मैदानाबाहेर जमलेल्या पागल ‘खेळाडूं’च्या सैन्याच्या वेडय़ा कहाण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:04 PM2019-06-09T14:04:32+5:302019-06-09T14:06:43+5:30

भारत आर्मी -‘बी द ट्वेल्थ मॅन/वुमन ऑन द फिल्ड! #वीनलूजड्रॉ!’

Bharat army- story of crazy India fans. | मैदानाबाहेर जमलेल्या पागल ‘खेळाडूं’च्या सैन्याच्या वेडय़ा कहाण्या

मैदानाबाहेर जमलेल्या पागल ‘खेळाडूं’च्या सैन्याच्या वेडय़ा कहाण्या

Next

-अनन्या भारद्वाज

तसे आपण काही थेट संघात नसतोच. 
आपण म्हणजे? सामान्य क्रिकेट चाहते. मात्र त्यांनी ठरवलं की आपण प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही ना? ना सही. आपण बारावा गडी तर होऊ शकतो? म्हणून तर त्यांची थीमच आहे, संघनिष्ठा. आणि कॅच लाइन आहे, ‘बी द ट्वेल्थ मॅन/वुमन ऑन द फिल्ड! वीनलूजड्रॉ!’ 
ते कोण?
त्यांचं नाव भारत आर्मी. म्हणजे भारतीय क्रिकेटच्या पाठीराख्यांची अशी एक फौज जी जिवाच्या आकांतानं आपल्या संघाला ‘सपोर्ट’ करते. आपल्या क्रिकेटच्या दिवानगीखातर जगभरात जिथं जिथं भारतीय संघाचे सामने असतील तिथं तिथं जाते. या ग्रुपचं नाव भारत आर्मी. आजच्या घडीला त्यांचे 60 हजारच्या आसपास फॉलोअर्स आहेत आणि ते जगभरात पसरलेले आहेत. भारतातही आहेत. भारतीय संघाचे सामने पहायला जायचं, तिथं एन्जॉय करत आपल्या संघाचं मनोबल वाढवायचं, मैदानात आपण खेळत नाही; पण स्टेडिअम दणादणून सोडायचं अशी ‘बेखुदी’ची अवस्था पुरेपूर जगून घेणारी क्रिकेट जगणारी ही आर्मी आहे.
1999च्या वर्ल्डकपच्या सामन्यात राकेश पटेल, सुख निजार, शाय टँक आणि हार्वे मॅन हे चार ब्रिटिश भारतीय मॅच पहायला गेलेले होते. स्वतंत्रपणे. तिथं इंग्लंडच्या पाठीराख्यांची बर्मी आर्मी म्हणजेच काही शे माणसं आपल्या संघाला पाठबळ देत स्टेडिअम डोक्यावर घेत होती. त्यातून या चौघांना वाटलं की, भारतीय पाठीराख्यांची अशी आर्मी का असू नये?? तिथून या क्रिकेटवेडय़ांची सुरुवात झाली आणि तीन वर्षात हा ‘फॅन ग्रुप’ नावारूपाला आला. तीन वर्षानी त्यांनी वेस्ट इंडिज दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाला पाठिंबा द्यायला म्हणून वेस्ट इंडिज गाठलं आणि स्टेडिअम दणादणून सोडलं. त्यातून त्यांना चेहरा आणि ओळख मिळाली तीच ही भारत आर्मी. 
आता ही आर्मी 20 वर्षाची होत आली आहे. काही जुने सदस्य मागे पडले तर काही नवीन सदस्य जगभरातून जोडले गेले. आता तर सारंच जगच ऑनलाइन झालं, आणि सोशल मीडियातला कनेक्ट वाढला तसा या आर्मीचा विस्तारही वाढला.  आयसीसीनं दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतीय संघ खेळत असलेल्या प्रत्येक सामन्यात या आर्मीचे किमान 5 ते 6 हजार पाठीराखे उपस्थित असतात. आजच्या घडीलाही सुमारे 22 देशांतून आठ हजारहून अधिक भारत आर्मीवाले भारतीय संघाला ‘चिअर’ करायला, लंडन आणि वेल्सला पोहचले आहेत. 
आजवर त्यांचं गाणं होतं, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी मात्र त्यांनी विशेष गाणं तयार करून घेतलं आहे. ‘लाऐंगे कप, देखेगा सारा जमाना..’ हे त्याचे शब्द. मात्र त्यातल्या काही ओळी खास आहेत, त्या म्हणतात, तुमसे ना हो सकेगा, ये कहता था जमाना, हमने ये कर दिखाया.’
- हा ‘कर दिखाने का जुनून’ या भारत आर्मीच्या क्रिकेटवेडय़ांसह देशभर आहेच, आणि त्याची रूपंही अनेक आहेत. आता या भारत आर्मीचं द भारत आर्मी फाउण्डेशनही झालं आहे. आणि फक्त मॅच पाहण्यापुरतं हे प्रकरण उरलेलं नाही, तर तिकीट बुकिंग, पर्यटन, जिथं मॅच असेल तिथलं साइटसिइंग, हॉटेल बुकिंग, त्याची पॅकेज, सेलिब्रेशन पाटर्य़ा, मैफली, कॉन्सर्ट असं सगळं या एकूण क्रिकेट फीव्हरच्या पॅकेजचा भाग झालं आहे. त्यातून त्यांना स्पॉन्सर्स मिळतात, कंपन्यांशी भागिदारीही होते. 26 लोक बाकायदा लॉजिस्टिकचं काम करतात. मात्र यासार्‍याच्या केंद्रस्थानी जो क्रिकेटप्रेमी आहे, ज्याच्या हाती क्रयशक्ती आहे, जो पैशापेक्षा अनुभव विकत घेऊ पाहतो, तो मात्र एक भलतंच स्वपA घेऊन जगताना दिसतो.
ते स्वपA म्हणजे प्रत्यक्ष मॅच पहायला जाणं.
लॉर्ड्स, ओव्हल, मेलबर्न, अ‍ॅडलेड, डॉकलॅण्ड, केपटाउन यांसारख्या जगभरातल्या बडय़ा क्रिकेट स्टेडिअमवर प्रत्यक्ष जाऊन मॅच पाहणं.
तो माहौल अनुभवणं, ते क्रिकेट जगणं.
संघासोबत जगून घेणं ती मॅच.
कानाला ट्रान्झिस्टर लावून कॉमेण्ट्री ऐकण्यापासून ते घरात लाइव्ह मॅच पाहण्यार्पयत, घरच्या मैदानात टी ट्विेण्टी सामने पाहण्यापासून ते थेट क्रिकेट पंढरी लॉर्ड्स गाठण्यार्पयतचा. हा स्वपAांचाच नाही तर क्षमतांचाही प्रवास आहे. त्याचं नाव भारत आर्मी. 

****

ऑस्ट्रेलियातली स्वामी आर्मी

 भारत आर्मीसारखीच भारतीय क्रिकेटवेडय़ांचीच एक स्वामी आर्मीही आहे. या स्वामी आर्मीचेही अनेक पाठीराखे आहेत आणि तेही भारतीय संघाचे दिवाने जगभर मॅच पहायला जात असतात. भारत आर्मीचा जन्म इंग्लंडमधला, तर स्वामी आर्मीचा ऑस्ट्रेलियातला आहे. भारत आणि स्वामी या दोन्ही आर्मी आपणच मोठा ग्रुप असल्याचा दावा करतात, मात्र अधिकृत आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही.

पाकिस्तानची स्टॅनी आर्मी
पाठीराखे तर पाकिस्तानचेही तितकेच कमाल दिवाने आहेत. त्यांच्या लंडनस्थित समर्थकांनी ही स्टॅनी आर्मी बर्मी आर्मीच्याच धर्तीवर सुरू केली आहे. 2008 पासून एका वेबसाइटवर हे क्रिकेटप्रेमी परस्परांच्या संपर्कात असतात.

 बेज ब्रिगेड
ही न्यूझीलंडच्या क्रिकेटप्रेमींची आर्मी आहे. तेही जगभर प्रवास करतात, मजा करतात. पण बेज ‘अनकूल’ जर्सी घालून मिरवतात. 1980 साली न्यूझीलंड टीमचा जो युनिफॉर्म होता त्यावर त्यांनी आपली जर्सी बेतलेली आहे.


बर्मी आर्मी
इंग्लंडची बर्मी आर्मी सगळ्यात जुनी. आपल्या संघाला पाठबळ आणि इतर प्रेक्षकांवर दबाव हे त्यांना उत्तम जमलेलं आहे. टिपिकल इंग्लिश स्टाइल ते मॅच पाहताना अ‍ॅटिटय़ूड दाखवत दणक्यात दंगा करतात. चिल करतात आणि त्यांची संख्याच इतकी जास्त की दबदबा निर्माण होणारच. आता मात्र भारतीय प्रेक्षक त्यांना भारी पडू लागलेत.

 

Web Title: Bharat army- story of crazy India fans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.