प्रगतिशील देशासाठी बुलेट ट्रेन

By admin | Published: December 26, 2015 05:52 PM2015-12-26T17:52:34+5:302015-12-26T17:52:34+5:30

देशाचा विकास करायचा तर विमान प्रवासाएवढाच वेग व सुविधा असणारी रेल्वेसेवा भविष्यात गरजेची ठरणार आहे. संरक्षणासाठीदेखील त्याचे महत्त्व आहेच.

Bullet train for a progressive country | प्रगतिशील देशासाठी बुलेट ट्रेन

प्रगतिशील देशासाठी बुलेट ट्रेन

Next
- यशवंत जोगदेव
 
गेल्या काही दिवसांपासून देशात भारत व जपान यांच्यामध्ये झालेल्या बुलेट ट्रेनशिवाय अन्य प्रकल्पांच्या सहकाराच्या करारामुळे आता देशात जलदगती बुलेट ट्रेन धावेल अशी आशा उत्पन्न झाली आहे. आतार्पयत आंतरराष्ट्रीय करार अनेक देशांशी होत असले तरी अधिकृत निर्णय, त्याच्या अंमलबजावणीसाठीची प्रक्रिया, शासकीय मंजुरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक पाठबळ असल्याखेरीज या कराराला फारसा अर्थ नसतो! आता मात्र मुंबई- अहमदाबाद या संपूर्णपणो वेगळ्या मार्गावर 97 हजार कोटी रुपये जपानकडून अत्यंत अल्प व्याजदरात मिळणार असल्याने मुंबई ते अहमदाबाद या 5क्5 कि.मी. मार्गावर 2क्24 र्पयत बुलेट ट्रेन धावेल अशी शक्यता आहे. सध्या याच प्रवासाला आठ तासापेक्षा जास्त वेळ लागतो! बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर मात्र हाच प्रवास अवघ्या दोन तासात करता येईल.
भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेतला जात आहे! मात्र हा करार झाल्यानंतर अनेक बाजूंनी त्यावर जोरदार टीकेलाही प्रारंभ झाला आहे!  अनेक दृष्टीने या प्रकल्पाच्या विरोधी सूर उमटू लागला आहे! 
सध्या मध्य रेल्वेची जलदगती गाडी; आपली दख्खन राणी सकाळी 7.15 वाजता पुण्यावरून सुटते आणि मुंबईला 10.25 र्पयत पोहोचते. ती गेली 50 वर्षे अशीच धावत आहे. तिचा वेग ताशी 120कि.मी. आहे. मात्र लोणावळा ते कजर्त यामध्ये 36 कि.मी.चा घाटउतार असल्यामुळे हीच गाडी ताशी फक्त 50 कि.मी. वेगाने उतरवावी लागते. मात्र मुंबई ते अहमदाबाद पर्यायी सपाट मार्ग, वाटेत फक्त खाडय़ा आणि नदी हेच अडथळे आणि बुलेट ट्रेनचा वेग डेक्कन क्वीनपेक्षा तिप्पट म्हणजे ताशी 35क् कि.मी. इतका असल्याने पूर्णपणो स्वतंत्र मार्ग, दोन्ही बाजूला कंपाऊंड, सिग्नलच्या खांबाऐवजी इंजिनमध्ये पुढील सिग्नल दिसायची सुविधा (कॅब सिंग्नलिंग) गरजेचे आहे. बुलेट ट्रेनसाठीची खास आवश्यकता म्हणजे इतक्या वेगाने जाणा:या या गाडीची चाके रुळावर जोरात आघात करत असल्याने रुळाखाली असणारे स्लिपर, त्याखालील खडीचा थर या अभियांत्रिकी मर्यादा काटेकोरपणो पाळाव्या लागतात. इतक्या वेगाने जाणा:या गाडीचे धक्के प्रवाशांना बसू नयेत तसेच गाडी वळत असताना ती खाली पडू नये म्हणून बुलेट ट्रेनची सस्पेंशन सिस्टीम खास बनवलेली असते. म्हणूनच सध्या आपल्या राजधानीचा लोहमार्ग बनवायचा खर्चही जास्तीत जास्त प्रत्येक किलोमीटरला 7 ते 1क् कोटी येत असला तरी बुलेट ट्रेनला प्रत्येक किलोमीटरसाठी 25क् कोटी रुपये खर्च करावे लागतील!
या गाडीचे प्रवासी विशेषत: उच्चभ्रू वर्गातील असणार हेही स्वाभाविकच आहे! याचे कारण सध्याचा रेल्वेचा प्रवासी सरासरी ताशी जास्तीत जास्त 6क् ते 8क् कि.मी.च्या वेगानेच प्रवास करू शकतो! तसेच सर्वसामान्य व्यक्तींसाठी तोटा सोसूनही गेली 6क्-7क् वर्षे केवळ जनकल्याणासाठी उपनगरी गाडय़ा चालविल्या जात आहेत. मात्र रेल्वेची उपनगरी सेवा आणि केवळ व्यापारी दृष्टीने विमान वाहतुकीसाठी पर्याय असणारी, आरामदायक, विमानाएवढय़ाच वेगाने प्रवास करू शकणारी बुलेट ट्रेन ही सर्वस्वी, स्वतंत्र, जलदगती, परिवहनाची सेवा आहे! प्रवासी वाहतुकीसाठी गरजेप्रमाणो सायकल, स्कूटर, रिक्षा, टॅक्सी, बस, उपनगरी गाडी अशी साधने आपण कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरतो. परंतु भविष्यात या खंडप्राय भारत देशाची तीन हजार 500 कि.मी. लांबी आणि दोन हजार कि.मी. रुंदी तसेच चढ व उताराचे प्रमाण, डोंगर, नद्या हे लक्षात घेतले तर देशाच्या विकासासाठी, विमानप्रवासाएवढाच वेग व सुविधा असणारी रेल्वेसेवा प्रवासी वाहतुकीसाठीच नव्हे, मालवाहतुकीसाठीसुद्धा भविष्यात गरजेची ठरणार आहे.
त्यामुळे देशात बुलेट ट्रेनचे युग सुरू होण्यासाठी जवळजवळ एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही जास्त वाटली तरी भविष्यात भारतीय रेल्वेपेक्षा जास्त मोठी अशी स्वतंत्रपणो जलदगती म्हणजे ताशी 2क्क् कि.मी. वेगाने मालवाहतूक आणि 300 ते 350 कि.मी. वेगाने प्रवासी वाहतूक करू शकणारी बुलेट ट्रेनसारखी सुविधा जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. 
दूरसंचार आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने आता आपापल्या देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पर्यटन, व्यापार, उद्योग यांचे युग सुरू झाले आहे! वेगवान वाहतुकीच्या साधनांमुळे परदेशाचा प्रवास आणि व्यापार आता जलद गतीने होऊ लागला आहे! 
म्हणूनच धुरांच्या रेषा सोडत झुकझुक जाणा:या आगगाडीऐवजी विमान वाहतुकीशी स्पर्धा करणारी, विद्युतशक्तीवर चालणारी, ताशी 200 कि.मी. वेगाने 6 ते 10 हजार टन माल नेणारी मालवाहतूक, त्यासाठी डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे स्वतंत्रपणो मालवाहतुकीच्या मार्गाचे नियोजन भारतीय रेल्वेने केले आहेच. ताशी 250 ते 300 कि.मी. वेगाने जाणारी प्रवासी वाहतूक ही याच योजनेचा दुसरा टप्पा आहे. 
मात्र भारतीय रेल्वेचा अफाट विस्तार, देशभरातील 65 हजार कि.मी.चा लोहमार्ग, रोज देशात धावणा:या 11 हजार गाडय़ा आणि देशाची दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर खर्चाच्या दृष्टीने मिळणा:या उत्पन्नातून भारतीय रेल्वेला सुरक्षित वाहतूक करणोही जड जात आहे! त्यातच गेल्या 15क् वर्षापूर्वी बांधलेले रेल्वेमार्ग, पूल, बोगदे, डबे, इंजिने यातील जुनाट झालेली साधनसामग्री बदलून पुन्हा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी भारतीय रेल्वेला निधीची अडचण येते. अशा कंगाल अवस्थेत स्वत:च्या ताकदीवर भारतीय रेल्वे बुलेट ट्रेन पळवायचे स्वप्न बघू शकणार नाही!
म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ जपानच नव्हे तर चीनचीसुद्धा मदत घेऊन भारत सरकार देशात जलदगती बुलेट ट्रेन आणि मालवाहतुकीची यंत्रणा, विदेशातून कर्ज घेऊन उभारण्याची योजना बनवत आहे! प्रारंभीच मुंबई ते अहमदाबाद ही सेवा सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात ही व्यापारी आर्थिक घडामोडी असणारी देशातील प्रमुख राज्ये आहेत! भारतात सर्वप्रथम जल वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान सेवा महाराष्ट्रातूनच सुरू झाली आहे! आताच नव्हे तर 19क्क् सालापासूनच मुंबईतील कपडा उद्योग आणि व्यापारी क्षेत्रत गुजराथींचा सहभाग आहेच! त्यामुळे अहमदाबाद व गुजरातमधून व्यापारी दृष्टीने विमान प्रवासाप्रमाणोच मोठय़ा प्रमाणावर प्रवासी बुलेट ट्रेनला मिळू शकतील.
बुलेट ट्रेन ही भविष्यात मुंबई ते अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रवास घडविणारी यंत्रणा अशी मर्यादित न राहता क्रमाक्रमाने जसे जसे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आर्थिक मदत मिळत जाईल त्याप्रमाणो मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, त्रिवेंद्रम, जयपूर, अंबाला, चंदिगड, लखनौ, पाटणा अशा प्रमुख महानगरांना जोडणारी स्वतंत्र यंत्रणा ठरेल. त्याचा विस्तार आणि वेग भारतीय रेल्वेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. असे झाले तरच या देशातील नैसर्गिक साधनसामग्री, पर्यटन, उद्योगाचा विस्तार, विकसित देशांशी व्यापारी स्पर्धा आणि प्रगतीसाठी टिकून राहण्यासाठीच नव्हे तर प्रभाव निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक ठरेल.
केवळ प्रादेशिक दृष्टिकोन बाळगणो योग्य ठरणार नाही! आपला शेजारी देश पाकिस्तान चीनच्या मदतीने थेट हिमालयाच्या दुर्गम भागातील कारामकोरम खिंड ओलांडून बिजिंग, बलुचिस्तानमधून ग्वादार बंदरार्पयत रेल्वे मार्ग उभारत आहे! चीनमध्येसुद्धा सध्या 5क् हजार कि.मी. लांबीचे जलदगती मालवाहतूक करणारे रेल्वे मार्ग बांधले जात आहेत! आपण मात्र या स्पर्धेत खूपच मागे आहोत! 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय रेल्वेचा सामान्य प्रवाशांसाठी येणारा खर्च आणि बुलेट ट्रेनला येणारा खर्च याची तुलना करणो योग्य ठरणार नाही. बुलेट ट्रेन आणि जलदगती मालवाहतूक ही सर्वस्वी स्वतंत्र यंत्रणा आणि त्याचा मार्गही वेगळा असल्याने याची तुलना रेल्वेशी करणो योग्य ठरणार नाही! भारतीय रेल्वेचा सध्याचा प्रवासी, रेल्वेचे रखडणारे प्रकल्प, रेल्वेची अपघात नियंत्रण यंत्रणा आणि उपनगरी प्रवाशांची सुरक्षा हे सर्व प्रकल्प गरजेचे आहेतच, मात्र या सर्वापेक्षा बुलेट ट्रेनचे नेटवर्क आणि जलदगती मालवाहतुकीचा स्वतंत्र मार्ग भारताच्या विकासासाठी अत्यावश्यक ठरणार आहे! यासाठी राष्ट्रीय दृष्टिकोनातून भारत आणि जपान या दोन देशांच्या सहकार्याने प्रारंभ होणा:या बुलेट ट्रेनच्या जलदगती, परिवर्तन युगाचे आपण स्वागतच केले पाहिजे! विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने विकास होत आहे! आपल्या राहणीमानामध्येही फरक पडत आहे! दृष्टिकोनही आंतरराष्ट्रीय होत चालला आहे! जगात घडणा:या कोणत्याही घटनेचे परिणाम आपल्याला आता अधिक जाणवू लागले आहेत! या सर्व दृष्टीने विचार केला तर भारताच्या प्रगतीसाठी भविष्यात आवश्यक असणारी प्रगती साधण्यासाठी बुलेट ट्रेनची गरुडङोप अत्यंत साहायक ठरेल!
 
(लेखक ‘जम्मू-काश्मीर रेल्वे प्रकल्पा’चे माजी जनसंपर्क सल्लागार आहेत.) 
yeshwant.jogdeo@gmail.com

 

Web Title: Bullet train for a progressive country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.