रेल गाडी झुक झुक झुक..

By Admin | Published: April 9, 2016 02:31 PM2016-04-09T14:31:55+5:302016-04-09T14:31:55+5:30

वाफेची इंजिन्स मागे पडली आणि झुक झुक करत धावणा:या रेल्वेगाडय़ाही आपोआप बंद झाल्या. मात्र या गाडय़ांची आठवण करून देणा:या काही रेल्वे अजूनही आपल्याकडे आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात हिल स्टेशनला जात असाल तर तिथल्या रेलगाडीचा अनुभव मुलाबाळांसह घ्यायलाच हवा.

Bend the train to bend .. | रेल गाडी झुक झुक झुक..

रेल गाडी झुक झुक झुक..

googlenewsNext
>मकरंद जोशी
 
रेल गाडी झुक झुक झुक झुक, बीचवाले स्टेशन बोले रु क रु क रु क..’
दादामुनी अशोककुमारच्या खास ढंगातल्या या गाण्यातली ती झुक झुक करत धावणारी रेल्वेगाडी, वाफेची इंजिन्स मागे पडल्यावर आपोआप बंद झाली. मात्र त्या झुक झुक गाडीची आठवण करून देणा:या काही रेल्वे आजही भारतात आहेत. ‘इंडियन माउंटन रेल्वे’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि भारतातल्या प्रसिद्ध हिल स्टेशनची वारी घडवणा:या या रेलगाडय़ांची सफर हा घ्यायलाच हवा असा अनुभव आहे. टॉय ट्रेन म्हणूनही ओळखल्या जाणा:या या गाडय़ा म्हणजे ‘दाजिर्लिंग हिमालयन रेल्वे’, ‘निलगिरी माउंटन रेल्वे’, ‘कालका-शिमला रेल्वे’ आणि ‘माथेरान हिल रेल्वे’. या गाडय़ांचा प्रवास जसा मजेदार आहे, तितकाच त्यांचा इतिहासही रंजक आहे.
दाजिर्लिंगचा रेल्वेमार्ग मार्गी लागल्यानंतर ब्रिटिशांनी दक्षिण भारतातील निलगिरी माउंटन रेल्वेकडे मोर्चा वळवला. 1854 साली प्रस्तावित झालेला हा रेल्वेमार्ग सुरू व्हायला 19क्8 साल उजाडावे लागले. मेट्टूपलायम ते उदकमंडलम (उटी) असे 26 किलोमीटरचे अंतर कापताना या रेल्वेमार्गावर 16 बोगदे आणि 25क् पूल लागतात. हा रेल्वेमार्ग उभारणो जिकिरीचे होते. कारण या मार्गावर आपण 1क्7क् फुटांवरून 7228 फुटांची उंची गाठतो. स्वातंत्र्यपूर्व काळात मद्रास रेल्वेकडून चालवण्यात येणा:या मार्गावर जी वाफेची इंजिन्स वापरली जात ती ‘एक्स क्लास स्टीम लोकोमोटिव्ह’ श्रेणीतली असून, ती स्वित्झर्लंडमधल्या कंपनीने बनवलेली होती. या रेल्वेमार्गाचा वापर प्रामुख्याने दाक्षिणात्य सिनेमांच्या शूटिंगसाठी होत असला, तरी शाहरु ख खानच्या ‘दिल से’मधील ‘छैया छैया’ या गाण्याचे शूटिंग निलगिरी माउंटन रेल्वेच्या टपावर करण्यात आल्याने, या मार्गाचे अनोखे दर्शन भारतभरात आणि जगभरातल्या सिनेशौकिनांना झाले. दाजिर्लिंग हिमालयन रेल्वेबरोबरच या निलगिरी माउंटन रेल्वेचा समावेशही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशमधील शिमला म्हणजे ब्रिटिशांचं लाडकं ठिकाण. नेपाळचा पराभव करून हा भाग ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांनी शिमला ख:या अर्थानं वसवलं. पुढे 1864 साली दिल्लीचा उन्हाळा सोसेना म्हणून समर कॅपिटलचा दर्जा देऊन व्हॉइसरॉय साहेबांपासून सगळे ब्रिटिश शासन उन्हाळ्यात शिमल्यालाच तळ ठोकू लागले. दिल्ली ते कालका हा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग 1891 सालीच सुरू झाला होता. कालका-शिमला या कामाचा गृहीत धरलेला अंदाजे खर्च होता रु . 86,78,5क्क्/-. पण प्रत्यक्षात हा खर्च दुप्पट झाला. हा 96 कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग 9 नोव्हेंबर 19क्3 रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. हिमालयातल्या शिवालिक पर्वतरांगेच्या कुशीतून वळसे आणि वळणो घेत जाणा:या या रेल्वेचा प्रवास हेच एक साइट सिइंग आहे. हा रेल्वेमार्ग सुरू झाला तेव्हा त्यावर एकूण 1क्7 बोगदे होते, आता त्यातले 1क्2 वापरात आहेत. या बोगद्यांमधला सर्वात लांब बोगदा आहे बारोगचा. 89क् फूट लांबीच्या या बोगद्याची कथा (दंतकथा?) आजही सांगितली जाते. हा बोगदा खोदणा:या इंजिनिअर कर्नल बारोगने दोन्ही बाजूंनी एकाचवेळी बोगदा खणायला सुरुवात केली. पण काहीतरी चूक झाली आणि दोन्ही टोके मिळाली नाहीत. त्याबद्दल त्याला प्रतीकात्मक एक रुपयाचा दंड झाला. पण आपल्या हातून अशी चूक झालीच कशी या शरमेनं खचलेल्या कर्नल बारोगने त्या अर्धवट बोगद्यात आत्महत्त्या केली. पुढे चिफ इंजिनिअर हर्लिगटन याने भाल्कू नावाच्या साधूच्या मदतीने बोगदा पूर्ण केला. 2152 फुटांवर आपला प्रवास सुरू करणारा हा रेल्वेमार्ग 6811 फुटांवर येऊन थांबतो. या मार्गावर 864 पूल आहेत, त्यातील काही मल्टी आर्चर्ड म्हणजे बहुकमानींचे आहेत. शिवालिक एक्स्प्रेस, कालका-शिमला एक्स्प्रेस, हिमालयन क्वीन, कालका-शिमला पॅसेंजर अशा गाडय़ा या मार्गावर धावतात.  
या हिल रेल्वेंच्या माळेतलीच पण युनेस्कोच्या वारसा यादीत अजून स्थान न मिळालेली रेल्वे म्हणजे नेरळ-माथेरान रेल्वे. 19क्4 ते क्7 या काळात आदमजी पिरभॉय यांनी सोळा लाख रु पये खर्चून हा रेल्वेमार्ग बनवला. या टॉय ट्रेनमुळे मुंबई आणि पुणोकरांना अगदी जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पोहोचण्याची छान सोय झाली. नेरळ ते माथेरान असा पूर्ण प्रवास करणो शक्य नसेल तर अमन लॉज ते माथेरान असा छोटासा प्रवास जरूर करावा. 2क् किलोमीटरचे अंतर पार करणा:या या रेल्वेमार्गावर एकच बोगदा आहे, ज्याला पर्यटकांनी ‘वन किस टनेल’ असे खटय़ाळ नाव दिले आहे.
या सगळ्या हिल रेल्वेंच्या यादीत उशिरा येऊ घातलेली, पण या सगळ्यांना भारी ठरणारी रेल्वे असेल काश्मीरमधली. ती पूर्ण होईपर्यंत यांचा तर आनंद घेऊया. तर मग दाजिर्लिंगला जाताना किंवा शिमल्याची सफर करताना नाहीतर उटीला गेल्यावर तिथल्या टॉय ट्रेनचा अनुभव घ्यायला विसरू नका.
 
सन 1844 मध्ये भारताचे तत्कालीन ब्रिटिश व्हॉइसरॉय सर जॉन लॉरेन्स यांनी संरक्षणाच्या दृष्टीने भारताच्या पहाडी इलाक्यांमध्ये रेल्वेमार्ग सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार सर्वात आधी 1878 साली कलकत्ता आणि सिलिगुडीदरम्यान रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला. नंतर पुढील टप्प्यासाठी सिलिगुडी ते दाजिर्लिंग अशी टॉय ट्रेन 1881 साली सुरू झाली. या रेल्वेमार्गाचे वैशिष्टय़ म्हणजे खडी चढण चढणो रेल्वे इंजिनाला सोपे जावे म्हणून या मार्गावर लूप्स आणि इंग्रजी ङोड आकाराचे रिव्हर्स बनवण्यात आले आहेत. यातला सगळ्यात प्रसिद्ध आहे ‘बतासिया लूप’. दाजिर्लिंगच्या आधी पाच किलोमीटरवर हे 
चक्र ाकार वळण आहे. याच ठिकाणी भारतीय सैन्यातल्या गोरखा रेजिमेंटच्या शहीद जवानांना मानवंदना देणारे स्मारकही आहे. नॅशनल हायवे नं. 55 ला समांतर धावणारी ही रेल्वे लोकांच्या नजरेत आली ती ‘आराधना’मधल्या राजेश-शर्मिलाच्या ‘मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू’ या गाण्यामुळे. रणबीर कपूरच्या ‘बर्फी’मध्येही या टॉय ट्रेनचं दर्शन घडतं. 1999 साली युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत समाविष्ट झालेल्या या रेल्वेमार्गाचे जतन करण्यासाठी दाजिर्लिंग हिमालयन रेल्वे सोसायटी नावाची संस्था कार्यरत आहे.
 
makarandvj@gmail.com

Web Title: Bend the train to bend ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.