कॅनव्हासवरचं देखणं अन्न
By admin | Published: May 16, 2015 02:16 PM2015-05-16T14:16:53+5:302015-05-16T14:16:53+5:30
मिलानमध्ये सुरू असलेल्या आंतरराट्रीय फूड फोटोग्राफी फेस्टीव्हलच्या निमित्ताने अन्नाच्या देखण्या रुप-रचनांची छायाचित्रकला कशी बहरत गेली, याची रसपूर्ण कथा गेल्या रविवारच्या अंकामध्ये प्रसिध्द झाली. .. त्या लेखाचा हा उत्तरार्ध,
Next
>
ख्यातनाम चित्रकारांनी कॅनव्हासवर रंगवलेल्या अन्नाचा पोत तपासणारा!
शर्मिला फडके
प्लेटमध्ये एखाद्या पेंटिंगसारखं रचलेलं अन्न पाहत असताना कलेच्या इतिहासातले टप्पे आठवतात. प्लेटच्या कॅनव्हासवर चितारलेली खाद्यपदार्थाची कला जशी आहे तशी रिएलिझमकडून मेगा रिएलिझम आणि हायपर रिएलिझमर्पयत पोहोचली. कंटेम्पररी आर्ट, निओ मॉडर्न, पोस्ट मॉडर्न मार्गाने जाताना प्लेटमध्ये फळांच्या साली, फोलकटंही सजायला लागली ‘प्रॉप’ म्हणून.
कलेच्या इतिहासाच्या सगळ्या पाय:या वेगाने आणि सहज विकसित झाल्या फूड फोटोग्राफीतल्या प्लेटमध्ये.
रशियन फूड स्टायलिस्ट तातियाना श्कोन्दिनाने क्लासिक पेंटर्सच्या कलाकृती प्लेटच्या कॅनव्हासमध्ये रचल्या. फळं, फुलं, धान्य, खाद्यपदार्थ वापरून हे टप्पे दाखवले.
मोन्द्रियानच्या सरळ रेषा आणि आकार कदाचित जास्त सोपा, त्यामुळे तो जास्त दिसतो फूड फोटोग्राफीमध्ये. स्टारी नाइट्सचे नाजूक, लयदार स्ट्रोक्स आणि त्यातला घनगर्द निळा रंगही दिसतो. सेझांची ऐपल स्टिल लाइफ्स प्लेटमधून पोटात जाताना कला अभिरूची कोणत्या वेगळ्या उंचीला पोहोचतही असेल बहुधा. सर्रिअल फू ड प्लेटमधले दालीचे वितळते आकार दिसतात. मॅग्राइटच्या चेह:याच्या जागी सफरचंद असलेला हॅटवाला जास्त सोपा रचायला बहुतेक त्यामुळे सतत दिसतो. काही प्लेट्समध्ये आकारांची मोडतोड असते. पिकासोच्या क्यूबिझममधून आलेली. त्याचा निळा, गुलाबी कालखंडही अनेकांचा आवडता.
आणि मग कलेच्या इतिहासातल्या पेंटिंगमधलंही अन्न आठवतं. रेनेसान्स काळातल्या स्टील लाइफ्समधली द्राक्षं, सफरचंदं आणि भाजलेले, सोललेले ससे, चिमण्या. लिओनादरेच्या लास्ट सपरमधलं, व्हेन गॉघच्या पोटॅटो इटर्सच्या समोरचं, ब्रुगेलच्या पेझन्ट वेिडंगमधलं अन्न.
आपल्या कलाकृतींमधून अन्नाचं जास्तीत जास्त ग्लॅमरस दर्शन घडावं याकरता क्लासिकल पिरियडमधल्या ग्रीक आणि रोमन कलाकारांनी आपलं कौशल्य पणाला लावलं. उच्चभ्रू रोमन नागरिकांना आपण किती उत्कृष्ट दर्जाचं अन्न खात आहोत, आपल्या पाहुण्यांना खिलवत आहोत हे दाखविण्याची भयंकर हौस. साहजिकच त्या काळातल्या रोमन पेंटिंग्जमध्ये ताज्या, रसरशीत फळांनी, चीजने भरलेले काचेचे शोभिवंत वाडगे, वाइन बॉटल्स आवर्जून दिसतात.
त्याही आधी आर्किओलॉजिस्ट्सना इजिप्शियन पिरॅमिड्सच्या भिंतींवर अन्नाची रेखाचित्रं आढळून आली आहेत. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत असा समज होता की थडग्यांभोवतालच्या भिंतींवर काढलेल्या अशा चित्रंमधलं अन्न पिरॅमिडमधल्या देहांचं पालनपोषण करतात.
रेनेसान्स काळात साधारणपणो पंधराव्या शतकात पेंटिंग्जमधल्या अन्नाच्या चित्रणाला अगदी पुसटसे धार्मिक संदर्भ जोडले गेले. अन्नाचं आणि धार्मिक प्रथांचं चित्रण शक्य असेल तितक्या वास्तवतेनं, पण साधेपणानं करण्यावर भर दिला गेला.
सोळाव्या आणि सतराव्या शतकात पेंटर्समध्ये शास्त्रीय, चिकित्सक दृष्टी विकसित झाली, त्यामुळे अन्नही जास्तीत जास्त खरेपणाने चित्रित झालं.
डच रिएलिस्ट पेंटर्सनी मात्र या काळात फूड पेंिटंगमध्ये ख:या अर्थाने बाजी मारली. त्यांनी रंगवलेली स्वयंपाकघरं, फळांचे बाजार, त्यात टेबलांवर रचून ठेवलेलं अन्न, शिजत असलेलं अन्न हे आजही अतिशय आकर्षक आणि त्या काळातील खाद्य-संस्कृतीचं वास्तव चित्रण करणारं वाटतं.
आणि मग पॉल सेझां (1893-19क्6). हा तर त्याच्या पेंटिंग्जमधल्या फळांच्या स्टील लाईफ चित्रणातला मास्टरच. सेझांच्या या स्टील लाइफ पेंटिंग्जमधलं अन्नाचं चित्रण एकाचवेळी पारंपरिकही आहे आणि आधुनिकही. पारंपरिक अशा अर्थाने की त्याने रंगवलेली फळं, भाज्या कोणत्या आहेत हे सहज ओळखता येतं, आणि आधुनिक आहेत कारण त्यांचं चित्रण कलात्मकरीत्या केलं आहे, जसं आहे तसं या रेनेसान्स काळातल्या अन्नाच्या वास्तव चित्रणासारखं नाही.
सेझांचं सुप्रसिद्ध ’स्टील लाइफ विथ फ्रुट बास्केट’ हे चित्र फूड इन आर्ट संदर्भातलं सर्वात स्टायलाइज्ड पेंटिंग. अतिशय आकर्षक पद्धतीने सजवलेल्या लाकडी टेबलावरचा पांढराशुभ्र टेबल क्लॉथ, त्यावरच्या फ्रुट बास्केटमध्ये सफरचंद आणि पेअर्स. चित्रचं वैशिष्टय़ म्हणजे ही फ्रुट बास्केट एकाच वेळी टेबलावर ठेवलेली आहे आणि त्या मागच्या जमिनीवरही टेकलेली आहे असं वाटतं. सेझांच्या पेंटिंगमधलं मॉडर्न एलेमेन्ट आहे ते हे.
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने त्याची स्वत:ची खास इम्प्रेशिनस्ट शैली वापरून त्याच्या पेंटिंगमधलं अन्न अजरामर केलं. त्याचं पोटॅटो इटर्स तर कोणीही विसरणार नाही.
समकालीन चित्रकार आपल्या पेंटिंग्जमध्ये अन्न चितारतात ते मुख्यत: रचना कौशल्य, प्रकाश, पोत यांना महत्त्व देऊन. कॅनव्हासवरच्या संकल्पनांमध्ये जिवंतपणा, वेगळेपणा आणण्याकरता अनेकांनी अन्नाचा वापर केला. काही आर्टिस्ट्सनी आपल्या पेंटिंग्जमध्ये आधुनिक अन्न वापरलं. पेंटिंग्जमधलं अन्न हे समाजातली समृद्धी, रेलचेल, संपन्नता दाखवायला चितारलं जातं की कलाकाराला ते चितारणं हे आपल्यातल्या कलेची, कौशल्याची कसोटी घेणारं वाटतं, की त्याला त्यातून सामाजिकतेबद्दल काही भाष्य करायचं असतं हे आजही नेमकं ठरवता येणार नाही. प्रत्येकाचे हेतू वेगळे, संकल्पना वेगळ्या. पण एक मात्र निश्चित. जोवर चित्रकला आहे आणि अन्नही आहे तोवर या दोघांना एकत्र आणणारे कलाकारही असणारच.
खाद्यपदार्थ सजावटीचा भारतीय इतिहास जास्त रंगतदार आहे. अन्नाचं ताट सजवणं हे पारंपरिक स्वयंपाकघरात होतं आणि आजही आहेच. केळीच्या हिरव्यागार, निमुळत्या पानावर देखणा सजलेला मोग:याच्या कळ्यांसारखा भात, पिवळ्या वरणावर सोनेरी तुपाची धार, तांबूस, खरपूर पुरणपोळी, शुभ्र मलईदार श्रीखंड. नाजूक मुरडीचा कानोला, केशरी पाकातली जिलबी, केशराच्या काडय़ा, पिस्त्याच्या पुडीची पखरण.
चिन्मय दामलेच्या अन्नं वै प्राणा: मध्ये प्राचीन खाद्य सजावटींच्या ज्या करामती दिल्या आहेत, त्या चित्तथरारक आहेत. सहाव्या विक्रमादित्याचा पुत्र सोमेश्वराने बाराव्या शतकात लिहिलेल्या मानसोल्लास ग्रंथातील वर्षोपलगोलक, कृष्णपाक असे चित्रदर्शी नावाचे पदार्थ, ज्यात उकडीचे मोदक पावसाळ्यात पडणा:या गारांप्रमाणो शुभ्र बनवतात आणि शेळीच्या मांसाच्या सुपारीच्या आकाराच्या तळलेल्या तुकडय़ांवर रक्त शिंपडतात. त्यात मांसाच्या तुकडय़ांना फळांचे आकार दिलेले असतात, बसवराजाच्या शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथात दर पन्नास वर्षानी फुलणा:या बांबूची फुलं घालून केलेला केशर, वेलदोडय़ाची पूड घालून सजवलेला भात आहे. ताम्बूलमञ्जरी श्लोकांमधलं विडय़ाचं पान, चुना, सुपारी, लवंग, वेलदोडा, जायपत्री, जायफळ, खोबरं, अक्रोड, कापूर, कंकोळ, केशर, दालचिनी, कस्तुरी, सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, सुंठ, चंदन, तंबाखू, नखी आणि कूलकुट युक्त त्रयोदशगुणी विडय़ाचे वर्णन.
अर्थात त्याकाळात सजावटीपेक्षा पदार्थ शिजवण्याची, मांडण्याची काटेकोर शिस्त, स्वच्छता, आरोग्याच्या नियमांचं प्रस्थ जास्त होतं. तपश्चर्या करणा:या योगींनी तांब्याच्या भांडय़ात शिजवलेला भात खावा. सोन्याच्या भांडय़ात शिजवलेला भात खाल्ल्यास विषबाधा होत नाही तसंच हा भात वातशामक व कामोद्दीपक असल्याने तो खास राजाकरता. चांदीच्या भांडय़ात शिजवलेला भात पचनास हलका. अतिशय कोरडय़ा जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांडय़ात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात, पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते वगैरे नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सजावटीपेक्षा महत्त्वाची वाटतात.
अकबराच्या मुदपाकखान्यात मात्र खानसामे गमती करत. शुभ्र मोत्यांच्या कंठय़ाच्या आकारातली पनीरची मिठाई, कधी कोंबडीच्या एखाद्या पदार्थाला दिलेला फळांचा आकार. कधी मेंढीचं मांस हिरेमोत्यांच्या आकारात असे. एकदा बादशाहाकडे आलेल्या एका जेसुइट पाहुण्यानं ताटातली टम्म फुगलेली पुरी बोटानं फोडली तर त्यातून म्हणो एक चिमणी बाहेर पडली आणि उडून गेली.
रोजचं दही सात रंगांत असे. केशर, हळद, पालक यांच्यापासून तयार केलेले रंग तूपात घातले जात. कापूर, गुलाबाच्या पाकळ्या, बडीशेप, संत्र्याची पानं घालून पाणी सुगंधी करत. अनेक पदार्थांमध्ये सोन्याचांदीच्या तारा किंवा मोत्यांचं चूर्ण घालत. मिठायांना अस्सल सोन्याचा वर्ख असे.
अकबराच्या काळात सामान्य लोकही मसाल्यांची पूड, बदाम, पिस्ते, अक्र ोड वापरून रोजचे पदार्थ देखणो बनवत असं म्हणतात.
(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत)