बेम विंदो
By admin | Published: July 15, 2016 04:19 PM2016-07-15T16:19:33+5:302016-07-15T16:27:00+5:30
ऑलिम्पिकसाठी रिओची सैर करणा-यांमध्ये उत्सुकतेबरोबर थोडी काळजीही आहे. आपण ब्राझीलला जातोय.. तिथे खायचे-प्यायचे काय? बीचवर चो-या होतात, पर्यटकांना तर हटकून लुटतात; आपल्यावर ती वेळ आली तर?
Next
>
सुलक्षणा व-हाडकर
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
रिओ-डायरी!
रिओ दि जानेरिओला जाण्याच्या तयारीत अनेक मराठी घरांमध्ये बॅगा भरल्या जात आहेत. ऑलिम्पिकसाठी रिओची सैर करणा-यांमध्ये उत्सुकतेबरोबर थोडी काळजीही आहे. आपण ब्राझीलला जातोय.. तिथे खायचे-प्यायचे काय? बीचवर चो-या होतात, पर्यटकांना तर हटकून लुटतात; आपल्यावर ती वेळ आली तर?
- रिओला जाण्याच्या तयारीत असलेल्या आणि इथूनच ऑलिम्पिकचा थरार अनुभवू इच्छिणा:या प्रत्येकासाठी या अंकापासून थेट ऑलिम्पिक संपेर्पयत चालणारी ही रिओ -डायरी!
सध्या माझा इनबॉक्स वेगवेगळ्या प्रश्नांनी, शंकांनी भरून वाहतो आहे.
नागपूरहून कुणीतरी विचारतंय, की रिओमध्ये आपलं भारतीय नाही, पण त्याच्या जवळपास जाणारं जेवण मिळेल का? आणि व्हेजिटेरियन असलेल्यांचं काय?
पुण्याच्या एका मावशींना रिओमध्ये कपडे कुठले घालावे असा प्रश्न पडला आहे.
कर्ज काढून महागाची तिकिटे खरेदी केलेल्या गोंदियातल्या एका तरुण मित्रला रिओमध्ये स्वस्तातलं पण पोटभरीचं जेवण (म्हणजे आपल्या भेळपुरीसारखं काही) मिळेल का, याची चिंता पडली आहे. कुणाला इथल्या हवामानाची माहिती हवी आहे, तर कुणाला रिओमधल्या चोरीमारीची भीती वाटतेय.
- हे सगळे आहेत ऑलिम्पिकचा सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी रिओच्या दिशेने निघालेले भारतीय सुहृद!!!
त्यांना ‘लोकमत’मधून माझी ओळख झाली आहे आणि मी त्यांची रिओमधली स्थानिक पालकच बनले आहे. ही सगळी मंडळी येत्या काही दिवसांतच रिओमध्ये पोचतील. या सगळ्यांसाठी मी एक मेजवानी ठेवली आहे माङया घरी, तेव्हाच सगळे प्रत्यक्ष भेटतील मला..
आणि मग आम्ही थेट ऑलिम्पिकच्या स्टेडियममध्येच भेटू. मी तिथे असेन ती स्वयंसेवकांच्या फळीतली एक प्रमुख व्यक्ती म्हणून!
गेली दोन र्वष मी रिओमध्ये राहते आहे. या शहराला ऑलिम्पिकची तोरणो लागत असताना, इथे घडणा:या घडामोडींची स्टेडियमबाहेरची खबर माङया मातृभूमीतल्या प्रियजनांर्पयत पोचवण्याच्या प्रयत्नांचा आज प्रारंभ करते आहे..
ऑलिम्पिकमुळे रिओ शहर एकदम चर्चेत आले आहे. रिओ-द-जानेरो असे नाव असलेल्या या शहराला इथे रिओ म्हणत नाहीत, तर हिओ असे म्हणतात. म्हणजे ‘र’चा इथे ‘ह’ होतो. तर हिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत.
हे शहर जरा वेगळे आहे. म्हणजे थोडे सांस्कृतिक धक्के देणारे ! तशात भारतीय नजरेच्या आणि मनांच्या वाटय़ाला जरा जास्त धक्के येऊ शकतात.
इथे येणा:या प्रत्येकाने त्याची तयारी ठेवावी आणि आपले प्रिय चष्मे उतरवून, जरा ‘मोकळ्या’ मनाने इथे यावे; हे माङो अनुभवाचे सांगणो आहे!
अत्यंत सुंदर समुद्रकिनारे, नेत्रसुखद सूर्योदय, सूर्यास्त आणि विस्तीर्ण पसरलेल्या वाळूवर भरलेली सुंदर, देखण्या स्त्री-पुरुषांची आनंदी जत्र : हा रिओचा चेहरा!
इथे एक दंतकथा आहे. असे म्हणतात, पूर्ण जग बनायला सात दिवस लागले आणि मग आठव्या दिवशी निवांतपणो देवाने रिओ जन्माला घातले. या शहराचे सौंदर्य पाहताना याचा प्रत्यय येतोच येतो. लांबच लांब पसरलेले किनारे, स्वच्छ सोनेरी वाळू, मोरपंखी पाणी, सहाफुटी लाटा, आणि अलगद खाली येणारे ढग. विमान जेव्हा रिओ शहरात लँडिंग करते तेव्हा हे दृश्य नेहमी दिसते. समुद्रकिना:याला लागून इथे धावपट्टी आहे. आपल्याला भास होतो की विमान पाण्यावरून तरंगत जातेय आणि किना:याला लागतेय. ढगसुद्धा इतके चुकार की विमानाच्या खिडकीतून तुम्हाला ढगांची दुलई दिसते. अगदी डोंगराच्या आजूबाजूला ढगांचे कडे दिसते.
चित्र काढल्यासारखे निसर्गसौंदर्य असलेल्या या शहरात काय नाही? कालवा आहे, धबधबे आहेत, म्युङिायम्स आहेत, असंख्य टेकडय़ा आहेत, टेकडय़ांवर गरिबांची घरे आहेत, ब्राझीलचा मियामी परिसर म्हणजे ‘बाहा दि तिजुका’ आहे. तब्बल 18 किमी लांब पसरलेला हा परिसर अगदी आखीव रेखीव आहे. येथेच ऑलिम्पिक सामने होणार आहेत. म्हणजे 6क् टक्के सामने बाहामध्ये होणार आहेत.
पर्यटकांसाठी आकर्षण असणा:या गोष्टी, ठिकाणो तर इथे आहेतच; त्यापलीकडेही या शहराची एक ओळख आहे.. आणि ती इथे येणा:या प्रत्येकाला नाही म्हटले तरी जरा दचकवतेच!
असे म्हणतात, अंडरवर्ल्ड नामक काळ्या व्यवहारांच्या जगात ब्राझीलच्या पासपोर्टला सर्वात जास्त मागणी असते. कारण इथे कोणत्याही रंगाचे, वंशाचे, देशाचे लोक ब्राझीलिअन होऊ शकतात. मेल्टिंग पॉट हा शब्द मला ब्राझीलसाठीच सर्वात योग्य वाटतो. जपानी, इटालियन, ज्यू, चिनी, पोलिश, जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश, रशियन आणि इतर अनेक देशांचे नागरिक या ना त्या कारणांमुळे इथे येऊन स्थायिक झालेले आहेत. येताना त्यांच्या त्यांच्या संस्कृतीला घेऊन आले आणि इथल्या संस्कृतीला आपलेसे केले.
त्यामुळे तुम्ही पर्यटक म्हणून इथे आलात तर तुम्हाला परके वाटणार नाही. रिओ शहर तुमचे स्वागतच करेल. ऑलिम्पिकचे सामने पाहण्यासाठी इथे येणारा प्रत्येक माणूस स्टेडियमबाहेरच्या रिओच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की! - पण इथे शहरात फिरता-राहता-वावरता आणि खातापिताना पाळायचे काही संकेत आहेत. ते लक्षात घेणो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करण्याने ऑलिम्पिक-पर्यटकांचे इथले वास्तव्य सुखाचे होऊ शकेल. म्हणून रिओ डायरीची सुरुवातच या ठोकताळ्यांनी करू!!
- म्हणजे रिओला येण्याच्या तयारीत असलेल्यांना बॅगेत काय काय भरायचे हे ठरवायला मदत होईल; आणि जे टीव्हीवरच ऑलिम्पिकचा आनंद लुटायला सज्ज होत आहेत त्यांना घरबसल्या रिओची सैर घडेल!!
- तेव्हा, बेम विंदो!
म्हणजे, वेलकम! सुस्वागतम!!
रिओला जाताय?
कपडे कुठले, किती न्यावे?
- हा ‘चान्स’ घ्याच!
आपण भारतीय रंगाने ब्राझीलिअन लोकांच्यात मिसळणारेच आहोत, हा एक फायदा! मात्र इथल्या स्थानिक लोकांकडे जो फिटनेस आहे तो आपल्याकडे नसतो, हे पक्के लक्षात ठेवावे. अर्थात, त्यांच्यासारखा पेहराव केला, तर गर्दीत मिसळून जाणो सोपे होईल. त्याकरता काही गोष्टी लक्षात ठेवा.
भारतात फार लोकप्रिय असलेला चौकटीचा शर्ट इथे ‘जुनीना’ या शेतक:यांच्या सणाला घातला जातो. त्याला शहरी संस्कृतीत फार स्थान नाही. त्यामुळे चौकडीचे शर्ट टाळा. रिओला येताना फंकी टीशर्ट आणलेत तर बरे. मात्र गोव्यामध्ये असतात तसे फुलाफुलांचे शर्ट नको. ते घातलेत तर लगेच समजेल की तुम्ही पर्यटक आहात आणि तुमच्याकडे पैसे आहेत. त्यामुळे लूटमार होण्याची शक्यता जास्त. त्यापेक्षा बिन बाह्यांचे टी शर्ट्स घातलेत तर ते इथे गर्दीत मिसळणो सोपे.
गडद रंगाचे कपडे, बम्यरुडा इथे जास्त वापरल्या जातात. कॅप्स घातल्या जातात. खूप फॉर्मल्स कपडे कुणी घालत नाही. लेदर शूज सहसा नसतात. हवाई स्लीपर्स आणि स्पोर्ट्स शूज असतात.
फिरताना कुणी महागडी घडय़ाळे घालत नाही. गळ्यात सोन्याची लॉकेट्स नसतात. म्हणजे महाग असे काहीच अंगावर घालायचे नाही. हातात अंगठी नको.
स्त्रियांसाठी एक सूचना म्हणजे साडी किंवा सलवार कुर्ता घालून रिओच्या रस्त्यावर जाणो टाळावे. आपल्याकडे घातल्या जाणा:या जीन्सऐवजी थोडय़ा फंकी जीन्स असल्या तर उत्तम. इथे खूप घट्ट कपडे घातले जातात.
म्हणजे लेगिंग्स किंवा जेगिंग्स.
अर्थात प्रिंट असायला पाहिजे, आकर्षक.
खूप मळकट रंग नको. इंद्रधनुष्याचे रंग असावेत.
घट्ट टी शर्ट, फ्रॉक्स, स्कर्ट्स आणि शॉर्ट्स हे इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पेहराव आहेत. ज्यांना ‘असे’ कपडे वापरून पाहण्याची हौस असेल, त्यांना रिओसारखा दुसरा चान्स मिळणो कठीण!
इथे स्त्रिया खूप मेकअप करतात. खूप सनस्क्रीन, लिपस्टिक लावतात. मोठे कानातले घालतात. उंच टाचांच्या चपला वापरतात.
पर्यटक म्हणून रिओमध्ये येताना हे लक्षात घेऊन पेहराव करणो केव्हाही उत्तम!
केसांना रंग देणो. ते मोकळे सोडणो ही इथली फॅशन आहे.
खायचे-प्यायचे काय?
चौसष्ट किलो सामानातून न्या गव्हाचे पीठ आणि तूरडाळ
ऑलिम्पिक सामन्यांचे वार्ताकन करण्यासाठी रिओमध्ये येणा-या माझ्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्नांच्या याद्या पाठवल्या आहेत. त्यात सगळ्यात कॉमन प्रश्न आहेत ते खाण्यापिण्याबाबतचे.
अनेकजण दीर्घ मुक्कामासाठी रिओला येत आहेत. त्यांच्या राहण्याच्या (स्वस्त) ठिकाणी स्वयंपाक करण्याची सोय आहे. स्वत: रांधून खाणो हा इथे उत्तम आणि तुलनेने स्वस्त पर्याय आहे. ब्राझीलमध्ये येताना 32 किलोच्या दोन बॅगा आणता येतात. त्यामुळे काही गोष्टी न विसरता सामानात टाका :
इथे आपल्यासारखे पूर्ण गव्हाचे पीठ मिळत नाही. मैदा आणि कोंडा एकत्र करून पोळ्यांसाठी वापरला जातो. तेही गरम गरम पाण्यात पीठ भिजवावे लागते. आणि लगेच पोळ्या कराव्या लागतात. इथल्या पिठात बेकिंग पावडर टाकलेली असते. त्यामुळे जे कुणी राहत्या ठिकाणी स्वयंपाक करू शकणार असतील, त्यांनी पोळ्यांसाठी पीठ जरूर आणावे.
इथे तूरडाळ, मटकी, हिरवे मूग, उडीद मिळत नाही. राजमा, छोले, सगळ्या चवळी, मका, सोयाबीन, मसूर, तांदूळ हे सर्व मुबलक असते. वरणाची सवय असेल, तर तूरडाळीची पिशवी आणणो उत्तम.
सुपर मार्केटमध्ये हळद, लाल तिखट मिळेल, गरम मसाला मिळेल. अगदी लहान पुडय़ांमध्ये. किंमत म्हणाल तर दहा ग्रॅमसाठी 8क् रुपये. त्यामुळे हे मसाले बरोबर आणणो योग्य.
दूध प्रचंड महाग आहे. मिल्क पावडर, चहाची पावडर सामानात आणणो कधीही चांगले.
भाज्यांमध्ये इथे कोबी, फ्लॉवर, भेंडी (कियाबो), कोथिंबीर (क्वेंत्रो), मिरच्या (पिमेन्ता), लसूण, आले, पालक (इस्पिनाफ्रे), शेपू, भोपळा, टोमॅटो, बटाटा, कांदे, वांगी, सिमला मिरची, गाजर, फरसबी असे बरेच काही मिळते. फळांमध्येसुद्धा अनेक प्रकार दिसतात.
नारळ आपल्यासारखा मिळतो. नारळाचा कीसही ताजा ताजा मिळतो. नारळाचे दूध मिळते. शेंगदाणो मिळतात. सोलून, भाजलेले, खारे शेंगदाणो सगळीकडे मिळतात. अगदी समुद्रकिनारी कागदाच्या पुडीत. मुंबईत जसे असतात तसेही.
अंडी, चिकन ज्याला फ्रँगो म्हणतात, मासे म्हणजे पेश्ये, कोळंबी, सॅल्मोन, तेलापिया, नामुरादा, खेकडे, कालवे, तिस:या, बांगडे अशी खूप विविधता इथे आहे.
ब्रेडचे प्रकार खूप आहेत.
ऑलिम्पिकसाठी जवळपास महिनाभर तुम्ही जिथे राहणार तिथे स्वयंपाक रांधणार नसलात, आणि खिसा गरम असेल; तर रिओमध्ये तुमच्या जिभेचे भरपूर लाड होऊ शकतील.
पोटभरीचा पदार्थ म्हणजे पास्तेल आणि उसाचा रस.. रिओच्या रस्त्यांवरल्या या खाद्ययात्रेबद्द्ल पुढच्या रविवारी!
लूटमार आणि सुरक्षा
कामा कामा..
रिओमधल्या ऑलिम्पिक इतकीच इथल्या गुन्हेगारीचीही मोठी चर्चा सध्या जगभरात सर्वत्रच चालू आहे. त्यात अतिशयोक्ती फारशी नाही. रिओमध्ये रस्त्यावरच्या मारामा:या अणि लूटमार नवीन नाहीत.
त्यातून खिशात पैसे घेऊन येणारे पर्यटक हे तर अशा पाकीटमारांचे मोठे लक्ष्य ठरणार, हे नक्कीच! इथल्या सुरक्षा यंत्रणांच्या क्षमतेवरही मोठमोठी प्रश्नचिन्हं सध्या लावली जात आहेत. रिओ शहरात पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणांनी न मिळालेल्या पगाराच्या निषेधार्थ मोठी निदर्शनं करून ‘रिओमध्ये येताय? तर मग तुम्ही सुरक्षित नाही’ असा थेट इशाराच पर्यटकांना दिला आहे. अशा परिस्थितीत इथे येणा:यांनी अधिकची काळजी बाळगणं अत्यावश्यक आहे. काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा :
रिओमध्ये गुन्ह्यांची एक पद्धत आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन तुमच्याकडे येतो. तुमच्याकडे असलेले मोबाइल्स, अंगठय़ा, पाकीट, महाग वस्तू सर्व मागतो. लोक खाली मानेने, नजरेला नजर न देता हे देऊन टाकतात. त्यांना प्रतिकार करायचा नसतो. कारण त्यांना फक्त तुमच्या वस्तू हव्या असतात. ते जीव घेत नाहीत. जर प्रतिकार केला तर मात्र प्राणाशी गाठ! त्यामुळे अशी वेळ आलीच, तर ‘कामा कामा’ असे म्हणून म्हणजे शांत हो, शांत हो. असे म्हणत गुन्हेगाराला वस्तू देऊन टाकाव्या, हा इथला साधा नियम आहे.
मुळात खूप महागडय़ा वस्तू घेऊन कुणी बाहेर पडत नाही. मोबाइल घेऊन, हेडफोन्स कानाला लावून बाहेर जात नाहीत. ही काही पथ्ये पाळली तर त्रस होणार नाही. इथे एटीएम मशीनमधून एकदम खूप पैसे काढता येत नाहीत. कारण त्याच्या आसपास गुन्हा होण्याची शक्यता असते.
सोन्याचे, हि:याचे, मोत्याचे कानातलेसुद्धा नकोच. अशी कोणतीही वस्तू नको ज्याच्यामुळे तुम्ही टार्गेट होऊ शकता. पर्ससुद्धा जास्त महाग बाळगू नये. खूप महागडा कॅमेरा असेल तर सारखा सारखा बाहेर काढून टार्गेट बनू नये.
इथले चोर समुद्रकिनारी धावण्यात तरबेज असतात. रेतीवर धावण्यात त्यांचा हात कुणी पकडू शकत नाही. बीच पोलीस असतात; पण हिसकावली गेलेली, चोरीला गेलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता कमी असते.
गरीब आणि श्रीमंत यात प्रचंड दरी असल्यामुळे या शहरात अशा पद्धतीने लूटमार होते. पण यात जीव घेतला जात नाही. हे शहर स्त्रियांसाठी असुरक्षित
नाही.
भाषा
स्थानिकांशी बोलताना..
1. बोअन जिया - गुड मॉर्निग.
2. बोआ तारजे - गुड आफ्टरनून
3. बोआ नॉईचे - गुड नाइट
4. ओयि - हॅल्लो, एसक्यूज मी
5. ओला - फॉर्मल हॅलो
6. कोमो वाय - कसंय, कसं चाललंय
7. तूदो बेम - सगळे ठीक?
हा प्रश्न विचारला तर उत्तर आहे तू दो बोम.
8. सिम - हो
9. नाव - नो
10. पोर फावर - प्लीज
11. कॉम लिसेन्सा - एसक्यूज मी
12. दिसकूपे - सॉरी
13. ओब्रिगादा / दो - धन्यवाद. बाई असेल तर आकारांत आणि पुरुष असेल तर ओकारान्त.
14. लेगाव - कूल, मस्त
15. नोसा - वॉव
16. कराम्बा - डॅम इट
17. मई - आई
18. पपय, पई - वडील
19. प्राया - समुद्रकिनारा
20. अग्वा - पाणी
21. चाव चाव - (चहातील च) बाय बाय