बज्म...

By Admin | Published: February 19, 2016 06:17 PM2016-02-19T18:17:09+5:302016-02-19T18:17:09+5:30

ऋतूंचे सोहळे विलक्षण असतात. गुलाबी थंडीतील अलवार स्वप्नांचे दिवस आता कुठे बहरत असताना, अचानकच गिरक्या घेत कोसळणारे शुष्क पर्ण या स्वप्नांच्या

Badm ... | बज्म...

बज्म...

googlenewsNext

 पतझड़ में गिरते पत्ताें पर, 

तेरा नाम लिखकर चलते रहें..!
 
ऋतूंचे सोहळे विलक्षण असतात. गुलाबी थंडीतील अलवार स्वप्नांचे दिवस आता कुठे बहरत असताना, अचानकच गिरक्या घेत कोसळणारे शुष्क पर्ण या स्वप्नांच्या निर्माल्यात परावर्तीत होणारे क्षण ठळकपणो अधोरेखित करतात. लांबच लांब पांगत जाणा:या सावल्या एका अनामिक रुक्षतेने एकलेपणाची जाणीव आणखीच गहिरी करतात. दरवर्षी पतझड (पानगळ) सुरू झाली की स्वप्नांची फांदी-फांदी आपल्या डोळयांदेखत निष्पर्ण होत असते. ते बघून मनातल्या आठवणींचे हे काहूर शब्दात मांडताना तरुण शायर मलेकीन म्हणतो.
जिक्र उसका आज भी, 
मेरे होठों पर आता क्यों हैं
पलकों की हलचल में,
अक्स उसका लहराता क्यों हैं,
बह गए कितने ही पतझड वक्त की साजिश में,
पर दिल उसकी आरजू से 
आज भी बहल जाता क्यों है?
दु:ख पानगळीचे नसतेच मुळी. तरी एक अनामिक अस्वस्थता छळत असते मनाला. याचे कारण, या पानगळीचा संदर्भ तुटलेल्या स्वप्नांशी असतो. आपल्याच कैफात मार्गस्थ होतानाही शुष्क पानांचा सडा हटकून लक्ष वेधतो आणि या प्रवासात मागे सुटलेला ‘तो’ नजरेसमोर तरळून जातो. ही भावावस्था नाजनीन कशी विशद करतो पहा..
पतझड आती है, तो पत्ते टूट जाते है
नया साथ मिल जाए, तो पुराने छूटही जाते हैे
फिर पलट जाती हैं, सदियों सी सुहानी रातें
फिर तेरी याद में, जलने के जमाने आते हैं।
तळहाताच्या रेषा अवेळी बदलून अवघे भविष्यच वेगळ्या वळणावर जावे इतके तिमीरगर्भी आव्हानांचे झुंड; त्यात पानगळ सुरू होते आणि फांदीफांदीतून जाणवायला लागते खोडांची पानांपासून वेगळे होतानाची वेदना. पण काही कलंदर या वेदनेचेही शौकीन असतात. पानगळीतही नवसृजनाचे संकेत दडल्याचं सुंदर चित्रण अलिशा खान करतात..
जब जानना चाहूँ मैं खुद को
तब कोई पर्दा खुद से न रह जाये,
साल भर वक्त के तेवर देखूं
जब मेरे भी पत्ताें का रंग बदल जाये, 
तब मैं दिल से चाहता हूँ की 
मुझपर भी पतझड आये..
भयाण वाटणा:या पानगळीनंतरच तर हिरवी पालवी फुटत असते स्वप्नांच्या फांद्यांना. आणि शेवटी पतझड काय आणि बहार काय.. हे सर्व पाहणा:याच्या दृष्टीवर अवलंबून असते. कारण.
नजारा वैसाही आता हैं सामने 
जैसी अपनी नजर बन जाती हैं, 
मानो तो पतझड, नही तो बहारे आती हैं
क्योकी.. नजरेही तो बसंत 
और पतझड़ लाती है.
 
- शफी पठाण

Web Title: Badm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.