डेमो
By admin | Published: March 19, 2016 02:33 PM2016-03-19T14:33:44+5:302016-03-19T14:33:44+5:30
आर्मेचरवर जीव धरणा:या शाडूपेक्षा माझं लक्ष मूर्ती घडवणा:या आणि ती निर्मिती निरखणा:या मूर्तिकारांकडे होतं. सगळे एकमेकांशी बोलत होते.पण त्याचवेळी त्यांच्या त्यांच्या नजरेला दिसणारं मॉडेल ओल्या मातीत रुजवत होते. हाताची बोटं साधन होती. एका मूर्तिकाराची. उर्वरित दोघे मनानेच प्रतिमा कोरत होते! ‘तुम्ही मूर्ती घडवता म्हणजे नेमकं काय करता?’ - मी त्यांना वास्तवात आणत विचारलं.
Next
कलाकृतीच्या निर्मितीचा क्षण शोधणारा एक लेखक चार शिल्पकारांसोबत ओल्या मातीत शिरतो, तेव्हा..
अनंत सामंत
'ऑक्टोबर एण्ड’ ही माझी कादंबरी. तिच्या नायकाच्या बोटांतून स्पर्शाची ओळख मातीत उतरत मूर्ती साकारते. ती कादंबरी वाचून कोलते सरांनी मला विचारलं होतं, ‘तुम्ही जेजे मध्ये कुठल्या वर्षाला होता?’
- ‘ऑक्टोबर एण्ड’च्या लेखकाने स्कल्पचर- शिल्प- केलेले नाही यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. ‘ओश्तोरीज’ वाचल्यावर अनेक वाचकांना मी फोटोग्राफर आहे असं वाटलं होतं.
कलाकृतीच्या निर्मितीचा क्षण मला दैवी वाटतो. जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तो जगण्याचा प्रयत्न मी करतो. हे सारं विश्व पंचमहाभूतांतून आकारलं. हि:यापासून कोळशार्पयत आणि पक्ष्यापासून माशार्पयत प्रत्येक घटकात त्यांचं प्रमाण, त्यांच्या संयोगाची प्रक्रिया आणि त्या क्षणीचं वातावरण भिन्न असतं एवढंच. पण त्यामुळेच निर्जीव-सजीवांना भिन्न गुणधर्म लाभतात. एका हि:यासारखा दुसरा नसतो, एका मानवासम दुसरा नसतो. गीता यास प्रत्येकाचा ‘स्वधर्म’ म्हणते. हा धर्म योद्धय़ाला शस्त्रची, खलाशाला सागराची, विद्वानाला ज्ञानाची जन्मजात ओढ लावतो. काही जिवांना त्यांचा ‘स्वधर्म’ आत्मशोधाची ओढ लावतो. ते तपस्वी अथवा कलाकार होतात!
गेल्या आठवडय़ात नाशकात होतो. कुसुमाग्रज स्मारक. तात्यासाहेबांच्या स्मरण सप्ताहाचा कार्यक्रम. तिथली तुडुंब गर्दी ओसरल्यावर मी स्मारकाशेजारच्या अंधा:या रस्त्यावर आलो. तिथे फक्त माझी गाडी आणि ती काढता येणो अशक्य व्हावे अशी दुसरी गाडी वेडीवाकडी उभी होती. या वेडय़ावाकडय़ा गाडीच्या मालकाच्या शोधात मी स्मारकात परतलो. शेवटच्या दालनात शिरलो. समोर यतिन पंडितने श्रेयस गर्गेचं शिल्प साकारलं होतं. नुकतं. काही क्षण मी माझी गाडी विसरलो. स्मारकात दोन तीन तास होतो पण इथे हे असं शिल्पकलेचं प्रात्यक्षिक-डेमो सुरू आहे हे मला कळलंही नव्हतं. आता या मूर्तिकारांचा दिवस संपला होता. आवराआवरी सुरू होती.
दुस:या दिवशी सकाळी अकरा वाजताच मी तिथे हजर झालो. आज श्रेयस गर्गे यतिन पंडितचं हेड करणार होता. दोघंही तरुण शिल्पकार. दोघांचंही आधीचं काम मी पाहिलेलं होतं. मला वाटलं होतं, हा डेमो पाहायला दालन खच्चून भरलेलं असेल. सारे मिळून सहा-सात जण होतो. त्यातले चार डेमो देणारे मूर्तिकार आणि उरलेले त्यांचे मित्र. हा डेमो पाहायला कोणीच नाही याची त्या चौघांना पर्वा नसावी.. नव्हतीच!
लाकडी बेसवर उभ्या केलेल्या जाड केबलच्या आर्मेचरवर ओल्या शाडूचे गोळे लिंपत बोटांतून त्यांत आकार ओतणारा मूर्तिकार तर आनंदमग्न होताच; पण त्याचं मॉडेल, डेमो पाहणारे इतर सारेच एवढे प्रसन्न दिसत होते की एखादा आनंद सोहळाच सुरू असावा. वरवर सारं नॉर्मल. कॅज्युअल सुरू होतं.. पण त्यांच्या स्वत:च्याही नकळत. हळू हळू. चिलमींच्या सुरात हरवणा:या साधूप्रमाणो तिथला प्रत्येक मूर्तिकार आणि रसिक निर्मितीच्या क्षणांच्या धुनकीत धुंद होत होता.. आणि या सा:यावर मूर्तिकार संदीप लोंढे बासरीच्या सुरांचा साज चढवत होता. नकळत ओल्या मातीत सूर मिसळत होता. खरंतर जेजेच्या कॅम्पसवर आल्यासारखंच वाटत होतं. नाशिकच्या तरुण कलाविश्वाची ओळख असलेले श्रेयस, यतिन, संदीप आणि नीलेश हे चौघे जेजेचेच! आर्मेचरवर जीव धरणा:या शाडूपेक्षा माझं लक्ष मूर्ती घडवणा:या आणि ती निर्मिती निरखणा:या मूर्तिकारांकडे होतं. सगळे एकमेकांशी बोलत होते. एकमेकांच्या फिरक्या घेत होते. तो त्यांचा वास्तवाशी संबंध तुटू न देण्याचा प्रयत्न असावा. पण त्याचवेळी त्यांच्या त्यांच्या नजरेला दिसणारं मॉडेल ते ओल्या मातीत रुजवत होते. हाताची बोटं साधन होती. एका मूर्तिकाराची. उर्वरित दोघे मनानेच प्रतिमा कोरत होते!
‘तुम्ही मूर्ती घडवता म्हणजे नेमकं काय करता?’ - मी त्यांना वास्तवात आणत विचारलं.
‘आम्ही रेषा, आकार आणि सरफेस रिपीट करतो’ - त्यांनी वास्तववादी उत्तर दिलं.
‘पण चेह:यावरले भाव? भावना?’
‘त्या रेषा आणि सरफेसमधून उमटतात. म्हणजे ओठाची टोकं वर वळवली की मूर्ती हसरी दिसते, खाली वळवलीे की रडकी!’
‘आणि त्वचेवरलं चैतन्य? आत्मभान. ‘स्वधर्म’ त्याचं काय?’ ‘रेषा, आकार, सरफेस!’ - ते सारे परत ठामपणो म्हणाले. टेक्स्ट बुकिंग! मला ते पटणंच शक्य नव्हतं. अख्खी ओश्तोरीज लिहिली मी त्याचा अर्थ लावण्यासाठी. रेषा, आकार आणि सरफेसची पुन:निर्मिती एवढय़ातच मूर्तिकला सीमित असती तर एकाच व्यक्तीच्या चार कसलेल्या मूर्तिकारांनी निमिलेल्या प्रतिकृती समसमान असत्या. त्या तशा नसतात. कारण चारही मूर्तिकारांनी पाहिलेली सजीव व्यक्ती एकच असली, तरी चौघांना ‘दिसलेली’ व्यक्ती भिन्न असते. प्रत्येक व्यक्तीच्या तनूवर उमटलेलं चैेतन्याचं अस्तित्व टिपण्याची प्रत्येक मूर्तिकाराची क्षमता भिन्न असते. मॉडेलच्या तनूवर उमटलेलं चैतन्यतत्त्व आणि मूर्तिकाराला उपजत लाभलेलं चैतन्यभान दोन्ही, आपापल्या मन, बुद्धी आणि अहंकाराच्या पटलाने झाकोळलेलं असतं. त्यामुळे रेषा, आकार आणि सरफेस यांच्या पल्याडचं हे चैतन्यतत्त्व मूर्तीस पांघरताना मॉडेलच्या तनूवरल्या चैतन्यतत्त्वाच्या पोतात मूर्तिकाराच्या चैतन्यभानाचा पोत मिसळतोच, पण पाहणा:याला जाणवणा:या ह्या पोताची स्पष्ट-अस्पष्टता रसिकाच्या क्षमतेनुसार आणखीच भिन्न असते. तनूवरला हा चैतन्याचा पोत निजिर्वाला सजीव करतो. या पोताचं आवरण माती, धातू, फायबरच्या निर्जीव मूर्तीलाही जीव, ऊर्जा, वय, स्वभाव आणि स्वधर्म बहाल करतं. नाशकातल्या चार तरुण मूर्तिकारांनी याचाच डेमो दिला. .आणि माङयाच विचारांचा फोलपणा पटवून देण्यासाठी त्यांनी अखेरीस मलाच मॉडेलच्या खुर्चीत बसवलं.
यतिन आर्मेचरवर माती लिंपत होता. श्रेयस, संदीप आणि नीलेश, यतिन साकारत असलेला आकार, रेषा, सरफेस निरखत होते. हळूहळू माझा चेहरा मातीत उमटत गेला आणि सकाळी अकरापासून माङया मेंदूत भिनलेल्या नशेतूनही मला मातीच्या चेह:यावर फिरणारी यतिनची बोटं माङया त्वचेवर जाणवायला लागली. यतिनच्या बोटांशी जखडलेली त्या तिघांची नजर कधी कधी एवढी इण्टेन्स होत होती की मला वाटतं, यतिनच्या बोटांनी ते तिघेही माती स्पर्शत होते.
..घडणा:या मूर्तीऐवजी मी घडवणा:या चौघांना पाहत होतो. आतार्पयत त्या चौघांनी एकमेकांची प्रतिमा साकारली होती. आता मात्र चौघे मिळून पाचवी मूर्ती घडवत होते आणि या सा:याची त्यांना जाणही नव्हती. उपजत गुणधर्मानुसार वागताना माणसाला जाणीव असण्याची गरज नसते! माशाला कुठे पोहण्याची थिअरी माहीत असते?
..अप्रतिम घडत होती मूर्ती. जवळ जवळ पूर्ण झाली होती. तेव्हा मी हेच सारं यतिनला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एकाएकी झटका आल्याप्रमाणो यतिनने मूर्तीचा ओल्या मातीचा चेहरा दोन हातांच्या ओंजळीत पकडून जिवंत असल्याप्रमाणो पिरगळत वळवला!
‘..अरे काय करतोयस?’
- इतर तिघे तत्क्षणी चित्कारले.
‘सामंतांकडे पाहता पाहता मला त्यांची लकब सापडली.’ - मूर्तीचं मुंडकं अधिकच वळवत यतिन म्हणाला. मानेला तडा गेला होता. एकसंध माती दुभंगली होती. काही क्षणात ती ओघळू लागली. वेदना असह्य झालेल्या सजीवासारखी. मग चौघेही सरसावले चारही बाजूंनी, मी दूर झालो त्यांच्यापासून.
..आतार्पयत दालनात दहापंधरा रसिक जमले होते. सा:यांचेच श्वास रोखले होते. नजरा मातीत रुतल्या होत्या. प्रत्येकाच्या आत्मतत्त्वावरील मन, बुद्धी, अहंकाराचं पटल दूर झालं होतं. स्वधर्म अजाणता जागा झाला होता. एकजीव होऊन ते तो क्षण जगत होते. तो खरा डेमो होता!
हळूहळू मातीने परत जीव गोळा केला. मूर्ती पूर्ण झाली. तेव्हा प्रत्येकाच्या चेह:यावर गाढ आनंद होता, समाधान होतं, तृप्ती होती. सारे मूर्ती पाहत होते. मी त्या जिवंत चेह:याच्या रेषा, आकार, सरफेसवर विलसणारं चैतन्य पाहत होतो.
.. टेक्स्ट बुकिंग थिअरीच्या पलीकडलं!
(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)
alekh.s@hotmail.com