फसव्या मेल, कॉल्सपासून सावधान
By admin | Published: October 8, 2016 02:10 PM2016-10-08T14:10:18+5:302016-10-08T14:10:18+5:30
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा!
Next
US VISA मदत खिडकी : पाच
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!
अमेरिकेतल्या एका कंपनीकडून मला एक ईमेल आला आहे. ही कंपनी मला नोकरी देऊ करते आहे, पण व्हिसाची प्रोसेस करण्यासाठी कंपनी माझ्याकडून मोठी फी मागत आहे. व्हिसा लवकर मिळण्यासाठी जादा फी द्यावी लागते का?
- अजिबात नाही. मुळात अशी आॅफर करणं हेच कायद्याच्या विरुद्ध आहे. हल्ली असे फसवे मेल येण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. हे संशयास्पद ईमेल अशा प्रकारच्या ‘आॅफर’ देतात की त्या जणू खऱ्याच वाटाव्यात. पण अशा फसव्या मेल्सना बळी पडू नये.
खरंतर काही मूलभूत गोष्टींकडे बारकाईनं लक्ष पुरवलं तर जादा पैशांच्या मोबदल्यात पटकन व्हिसा देऊ करणारे ईमेल कसे खोटे आहेत हे पटकन ओळखता येतं. व्हिसाच्या बाबतीत पहिला नियम म्हणजे ज्या व्यक्तीने व्हिसासाठी अर्ज केला आहे, त्याला व्हिसा मिळण्याआधी वकिलातीत स्वत: मुलाखतीला यावं लागतं. या नियमाला बगल देताच येत नाही. तरीही कोणी ईमेल करून जादा पैसे भरा आणि व्हिसा पटकन मिळवा असं म्हणत असेल तर ती शुद्ध फसवणूक आहे. दुसरा नियम म्हणजे मुलाखतीच्या आधीच आपल्याला व्हिसा मिळेल अशी खात्री अमेरिका दूतावासातील किंवा वकिलातीतील कोणीही, कोणत्याही परिस्थितीत देऊ शकत नाही. अशी खात्री जर कोणी ठामठोकपणे देत असेल तर ती फसवणूक आहे, यात काहीतरी गडबड नक्कीच आहे असे समजा.
सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे अमेरिकेच्या व्हिसासाठीची फी ही अमेरिकी सरकार ठरवत असते. व्हिसाच्या वर्गीकरणानुसार ती फी ठरत असते. आणि त्यात लवकरात लवकर व्हिसा मिळण्यासाठी अमुक तमुक जादा फी अशी कोणतीही तरतूद नसते. अमेरिकेच्या व्हिसासाठीची फी, ती फी भरण्याची पद्धत याविषयीची माहिती आॅनलाइनही मिळते. ttp://www.ustraveldocs.com/in/. या वेबसाइटवर ही माहिती मिळू शकते.
जे नियम फसव्या ईमेलच्या बाबतीत लागू पडतात तेच नियम फसव्या फोन कॉल्सलाही लागू पडतात. जो कोणी फोन करून स्वत:ला अमेरिकेच्या दूतावासातून किंवा वकिलातीतून बोलतो आहे असं म्ह्णून जलद व्हिसा मिळण्यासाठी अमुक एक रक्कम भरा असं म्हणत असेल तर ती आपली फसवणूक करते आहे हे लक्षात घ्या. कोणी असे फोन करीत असेल किंवा मुख्य प्रकिया डावलून काहीतरी फसवे दावे कोणी करत असेल तर त्यांच्याविरुद्ध सरळ स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवा. त्या एफआयआरची प्रत मुंबई येथील अमेरिकी वकिलातीला खालील आयडीवर मेल करा. mumbai_visa_fraud@state.gov

अधिक माहितीसाठी वेबसाइट :
http://www.ustraveldocs.com/in
व्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :
support-india@ustraveldocs.com