करुणा ध्यान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 12:58 PM2018-06-03T12:58:06+5:302018-06-03T12:58:06+5:30

दुसऱ्याला न आवडणारी एखादी कृती आपण केली की त्याची भरपाई एका चांगल्या कृतीने होईल, असे आपल्याला वाटते; पण मानसशास्त्र सांगते, एका चुकीची कृती पुसण्यासाठी एक नव्हे, पाच चांगल्या कृती कराव्या लागतात!

Compassion Meditation! | करुणा ध्यान!

करुणा ध्यान!

Next

- डॉ. यश वेलणकर
आपल्या घरात कोठे घाण वास येत असेल तर आपण दोन गोष्टी करतो. ती घाण कोठे आहे ते शोधतो आणि ती काढून टाकतो. पण ती घाण शोधताना किंवा काढून टाकेपर्यंत येणारा घाणेरडा वास कमी करण्यासाठी आपण रूम फ्रेशनर उडवतो, सुगंधी अगरबत्ती लावतो किंवा सेंट लावतो. माइण्डफुलनेसचा अभ्यास मनातील घाण साफ करण्यासाठी आहे. त्यामध्येही मनात साठलेली घाण साफ करणे आणि सुखकर भाव निर्माण करणे अशा दोन गोष्टी कराव्या लागतात. ओपन अटेन्शन ठेवून आपण शरीरातील संवेदना, मनातील विचार आणि भावना प्रतिक्रि या न करता जाणत राहतो त्यावेळी आपण आपल्या मनातील अस्वच्छता साफ करीत असतो. मन अंतर्मनापासून स्वच्छ करण्यासाठी असे करायलाच हवे. पण साठलेला कचरा खूपच दुर्गंध देणारा असेल तर आपण अत्तर लावून तो त्रास कमी करतो तसाच माइण्डफुलनेसचा सराव करीत असताना काही वेळ करुणा ध्यानाचा सराव करायला हवा.
बी पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा अशी आठवण सतत करून द्यावी लागते याचे कारण आपला मेंदू निगेटिव्ह बायस्ड आहे. त्याच्यामध्ये वाईट स्मृतीसाठी अधिक जागा आहे. दु:ख देणाºया आठवणी तो वेल्क्र ोसारख्या पकडून ठेवतो. चांगल्या स्मृती मात्र कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांसारख्या असतात. त्या मेंदूत फार राहात नाहीत. अपयशाचे, भीतीचे विचार आपल्या मनात अधिक येतात. असे होते याचे कारण आपल्या उत्क्र ांतीते आहे असे शास्त्रज्ञांना वाटते.
आपल्याला असे वाटते की, आपण दुसºयाला न आवडणारी एखादी कृती केली की त्याची भरपाई एका चांगल्या कृतीने होईल. पण आजचे मानसशास्त्रातील संशोधन असे सांगते की, एका चुकीच्या कृतीला पुसून टाकण्यासाठी एक नाही तर पाच चांगल्या कृती कराव्या लागतात. पती-पत्नीच्या नात्यात हा अनुभव सर्वांनाच येत असतो. वाईट ते मनात सहज राहते, चांगल्याची मुद्दाम आठवण करावी लागते. करुणा ध्यान म्हणजे जे काही चांगले आहे त्याचे स्मरण करून मनात कृतज्ञता, प्रेम, आनंद, करुणा अशा भावना काही मिनिटे धारण करून राहायचे. असे आपण करू लागतो त्यावेळी मेंदूतील रसायने बदलली जातात.
मेंदूतील डोपामिन नावाचे रसायन उत्साह, प्रेरणा यांच्याशी संबंधित आहे. हे रसायन कमी असते त्यावेळी आपल्याला कंटाळा येतो, बोअर वाटू लागते. पण हा परिणाम केवळ एकाच दिशेने होत नाही, तो विरु द्ध दिशेनेही होतो. म्हणजे आपण मनात उत्सुकतेचा भाव प्रयत्नपूर्वक निर्माण केला तर त्यामुळे मेंदूत डोपामिन तयार होते. मेंदूतील केमिकल लोच्यामुळे आपल्या भावना जन्माला येतात. पण आपण त्या भावना बदलल्या तर केमिकल लोच्या बदलवू शकतो.
मात्र त्यासाठी मेंदूला ट्रेनिंग देणे आवश्यक असते. त्याची सुरुवात सेल्फ कॉम्पॅशन, स्वविषयी करुणा भाव निर्माण करून करायची. आपले जे शरीर आहे, ते जसे आहे तसा त्याचा स्वीकार करायचा. आपण आपल्या शरीराची नेहमी दुसºयांशी तुलना करीत असतो. मी गोरी नाही, मी बुटका आहे, माझे नाक नकटे आहे असे अनेक समज आपल्या मनात असतात. ओपन अटेन्शन ठेवतो त्यावेळी असे विचार मनात येतील त्यावेळी ते नाकारायचे नाहीत. त्या विचारांची नोंद कारायची, त्या विचारांमुळे शरीरावर काही संवेदना निर्माण होतात का हे पाहायचे. पण हे सजगता ध्यान झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढायचा आणि आपल्या शरीराचे आभार मानायचे.
आनंद आपण रोज व्यक्त करायला हवा. त्यासाठी शांत बसायचे. डोळे बंद करायचे आणि अशी कल्पना करायची की तुम्ही आरशासमोर उभे आहात. बंद डोळ्यांनी तुम्ही तुमची आरशातील प्रतिमा, तुमचे रूप, तुमचे शरीर पाहायचे आणि स्वत:च्या शरीराला धन्यवाद द्यायचे, थँक्यू म्हणायचे. त्याच्यावर प्रेम करायचे, ते जसे आहे तसे स्वीकारायचे. असे करताना मनात नकारात्मक विचार येतील, त्यांच्याकडे आता लक्ष द्यायचे नाही.
मी आनंदी आहे, मी कृतज्ञ आहे अशी वाक्ये, त्यांचा अर्थ आणि आनंद, प्रेम, कृतज्ञता या भावना मनात धरून ठेवायच्या. नंतर आपले लक्ष शरीरावर आणायचे. मस्तकात मेंदू आहे, त्याच्यामुळेच आपण सजग राहू शकतो, त्यासाठी त्याला धन्यवाद द्यायचे. चेहºयावर डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा ही पंच ज्ञानेंद्रिये आहेत. त्यांच्यामुळे आपण जगाचे ज्ञान घेऊ शकतो, सुख अनुभवू शकतो. त्यांना धन्यवाद द्यायचे.
मान डोक्याचे वजन उचलत असते, छातीत, पोटात अनेक इंद्रिये आपापले काम करीत असतात. संपूर्ण शरीरात आपले मन फिरवायचे आणि त्याचा आनंद अनुभवायचा. शरीरात कोठे दुखत असते ते आपण जाणत असतो; पण जे अवयव आपापले काम योग्य पद्धतीने करीत आहेत त्यांचे महत्त्व आपल्याला वाटत नाही. आपण ते गृहीत धरतो. ही गृहीत धरण्याची सवय बदलायची. त्याची सुरुवात स्वत:च्या शरीरापासून करायची.
असे केल्याने जे आहे त्याचा आनंद आपण अनुभवू लागतो. जे नाही ते मनात येणे, त्याबद्दल खंत वाटणे, दु:ख वाटणे स्वाभाविक आहे. सजगता ध्यान करताना, ओपन अटेन्शन ठेवून त्याची नोंद करायची. हे मला मिळाले नाही, असा विचार या क्षणी मनात आहे, दु:ख ही भावना आहे, शरीरावर या संवेदना आहेत असे जाणत राहणे म्हणजे मनातील घाण साफ करणे आहे. पण ती साफ करण्याचे धैर्य आणि शक्ती येण्यासाठी एक सपोर्ट सिस्टिम निर्माण करावी लागते. करुणा ध्यान म्हणजे जे काही आहे त्याचे स्मरण आणि त्याबद्दल कृतज्ञता भाव निर्माण करणे ही एक सपोर्ट सिस्टिम आहे. परिसरातील भौतिक घाण साफ करताना सेंट, अत्तर, रूम फ्रेशनर ही अशी सपोर्ट सिस्टिमच आहे. केवळ अत्तर उडवीत राहिलो तर प्रत्यक्ष घाण अधिकाधिक साचत जाईल तसेच केवळ करुणा ध्यान, पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेसे नाही याचेही भान ठेवायला हवे. त्यासाठी ओपन अटेन्शन आणि करुणा ध्यान या दोन्हीचा सराव करायला हवा.

Web Title: Compassion Meditation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या