देशोदेशीची दिवाळी
By admin | Published: October 28, 2016 04:46 PM2016-10-28T16:46:35+5:302016-10-28T17:17:56+5:30
घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता परदेशांतही चैतन्याची रुजवात करते आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या थेट घरापर्यंत दिवाळी पोहोचली आहे.
- कल्याणी गाडगीळ
घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी
भारतीय दिवाळी आता परदेशांतही
चैतन्याची रुजवात करते आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या
थेट घरापर्यंत दिवाळी पोहोचली आहे,
तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही
त्याची धूम दिसते.
लोकल भारतीय दिवाळी
जगभरातल्या अनेक शहरांत जाऊन
ग्लोबल होत असताना,
त्या-त्या देशांत मात्र ती
इतकी रुजली आहे की
स्थानिकच होऊन गेली आहे.
अलीकडे सगळे जगच एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झालेले असल्याने प्रत्येक देशातच विविध देशातील लोक कामधंद्याच्या, शिक्षणाच्या निमित्ताने जातात व कालांतराने स्थायिकही होतात. भारतीय लोक त्याला अपवाद नाहीत. लोकांबरोबर त्यांची संस्कृती, भाषा, सण हे सगळे आलेच. त्यामुळे आता जगभर पसरलेल्या भारतीयांनी ‘दिवाळी’ अथवा ‘दीपावली’ हा सणही जगभर नेलेला असून, तो अनेक देशांमध्ये साजरा होतो. त्यात विविध वेशभूषा, भारतीय मिष्टान्ने, फराळाचे पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, मेंदी, दिव्यांची व इतर आरास, शोभेचे दारूकाम असतेच. भारताशेजारच्या तसेच पुढारलेल्या काही देशांतून तो साजरा करताना भारतापेक्षा वेगळ्या काय गोष्टी असतात ते पाहूया.
भारताचा शेजारी नेपाळ. तिथे दिवाळी सण ‘तिहार’ म्हणून साजरा केला जातो.
यातील पहिला दिवस ‘काग तिहार’ म्हणजे ‘कावळ्यांचा दिवस’! कावळ्यांसाठी गोडधोड पदार्थ घराच्या छपरावर ठेवून दिले जातात.
कावळ्यांचे ओरडणे हे दु:ख व मृत्यूचे प्रतीक असल्याने सणापूर्वी ते दूर करण्यासाठी हा नैवेद्य.
दुसऱ्या दिवशी चक्क कुत्र्यांची पूजा होते. त्याला ‘कुकुर तिहार’ म्हणतात. माणसाच्या कुत्र्याशी असलेल्या अतूट नात्याचा आदर करणे ही त्यामागची भूमिका. या दिवशी कुत्र्याला कुंकवाचा टिळा लावून, गळ्यात झेंडूची माळ घालून त्याला गोडधोड दिले जाते. नंतर ‘गाय तिहार’ म्हणजे गायीची पूजा व शेवटी लक्ष्मीपूजनही होते. इंडोनेशियामध्ये म्हणजे मुख्यत: बाली बेटांमध्ये देवळांना दिव्यांची रोषणाई फार उत्तम तऱ्हेने केली जाते. शिवाय ‘दिवाळी धमाका’ म्हणून नाचाचे व विविध प्रकारच्या वेशभूषेचे समारंभही जागोजागी साजरे होतात. सिंगापूरमध्ये अनेक भारतीय स्थायिक झालेले आहेत. तिथे दिवाळी आपल्यासारखीच दणक्यात साजरी होते. सुरक्षा व आवाजाचे प्रदूषण टाळण्यासाठी मात्र तिथे सार्वजनिक आतषबाजीला कटाक्षाने बंदी आहे. येथील दिव्यांच्या आराशीत आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचे आकर्षक रूप सगळीकडे विपुल प्रमाणात वापरलेले दिसते. मलेशियातील दिवाळीचे एक वेगळे आकर्षण म्हणजे शॅडो पपेट; ज्याला मलेशियन भाषेत '‘६ं८ंल्लॅ ‘४’्र३’' म्हणतात.
रामायण व महाभारतातील कथा बाहुल्यांच्या खेळाद्वारे दाखविण्याचे हे कलाकृतीपूर्ण काम असून, या आकृत्या म्हशीच्या कातड्यापासून बनवल्या जातात. त्यांना रंग देऊन, सर्व प्रकारची आभूषणे, वस्त्रे, मुकुट घालून त्यांचा नाच दाखवला जातो.
थायलंडमध्ये दिवाळी 'छें ङ१्र८ङ्मल्लॅँ’' म्हणून साजरी केली जाते. दीपावली म्हणून तयार केलेले दिवे मात्र केळीच्या झाडाच्या पानांपासून बनवले जातात. असे हजारो दिवे नदीमध्ये सोडलेले असतात. हा दीपोत्सव फारच नयनरम्य असतो.
फिजी या पॅसिफिक बेटात निळीच्या उद्योगासाठी अनेक वर्षांपूर्वी गेलेले भारतीय मजूर कायमचे तिथे स्थायिक झाले आहेत. सध्या फिजीमधील ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे असून, तिथे पारंपरिक पद्धतीने अतिशय जोरदारपणे दिवाळी साजरी होते. ‘नादी’ या शहरामध्ये सिगाटोका, लाउटोका व डेनाराऊ या आसपासच्या गावांतून व खेडेगावातून खास दिवाळीसाठी स्पेशल बसेस सोडल्या जातात. नागरिकांना ‘नादी’मध्ये सोडणे व रात्री पुन्हा घरी पोचविणे यासाठी त्या आयोजित केल्या जातात. या शहरातील एक आगळीवेगळी परंपरा म्हणजे दिव्यांच्या रोषणाईच्या स्पर्धा. फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला सुरुवात होते.
दिवाळीनिमित्त आजारी व्यक्तींचे मोफत मेडिकल स्क्रीनिंग केले जाते आणि प्रत्येकाला मिठाईही दिली जाते. पुढारलेल्या देशातही दिवाळीची अगदी धूम असते आणि तिथेही जोरदारपणे दिवाळी साजरी केली जाते. अगदी राष्ट्रीय पातळीवरसुद्धा.
अमेरिकेचंच उदाहरण. अमेरिकेत किती भारतीय आहेत याची मोजदाद करणंही अवघड. दिवाळीचा हा सोहळा तिथेही आनंदाची बरसात करतो. हजारो भारतीय लोक आपापल्या घरी दिवाळी साजरी करतातच; पण आता पुण्या-मुंबईला जसे फराळाचे पदार्थ घरी करण्याऐवजी चितळे किंवा काका हलवाई यांच्याकडून खरेदी केले जातात त्याच धर्तीवर अनेक ठिकाणी खास दिवाळीनिमित्त मिठाया बनवल्या व विकल्या जातात.
अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांत स्थायिक झालेल्या अनेक गुजराथी स्त्रियांनीही हा ‘गृहोद्योग’ सुरू केलेला असून, चकल्या, लाडू, शंकरपाळ्यांसारख्या पदार्थांचा पुरवठा करताना त्या स्त्रिया महिनाभर कामात बुडालेल्या असतात.
जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असताना २००३ पासून त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचा प्रघात सुरू केला. सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ मध्ये स्वत:च्या अध्यक्षीय घरात पूर्वेकडील खोलीमध्ये वैदिक मंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन केले.
सध्याची फर्स्ट लेडी - मिशेल ओबामा यांनी 'इङ्म’’८६ङ्मङ्म िेङ्म५ी२ ३ङ्म हँ्र३ी ऌङ्म४२ी ्रल्ल ं ऊंल्लूी उ’्रल्ल्रू' या घोषणेखाली चक्क पंजाबी नृत्याचे प्रयोग व्हाइट हाउसमध्ये घडवून आणले.
या प्रयोगात स्वत: मिशेल ओबामा नृत्य करीत असल्याचेही पाहायला मिळते. साडी नेसलेल्या ‘गौरांगना’ हातात दिवा व तबक घेऊन सार्वजनिक दिवाळीत सामील झाल्याचे पाहूनही मजा वाटली होती. दिवाळी म्हटल्यावर नटण्या-मुरडण्याला आणि गोडधोडाला अंत नाही. त्यामुळे सलवार-कमीज, चमकदार साड्या, सोन्या-मोत्याचे दागिने असला भरपूर ऐवज या देशांतील भारतीय दुकानात ठेवावा लागतो. त्यावर लोकांच्या उड्याही पडतात. अलीकडे विविध प्रकारचे मातीचे किंवा टेराकोटाचे रंगीबेरंगी दिवेही इथे विकायला असतात.
एकमेकांना भेट म्हणून असे दिवे देण्याची पद्धत येथे सुरू झाली आहे. स्त्रियांचा हळवा कोपरा म्हणजे मेंदी. सणावाराला मेंदी नाही असे कसे होणार? मेंदीचे कोन तर इथे जागोजागी विक्र ीसाठी ठेवलेले पाहायला मिळतात. युनायटेड किंगडम म्हणजे यूकेतही भारतीय घरांमध्ये दिवाळीची धूम खूपच आगळीवेगळी. प्रत्येक भारतीय धूमधडाक्यात दिवाळी साजरी करतो, पण शिक्षणाचे माहेरघर असलेल्या इथल्या विद्यापीठांतही दिवाळी अशीच धमाल असते. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ‘दिवाली सेलिब्रेशन’ करतात.
युनिव्हर्सिटी आॅफ ससेक्सतर्फेतर दिवाळीनिमित्त खास सांस्कृतिक कार्यक्र म आयोजित केले जातात. त्याला ४०० ते ५०० लोकांची हजेरी सहज असते. याखेरीज लंडन शहरातून दिवाळीनिमित्त एक मोठी मिरवणूक निघते. त्यात अनेक भारतीय व गोरे लोक सहभागी होतात.
मिरवणुकीमध्ये भारतीय वाद्ये, नाच व कपडे यांचे मनोहारी दर्शन होते. ट्रेफल्गार स्क्वेअरमध्ये दिवाळीनिमित्त व्यावसायिक कलाकारांना खास निमंत्रित करून भांगडा केला जातो.
हे उपक्र म चालू असतात तेव्हा आसपासच्या भागात इतर अनेक छोटे, खास भारतीय स्टॉल उभारलेले असतात. आयुर्वेदिक मसाज, मेंदी, साडी नेसणे व नेसविणे या साऱ्या पारंपरिक गोष्टी हौसेने केल्या जातात. विदेशी नागरिकही या समारंभात अगदी आनंदाने सहभागी होतात.
हे सुवर्णक्षण साठवून ठेवण्यासाठी सगळीकडे फोटोंचा क्लिकक्लिकाट!
मेंचेस्टरमधील आलबर्ट स्क्वेअरमध्ये तर एक भलामोठा हत्ती छान रंगवून ठेवला होता. लोक मुलाबाळांना तो आनंदाने दाखवीत होते.
न्यूझीलंडमध्ये सिटी काउन्सिलची (म्हणजे आपल्याकडची म्युनिसिपालिटी) तऱ्हा आणखीच वेगळी. आॅकलंड शहर आणि वेलिंग्टन या न्यूझीलंडच्या राजधानीच्या शहरात प्रत्यक्ष दिवाळीच्या आधी सुमारे दोन आठवडे ‘दिवाली मेला’ साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले जाते ‘बी हाइव्ह’ या पार्लमेंटच्या इमारतीसमोर भलीमोठी रांगोळी काढली जाते. शहरातील मध्यवर्ती महत्त्वाच्या ठिकाणी दोन दिवस हा मेळा साजरा होतो.
विविध सांस्कृृतिक कार्यक्र म, भारतीय नृत्ये, कर्नाटकी संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, रांगोळीचे मुलांसाठी चालविले जाणारे वर्कशॉप, फॅशन शो, भांगडा.. असा सारा जामानिमा असतो.
कै. वीणाताई सहस्त्रबुद्धे यांचाही याठिकाणी कार्यक्र म झाला होता. हे सारे उपक्र म आता लोकांच्या इतके अंगवळणी पडले आहेत, की त्याशिवाय दिवाळीचा विचारही ते करू शकत नाहीत. या ठिकाणचे गोरे लोक, या देशाला भेट देणारी इतर देशांची माणसेही या दिवाळी महोत्सवात हिरीरीने सामील होतात.
या कार्यक्रमाची जंगी जाहिरात केली जाते. जागोजागी त्याविषयीचे फलक लावले जातात. त्यासाठी खास बसेस, अगदी ट्रेनचीही सोय केली जाते. दिवाळीच्याच सुमारास ‘गाय फॉक्स डे’ असतो. यावेळी अगदी फटाके विकत घेऊन घरच्याघरी वाजवायलाही परवानगी असते. ‘दिवाली मेला’ची सांगताही आकर्षक आतषबाजीने होते.
देशोदेशी पसरलेल्या हरेकृष्ण मंदिरांतून आणि स्वामिनारायण मंदिरांमधूनही दिवाळी साजरी केली जाते. विशेषत: हरेकृष्ण मंदिरांतील शेंडी ठेवलेले, धोतर नेसून ‘हरे रामा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे’ करीत नाचणारे व तासन्तास हार्मोनियमवर हा जप वाजविणारे ‘गोरे’ भक्त दिवाळीची वाट पाहत असतात.
न्यूझीलंडमधील भारतीय मंदिरांतून दिवाळीनिमित्त ‘अन्नकूट’ म्हणजे अन्नकोटाचे आयोजन होते. भक्तमंडळी अक्षरश: हजारो प्रकारचे पदार्थ बनवून ते आकर्षक रीतीने मांडून ठेवतात.
त्या पदार्थांचे दर्शनही माणसाच्या तोंडाला पाणी सुटायला लावणारे असते आणि ठरावीक वेळानंतर हे पदार्थ खरोखरच सर्वांना प्रसाद म्हणून वाटलेही जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘चोपडी पूजन’ हे या मंदिरांमधून तसेच विविध भारतीय दुकानांमधून साजरे केले जाते.
अनेक भारतीय दुकाने (यात मॅकडोनाल्डची एजन्सी असलेले भारतीय लोकही आहेत) या दिवशी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हिशेबाच्या वह्यांचे पूजन करण्यासाठी बोलावून मिठाई व ‘बोनस’ वाटतात. शेवटी शोभेची दारूही आनंदाने उडविली जाते.
देशभरातील विविध वाचनालयांतही दिवाळीनिमित्त उपक्र म साजरे केले जातात.
भारतीय चित्रकारांची (भारतातील स्थानांची) चित्रप्रदर्शने होतात. त्यात सुनील गाडगीळ या माझ्या यजमानांच्या चित्रांनाही एकदा संधी मिळाली होती. सुनीलने आकाशकंदील करण्याचे लहान मुलांचे वर्कशॉपही एकदा घेतले होते.
मलाही वाचनालयात आता नियमितपणे रांगोळी या विषयावरील वर्कशॉप व प्रात्यक्षिक दाखविण्याचे निमंत्रण येते. एकेवर्षी भाऊबीज हा कार्यक्र म कसा साजरा होतो हे लहान मुलांना दाखविण्यासाठी वाचनालयात एका गोऱ्या मुलाला चांदीच्या ताम्हणातून निरांजन लावून मी औक्षण केले होते.
त्याला अनुसरून अनेक मुलींनी तिथे जमलेल्या मुलांना औक्षणे करून भाऊबीजही मिळविली होती.
दिवाळी हा सण आता न्यूझीलंडमधील समाजात इतका खोलवर रु जला आहे की कालच 'ङल्लङ्म७ फी२३ ँङ्मेी-ँङ्म२स्र्र३ं' या वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त वयोवृद्धांसाठी दिवाळीची सजावट करून त्यांना मिठाई वाटण्यासाठी मला जायला मिळाले. या वृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ आता जवळ आलेली आहे. आपल्या देशात, आपल्या मातीतल्या आपल्या घरी पुन्हा जाण्याची, त्याचे दर्शन घेण्याची, तिथे दिवाळी साजरी करण्याची शक्यताही अगदीच क्षीण. त्यांच्या जीवनात पाच मिनिटे का होईना आनंदाचे दिवे पेटविण्याची संधी मिळाली तर खरीखुरी दिवाळी साजरी झाली असे मला वाटते.
आनंदाची ही दिवाळी सगळीकडेच चैतन्याचे कोंदण लावत जाते. भारतीय दिवाळी आता अशी जागतिक होते आहे..