वेशीपलीकडची दिवाळी
By admin | Published: October 28, 2016 05:03 PM2016-10-28T17:03:43+5:302016-10-28T17:21:53+5:30
या दिवाळीत ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्काराचे संतप्त अस्र उगारण्यामागचा भारतीय राग स्वाभाविक असला, तरी अर्थशास्त्र वेगळे काही सांगते.
- टेकचंद सोनावणे
या दिवाळीत ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्काराचे संतप्त अस्र उगारण्यामागचा भारतीय राग स्वाभाविक असला, तरी अर्थशास्त्र वेगळे काही सांगते. थेट चीनमधूनच घेतलेला या रहस्याचा शोध...
गेले सुमारे वर्षभर एका फेलोशिपच्या निमित्ताने चीनमध्ये राहतो, फिरतो, आणि भिंतीपलीकडला हा बंदिस्त देश समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर माझे मुंबई-पुण्यातले-दिल्लीतले मित्र चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट्स मला व्हॉट्सअॅपवर पाठवित आहेत, तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीतील
इच्छुक उमेदवार मतदारांना देण्यासाठी चिनी भेटवस्तू (हजारांच्या पटीत) स्वस्त मिळतील का, म्हणून विचारणा करीत आहेत.
- अशी एक दुर्लभ व्हॉट्सअॅपीय अवस्था मी सध्या अनुभवतो आहे.
चीनची बाजारपेठ हे खरे सांगायचे तर अभ्यासकांच्या आवाक्याबाहेरचे प्रकरण!- कारण चीनची मूठ झाकण्याची सवय.
ही चिनी बाजारपेठ अलिबाबाची गुहा आहे.
या गुहेतून प्रत्यक्ष फिरताना
हाती लागलेली
काही निरीक्षणे...