लोक ‘मी’कडून ‘आम्ही’कडे निघाले आहेत! - डॉ. प्रकाश आमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:01 AM2019-11-24T06:01:00+5:302019-11-24T06:05:02+5:30
हेमलकशाला वर्दळ असते लोकांची! मला हे जाणवतं, की अनेकांच्या मनाशी अस्वस्थता आहे. त्यांना आपलं आयुष्य बदलण्याची आस आहे. लोक मला सांगतात, ‘तुमच्याकडचं वातावरण पाहिल्यावर आम्ही इतरांशी अधिक प्रेमानं वागण्याचा, इतरांना समजून घ्यायचा प्रय} करायला लागलो.’
बिल गेट्स यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी संवाद!
मुलाखत : समीर मराठे
छाया : प्रशांत खरोटे
* बिल गेट्स यांच्या भेटीचा, संवादाचा अनुभव कसा होता?
- जगातल्या सर्वात ‘र्शीमंत’ माणसाकडून जगातल्या सर्वात ‘गरीब’ माणसाचा तो सत्कार होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांच्या कार्याचा आदर केला. डोळ्यांतूनच कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्यक्ष बोलणं मात्र फारसं झालं नाही. अर्थात, त्यांच्याबरोबर झालेला स्पर्शाचा संवादही खूप आपुलकीचा आणि आपलेपणाचा होता!
* गेली पन्नासाहून अधिक वर्ष तुम्ही आदिवासींसाठी निरलसपणे काम करता आहात. या एवढ्या काळात सरकारी स्तरावरून या प्रश्नाकडे बघायची नजर, धोरणं, नियोजन यात काही बदल झाल्याचं तुमच्या अनुभवाला आलं का?
- बाबांनी (बाबा आमटे) आदिवासींसाठी गडचिरोलीच्या जंगलात काम सुरू केलं तेव्हा अक्षरश: काहीही नव्हतं. इथले आदिवासी जणू काही अज्ञात बेटांवरचे अदीम रहिवासी होते. सगळाच नकार आणि अभाव! आम्ही काम सुरू केल्यानंतर तब्बल 22 वर्षांनी त्या परिसरात वीज आली.
आदिवासींच्या आरोग्यासाठी सुरू झालेलं काम पुढे खूपच विस्तारत गेलं, आणि सरकारनंही या भागात हळूहळू आपल्या योजना सुरू केल्या. आदिवासींसाठी आता शासनाच्या खूप योजना आहेत, पण एकतर त्या योजना आदिवासींपर्यंत पोचतच नाही, किंवा त्या पोचण्याचा वेग तरी अत्यंत संथ असतो. खरंतर आदिवासींचे प्रश्न असे आहेत तरी किती? ते ओळखून त्यावर उपाययोजना करणं सहज शक्यही आहे, पण आपल्याकडे उलटं असतं. कुठलीही समस्या आधी शोधा, त्या समस्या घेऊन मंत्रालयात जा, तिथे त्या मांडा, नाहीतर मग थेट आंदोलन करा. या मार्गांनीच आपल्याकडे कुठल्याही समस्या ‘सुटतात’.
खरंतर आदिवासींच्या गरजा अतिशय कमी आहेत. स्वत:हून ते आपल्यासाठी काहीही मागत नाहीत. कुठल्याही कारणानं रडत बसत नाहीत. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रय} करतात. हा त्यांचा खूप मोठा गुण आहे. आजवर तोच त्यांचा अवगुण ठरला खरा, पण आता संथ गतीने का असेना, परिस्थिती बदलते आहे. या बदलाचा वेग मात्र वाढला पाहिजे!
* इतक्या वर्षांच्या या प्रदीर्घ काळात आदिवासींच्या किमान तीन पिढ्या तुम्ही अनुभवल्यात. त्यांच्यामध्ये कोणते बदल तुम्हाला दिसतात? आदिवासींची तरुण पिढी अधिक सजग आहे असं तुमच्या अनुभवाला येतंय का?
- मुळात कित्येक दशके आदिवासी समाज नागरी समाजापासून खूप दूर होता. आरोग्य ही प्रत्येकाची प्राथमिक गरज. साध्या साध्या कारणांनी आदिवासी मृत्युमुखी पडत. त्यांची ही तातडीची गरज लक्षात घेऊन आम्ही आदिवासींच्या आरोग्याचे प्रo्न आधी हाती घेतले. पण नुसत्या आरोग्यानं विकास होत नाही, हेही आमच्या लवकरच लक्षात आलं.
अशिक्षितपणा आणि अंधर्शद्धा यामुळे आधुनिक सोयीसुविधांपासून आदिवासी खूपच दूर होता. त्यासाठी आम्ही शिक्षण सुरू केलं.त्याचा खूपच फायदा झाला. आदिवासींची जी पहिली पिढी शिकली, पुण्या-मुंबईसारख्या शहरांत जाऊन ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं, त्यातले बहुसंख्य पुन्हा गडचिरोलीत आले. त्यांना नोकर्याही मिळाल्या. गेल्या अनेक वर्षांपासूनचा सरकारी बॅकलॉग काही प्रमाणात भरला गेला. त्यांचं जीवनमान सुधारलं.
हे पाहून इतर आदिवासी तरुणांनाही प्रेरणा मिळाली. तेही शिकायला लागले. शिकलो, तर आपण आणि आपलं कुटुंब दारिद्रय़ातून बाहेर पडेल हे त्यांना कळायला लागलं. पालकही याबाबत सजग झाले, कधी शाळेत न जाणारी मुलं शाळेत जायला लागली. आपल्या हक्कांची त्यांना जाणीव झाली. इतकंच नव्हे, आधुनिकता आणि विज्ञानाचा स्पर्श झाल्यामुळे त्यांची पारंपरिक शेतीही बदलली. शेतीत सुधारणा झाली. त्याचा फायदा त्यांना मिळू लागला आहे.
पूर्वीच्या तुलनेत आज आदिवासी तरुण आरोग्य, शिक्षण आणि त्यांचे हक्क याबाबत खूपच जागरूक झाला आहे. पर्यावरणाच्या बाबतीत ते अधिक सजग झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या अनावश्यक शिकारी बंद झाल्या आहेत.
* तुमच्या कामाची निम्मी वर्षं जवळपास एकांतवासातच गेली. तुमच्या कामाविषयी लोकांना कळल्यानंतर हेमलकसाला आणि तुमच्या आयुष्यातही खूपच वर्दळ वाढली. आधीचा एकांतवास, शांतता हरवल्याचं वैषम्य कधी वाटतं का?
- खरं सांगायचं तर आमच्या आयुष्यातली शांतता आता संपली आहे. गडचिरोलीच्या जंगलात आदिवासींमधला एक होऊन राहताना आम्हीही जणू आदिवासीच झालो होतो. मुक्तपणे तिथे वावरत होतो, वेगवेगळे प्रयोग करत होतो. काम करताना दिवस केव्हा उगवला आणि मावळला हेदेखील कळत नव्हतं. मुक्तपणाचा तो आनंद आता हरपला आहे, असं वाटतं.
इथलं काम बर्यापैकी वाढल्यानंतर आणि लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून भाषणांसाठी आमंत्रणं यायला लागली. कामाला सुरुवात केल्यानंतर तीस वर्षांनी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी आम्हाला या जंगलातून बाहेर काढलं. तुमचं काम लोकांना समजू द्या म्हणून आग्रह केला. इच्छा नसताना बाहेर पडावं लागलं. त्यांच्या आग्रहाला बळी पडून पहिल्यांदा मी आणि प}ी डॉ. मंदा अमेरिकेला गेलो.
त्यानंतर इतरही अनेक ठिकाणांहून आमंत्रणं आली. लोक भेटीसाठी आणि गडचिरोलीतलं काम पहायला यायला लागले. पद्मर्शी, मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
एखादा मोठा पुरस्कार मिळाल्यावरच माणूस मोठा होतो, असं आपल्याकडे मानतात, याची आम्हाला खूप गंमत वाटते. खरंतर आम्ही पूर्वी होतो तेच, तसेच आहोत.
अर्थात आता अधूनमधून आम्ही गडचिरोलीच्या बाहेर पडतो, याचा सकारात्मक परिणामही झाला. आमच्या आयुष्याबद्दल तरुणांना खूप उत्सुकता वाटते , हे आम्ही अनुभवतो. त्यामुळेच आमच्या भाषणासाठी वेगवेगळ्या कॉलेजांतली आमंत्रणं बरीच जास्त असतात. अनेक जण हा ‘आदिवासी’ कसा दिसतो, हे पाहण्यासाठी आलेले असतात, पण त्यापासून प्रेरणा घेऊन छोटी छोटी का होईना, समाजोपयोगी कामं त्यांनी सुरू केली, हे त्यांच्याच तोंडून ऐकताना खूप बरं वाटतं.
पण तरीही आधीचा तो एकांतवासच मला हवासा वाटतो. त्या एकांतवासानं मला खूप काही दिलं आहे. ‘माणूस’ बनवलं आहे. गीता मी कधी वाचली नाही, पण गीतेत सांगितलेल्या त्या निरपेक्ष सेवेचा पुरेपूर आनंद मी त्या एकांतवासात घेतला आहे.
* हेमलकसाला तुम्हाला येऊन भेटतात ती माणसं अस्वस्थ असतात असं तुम्ही म्हणाला होतात. माणसांच्या मनात कसली अस्वस्थता भरली आहे?
- शाळकरी वयापासून वर्षानुवर्षं मुलं शाळेत रोज प्रतिज्ञा म्हणतात, ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’, पण गडचिरोलीत हेमलकसाला आल्यावर, इथलं वातावरण पाहिल्यावर ‘बांधव’ म्हणजे काय, लोकं एकमेकांशी कसं प्रेमानं आणि आपुलकीनं वागतात, राहतात हे अनेकांना कळतं. आपली उक्ती आणि कृतीतला फरक त्यांना कळतो आणि त्यांना आश्चर्य वाटतं. ते विचार करायला लागतात. काहीसे अस्वस्थ होतात.
इथले आदिवासी इतके अभावात जगतात, तरी कधीच, कोणतीच तक्रार ते करत नाहीत, एकमेकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात, आनंदी असतात आणि आपण मात्र कायम असमाधानी असतो, कायम कशाच्या तरी मागे आधाशासारखे धावत असतो, याची जाणीव लोकांना होते आणि नकळतपणे त्यांच्यात बदल होऊ लागतो.
अनेकांनी आम्हाला सांगितलं, हेमलकसाचं वातावरण पाहिल्यावर आम्ही इतरांशी अधिक प्रेमानं वागण्याचा, इतरांना समजून घ्यायचा प्रय} करायला लागलो. आमचा वायफळ खर्च कमी झाला. अनेक डॉक्टरांनी तर गरिबांवर मोफत, अत्यल्प मोबदल्यात उपचार करायला सुरुवात केली. अनेक जण ‘मी’पासून ‘आम्ही’पर्यंत पोहोचले हा त्या अस्वस्थतेचाच परिणाम आहे.
* इतकी वर्षं काम केल्यानंतर एकांतवासापासून अलिप्ततेकडे तुमचा प्रवास सुरू झाला आहे.
- हो, हे शक्य झालं, कारण आमची चौथी पिढी आता स्वयंप्रेरणेनं आदिवासींमध्ये रमली आहे. त्यांना स्वतंत्रपणे आणि सर्मथपणे काम करताना पाहून अलिप्त होण्याचा आमचा निर्णय बराच सुकर झाला. मुलांवर दडपण येऊ नये म्हणून विचारल्याशिवाय कुठला सल्ला आम्ही त्यांना देत नाही. आमच्या वेळी आम्हाला जसे तरुण कार्यकते येऊन मिळाले, तशी नव्या दमाची, उच्चशिक्षित, टेक्नोसॅव्ही तरुण कार्यकर्त्यांंची फळी या मुलांनाही येऊन मिळाली आहे. त्यांच्या पद्धतीनं उत्तम प्रकारे ती काम पुढे नेताहेत.
प}ी डॉ. मंदाकिनीची खूप मोठी साथ मला मिळाली. आमची दोन्ही मुलं आदिवासींबरोबर शिकली. त्या दोघांच्या प}ीही या कामात समरसून गेल्या. मोठा मुलगा डॉ. दिगंत आणि त्याची प}ी डॉ. अनघा दवाखाना व आरोग्याचं काम सांभाळतात, तर धाकटा मुलगा अनिकेत आणि त्याची प}ी समीक्षा आदिवासींच्या शिक्षणासाठी काम करतात. एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि तृप्ती आता आम्ही अनुभवतो आहोत.
amteprakash@gmail.com