कापूसबोळा
By admin | Published: January 9, 2016 02:35 PM2016-01-09T14:35:11+5:302016-01-09T14:35:11+5:30
आता आपण कुठेतरी पोचलो आहोत जिथे सर्वात सक्षम आणि ताकदवान आपणच आहोत असे कधीही झाले नाही. आपल्याला ज्ञान मिळाले आहे आणि आता त्या ज्ञानाने आपल्याला आत्मविश्वासाचे स्थैर्य लाभेल ही भावनाच ह्या काळाने येऊ दिली नाही. मला संपूर्ण आत्मविश्वास की काय म्हणतात तो कधीही नव्हता आणि आजही तो माझ्यापाशी बरेचवेळा नसतो - हे माझे फार चांगले नशीब आहे.
Next
- डॉ. उज्ज्वला दळवी
आपल्या मनातली भगवान बुद्धांची प्रतिमा पहुडलेली किंवा पद्मासनात बसलेली असते. पण बोधिवृक्षाखालचे ते एकोणपन्नास दिवस सोडले तर आधी ज्ञानार्जनासाठी आणि मग ज्ञानप्रसारासाठी जवळ जवळ पन्नास वर्षं भगवान बुद्ध सतत चालत होते. सगळा उत्तर भारत त्यांनी प्रवचनं देत पादाक्रांत केला. त्यांची शिकवण रंकापासून राजापर्यंत सा:यांना पटली. राजाश्रयामुळे अधिक दूरचा प्रवास जमला.
तथागतांच्या परिनिर्वाणानंतर लगेचच त्यांच्या अनुयायांनी तो सतत ऐकून मुखोद्गत झालेला पन्नास वर्षांचा उपदेश इमानेइतबारे नोंदवून ठेवला. चालत्याबोलत्या धर्मप्रसाराचा वारसाही त्यांनी चालू ठेवला. प्रवचनांतून, वादविवादांतून, दक्षिणोत श्रीलंका, उत्तरेत गांधार आणि तिथून रेशीमवाटांवरून चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरला.
पण वाटेतल्या अनेक भाषांतरांतून, कानीतोंडी पसरलेल्या उपदेशात ‘चिनी कानगोष्टी’ घुसल्या. महत्त्वाचे भाग गळले. म्हणून मूळ पाली-संस्कृत प्रतींची बिनचूक लेखी भाषांतरं करणं हा काही चिनी शहरांतला मोठा व्यवसाय झाला. भारतातून अनेक भिक्षू त्या कामासाठी गेले. तरी त्यातही कुमारजीवासारखे, दोन्ही भाषांत पारंगत, ललित-भाषांतरकार कमीच होते. शब्दश: भाषांतरांत खरा संदेश हरवून जाई. भाषांतरांच्या ताकाने ख:या ज्ञानाच्या दुधाची तहान भागेना. मूळ प्रती अभ्यासून भवसागर उतरायची पायवाट सोपी करायला शेकडो चिनी अभ्यासक पायी पायी भारतात आले. त्यांच्यातले बहुतेक जण सज्ञान भाषांतरं करूनही अज्ञात, निनावीच राहिले. फा हियेन, ह्यूएनत्संग आणि यित्सिंग हे तिघे त्यांच्या प्रवासवर्णनांमुळे ‘नामवंत’ राहिले. कोरियाचा प्रज्ञावर्मन, चीनचेच पंचसुमती, प्रज्ञादेव यांच्यासारख्या, सातव्या शतकातल्या छप्पन्न अभ्यासयात्रींबद्दल लिहून यित्सिंगाने त्यांनाही अजरामर केलं. वयाच्या चौसष्ठाव्या वर्षी, इ.स. 399 मध्ये, फा हियेन भारतात यायला निघाला. वाटेतल्या पहिल्याच देशात धुमश्चक्र ी चालू होती. नंतर लागलं ताकलामकानचं वाळवंट! ना आभाळात पक्षी, ना जमिनीवर प्राणी! खाणाखुणा फक्त सांगाडय़ांच्या! तशी सतरा दिवस पायपीट झाली. त्यानंतरही बर्फाच्छादित उंच डोंगर, त्यातली बर्फाची वादळं आणि खडकाळ-डोंगराळ मार्गातले वेगात खळाळणारे ओढे पार करून तो त्याकाळच्या हिंदुस्थानात पोचला.
त्यानंतरही सिंधू नदीच्या काठावरच्या उंच उभ्या कडय़ांवरच्या अरु ंद वाटेवरून पंधरा दिवसांची वाटचाल झाली. घोंघावणारी नदी त्याने दोरखंडाच्या शिडीसारख्या पुलावरून चार पायांवर पार केली. संकटांवर मात करत चीनच्या राजधानीहून मध्य हिंदुस्थानात पोचायला त्याला सहा वर्षं लागली. भिक्षूंच्या संघांशी वादविवाद करत पूर्वेकडे जाऊन तो बंगालच्या ताम्रलिप्ती बंदरात पोचला. तिथे दोन वर्षं अभ्यास केल्यावर एका व्यापारी जहाजातून श्रीलंकेला गेला. तिथेही दोन वर्षं वाचन-वादविवादात घालवून तो बंगालच्या उपसागरातून, जावावरून, सागरमार्गातल्या वा:यावादळाशी झुंजत, वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी चीनला परत गेला आणि शेवटच्या श्वासापर्यंत अखंड लिहित राहिला.
ह्यूएनत्संग इ.स. 629 मध्ये चीनमधून भारताच्या दिशेने निघाला तो टँग राजाच्या मनाविरु द्ध, लपूनछपून! वाटेतले खडतर टप्पे पार करून तो आला आणि तब्बल सतरा र्वष भारतात राहिला. त्याने संस्कृतमध्येही विद्वत्ताप्रचुर पुस्तकं लिहिली, व्याख्यानं दिली, वादविवाद जिंकले. सम्राट हर्षवर्धनाच्या मदतीने ह्यूएनत्संग इ.स. 645 मध्ये चीनला परत निघाला. सहाशेसत्तावन्न दुर्मीळ धर्मग्रंथांच्या प्रती घेऊन परतताना त्याचं सामान ठेवलेली नाव उलटली आणि कष्टाने जमा केलेले ग्रंथ पाण्यात पडले. त्याच्यातले पन्नास ग्रंथ बुडाले! चीनला परतल्यानंतर त्याने इत्थंभूत प्रवासवर्णन तर लिहिलंच पण त्याखेरीज एका सहाशे प्रकरणांच्या ग्रंथराजाचं पूर्ण भाषांतरही केलं
सम्राट हर्षवर्धनाच्या मदतीने ह्यूएनत्संग इ.स. 645 मध्ये चीनला परत निघाला. सहाशेसत्तावन्न दुर्मीळ धर्मग्रंथांच्या प्रती घेऊन परतताना त्याचं सामान ठेवलेली नाव उलटली आणि कष्टाने जमा केलेले ग्रंथ पाण्यात पडले. त्याच्यातले पन्नास ग्रंथ बुडाले! चीनला परतल्यानंतर त्याने इत्थंभूत प्रवासवर्णन तर लिहिलंच पण त्याखेरीज एका सहाशे प्रकरणांच्या ग्रंथराजाचं पूर्ण भाषांतरही केलं. घरून निघताना त्याने राजाज्ञा मोडली होती. भटकंतीच्या सतरा वर्षांत त्याला सतत ती रुखरुख होती. त्यामुळे नेपाळ, आसाम वगैरे सगळ्या ठिकाणी अभ्यासासाठी वणवणताना त्याने आपल्या देशाच्या राजदूताची भूमिकाही निभावली आणि टँग घराण्याबद्दल सलोखा निर्माण केला. ते सारं टँग राजाच्या कानांवर गेलंच होतं. भारतातला सम्राट हर्षवर्धनाच्या मदतीने चीनला परतणा:या ह्यूएनत्संगाचं टँग राजाने प्रेमाने स्वागत केलं आणि हर्षवर्धनाकडे राजदूत पाठवला. तोवर हर्षवर्धनाचा मृत्यू होऊन एक उपटसुंभ गादीवर बसला होता. ते कळल्यावर टँग राजाने मोठी फौज पाठवली आणि त्या उपटसुंभाला हाकलून योग्य वारस गादीवर बसवला! ह्यूएनत्संग परतल्यावर सव्वीस वर्षांनी यित्सिंग चीनहून समुद्रमार्गाने निघाला. खवळलेला समुद्र, अक्राळविक्र ाळ लाटांचं तांडव. हे सारं त्याने अनुभवलं. वाटेत सुमात्रच्या श्रीविजय बेटावर आणि हिंदुस्थानाच्या पूर्व किना:यावर राहून तो दीड वर्ष संस्कृत शिकला. तिथून नालंदाला जाताना त्याला जिवावरचं आजारपण आलं. सोबती निघून गेले. तो एकटा पडला. ‘भारतीय देवांना गोरा नरबळी आवडतो’ अशी समजूत असल्यामुळे कित्येक दिवस अंगावर चिखल माखून, पानं पांघरून राहिला. नालंदामध्ये त्याने अकरा वर्षं बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि मग दोन वर्षं श्रीविजय बेटावर राहून भाषांतरं केली. मधल्या काळात संपलेली कागद-शाई आणायला त्याने ईशान्य चीनपर्यंत चार-पाच हजार मैलांची सागरी चक्करही मारली आणि पुन्हा श्रीविजय बेटावर बसून काम पुरं केलं! चारशे धर्मग्रंथांची भाषांतरं घेऊन तो पंचवीस वर्षांनी आपल्या गावाला परतला. अकराव्या शतकात नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झालं. तिथले दुर्मीळ धर्मग्रंथ नष्ट झाले. पण त्यांच्या चिनी प्रती त्या ज्ञानयात्रींमुळे जपल्या गेल्या. त्यावेळचा खडतर प्रवास, वाटेवरच्या देशांमधली बौद्ध धर्माची स्थिती, भिक्षूंचे मठ, त्यांचे रीतिरिवाज वगैरेंची तपशीलवार माहिती त्यांनी लिहून ठेवली. त्यांच्या मन:चक्षूंना जागोजागी बुद्धचरित्रतल्या घटना दिसत होत्या. तरीही त्याकाळची सामाजिक आणि राजकीय परिस्थितीही त्यांनी डोळसपणो पाहिली, वेगवेगळ्या संस्कृतींचे परस्पर संबंध आणि दृष्टिकोन जाणून घेतले. त्यांनी पाहिलेल्या हिंदुस्थानाचा अमूल्य शब्दचित्रपट त्यांच्या प्रवासवर्णनांमुळेच जतन झाला. त्या हिंदुस्थानात डोकवायची, त्यावेळचं दैनंदिन जीवन, समाजकारण, राजकारण अनुभवायची संधी त्या अभ्यासयात्रींमुळेच आपल्याला मिळाली. कालकुपीसारखं त्यांच्या लेखनाने कालकोषाचं काम केलं.
ह्यूएनत्संगाची सफर
ह्यूएनत्संग इ.स. 629 मध्ये घरून निघाला. त्यावेळी तुर्काच्या हल्ल्यांच्या भयामुळे नागरिकांना चीन सोडायची परवानगी नव्हती. ह्यूएनत्संगाला तिथल्या टँग राजाच्या मनाविरु द्ध, लपूनछपून परागंदा व्हावं लागलं. वाटेत गस्त घालणा:या शिपायांच्या बाणांपासून तो बचावला. ताकलामकानच्या वाळवंटात त्याची वाट चुकली, पखालीतलं पाणी वाहून गेलं. चार दिवस तो पाण्याविना व्याकुळला. त्याच्या शहाण्या घोडय़ाने त्याला एका ओयॅसिसकडे नेऊन त्याचा जीव वाचवला.
वाळवंटाच्या दुस:या टोकाला सशस्त्र तुर्कांचा सुळसुळाट होता. त्याशिवाय खडतर रस्ता, हिमवादळं, चोर-लुटारू होतेच. सतरा वर्षं आणि हजारो मैल चाललेल्या प्रवासात एक्याऐंशी वेळा ह्यूएनत्संगाच्या जिवावर बेतलं. वाटेतल्या राजाश्रयाचेही तोटे होते. काही राजांनी त्याला जबरदस्तीने आपल्या दरबारात कायम ठेवून घ्यायचा प्रयत्न केला. हर्षवर्धन आणि कुमार हे बलाढय़ राजे तर तेवढय़ासाठी परस्परांशी युद्धाला उभे ठाकले! ह्यूएनत्संगाने तशा सगळ्या संकटांना जिद्दीने तोंड दिलं. वाटेत भेटलेल्या प्रत्येक ज्ञानी भिक्षूकडून तो काही ना काही शिकला. नालंदा विद्यापीठात त्याने 4क् हजार संस्कृत श्लोकांचं चिनी भाषेत भाषांतर केलं. !
लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
ujjwalahd9@gmail.com