वर्चस्वाची चढाओढ
By admin | Published: February 15, 2015 02:31 AM2015-02-15T02:31:53+5:302015-02-15T02:31:53+5:30
जागतिक समुदायाला यापुढे ‘गरीब-श्रीमंत’ ‘विकसित-अविकसित’ अशा रकान्यांमध्ये राहणो शक्य होणार नाही.
Next
> जागतिक समुदायाला यापुढे ‘गरीब-श्रीमंत’ ‘विकसित-अविकसित’ अशा रकान्यांमध्ये राहणो शक्य होणार नाही. श्रीमंत सबल राष्ट्रांना आपल्या वागणुकीने आणि मूल्यांनी जगाला स्वत:कडे आकर्षित करावे लागेल. आर्थिक नाडय़ा आवळून किंवा एखाद्या देशाला वाळीत टाकून आता काम भागणार नाही.
भावनांना हात घालणारी पब्लिक डिप्लोमसी - जनमत आपल्या बाजूने
वळवण्याची किंवा आकर्षित करण्याची क्षमता
हे सॉफ्ट पॉवरचे अस्त्र जगाच्या गावगाडय़ात
म्हणूनच अतिशय महत्त्वाचे
ठरू पाहत आहे.
ल्या वेळी पाहिलेला ‘सॉफ्ट पॉवर’चा हिमनग हा प्रत्येक देशासाठी अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. विशेषत: आजच्या या इंटरनेटच्या जगात.
आपल्या जगात एकूण सुमारे दोनशे राष्ट्रे आहेत. जणू एखाद्या गावातली एकत्र नांदू पहाणारी दोनशे कुटुंबे. या गावाकडे- म्हणजे आपल्या पृथ्वीकडे-तशी साधनसंपत्ती मर्यादित प्रमाणात आहे. कारण खाणारी तोंडे फार. त्यातही कुपोषित जास्ती.
कुपोषितही दोन प्रकारचे. एक अती खाऊन कुपोषित आणि दुसरे उपासाने कुपोषित. तर या दोनशे राष्ट्रांच्या विश्वकुटुंबात जमिनीसाठी चढाओढ आली. एकमेकांशी स्पर्धा आली. एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचे प्रकार आले. हुजूर-मजूर, श्रीमंत-गरीब अशी वर्गवारीही आली. जी-2क् या क्लबातले उच्चभ्रू, खाऊन-पिऊन सुखी देश यांच्यातली वर्चस्वाची चढाओढ अर्थातच सर्वात तीव्र.
पूर्वी म्हणजे इंटरनेटच्या जमान्याआधी या ‘जी’ नावाच्या श्रीमंतांच्या क्लबात फक्त आठेक राष्ट्रे होती. त्यांच्याकडे आपापल्या वावरात पिकणा:या उत्पन्नांची, ज्ञानाची मोठी ऐट होती. जर्मनीत बियर तयार होते. पण कॉफीची लागवड होऊ शकत नाही. तरीही 1 ग्लास बियरपेक्षा 1 कप कॉफी स्वस्त, ही किमया शक्य होती.
काही देश ज्ञान विकून श्रीमंत होत होते, तर काही देश शस्त्रस्त्रे विकून. या शस्त्रत्रंचा सर्व जगातल्या उर्वरित कुटुंबांना धाक होता. गुंडगिरी आणि धाकदपटशा वापरून सर्व विरोधाला गप्प करण्याचे सामथ्र्य होते. त्यामुळे लष्करी बळ आणि आर्थिक बळ हे ‘पॉवर’चे प्रकार अधिक सर्वमान्य होते. लष्करी बळ आणि आर्थिक बळ या दोन पॉवर्सच्या लोहचुंबकामुळे मग त्या-त्या देशाची मूल्ये किंवा वागण्या-बोलण्याची पद्धत थोडक्यात तेथील संस्कृती किंवा कल्चर हे आपोआप इतर गरीब देशांना अनुकरणीय वाटत राहिले. पाश्चात्य पेहेराव, भाषा काटय़ा-सुरीने जेवणो, हे ‘शिक्षित’ असण्याचे मोजमाप ठरले. टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य पाठोपाठ कुटुंबसंस्थेची मोडतोड होणो हे ‘नॉर्मल’ समजले जाऊ लागले. अमेरिकेचे सुप्रसिद्ध राजनीतिज्ज्ञ जोजेफ ने म्हणतात- ‘‘लोकशाही, मानवी हक्क, व्यक्तिगत संधी असे शब्द मादक पदार्थासारखे असतात. जगातील समुदायावर प्रभाव पाडण्यासाठी अमेरिकेकडील लष्करी सामथ्र्याच्या कैकपटीने अधिक या मूल्यांचा व्यसनाचा उत्तम उपयोग करून घेता येतो. जागतिक समुदायाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेता येते.’’
थोडक्यात दोनशे राष्ट्रांच्या या ‘जग’ नावाच्या गावात पूर्वीसारखी बंदुकीच्या आवाजाने दहशत बसवणो किंवा आपल्या आर्थिक सुबत्तेच्या उदाधुपाने इतरांना आकर्षित करणो-हा काळ संपत आला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्येही इंटरनेट नावाच्या महाजालाने ब:याच मोठय़ा उलथापालथी घडवून आणल्या आहेत. कसे आहे आजच्या जगाच्या गावगाडय़ाचे सतत बदलणारे चित्र?
‘माहितीतंत्र’ नावाचा तिसरा डोळा
पूर्वी आपल्याला पृथ्वी भलीथोरली वाटे. त्यावरचे दूरदूर पसरलेले देश एकमेकांपासून किती लांब आहेत? अप्राप्य आहेत? - असे वाटत राही. आज इंटरनेट आणि गूगल काय आले आणि आपल्याला त्या यानातून सहज जगभर - कल्पनेतला का होईना- प्रवास करणो शक्य होऊ लागले. दूर-दूर देशीच्या समविचारी माणसांच्या ‘व्हच्र्यूअल कम्युनिटीज’ म्हणजे जणू ‘अंतराळातील विचार मंडळे’ स्थापन होऊ लागली. विचारांची मुक्त देवाण-घेवाण सुरू झाली. ‘तुमच्या देशात हे असे’, ‘आमच्या देशात ते तसे’ अशा तुलना बिनधास्तपणो होऊ लागल्या.
भौगोलिक आणि राजकीय सीमा पुसट झाल्या. ‘लोकशाही’, ‘मानवी हक्क’ ही श्रीमंत क्लबची मूल्ये आता संपूर्ण जग जरा स्वत: आणि बारकाईने तपासून पाहू लागले. प्रत्येकाच्या हातातल्या फोनवर व्हिडिओ कॅमेरा आला. मग ‘मानवी हक्क’ हे मादक द्रव्य पुरेसे काम करेनासे झाले.
याचे सर्वात बोलके उदाहरण म्हणजे अमेरिकेने ‘अबू घरीब’ येथे चालविलेली छळछावणी. त्याच्या चित्रफिती सर्व जगाने पाहिल्या. आता कुठे गेले तुमचे ‘मानवी हक्क’? असा प्रश्न सर्व जगाचा समुदाय दस्तुरखुद्द अमेरिकेला विचारू लागला.
सद्दाम हुसेनने अत्याचार केले यात वाद नाही; पण इराकवरील हल्ला समर्थनीय होता का? - असे प्रश्न मग ‘जी-2क्’ हा श्रीमंत राष्ट्रांचा क्लबही अमेरिकेला विचारू लागला.
इराकवरील हल्ल्यापूर्वी ‘युनो’च्या महासभेत कॉलीन पॉवेल यांनी जे भाषण केलेले होते तेही आता सर्व जगाने पाहिलेले होते.
एका परीक्षानळीत एक पांढरी पावडर दाखवत अत्यंत नाटकीपणो- ‘‘पहा ही अंॅथ्रॅक्स पावडर.. ही अशी घातक रसायने इराक बनवत आहे. त्या चिमूटभर पावडरमध्ये लक्षावधी मानवांची हत्त्या करण्याचे सामथ्र्य आहे.’’- या शब्दात पॉवेल यांनी केलेले भावनिक आव्हान जगाचा समुदाय एकत्रितपणो पाहत होता.
युद्ध संपले. इराकमध्ये अशी कोणतीही महासंहारक अस्त्रे नव्हती हे सर्वाना कळले.
थोडक्यात इंटरनेट नावाचे माहितीजाल आणि माहितीतंत्रचा विस्फोट हा भल्याभल्यांना विवस्त्र करण्याची क्षमता दाखवू लागला.
आजच्या जगात लष्करी सामथ्र्य किंवा आर्थिक सामथ्र्य हे आकर्षण बिंदू क्षीण होत चालले आहेत.
जगाच्या समुदायात वावरताना एखाद्या देशाचे वागणो ‘बोले तैसा चाले’ असे आहे? की त्यात ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा आहे? अमुक एका देशाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का?- हे आता गुपित राहणो फारसे शक्य राहिलेले नाही. त्यामुळे एखाद्या देशाची वर्तन मूल्ये या सॉफ्ट पॉवरला पुढील जगात खूप मोठे महत्त्व आले आहे.
दहशतवाद आणि ‘युद्ध’
या संकल्पनेचे खासगीकरण
‘सॉफ्ट पॉवर’ किंवा एखाद्या देशाची भावनिक आकर्षणशक्ती याच्या वाढत्या महत्त्वाचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे ‘युद्ध’ या संकल्पनेची बदलेली परिभाषा.
पूर्वी कौरव पांडव, भारत पाकिस्तान, जर्मनी आणि इतर दोस्त राष्ट्रे असे एक विरुद्ध एक असे युद्ध होते. तिथे ‘शत्रू’ की कल्पना सुस्पष्ट होती. या शत्रूला एक भौगोलिक सीमा होती. त्यामुळे या शत्रूचा कसा विनाश करायचा याची आखणी करणो शक्य होते.
11 सप्टेंबर 2क्क्1 नंतर हे चित्र पूर्ण बदलले. ‘दहशतवाद’ हा स्पष्ट न दिसणारा पण जिकडे तिकडे एखाद्या जंतू प्रादुर्भावासारखा वावरणारा शत्रू हे एकविसाव्या शतकातले सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. या शत्रूने सर्व भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत.
कुठे कुठे शोधायचे त्याला?
मध्यपूव्रेत? उत्तर आर्यलडमध्ये? स्पेनमध्ये? श्रीलंकेत? पाकिस्तानात? की युरोपात?
-माहितीतंत्रच्या विस्फोटामुळे शस्त्रे आणि बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान याचेही ‘लोकशाहीकरण’ झाले. एरव्ही हे ज्ञान देशाच्या संरक्षण खात्याकडे असे. ते आता कोणत्याही ‘क्ष’ व्यक्तीच्या हातात आले. प्रत्येकाच्या हातातल्या स्वस्त फोनमुळे जगभरातल्या दहशतवाद्यांना संगठितपणो हल्लाबोल करणो शक्य झाले आहे.
दहशतवाद सत्तरीच्या दशकातही होता. पण त्याला एक पोलिटिकल अजेंडा - म्हणजे स्पष्ट राजकीय हेतू होता. आज तो ही स्पष्ट दिसत नाही. दहशतवादामागचा अजेंडा आज कोणालाच धड वाचता येत नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी स्टॅलिन, हिटलर, पॉल पॉट यांना आपापल्या देशात एकाधिकारी सरकारची गरज होती. त्या जोरावर त्यांनी युद्धे आणि मानवसंहार घडवून आणले. आज त्याचीही गरज उरलेली नाही. युद्धाचेही खासगीकरण झाले आहे.
त्यामुळे जागतिक समुदायाला पुढील काळात ‘गरीब-श्रीमंत’ ‘विकसित-अविकसित’ अशा रकान्यांमध्ये राहणो शक्य होणार नाही. ‘जी-2क्’ या समुदायाला आपल्या वागणुकीने आणि मूल्यांनी जगाला स्वत:कडे आकर्षित करावे लागेल. तरच ‘दहशतवाद’ या शत्रूशी सामना करणो कदाचित शक्य होऊ शकेल. आर्थिक नाडय़ा आवळून किंवा एखाद्या देशाला वाळीत टाकून आता काम भागणार नाही. भावनांना हात घालणारी पब्लिक डिप्लोमेसी - किंवा जनमत आपल्या बाजूने वळवण्याची किंवा आकर्षित करण्याची क्षमता- हे सॉफ्ट पॉवरचे अस्त्र जगाच्या गावगाडय़ात म्हणूनच अतिशय महत्त्वाचे ठरू पाहत आहे.
लष्करी सामथ्र्याच्या गुर्मीत स्टॅलिनने एकदा विचारले होते-
‘‘पोपकडे अशा कितीशा लष्कराच्या तुकडय़ा आहेत?’’
पदरी एकही सैनिक न बाळगता व्हॅटिकन आणि रोमन कॅथलिक चर्च सर्व जगाच्या विचारांना अमुक एका दिशेने वळवण्याचे सामथ्र्य राखून आहे ही सॉफ्ट पॉवरची करामत स्टॅलिनसाहेब साफ विसरून गेले.