बैद्यनाथ

By admin | Published: May 8, 2016 12:14 AM2016-05-08T00:14:13+5:302016-05-08T00:14:13+5:30

नाकात सणसणत जाणारा हवनकुंडांमधला धूर, तो उग्र गंध, धुकं आणि धूर एकच होत गारठलेली आणि जडावलेली हवा आणि त्यासोबत चाललेले

Baidyanath | बैद्यनाथ

बैद्यनाथ

Next
>- सुधारक ओलवे
 
नाकात सणसणत जाणारा हवनकुंडांमधला धूर, तो उग्र गंध, धुकं आणि धूर एकच होत गारठलेली आणि जडावलेली हवा आणि त्यासोबत चाललेले मंत्रपठण या सा:यानं मंदिरातलं वातावरण भारून गेलं होतं. दर्शनासाठी महिलांची ही भली मोठी रांग. सगळ्यांच्या डोक्यावर पदर नाहीतर शाली, मळवट भरल्यासारखे भांगभर पसरलेले सिंदूर, हातात उदबत्त्या, फुलांच्या माळा आणि काही जणींच्या हातात तर कमंडलूही! दर्शनाला येणा:या हजारोंच्या गर्दीतलं हे एक रोजचं चित्र. श्रद्धेनं, शांतपणो उभं राहत किंवा जिथं जागा मिळेल तिथं बसून देवाचा धावा करणा:या माणसांचं हे एक जग :
बैद्यनाथ ज्योतिर्लिग.
भारतातल्या बारा ज्योतिर्लिगांपैकी हे एक अत्यंत पवित्र तीर्थस्थळ. झारखंडात उत्तरेला असलेलं. एका गारठलेल्या, धुक्यात हरवलेल्या भल्या सकाळी मंदिराच्या आवारात उभा होतो. तसं पाहता या राज्याची धार्मिक अशी काही फार ओळख नाही, फॅक्टरी आणि इंडस्ट्रींचं राज्य अशीच एक ओळख. देवघर नावाच्या छोटय़ा शहरात मालवाहू ट्रक्सच्या रांगाच जास्त दिसतात. मात्र या देवघरची एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की, रावणानं शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि अत्यंत शक्तिशाली बनण्यासाठी इथंच अत्यंत कठोर तपश्चर्या केली. इतकी कठोर की आपली दहा तोंडं शिवजीला अर्पण केली. त्या तपश्चर्येनं प्रसन्न होत भोळ्या सांबानं त्याला दर्शन दिलं आणि त्याला झालेल्या जखमाही ब:या केल्या. शिवजी इथं वैद्याच्या रूपात अवतरले म्हणून त्यांची ‘बैद्य’ अशी ओळख तयार झाली आणि मंदिराचं नामकरण झाल, बैद्यनाथ!
तसा मी काही धार्मिक नाही, पण फोटोजर्नलिस्ट म्हणून माझं काम मला आपल्या देशातल्या अनेक मोठय़ा मंदिरात घेऊन गेलं. प्राचीन भारतातल्या लोकसंस्कृती, लोककला, त्यातल्या आख्यायिका, त्यातली माणसं, रूपकांतून उलगडणा:या जीवनकहाण्या हे सारं त्यातून मला भेटत गेलं. मुख्य म्हणजे जगण्याला असलेलं एक आध्यात्मिक अस्तर या लोकसंस्कृतीत दिसतं. वर्तमानात जगतानाही इंद्रियेतर जगाची एक जाणीव या सा:यात दिसते.
 मी देवघरला पोहचलो. अमुकच फोटो काढायचे असं काही मनात नव्हतं. मी बरेच फोटो काढले, कुणी प्रार्थना करत होतं, कुणी डोळे मिटून हरवून गेलं होतं देवाचा धावा करण्यात. बैद्यनाथाचा प्रवास हा एक असामान्य, अद्भुत अनुभव होता. तिथं आलेली माणसं, त्यांच्या चेह:यावरची उत्कट, अतक्र्य श्रद्धा हे सारं पाहणं हाच एक अवर्णनीय अनुभव होता. आपल्या शारीरिक, भौतिक अस्तित्वापलीकडे काय असतं, असेल हे आपल्याला नाही सांगता येणार; पण त्या मंदिरात आलेल्या प्रत्येकाच्या मनात त्या सर्वोच्च, अभौतिक शक्तीची जाणीव होती. श्रद्धेला आशेची मिळणारी जोड हा या भूतलावरचा आपला एकमेव मित्र म्हणावा. किंवा तीच आपली गरज आहे. असंही म्हणावं लागेल!
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)

Web Title: Baidyanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.