दुर्गसंवर्धनाची अवघड, पण शास्त्रीय पायवाट.

By admin | Published: October 3, 2015 10:38 PM2015-10-03T22:38:34+5:302015-10-03T22:38:34+5:30

किल्ल्यावरील वास्तूच्या खाणाखुणा व त्याची सद्यस्थिती - दुर्गसंवर्धनाच्या कामामध्ये अनेक लोकांचा किल्ल्यावरील वास्तूंचा अभ्यास झालेला नसतो.

Difficult to fortify, but classical trails. | दुर्गसंवर्धनाची अवघड, पण शास्त्रीय पायवाट.

दुर्गसंवर्धनाची अवघड, पण शास्त्रीय पायवाट.

Next
>दुर्गसंवर्धनातील महत्त्वाचे घटक
 
 किल्ल्यावरील वास्तूच्या खाणाखुणा व त्याची सद्यस्थिती - दुर्गसंवर्धनाच्या कामामध्ये अनेक लोकांचा किल्ल्यावरील वास्तूंचा अभ्यास झालेला नसतो. त्यामुळे किल्ल्यांवर किती प्रकारचे व कोणकोणत्या काळातील बांधकाम झाले आहे हे कळत नाही. अनेक वेळा बांधकामांचे दगड सुटे होऊन खाली पडलेले असतात. असे दगड कोठे व कसे ठेवावेत याची माहिती नसल्याने योग्य प्रकारे संवर्धन करता येऊ शकत नाही. अनेकवेळा वेगवेगळ्या दगडांवर विशिष्ट प्रकारच्या खुणा किंवा काही लेख आढळून येतात याचाही अर्थ संवर्धन करणा:या मंडळींना माहीत नसला तर त्याचे महत्त्व ओळखता येत नाही. या प्रकारची माहिती पुरातत्व विभागाकडे किंवा या संबंधातील संशोधन करणा:या इतिहासतज्ज्ञाकडे असते. त्यांची मदत घेतली जावी.
 किल्ल्याचा संदर्भित इतिहास - दुर्गसंवर्धन करताना हा घटक दुर्लक्षितच आहे असे म्हणावे लागेल. काही महत्त्वाचे किल्ले सोडले तर अन्य कोणत्याही किल्ल्यांवर त्याचा इतिहास सांगणारे फलक आढळत नाही. यासाठी इतिहासतज्ज्ञाची मदत घेणो आवश्यक असते, जेणोकरून योग्य तो इतिहास मांडता येऊ शकतो. इतिहासाच्या गोष्टींचे चित्रमय प्रदर्शन किल्ल्याच्या पायथ्याच्या गावामध्ये ठेवल्यास पर्यटकांना किल्ला पूर्णपणो समजण्यास तसेच किल्ल्यावर नक्की काय बघावयाचे हे लक्षात येते.
 किल्ले परिसरातील वनस्पती व प्राणीसृष्टी- दुर्गसंवर्धनात हा घटक तसा अगदी नवीन आहे परंतु पर्यावरण दृष्टीने या घटकाचे महत्त्व आजर्पयत बहुतेक जणांना कळालेले नाही. अगदी शिवरायांच्या काळातदेखील किल्ल्यांच्या बांधकामावेळी त्याच्या भोवती असलेल्या निबिड अरण्याचा विचार केलेला आपणास प्रतापगडाच्या बाबतीत दिसून येतो. परंतु हाच विचार आज मात्र अभावाने आढळतो. या घटकासाठीदेखील तज्ज्ञ मंडळींची मदत घेणो आवश्यक आहे. गड-किल्ल्यांवरील वैशिष्टय़पूर्ण जीवसृष्टी पर्यटकांना दाखविण्यास सुरुवात केली तर दुर्ग पर्यटनाचे महत्त्व अनेक पटीने वाढू शकते. पर्यावरणीय पर्यटन हे केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी नाही हे समजून घेतले पाहिजे. गड-किल्ल्यांच्या भोवती असलेल्या जीवसृष्टीची गेल्या काही वर्षामध्ये अपरिमित हानी झाली आहे. अतिप्रमाणात वृक्षतोड झाल्याने त्याजागी रानमोडीसारख्या वनस्पती वेगाने वाढत असल्याचे दिसून आलेले आहे. या वनस्पतींचा उपयोग ना जळण्यासाठी होतो ना जनावरांच्या चा:याकरिता होतो. तसेच यावर स्थानिक जीवजंतू फारसे अवलंबून नसल्याने परिसंस्थेमध्येही याचे फारसे महत्त्व नसते. परंतु याचा अप्रत्यक्ष परिणाम गड-किल्ल्याच्या भागातील चा:याच्या उपलब्धतेवर होतो व पर्यायाने याचा परिणाम पिकांवरदेखील होत असतो. हे सर्व अनिष्ट टाळण्याकरिता गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्थानिक प्रजाती व परिसंस्था ह्यांचे जतन होणो अती आवश्यक आहे. यातूनच संवर्धनाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने होणारे वृक्षारोपण टाळता येऊ शकते. तसेच गड- किल्ल्यांवरचे गवताळ कुरणांचे बदल टाळता येऊ शकते.
 किल्ल्यांवर अवलंबून असलेले स्थानिक जनजीवन - सिंहगडासारख्या किल्ल्यांवर आजही परंपरागत पद्धतीने किल्लेदारी असणारी कुटुंबे या परिसरात निवास करीत आहेत. परंपरा जपणारी अनेक कुटुंबे अनेक गड-किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावांमध्ये आढळून येतात. परंतु अशा लोकांकडे सहजपणो दुर्लक्ष झालेले दिसून येते. याशिवाय गड-किल्ल्यांच्या परिसरातून मिळणारे पाणी, चारा यांसारख्या बाबींवर अवलंबून असणा:या कुटुंबांचाही किल्ले संवर्धनात विचार केल्यास त्यांची दैनंदिन स्वरूपात गड-किल्ल्यांच्या व्यवस्थापनात मदत होऊ शकते.
 
कोणत्या किल्ल्याचा नंबर पहिला?
किल्ल्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार केले जाते. जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईदुर्ग असे यांचे विभाजन होते. परंतु याशिवाय किल्ल्यांच्या वापरानुसार त्यांचे चार प्रकार ठरविता येतात. 
 वापरानुसार वर्गीकरण
1) निवास व्यवस्थेकरिता बांधलेले किल्ले- या प्रकारच्या किल्ल्यांवर मुख्यत्वे लोकांची वसतिस्थाने होती. 
2) प्रादेशिक भागावर अकुंश ठेवणारे किल्ले- आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता कायम ठेवण्याकरिता या किल्ल्यांचा उपयोग होई.
3) संरक्षक किल्ले- हे किल्ले अगदी सुरक्षित ठिकाणी बांधले होते व याचा मुख्य उद्देश शत्रूपासून बचाव करणो हाच होता. हे किल्ले अत्यंत दुर्गम तसेच अभेद्य होते. 
4) पायवाटेवरचे किल्ले- अशा किल्ल्यांचा वापर मुख्यत्वे व्यापारउदिमावर नियंत्रण ठेवण्याकरिता होत असे. 
या वर्गीकरणानुसार संवर्धन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या किल्ल्यास प्राधान्य द्यायचे आहे ते ठरविता येऊ शकते.
 सद्यस्थितीनुसार वर्गीकरण
किल्ल्यांच्या सद्यस्थितीतील परिस्थितीनुसार वर्गीकरण करावयाचे झाल्यास सर्व किल्ले एकूण पाच विभागांत विभाजित करावे लागतील. 
1) उत्तम स्थितीतील किल्ले- या प्रकारच्या किल्ल्यांवर इतिहासातील वर्णनाप्रमाणो बहुतांश बाबी पाहावयास मिळू शकतात. अशा दुर्गाचे तट व बुरूज आजही शाबूत आहेत. 
2) सर्वसाधारण स्थितीतील किल्ले- यामध्ये किल्ल्याच्या विविध भागांचे अवशेष सहजपणो आढळून येतात परंतु तटबंदी किंवा सर्व बुरूज शाबूत नसतात. अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे दिसून येते. 
3) ढासळलेले किंवा लयास चाललेले किल्ले- दुर्गामधील अशा प्रकारच्या किल्ल्यांवर फारच थोडे अवशेष पाहावयांस मिळतात. तसेच एखादाच बुरूज, तटबंदीचा काही भाग केवळ शिल्लक असल्याचे दिसते. सद्यस्थितीत बरेच किल्ले याच प्रकारामध्ये आहेत. 
4) पड किल्ले किंवा नष्ट होत चाललेले दुर्ग- या स्थितीतील दुर्ग ओळखणो हे किल्ल्यांवरच्या केवळ काही खुणांमुळे शक्य होते. उदाहरणार्थ बुरूज असल्याचा एखादा भागच राहिलेला असतो किंवा केवळ तटबंदीचा एखादाच भाग शिल्लक असतो ज्यामुळे किल्ला होता असे म्हणता येते. असे किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने फार अवघड असतात. 
5) मृतवत किंवा नष्ट झालेले किल्ले- या प्रकारातील किल्ले संपूर्णपणो नष्ट झाल्याचे आढळते. यात कोणत्याही खाणाखुणा पाहावयास मिळत नाही. परंतु असे किल्ले असल्याचा संदर्भ मात्र आढळतो. ब:याच वेळा इतिहासातील वर्णनांस मिळतेजुळते असणारे किल्ले अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. 
किल्ल्यांचे हे वर्गीकरण करण्याची गरज म्हणजे संवर्धन करण्याकरिता किती व कोणत्या प्रकारचे प्रयत्न करावयाचे आहेत हे या प्रकारावरून ठरविता येऊ शकते. सध्या उत्तम स्थितीतील व ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे किल्ले मुळातच शासनामार्फत संरक्षित केलेले असून, त्याची देखभालही त्यांच्याकडूनच केली जाते. म्हणूनच खरी गरज आहे, जे किल्ले आज आपल्या हातात आहेत व कमीत कमी खर्चात आपण ते सांभाळू शकतो अशा किल्ल्यांचा विचार करण्याची. वर नमूद केलेल्या दुस:या व तिस:या प्रकारातील किल्ले संवर्धनाकरिता प्राधान्याने विचारात घेता येऊ शकेल.
ताब्यानुसार वर्गीकरण
किल्ल्यांच्या ताब्यानुसारही किल्ल्यांचे वर्गीकरण करता येते. 
 खासगी मालकीचे किल्ले
 महसूल विभागाच्या ताब्यातील किल्ले
 वन विभागाच्या ताब्यातील किल्ले
 पुरातत्व विभागाच्या ताब्यातील किल्ले
 तटरक्षक दलाच्या ताब्यातील किल्ले
काही वेळा किल्ल्याचा ताबा दोन किंवा तीन विभागांमिळून देखील असू शकतो. या प्रकारापैकी महसूल किंवा वन विभागाच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांचा संवर्धनाकरिता प्राधान्याने विचार करता येऊ शकतो.

Web Title: Difficult to fortify, but classical trails.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.