स्वप्न आणि सत्य

By Admin | Published: February 27, 2016 02:53 PM2016-02-27T14:53:22+5:302016-02-27T14:53:22+5:30

बदलत्या जगण्याची खूणच असलेली शहरे सतत बदलत असतात. वर्तमानातल्या नव्या आणि भविष्यातल्या संभाव्य गरजांसाठी व्यवस्था उभारणे, असलेल्या व्यवस्थेतल्या चुका अगर कालबाह्यता सुधारून त्या कालसुसंगत करत राहणे म्हणजे नगरनियोजन. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया. - सुलक्षणा महाजन यांच्यासारखे नगरनियोजनातले ज्येष्ठ अभ्यासक स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय याचे ‘भारतीय उत्तर’ शोधून सांगत आहेत.

Dream and truth | स्वप्न आणि सत्य

स्वप्न आणि सत्य

googlenewsNext
>- अपर्णा वेलणकर
 
जिथे पाहावे तिथे टांगलेले कॅमेरे, सेन्सर्स, आकाशीच्या उपग्रहांशी संधान, जीपीएस टॅगिंग यांसारखे दिवसागणिक अत्याधुनिक होत जाणारे, शहराला चोहोबाजूंनी घेरणारे हार्डवेअर, ते चालवणारे सॉफ्टवेअर आणि या दोन्हींच्या बळावर सतत विकसित होणारे तंत्रज्ञान म्हणजेच स्मार्ट सिटी.
आणि
शहराचे जीवनमान सुधारण्यासाठी नागरिकांच्या समूहाला सक्षम-सक्रिय-सहभागी करण्याच्या प्रक्रियेचा मुख्य कारक म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करणारी व्यवस्था म्हणजे स्मार्ट सिटी.
- आधुनिक शहरनियोजनाच्या भिन्न दिशा दाखवणारे हे दोन रस्ते सध्या जगभरात चर्चेचा विषय आहेत.
आणि वार्षिक तब्बल 4क्क् अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेली बाजारपेठ!
- त्यामुळे भारतात 1क्क् स्मार्ट शहरे उभारण्याच्या घोषणोने स्मार्ट तंत्रज्ञान-स्मार्ट सल्ला असे सारेच विकायला बसलेल्या या महाप्रचंड बाजारपेठेचे डोळे न विस्फारते, तरच नवल! तेल अवीवमधल्या मुक्कामात एका जागतिक सिटी समीटमध्ये सहभागी होताना हे ‘स्मार्ट मार्केट’ मी अनुभवले आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाची बाजारपेठ उभी करण्याच्या तयारीला लागलेल्या अनेकानेक कंपन्यांनी मांडलेले स्टॉल्स भटकत फिरणो हा पायाचे तुकडे पाडणारा आणि भविष्यातल्या शहरांमध्ये काय काय शक्य होऊ घातले आहे या जाणिवेने मेंदू भिरभिरवून टाकणारा अनुभव होता.
स्मार्ट शहरे म्हणजे जणू काही बसल्या जागी सारी कामे चुटकीसरशी करण्या/करवण्याची जादूची कळ शोधून देणारी, कुठे कसला प्रश्न म्हणून न उरू देणारी आणि कच:यापासून पार्किंगर्पयतचे सगळे प्रश्न परस्पर सुटतील अशा व्यवस्थेची यक्षनगरी असल्याचे भास हल्ली अनेकांना होत असतात. 
स्मार्ट शहर या संकल्पनेचा जोरदार पाठपुरावा/समर्थन करणारे आणि न परवडणारे भलते फॅड म्हणून या स्मार्ट प्रकरणाला टोकाचा विरोध करणारे.. आघाडीचे समर्थक आणि पराकोटीचे विरोधक सारेच या चकव्यात अडकले आहेत. त्यातून बाहेर पडायला मदत करतात ते तज्ज्ञ अभ्यासक. नगरनियोजनाच्या शास्त्रत उत्क्रांत होत गेलेल्या संकल्पनांचा, आधुनिक नगरनियोजनातल्या जागतिक प्रयोगांचा दीर्घ अनुभव आणि अभ्यास असलेल्या सुलक्षणा महाजन यांचे स्थान त्यात आघाडीचे. 2क्14च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे सूतोवाच केल्याच्या कितीतरी आधीपासून सुलक्षणा महाजन भारतीय महानगरांच्या ढिसाळ, अदूरदर्शी नियोजन-शून्यतेबद्दल पोटतिडिकीने लिहीत आल्या आहेत.  (त्यांच्याच शब्दात सांगायचे तर हातात दिवा घेऊन अख्ख्या शहरातला अंधार दूर करण्याचा क्षीण प्रयत्न.) मुंबईचा ढासळता डोलारा हा अर्थातच त्यांच्या अभ्यासातल्या प्राधान्याचा विषय. त्यांच्या मते माणसाला स्वभावत: शहरांचे आकर्षण असते आणि वास्तवाच्या पलीकडे कल्पनेची भरारी घेऊन स्वप्नातले शहर वसवणो या ध्येयाने नियोजनकारांना नेहमीच भुरळ पाडलेली आहे. उंच इमारतींची, बागांची, मोटारींची, सायकलींची शहरे, जुळी शहरे अशा अनेकानेक कल्पना आजवर आखल्या/प्रत्यक्षात उतरवल्या गेल्या. विसाव्या शतकात विकसित झालेल्या बहुतेक सर्व संकल्पना डोळ्यांना दिसणा:या शहराच्या बदलत्या स्वरूपाविषयीच्या होत्या. कुठे गगनचुंबी इमारतींचे जाळे, कुठे फुललेले बगीचे, कुठे सायकलींसाठी राखलेले मार्ग, तर कुठे पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठीच्या योजना. स्मार्ट शहर ही संकल्पना अशी डोळ्यांना दिसणारी, चित्रतून दाखवता येणारी अगर निश्चित अशी व्याख्या करून सांगता येणारी नाही. - क्लिष्ट तांत्रिक शब्दयोजनेच्या पलीकडे जाऊन सुलक्षणा महाजन यांनी स्मार्ट शहरांच्या स्वभावाची आणि गुणवैशिष्टय़ांची एक सोपी यादी (चौकटीत पाहा) मात्र केली आहे. मराठी विज्ञान परिषदेतल्या व्याख्यानात मांडलेल्या या यादीबद्दल  एक खुलासाही त्या करतात : ही संपूर्ण यादी नव्हे, कारण बदलत्या जगण्याची खूणच असलेली शहरे सतत बदलत असतात आणि म्हणून नगरनियोजन ही एकदा करून संपवण्याची गोष्टच नव्हे. वर्तमानातल्या नव्या आणि भविष्यातल्या संभाव्य गरजांसाठी व्यवस्था उभारणो, असलेल्या व्यवस्थेतल्या चुका अगर कालबाह्यता सुधारून त्या कालसुसंगत करत राहणो म्हणजे नगरनियोजन. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया असते.
या प्रक्रियेचे तंत्रज्ञानाधारित नवे रूप म्हणजे  ‘स्मार्ट’ शहरे. त्यासाठीच्या तांत्रिक पूर्तता करणो भारतात अवघड असले, तरी अशक्य नाही असे सुलक्षणा महाजन यांना वाटते. त्यांना शंका आहे ती प्रत्यक्ष अंमलबजावणीची. ‘स्मार्ट’ शहरे स्मार्ट मनोवृत्ती जन्माला घालू शकत नाहीत, ती त्या समाजामध्ये मूलत:च असावी लागते किंवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक मानसिकतेतली पारंपरिक संकुचितता हा स्मार्ट शहरांच्या मार्गातला प्रमुख भारतीय अडथळा आहे, असे त्या म्हणतात.
अर्थात, अंमलबजावणीआधीचा भारतीय टप्पा आहे तो अशा स्मार्ट शहरांचे नियोजन आराखडे बनवण्याचा! त्यात राजकीय सहमतीचे (आणि अर्थातच समजुतीचे) अडथळे किती आहेत हे महाराष्ट्राने पाहिले आहेच. त्याशिवाय भांडवल उभारणी, कररचना, केंद्र-राज्य आणि महानगरपालिकांच्या परस्परसंबंधांचे गुंते हे सगळेच जिकिरीचे!
हा पसारा समजून घ्यायला सोप्या पद्धतीने सुरुवात करायची तर वाटेत काही संकल्पना येतात. उदाहरणार्थ भारतात सध्या ‘ग्रीनफिल्ड’ (म्हणजे पूर्णत: नवे स्मार्ट शहर वसवणो) आणि  ‘ब्राउनफिल्ड’ (म्हणजे अस्तित्वात असलेल्या महानगरीय व्यवस्थेलाच ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाची जोड देणो) अशा दोन पर्यायांची चर्चा चालू आहे. त्याबद्दल पुढच्या रविवारी.
 
स्मार्ट शहरे म्हणजे..
 
 चटपटीत, तत्पर आणि उत्साही
 दिसायला छान, सर्वाना हवीशी वाटणारी
 वावरायला सुकर, सोपी आणि आपलीशी वाटणारी
 पुरेशा, अनेक प्रकारच्या आवश्यक आणि अखंडित नागरी सोयी-सुविधा असलेली
 माहिती-ज्ञान आणि अनुभवाचा साठा असलेली म्हणजेच हुशार
 कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास त्यावर चटकन उपाय शोधून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची क्षमता असलेली
 आणीबाणीच्या प्रसंगी झटपट निर्णय घेण्याची आणि ते तत्काळ सर्वार्पयत पोहोचवून आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्याची क्षमता असलेली
 नागरिकांच्या सुरक्षेबाबत तत्पर असलेली आणि त्यांना माहिती देऊन सहभाग मिळवणारी
 नियोजन, देखभाल, दुरुस्ती यात सर्वत्र स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणारी
 माहितीचा साठा करून त्याचे सातत्याने विश्लेषण, संशोधन करत त्या आधाराने तत्काळ निर्णय घेऊ/बदलू शकणारी
 अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि पर्यावरण यांचा सातत्याने वेध घेऊन त्यानुसार धोरण आखून पाठपुरावा करणारी, उत्तम प्रशासनाची शहरे
 शहरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन त्यांनाही ‘स्मार्ट’ म्हणजेच जबाबदार नागरिक बनवणारी, त्यासाठी पूरक-प्रोत्साहक वातावरण निर्माण करणारी शहरे.
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com
 

Web Title: Dream and truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.