जंतूंची पृथ्वीप्रदक्षिणा
By admin | Published: March 5, 2016 02:43 PM2016-03-05T14:43:01+5:302016-03-05T14:43:01+5:30
सोळाव्या शतकात अमेरिकेत पोहोचलेले पश्चिम आफ्रिकेतले गुलाम. बंगालमधून निघालेला कॉलरा. मध्य आफ्रिकेतल्या चिंपान्झींनी 70 वर्षापूर्वी बहाल केलेला एड्स. 2002 च्या सुमारास चीनच्या कोंबडीबाजारातून सुटलेला सार्स. 47 साली युगांडाच्या माकडाचा ङिाका. कोटय़वधी मृत्यूंची खैरात या जंतूंनी वाटली! पहिल्या महायुद्धात पावणोदोन कोटी माणसं मेली, मात्र एकटय़ा फ्लूनं दोन कोटी बळी घेतले! आता अंतरिक्षातले जंतू माणसाच्या पाठीवरून पृथ्वीप्रदक्षिणोची वाट बघताहेत!
Next
>-- डॉ. उज्ज्वला दळवी
गरोदरपणी साधा पुरळ उठला होता माझ्या अंगावर! त्याचा माङया बाळाला असा त्रस होईलसं वाटलंच नाही!’’
- ब्राझीलमधल्या आयांचा आक्रोश सध्या जगात घुमतो आहे. गरोदरपणी त्यांना ‘झिका’-विषाणूचा ताप आला आणि परिणामी अतिलहान डोकी आणि पोकळ मेंदू असलेली बाळं जन्मली.
तो झिका-विषाणू सत्तेचाळीस साली युगांडातल्या झिका नावाच्या माकडात सापडला होता. अडुसष्ट साली नायजेरियातल्या माणसांना त्याची लागण झाली. पुढल्या तीस वर्षांत माणसांबरोबर चालत, गाडीतून, जहाजांतून त्याची साथ विषुववृत्तालगतच्या आफ्रिका-आशियाई देशांत पसरली. दोन वर्षांपूर्वी तिचा सैरसपाटा विमानातून पॅसिफिक बेटांपर्यंत आणि गेल्यावर्षी मेक्सिकोत, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत पोचला. नवनव्या माणसांना चटावलेली ती आधुनिक मरीआई आता झपाटय़ाने पृथ्वीप्रदक्षिणा करते आहे. जगाचं धाबं दणाणलं आहे.
जागतिक प्रवासाचा वेग वाढल्यापासून माणसांच्या बरोबरीने रोगजंतूही सर्रास पृथ्वीप्रदक्षिणा करायला लागले. शिवाय अनेकवंशीय माणसांसोबत अनेक जातींचे जंतूही एकत्र येऊन एकमेकांचे गुणदोष उचलायला शिकले.
सोळाव्या शतकात अमेरिकेत आणि स्पेन-पोर्तुगालमध्ये पश्चिम आफ्रिकेतले गुलाम पोचले. त्यांच्यासोबत पीतज्वराचे, डेंगीचे जंतू आणि त्यांचे वाहक-डासही आयात झाले. ते डास जहाजांतल्या पाण्याच्या बुधल्यांतून पुढे त्रिखंडांत पोचले. मलेरियाचं मच्छरवाहन तर पोटातल्या जंतूंसकट विमानात बसून आफ्रिकेतून ब्राझीलला, युरोपला गेलं आणि ‘विमानतळ-मलेरिया’ नावाने ठाण मांडून बसलं! पीतज्वर, डेंगी, मेंदूज्वर आणि ङिाका विषाणूही वाहून नेणारे, बूचभर पाण्यातही सुखेनैव नांदणारे, दिवसाढवळ्या चावणारे, ‘इडिस’ जातीचे बहुप्रसव डास पार न्यूयॉर्क-वॉशिंग्टनपर्यंत पोचले आहेत. त्यांना पूर्वी थंडी सोसत नसे. आता गुणधर्म बदलून ते शीत कटिबंधातही मजेत राहायला सोकावले आहेत.
कॉल:याचं माहेरघर बंगाल. तिथून गेल्या 185 वर्षांत सात वेळा कॉलरा जगप्रवासाला निघाला. 1817त तो भारतीय बंदरांतून, ब्रिटिशांच्या जहाजांत बसून चीन-जपान-इंडोनेशियाला गेला. तिथून खुष्कीच्या मार्गाने रशियाला पोचला. 1830 मध्ये शोधमोहिमा, व्यापारी, सैनिक आणि विस्थापित यांच्यासंगे कॉल:याचे जंतू इंग्लंड-आयर्लंड, कॅनडा-अमेरिका, मेक्सिकोपर्यंत पोचले. 1831 मध्ये हजयात्रेचा मुहूर्त साधून कॉल:याने मक्केत मुक्काम ठोकला. तिथून 1912 पर्यंत चाळीस वेळा तो महासाथीच्या रूपात जगभर भटकला.
इन्फ्लुएंझाचा बहुरूपी जंतू सतत चेहरामोहरा बदलून माणसांच्या प्रतिकारशक्तीला चकवतो, शरीरात घुसतो आणि रोग पसरवतो. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला चीनमध्ये त्याने नवाच अवतार धारण केला. तो नवलाईचा जंतू व्यापारवाटांवरून स्पेनला पोचला. तिथे जगभरातले, देशोदेशींचे सैनिक ‘महा’युद्धात गुंतले होते. ‘क्षुल्लक’ जंतूकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नव्हता. युद्ध संपल्यावर सैनिक आपापल्या मायदेशी परतले. त्यांच्यासोबत पाहुणा जंतूही अनेक वेगवेगळ्या देशांत-गावांत जाऊन थडकला आणि पुढे मजल दरमजल करत दोन्ही ध्रुवांवरच नव्हे, तर अगदी महासागरांतल्या एकटय़ादुकटय़ा बेटांवरदेखील पोचला. महायुद्धात पावणोदोन कोटी माणसं मेली, तर त्या फ्लूच्या महासाथीने वर्षभरात पुरते दोन कोटी बळी घेतले!
1957 आणि पुन्हा 1968 मध्येही फ्लूने आपला तोंडवळा बदलला. त्या दोन्ही वेळच्या महासाथींनी विमानं, जहाजांतून प्रवास करत प्रत्येकी सहाच महिन्यांत जग पादाक्र ांत केलं आणि वर्षभरात हजारो बळी घेतले. 2क्क्8 मध्ये पक्षा-डुकरांच्या ‘अमानुष’ जंतूंशी संकर करून महाबली झालेला फ्लूचा जंतू 24 एप्रिलला मेक्सिकोहून निघाला. विमानप्रवासामुळे एका दिवसातच त्याची साथ अमेरिकेत, कॅनडातच नव्हे तर महासागरापार स्पेनपर्यंत पोचली. नऊ दिवसांत फ्लूच्या त्या वराहावताराने जग काबीज केलं. आठ-नऊ महिन्यांनी साथ ओसरेपर्यंत त्याने समग्र पृथ्वीतलावरचे सुमारे तीन लाख बळी घेतले.
एक्याण्णव साली अर्जेंटिनाहून निघालेलं एक विमान थोडावेळ लिमाला थांबून मग लॉस एंजेलिसला गेलं. लिमाला चढलेल्या काही प्रवाशांबरोबर कॉल:याचे जंतूही निघाले आणि त्यांनी 3क्क्क् मैलांवरच्या लॉस एंजेलिसमध्ये मोठी साथ फैलावली.
2क्क्2 च्या सुमाराला चीनमध्ये गँगडाँग शहरातल्या मटनकोंबडय़ांच्या बाजारातल्या कामगारांना सार्स हा श्वसनसंस्थेचा सांसर्गिक आजार त्या प्राण्यांकडून लागला. त्या शहरातला एक डॉक्टर एका रात्रीपुरताच हाँगकाँगच्या हॉटेलात राहिला. त्याच्याकडून त्या हॉटेलातल्या इतर सोळा प्रवाशांना त्या आजाराचा प्रसाद मिळाला. ते सोळाजण हाँगकाँग-सिंगापूर, टोरांटो, व्हिएतनाममध्ये भटकले आणि आठवडाभरात पंचखंडांतल्या 26 देशांतल्या 8क्क्क् माणसांना त्यांनी सार्सची खिरापत वाटली. जगभरातला प्रवास, व्यापार, सामाजिक स्थैर्य सारंच गडबडलं. दहा हजार कोटी डॉलर्सचं जागतिक नुकसान झालं. मृत्यू आठशेहून कमीच झाले, पण ज्याच्यासाठी प्रतिबंधक लस नाही, नेमके उपचार नाहीत असा सार्ससारखा नवलाईचा आजार एका देशाच्या हलगर्जीपणामुळे, हवाईमार्गाने कसा वायुवेगाने फैलावू शकतो त्याचा जगाला प्रत्यय आला. क्वारंटाईनचं, प्रतिबंधक लसींचं महत्त्व वाढलं.
आता अंतरिक्ष प्रवासाच्या प्रगतीमुळे परग्रहांवरच्या जंतूंची आयात व्हायची शक्यता भेडसावते आहे. मंगळावरची दगडमाती परीक्षणासाठी आणली तर तिच्यासोबत ‘अॅण्ड्रोमीडा स्ट्रेन’सारखे भलभलते जंतू येतील अशी जीवशास्त्रज्ञांना भीती आहे. अंतरिक्षातल्या वजनरहित अवस्थेत मानवाची प्रतिकारशक्ती घटते आणि त्याच ‘निर्वजनी’पणामुळे टायफॉईडसारख्या रोगजंतूंची आक्रमकशक्ती वाढते. त्यासाठी जंतुनाशकं फवारावी तर ती अंतरिक्षयानाच्या बंदिस्त निर्वात दालनांत साचून राहतात, अपायकारक ठरतात म्हणून ती तिथे वापरता येत नाहीत. त्यामुळे तिथल्या जंतूंचं फावतं. ते प्रबळ होतात. माणूसवाहू मंगळयानाच्या प्रदीर्घ यात्रेत तशा जंतूंचे भस्मासुर बनतील. ते अॅण्टिबायोटिक्सना दाद देणार नाहीत. तशा भयानक जंतूंनी भरलेले फुगे फोडून पृथ्वीवरचे आतंकवादी जगामध्ये ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करतील.
सध्याच्या आतंकवादाच्या काळात महासाथी टाळायच्या असल्या तर येत्या संकटाचा कानोसा घेऊन प्रतिबंधक लसटोचणी, कीटकनाशकं आणि योग्य उपचारांचा पुरवठा वेळीच करायला हवा. शिवाय जंतूंसाठी अहोरात्र टेहळणी चालू ठेवायला हवी आणि उवा-पिसवा-डासांचाही नायनाट करायला हवा. सागरी-हवाई-खुष्कीच्या सगळ्या मार्गांवर अहोरात्र सजग-सक्षम बंदोबस्त ठेवायला हवा. वणवा टाळायचा असला तर ठिणगी तर पडू देऊ नयेच, पण माजणा:या गवताचा बंदोबस्तही आधीपासूनच करायला हवा.
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)