सेण्टिमेण्ट मॅपिंग

By Admin | Published: February 15, 2015 02:54 AM2015-02-15T02:54:56+5:302015-02-15T02:54:56+5:30

‘आम आदमी पक्षा’च्या समर्थनार्थ दिल्लीच्या निवडणुकीत उतरलेल्या तरुण, ‘आयआयटी’वाल्या कार्यकत्र्यानी एक नवं शस्त्र वापरलं.

Centimeter mapping | सेण्टिमेण्ट मॅपिंग

सेण्टिमेण्ट मॅपिंग

googlenewsNext
>‘आम आदमी पक्षा’च्या समर्थनार्थ दिल्लीच्या निवडणुकीत उतरलेल्या तरुण, ‘आयआयटी’वाल्या कार्यकत्र्यानी एक नवं शस्त्र वापरलं.
कोणत्या मतदारसंघात कोणत्या 
जाती-धर्माचे, कोणती भाषा बोलणारे किती मतदार आहेत, 
या पारंपरिक गणितात न जाता
त्यांनी मोजल्या दिल्लीकर 
मतदारांच्या भावना!
म्हणजे संताप कशाचा, 
राग कशावर, प्रेम कुणावर, 
विश्वास कुणाबद्दल..??
- त्यांनी हे कसं केलं??
स:या महायुद्धातली गोष्ट.
जर्मन सैन्याच्या फौजा कुठे जास्त एकवटल्या आहेत, जर्मनीबाहेर कुठे तळ ठोकलेत याचा माग काढण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी एक वेगळीच युक्ती केली. त्या भागातील रेडिओ केंद्रावरील कार्यक्रमांचं खूप तपशीलवार माग ठेवला. ज्या रेडिओ केंद्रावरून जर्मन संगीताचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले त्या भागात जर्मन फौजांची उपस्थितीही वाढली किंवा कमी झाली असा अंदाज त्यांनी काढला. हेरगिरीची इतर साधनं वापरून आलेल्या निष्कर्षाशी हे अंदाज खूप मिळते-जुळते होते. एका अर्थानं त्यांना आशयातून हेरगिरी करण्याची सुरक्षित युक्तीच सापडली.
असंच एक उदाहरण, अमेरिका आणि जपानचं! त्याच महायुद्धात अमेरिका जपानच्या सामरिक हालचालींचा वेध घ्यायचा प्रयत्न करत होती. जपान हा बेटांचा समूह. अमेरिकेनं आपल्या गुप्तहेरांना सांगितलं होतं की, कुठल्या दोन बेटांमधला पत्रव्यवहार जास्त वाढला आहे हे शोधा. त्या पत्रव्यवहारावर सतत लक्ष ठेवून, अभ्यास करून त्यांच्या लक्षात आलं की, ज्या भागातला पत्रव्यवहार वाढतो आहे, त्या भागात जपानी फौजांचे तळ हालचाली करताना दिसतात.
युद्धशास्त्रच्या पलीकडे जाऊन संशोधन पद्धती शास्त्रच्या शब्दात सांगायचं तर हे काय होतं?
- याला म्हणतात, आशय विश्लेषण किंवा कण्टेट अॅनालिसिस. 
दिल्लीत ‘आप’च्या विजयानंतर सेण्टिमेण्ट मॅपिंग किंवा अॅनालिसिस हा शब्द चर्चेत आला आहे. हे सेण्टिमेण्ट अॅनासिसिस म्हणजेच या आशय विश्लेषण पद्धतीचे आजचे आणि उपयोजित रूप. माणसं जे बोलतात, लिहितात, वेगवेगळ्या माध्यमात जे छापून येतं, त्याचा संख्यात्मक हिशेब ठेवून त्या आधारावर काही निष्कर्षार्पयत पोचण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे विश्लेषण. 
अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर आपण दरमहा पैसा कसा खर्च करतो, याचा सतत वर्ष-दोनवर्षे  अभ्यास करायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या खर्चाच्या सवयीचं आकलन होतं. अंदाज येतो, आपण नक्की कशावर जास्त पैसा खर्च करतो, हे कळतं!
हेच तत्त्व आशय विश्लेषणालाही लागू असते. म्हणजे असे की, माध्यमांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असलेला आशय ‘डेटा’ म्हणून घ्यायचा आणि त्याचं मुख्यत्वे संख्यात्मक पद्धतीने ऑडीट करायचं. या विश्लेषणातून काय पॅटर्न दिसतात ते शोधायचं आणि त्या पॅटर्न्‍सचा मूळ व्यापक संदर्भामध्ये अर्थ लावायचा, असं या पद्धतीचं ढोबळ वर्णन करता येईल.
- दुस:या महायुद्धातली जी उदाहरणं लेखाच्या सुरुवातीला सांगितली आहेत, ते म्हणजे हेच आशय विश्लेषण.  सोप्या शब्दात याला भाषिक डिटेक्टिव्हगिरी असंही म्हणता येईल.
विश्लेषण करण्याची ही पद्धत नवीन नाही; पण आता मात्र या आशय किंवा भावनिक विश्लेषणाला नवा अर्थ प्राप्त होत आहे. कारण पूर्वी साहित्य, पत्रव्यवहार आणि धार्मिक लेखन यासंदर्भात फक्त लोक जाहीर बोलत किंवा लिहित. नंतर वर्तमानपत्र आली, टीव्ही आले. टीव्हीवरच्या चर्चात्मक कार्यक्रमांचा किंवा वर्तमानपत्रत प्रसिद्ध होणारे लेख आणि बातम्यांचा डेटा म्हणून वापर करत असं विश्लेषण केलं जाऊ लागलं; मात्र एकतर माध्यमांना स्वत:चे बायस होते आणि शिवाय या माध्यमांची कळ कशी फिरवायची याची जाण  असलेले लोक त्यापद्धतीनं माहिती पेरायचेही. त्यामुळे या माध्यमात जे दिसतं, लिहिलं-बोललं जातं ते प्रत्यक्ष वास्तवाशी मिळतं जुळतं असेलच असं नाही किंवा तसंच चित्र समाजात असतं असं ठामपणो म्हणणंही अवघड असतं. 
त्यानंतर आलं इंटरनेट. या वेब टू पॉइण्ट ङिारो अॅप्लिेकशनचा म्हणजेच सोशल मीडियाचा उदय झाला. ट्विट, ब्लॉग, फेसबुक, व्हॉट्सअॅप हे सारं लोकांच्या हाती आलं. लोक त्यावर बोलू लागले, चर्चा करू लागले, वाद घालू लागले, मतं मोकळेपणानं व्यक्त करू लागले आणि हे सारं होताना, त्या ‘व्यक्त होण्यावर’ कुणा मध्यस्थाचं नियंत्रण उरलं नाही. ही माध्यमं खासगी अभिव्यक्तीची साधनं झाली. या माध्यमात चर्चा खूप होतात, दुतर्फा संवाद होतात. त्यातून संभाषणवजा आशय निर्माण होतो.
आणि म्हणूनच ट्विटर ही चावडी झाली आणि फेसबुकचा पार बनला; पण पूर्वी चावडी किंवा पारावरच्या चर्चा हवेत विरून जायच्या. आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे या संभाषणाचा कायमस्वरुपी ‘डेटा’ बनतो. साध्या चर्चेचं रूपांतर डेटामध्ये होतं आणि त्या डेटाचं विश्लेषण करणंही सोपं होतं. मुख्य म्हणजे लोकांचं बोलणं, संभाषण, वाद आणि भावभावना या सा:यांचा मिळून तो डेटा बनतो. सोशल मीडियाचा पैस आणि अधिकाधिक लोकांर्पयत पोहोचण्याचा आवाका मोठा त्यामुळे या डाटाचं प्रमाणही प्रचंड मोठं होतं. शिवाय तो डाटा डिजिटल असतो, त्यामुळे त्याचा वापर करणं, तो ‘एक्स्ट्रॅक्ट’ करून म्हणजे एकाजागी एकत्रित करून/मिळवून त्याचं विश्लेषण करणं तर तुलनेनं सोपं. त्याला म्हणतात सेण्टिमेण्ट अॅनासिसिस. 
(पहा चौकट)
अर्थात या भावना विश्लेषणाच्या काही मर्यादाही असतात.
1) भारतासारख्या देशात फक्त समाजमाध्यमातलं आशय विश्लेषण करून पूर्ण वास्तव समजलं असा दावा कुणालाही करता येऊ शकणार नाही. मोबाइलवर इंटरनेट वापरणा:यांची संख्या वाढत असली, तरी त्यातून प्रत्यक्ष चर्चेच्या रूपाने व्यक्त होणा:यांची संख्या अजूनही मर्यादितच आहे.
2) जे व्यक्त होतात, त्यांचं म्हणणं प्रातिनिधिक म्हटलं तरी ते सर्वस्वी सार्वत्रिक मत ठरू शकत नाही कारण जे व्यक्त होतात ते राजकीयदृष्टय़ा सक्रिय (प्रत्यक्ष नसले तरी आभासी) असतात, तेच जास्त बोलतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं हेच पूर्ण समाजाचं म्हणणं, असं म्हणणं धाडसाचं ठरावं.
3) आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. सगळेच शब्द आपण शब्दकोशातील अर्थाप्रमाणोच वापरतो असं नाही. आपण द्विभाषा किंवा मिश्रभाषा अनेकदा वापरतो. समाजमाध्यमात व्यक्त होणारे तर असा मिश्रभाषेचा उपयोग करतातच. त्यामुळे भाषिक जडणघडण समजून घेणारं प्रोग्रॅमिंग नसेल तर शब्दांचे भलतेच अर्थ, त्यातून चुकीचे पॅटर्न समोर येऊ शकतात.
4) समाजमाध्यमातसुद्धा लाइक्स विकत घेण्याचे, माणसं नेमून आपल्याला हव्या त्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न अनेक कंपन्या, संघटना करतात. त्या माहितीचा वापर डेटा म्हणून झाला तर दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती निवडणं हे तंत्रच्या पलीकडे जाणारं वेगळं कसब असतं.
नव्या काळात ही समाजमाध्यमं लोकभावना तपासण्याचं एक मोठं सधन बनू शकतात. कारण आपलं सार्वजनिक चर्चाविश्व या समाजमाध्यमांमुळे विस्तारत चाललं आहे. तिथं जे जे लिहिलं, बोललं जातं, शेअर होतं, त्याचं एक ट्रॅक रेकॉर्ड तयार होतं आणि ती माहिती मोजणंही सहज शक्य होतं. फक्त राजकारणच नाही, तर धर्मकारण, उद्योग, बॅकिंग, या सा:या मानवी मतांना व भावनेला किंमत असणा:या आणि त्यानुरूप निर्णय घेणा:या क्षेत्रत या नव्या माध्यमाची भूमिका बदलते आहे. 
म्हणूनच सेण्टिेमण्ट मॅपिंगलाही महत्व येत आहे.
 
 

Web Title: Centimeter mapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.