मंदारविचार

By admin | Published: December 19, 2015 03:36 PM2015-12-19T15:36:51+5:302015-12-19T15:36:51+5:30

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. कदाचित कुणीही छापायला तयार नसलेलं आणि कुणीही ऐकून न घेतलेलं. इथे तुम्हाला असं सगळं वाचायला मिळेल.

Chaos | मंदारविचार

मंदारविचार

Next
>मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. कदाचित कुणीही छापायला तयार नसलेलं आणि कुणीही ऐकून न घेतलेलं. इथे तुम्हाला असं सगळं वाचायला मिळेल. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे.. ’ असं रामदासस्वामी म्हणून गेले असले, तरी वैयक्तिकआणि कार्यालयीन आयुष्यात तसंच लष्कराच्या भाक:या भाजण्यात व्यग्र असल्याने कधी काही तर कधी काहीच्या काही वाचण्याची तयारी असू द्यावी एवढा मोठा इशारा देणा:या मंदार जोशी यांचा हा ब्लॉग. 2010 पासून ते लिहित आलेत. प्रारंभी सिनेमांची समीक्षणे येत. नंतर विविध विषयांवर ते लिहित गेले. कोणताही विषय वज्र्य न मानता. 
काका-आजोबा आणि अशोककुमार यांच्या चेह:यात साम्य लक्षात आल्यानंतर अशोककुमार यांच्यावर अभ्यासपूर्ण पोस्ट जोशी लिहितात. बोचरा विनोद, व्यंग त्यांना साधता येतो. विडंबन कविता (कविता-काहीच्या काही) हे या ब्लॉगचे वैशिष्टय़ ठरावे. ‘बघ, देश बुडतो की नाही?’ टग्यामहाराज, आवर्जून वाचाव्या अशा. भाषा हवी तेव्हा टोचकी, पण खुमासदार.
 http://mandarvichar.blogspot.in/    
 
दिसामाजी काहीतरी 
‘संदर्भाच्या कुशीतून खुडलेले पोरके शब्द त्यांचा अर्थ चटकन गमावतात’. समर्थांच्या टवाळा आवडे विनोद या उक्तीचा आपण चुकीचा अर्थ घेतो हे सांगण्यासाठी इतके सहज सुंदर विधान करणारा हा ब्लॉगर ‘पामर’ हे नाव घेऊन लेखन करतो आहे, तेही गेली दहा वर्षे. भोपळेवाडीतील कोड- तोडय़ाची गोष्ट तशी मार्मिकच. म्हातारा सुनांना भोपळ्याच्या बिया देतो. प्रत्येक सून त्याचे जे करते त्यानुसार तिच्यावर जबाबदारी तसेच आयटी क्षेत्रत होत असते. प्रामाणिक (ला)कूडतोडय़ाची गोष्ट नव्या काळातील लाकूडतोडय़ा उभा करते. कु:हाडीच्या जागी लॅपटॉप ठेवलाय फक्त. ‘कुठे न्यायची सोय नाही तुला’ तर भारीच. मुलगा आपल्याकडे शि:यात केशर नाही याचा मित्रकडे बोभाटा करतो म्हणून घरी आल्यावर त्याला आई बदाडते. पुढे तो विदेशात गेल्यावर आई मित्रकडे तक्रार करते हा संपर्क ठेवत नाही म्हणून. ‘तुला कुठे न्यायची सोय नाही’ हे आईला ऐकवण्याची आता त्याची पाळी असते. तो तिला सांगतो, स्काईपलाही नेट कनेक्शन लागते आणि तूच तर ते काढून टाकले होतेस. मग कशाला सांगत फिरतेस मी संपर्क ठेवत नाही म्हणून? सचिनवर राजू परु ळेकरांनी लिहिलेल्या लेखाचा समाचार मुळातून वाचायला हवा. अपरांताचा दौराही बारीक तपशील पेरत जाणारा. भाषा सुभग. 
  http://paamar.blogspot.in/

Web Title: Chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.