स्नेहाचे दीप उजळू या..
By admin | Published: November 8, 2015 06:01 PM2015-11-08T18:01:36+5:302015-11-08T18:01:36+5:30
आजकाल कोणत्याच सणातून आंतरिक आनंद मिळत नाही. कारण महत्त्व आलंय ते फक्त पैशाला. म्हणून दिवाळीही पूर्वीपेक्षा अधिक झगमगाटात येते.
Next
अनुपमा मुजुमदार
आजकाल कोणत्याच सणातून आंतरिक आनंद मिळत नाही. कारण महत्त्व आलंय ते फक्त पैशाला. म्हणून दिवाळीही पूर्वीपेक्षा अधिक झगमगाटात येते. तरीसुद्धा दिवाळीतील सात्त्विकता, शुचिता, मांगल्य जपलं पाहिजे, कारण दिवाळी तेजाचा सण आहे.
महाकवी कालिदासाने ‘उत्सव प्रिय: खलु मनुष्य:’ असे म्हटले आहे. सण-उत्सव आपल्याला आवडतात ते आपल्या रोजच्या चाकोरीबद्ध जीवनात आनंद निर्माण करतात. जीवनव्यवहाराखाली दबलेला मानव हा उत्सवादिवशी मोकळा होतो. आनंद प्राप्त करून घेतो. उत्सव माणसाला उन्नत व संस्कारी बनवतात म्हणून उत्सवाचे महत्त्व आपल्या भारतीयांच्या जीवनात मोठे आहे, असाच काश्मीरपासून कन्याकुमारीर्पयत साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी.
इसवी सनाच्या आरंभापासून हा सण साजरा होत असल्याचे उल्लेख काही प्राचीन ग्रंथांत मिळतात. इ.स. 6क्6मध्ये नागानंद या हर्षाने लिहलेल्या नाटकात दीप प्रतिपद उत्सव वर्णन आहे. काश्मीरमधील ‘नीलमत पुराण’ ग्रंथात दीपमाला उत्सव असा उल्लेख आहे. ‘सोमदेव सुरी’ या जैन ग्रंथकाराने यशस्तिलक चंपू हे गद्य काव्य लिहिले. यामध्ये मालखेडच्या राष्ट्रकूट राजांच्या काळातील दिवाळी उत्सवाचे वर्णन आहे. इ.स. 1क्3क्मध्ये अल्बेरुणी नावाचा एक विदेशी प्रवासी भारतात येऊन गेला. त्याने आपल्या ‘ताहकिक-इ-हिंद’ ग्रंथात भारतातील दीपावली उत्सवाचे वर्णन केले आहे. प्राचीन मराठी कवी नरेंद्र यांनी इ.स. 1292मध्ये लिहिलेल्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ ग्रंथात विदर्भातील दिवाळीचे वर्णन केले आहे. इ.स. 125क्मध्ये लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या महानुभवांच्या ग्रंथात चक्रधरस्वामींची शिष्या महदंबेने हिरवली (जालना) येथील दिवाळीचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीत दिवाळीचे संदर्भ आलेले आहेत. तसेच मेरू तुंगाचार्य यांनी इ.स. 13क्5मध्ये लिहिलेल्या ‘प्रबंधचिंतामणी’ या संस्कृत ग्रंथात कोल्हापूरच्या राजांनी दीपावली उत्सव साजरा केला, याचे वर्णन आहे. इ.स. 159क्मध्ये लिहिलेल्या पार्शियन भाषेतील ‘ऐने अकबरी’ ग्रंथात दिल्लीतील दीपावलीचे वर्णन आहे व त्यात सम्राट अकबराने भाग घेतल्याचाही उल्लेख आढळतो. वरील सर्व उल्लेखांवरून या सणाची प्राचीनता लक्षात येते व किती मोठी परंपरा आहे, हेही समजते.
या सणात निसर्गसुद्धा आपल्यात सामील होतो. पावसाळा नुकताच संपलेला असतो. शेतात मोती पिकलेले असतात. कणगी ओसंडून वाहत असतात.
धरतीचे स्वरूप सुजलाम्-सुफलाम् असते. हवेतसुद्धा सुखदपणा असतो. दीपावलीच्या वेळी निसर्गाचे स्वरूप नितांत रमणीय असते. पक्षांचे निसर्गनिर्मित संगीत ऐकावयास मिळते. या पाश्र्वभूमीवर, आश्विन-कार्तिक या दोन महिन्यांच्या संधिकाळात हा उत्सव सुरू होतो.
पूर्वी दिवाळी जवळ येत असे, तसतसा घराचा चेहराच आनंदी आनंद गडे असा दिसत असे. घरात अस्वच्छता अभियान चालू होई. रंगरंगोटीने नेहमीचेच घर देखणो दिसे. अंगणाची डागडुजीही रांगोळी देखणी सुदर होण्यासाठी केली जाई. इकडे आकाशकंदिलाच्या तयारीत छोटे-मोठे हात कामाला लागत. दिवाळीच्या म्हणून खास सामानाची यादी घेऊन, सायकलीला पिशव्या अडकवून, तमाम पुरुषवर्गाची धावपळ सुरू होई. तमाम गृहिणी फराळ कसा उत्तम होईल, रुचकर होईल यात मगA. बहुतेक सर्व घरांत हेच दृश्य दिसे. नोकरी धंद्यासाठी बाहेर गेलेले यानिमित्ताने एकत्र येत. आनंदाचे वाटप होई. दिवाळीच्या निमित्ताने कौटुंबिक संमेलनच साजरे होईल.
घराघरांत शांतपणो तेवणा:या पणत्या, ङिारमिळ्या असलेला आकाशकंदील, दारासमोरील ठिपक्यांची रांगोळी, ङोंडूच्या फुलांचे तोरण ही तर दिवाळीची खासियत. फराळाला परिचितांकडे निमंत्रणो असायची. माणसेसुद्धा आवर्जुन जायची. यानिमित्ताने एकमेकांची वास्तपुस्त व्हायची. ‘चकली छान झालीय’ ही शाबासकी त्या गृहिणीचे काम हलके करायची. फराळाची ताटे त्यावर नक्षीचे रुमाल झाकून एकमेकींकडे पोहोचती व्हायची. काही किलोंत घरी केलेले फराळाचे जिन्नस बघता-बघता फस्त व्हायचे. त्यात गोरगरिबांची आठवण असायचीच. भाऊ नसलेल्या बहिणीची भाऊबीज थाटात व्हायची. घरातील वडीलधारी मंडळी हे सामाजिक भान ठेवायची व मुलांच्यातही ते रुजवायची. आता फक्त या पारंपरिक दिवाळीच्या आठवणी राहिल्या. कालमानानुरूप अनेक गोष्टी बदलल्या. त्याला दिवाळी तरी कशी अपवाद राहील?
आजची दिवाळी ही उबंरठय़ाच्या आत व पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली साजरी होताना दिसते. या सणाचे कौटुंबिक, सामाजिक संदर्भ नष्ट होत जाऊन फक्त माङो कुटुंब हाच त्याचा बिंदू बनला. श्रमाला प्रतिष्ठाच राहिली नाही.
दिवाळीची पूर्वतयारी अंग मोडून करावी लागत नाही; त्यामुळे दिवाळी आली, की धास्तावल्यासारखे वाटत नाही. पूर्वी फक्त दिवाळीतच दिसणारे दिवाळी पदार्थ आता बारमाही उपलब्ध आहेत. वाढदिवस, पाहुणो, चवीत बदल या नावाने ते रोज खाल्ले जातात म्हणून ‘ते’ कौतुक आता राहिले नाही. त्यामुळे ‘त्या’ फराळाने दिवाळीतून काढता पाय घेतला. काही घरे याला अपवाद असतील; पण तीही थोडीच. उटणं, सुवासिक तेल हे नित्याचं झालंय. मंद तेवणा:या पणत्यांची जागा आता लाईटच्या माळांनी घेतलीय. रांगोळी, फुलांचे तोरण तेही रेडीमेड. त्यामुळे दिवाळीची ‘ती’ धांदल-गडबड नाही. वसूबारस, धनत्रयोदशी, यमदीपदान हे सुरुवातीचे दिवसही विस्मरणात गेल्यासारखे झालेले आहेत. दिवाळी म्हणजे फक्त लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज. फराळापेक्षा फटाक्यांना महत्त्व, त्यामुळे पर्यावरणाची समस्या गंभीर बनली. जागोजागी साचलेले कच:याचे ढीग या सुंदर सणाचे सौंदर्य नाहीसे करतात. लक्ष्मीपूजन दिवशी होणारे संपत्तीचे दर्शन ख:या लक्ष्मीचे विस्मरण दर्शविते. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, नोकरीधंद्यामुळे बाहेर राहणारे दिवाळीनिमित्त एकत्र येण्याऐवजी कुठे तरी हिलस्टेशनवर जातात. आजकाल स्त्रिया नोकरी करीत असल्यामुळे त्यांनाही थोडा निवांतपणा, कामापासून सुटका पाहिजे असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्यापुरता आनंद मिळवतो. खरे तर ‘दिवाळी’ या सणात प्रत्येक नात्याचा विचार केलेला दिसतो. अगदी प्राणिमात्रंचासुद्धा; पण तोही आता मागे पडत चाललेला दिसतो. दिवाळीचा स्नेह, ऐक्य लोपत चाललेले दिसते. नवीन दिवाळीचे पूर्वीइतके कौतुक आता नाही. भाऊबीज, पाडवा हे स्त्रियांचे खास सण; पण त्या नोकरी करीत असल्यामुळे ‘ती’ नवलाई आता दिसत नाही. बहीणसुद्धा भावाला दिवाळी गिफ्ट देते, पत्नीही पतीला देते.
म्हणून आजकाल सणामध्ये पूर्वीसारखा भरूभरून आनंद मिळत नाही. ‘नेमेची येतो’ या नियमाने सण येतात जातात. सगळं कसं यंत्रवत म्हणून पूर्वीचे संदर्भ हे आजच्या दिवाळीला फिट बसत नाहीत. झगमगाट, संपत्तीचं श्रीमंतीचं प्रदर्शन असतं; पण आंतरिक प्रेमाच्या सोज्वळ पणतीचं दर्शन मात्र दुर्लभ झालंय. सर्व इन्स्टंट, नातीसुद्धा गिलावा दिलेली़ कुठेही आस्थेचा, प्रेमाचा स्पर्श नाही.
आता कोणत्याच सणातून आंतरिक आनंद मिळत नाही. आज प्रत्येक गोष्टीची किंमत आहे फक्त पैशात. म्हणून आजची दिवाळी पूर्वीपेक्षा अधिक झगमगाटात येते. दारावरून जाते; पण घरात येत नाही. बदलणारा काळ याला कारणीभूत आहे, तरीसुद्धा दिवाळीतील सात्त्विकता, शुचिता, मांगल्य जपलं पाहिजे, कारण दिवाळी तेजाचा सण आहे. दिवा हे प्रकाशाचं लहानसं पाऊल आहे. कालमानारूप बदल झाला तरी सणांचा आत्मा आपण गमावता कामा नये. कारण भारताचा सांस्कृतिक इतिहास हा त्याच्या सणांत पाहावयास मिळतो. म्हणून दिवाळीच्या निमित्ताने स्नेहाच्या पणत्यांनी काहींचे जीवन उजळू या व काहीच्या जीवनात स्नेहाचा दीप होऊ या.