मुलांचा व्हिसा

By admin | Published: October 21, 2016 06:23 PM2016-10-21T18:23:35+5:302016-10-21T18:23:35+5:30

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!

Children's visa | मुलांचा व्हिसा

मुलांचा व्हिसा

Next
>US Visa मदत खिडकी : सहा
 
परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!
 
माझ्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा आहे. पण माझ्या मुलांकडे नाही. मुलांसाठी अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याची सोपी पद्धत काय आहे?
- जर तुमच्या मुलांचं वय १४ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांना व्हिसाच्या मुलाखतीसाठी येण्याची गरज नाही. ‘इंटरव्ह्यू वेवर प्रोग्रॅम’द्वारे (IWP) व्हिसा मिळवण्यासाठी ती पात्र ठरतील. जी मुलं IWPसाठी पात्र असतात ती ‘ड्रॉप बॉक्स सबमिशन’द्वारे व्हिसासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी एकच फक्त करायचं.. DS-160 हा आॅनलाइन फॉर्म भरायचा.  http://www.ustraveldocs.com/in  या साइटवर अर्ज उपलब्ध आहे. व्हिसासाठीची फी भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांचं एक पाकीट बनवून ते उपलब्ध असलेल्या व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटर (VAC)पैकी तुम्हाला सोयिस्कर केंद्रावर हे पाकीट द्यावं. मुलांच्या व्हिसासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्येक अर्जासाठी एक सबमिशन लेटर तुम्हाला मिळेल. ड्रॉप बॉक्स सबमिशनसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची यादी त्यात असेल. मात्र सबमिशन लेटरच्या दोन प्रती आठवणीनं प्रिंट करून घ्याव्यात. मुलांसाठीच्या व्हिसासाठी मुलांचे जास्तीत जास्त ६ महिने जुने छायाचित्र चालू शकते. मात्र ही छायाचित्रं अमेरिकेच्या व्हिसासाठी तयार करण्यात आलेल्या मानकाप्रमाणेच असायला हवीत. छायाचित्राबाबतचे आणि इतर आवश्यक कागदपत्रांचे निकष आणि माहिती http://www.ustraveldocs.com/in ¹ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. पालकांनी (पती आणि पत्नी) आपापल्या पासपोर्टवरील स्वत:च्या वैयक्तिक माहितीच्या पानांची प्रिंट आणि अमेरिकेच्या व्हिसाची प्रतही सोबत जोडणं आवश्यक आहे. आॅनलाइनवर व्हिसासाठी अर्ज केल्यावर आणि व्हिसासाठीची आवश्यक कागदपत्रे सुपूर्द केल्यावर व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरवर सर्व कागदपत्रांची तपासणी होते. ही कागदपत्रं पुढे व्हिसाच्या प्रक्रियेसाठी स्थानिक दूतावासात किंवा वकिलातीत पाठवली जातात. अर्जासाठी निवडलेल्या व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या कलेक्शन सेंटरवरच पालकांना पासपोर्ट मिळतील. 
अधिक माहितीसाठी वेबसाइट :
http://www.ustraveldocs.com/in
व्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :
support-india@ustraveldocs.com

Web Title: Children's visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.