स्वप्न निर्भय महासत्तेचे

By admin | Published: May 17, 2014 07:57 PM2014-05-17T19:57:33+5:302014-05-17T19:57:33+5:30

आधुनिक भारताचं हेच तर खरं वैशिष्टय़! काय असेल या तरुणाईच्या मनात? नवे सरकार कसं असावं, असं त्यांना वाटत असेल ?

Dream dreamless world | स्वप्न निर्भय महासत्तेचे

स्वप्न निर्भय महासत्तेचे

Next
>जगभरात कुठं लष्करी उठाव होत आहेत, तर कुठं लोक रस्त्यावर आल्यामुळं राज्यकत्र्याना परागंदा व्हावं लागत आहे. त्याच वेळी तब्बल 125 कोटी लोकसंख्येच्या भारतात मात्र अगदी सहजपणो मतदानातून नवं सरकार निवडलं जात आहे. जगातील तरुण आपल्यातील अस्वस्थतेला क्रांतीच्या वगैरे माध्यमातून वाचा फोडण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय युवक मात्र मतदानातून शांतपणो आपलं सरकार निश्चित करत आहे. आधुनिक भारताचं हेच तर खरं वैशिष्टय़! काय असेल या तरुणाईच्या मनात? नवे सरकार कसं असावं, असं त्यांना वाटत असेल ? यंदाच्या निवडणुकीत उत्साहाने मतदान करणा:या तरुणाईच्या भाव-भावनांचा, आशा-अपेक्षांचा घेतलेला कानोसा..
 
कलेला प्रोत्साहन; समान विकासाची दृष्टी हवी
उत्तर भारतात नाटय़चळवळ नाही. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात काम होणो गरजेचे आहे. कला क्षेत्रसाठी आणि इतरही क्षेत्रंत सर्व राज्यांना केंद्राकडून मिळणा:या सुविधा योग्य पद्धतीने राबविल्या जात आहेत की नाही, याचा आढावा घेणो गरजेचे आहे. नाटय़क्षेत्रला मान मिळावा यासाठी योग्य त्या योजना राज्यस्तरावर राबविणोही तितकेच महत्त्वाचे आहे. चित्रपटगृहात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आपल्याकडे मराठी चित्रपटांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. तसे न होता प्रत्येक राज्यात त्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना हक्क मिळाला पाहिजे. 
जनतेर्पयत अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज यांसारख्या किमान सुविधा कमी संघर्षामध्ये पोहोचल्या पाहिजेत. तसेच या सुविधा सामान्यांर्पयत पोहोचत आहेत की नाही याची पाहणी होणोही तितकेच महत्त्वाचे. कायदा न पाळणा:या लोकांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय प्रगती होणार नाही. येणा:या सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे असे वाटते. केवळ मुंबई, बंगळुरू, पुणो यांसारख्या शहरांचा होणारा विकास आणि त्यामुळे त्या ठिकाणी वाढणारी गर्दी येत्या काळात आणखीन उग्र रूप धारण करू शकते. यासाठी सर्व शहरांचा समान विकास होण्यासाठी नवीन सरकार प्रयत्न करेल अशी आशा आहे. उपनगरांमधील बांधकामांवर र्निबध घालून ही उपनगरे देखणी होण्यासाठी प्रयत्न होणो गरजेचे आहे. वाढती बांधकामे आणि ठराविक ठिकाणी वाढणारी गर्दी यांबाबत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 
आताचा तरुण हा हुशार, प्रगल्भ असून त्याला चांगल्या सोयीसुविधा मिळाल्यास तो परदेशात न जाता त्याच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला देशासाठी होईल हे नक्की.
सुनील बव्रे
अभिनेता
 
आम्हाला घडवा; आम्ही देश घडवू
परदेशात विद्यार्थी आठवीमध्ये असतानाच त्याला कोणत्या क्षेत्रत करिअर करायचे आहे, ते समजून घेतले जाते. त्यानुसार संबंधित क्षेत्रत कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी शिक्षण दिले जाते. आपल्याकडे मात्र विद्यार्थी पदवीधर झाला तरीही त्याच्या डोळ्यांपुढे नक्की काय करायचे, याविषयी अंधारच असतो. हे चित्र बदलायला नको का? नव्या शासनाने यासाठी पावले उचलावीत. आम्हाला घडवलेत तर देश नक्की घडेल. कारण प्रगतीचे सुकाणू आता तरुणांच्याच हातात आहे. केंद्राला आणखी एका बाबतीत कठोर राहावे लागणार आहे, ते म्हणजे महिला सुरक्षा.  महिला, युवतींवर अत्याचार करणा:यांवर कडक कारवाई व्हावी.  न्यायालयीन यंत्रणोद्वारे तत्काळ निर्णय व्हावा. कडक शिक्षा आणि कारवाई झाली तरच महिलांवरील अत्याचाराला लगाम बसेल.  
संध्या पाटील
विद्यार्थिनी, इन्स्टिटय़ूट ऑफ क्लिनिकल रिसर्च ग्रुप, कोल्हापूर
 
 
 
खेळांना प्राधान्य हवेच
खेळांसाठी असणा:या मूलभूत सोयीसुविधा गावागावांत पोहोचणो गरजेचे आहे. प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र जागा आणि साधनसामग्री; तसेच खेळाडूंच्या राहण्याची सुविधा, खेळातील विज्ञान, खेळातील वैद्यकीय सुविधांबाबत जागरुकता महत्त्वाची. खेळांसाठी गरजेचे असणारे आधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक शहरांत हवे. खेळाडूंचे प्रशिक्षण, त्यांचा आहार, या सर्वासाठी खेळाडूला येणारा खर्च या सर्वाचा येणा:या सरकारकडून प्राधान्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडील मुलांकडे खेळात असणारे कौशल्य वेळीच लक्षात येण्यासाठी प्रत्येक मुलाला शालेय स्तरापासून विविध खेळांची ओळख करून देणो गरजेचे आहे. परदेशात असणा:या सोयीसुविधा आपल्या देशात मिळाल्या, तर परदेशात जाण्यापेक्षा प्रत्येक तरुण स्वत:च्या देशात राहून आपल्या हुशारीचा उपयोग देशासाठी करू शकेल. त्या दृष्टीने व्यवस्थित नियोजन करून, उपाययोजना कराव्यात. आपण चीन आणि इतर देशांशी आपली तुलना करत असताना, तितक्या सुविधा आपल्याकडे नाहीत. आजही पाऊस आला, की आपल्याकडील वीज जाते. हे थांबवायचे असल्यास मूलभूत सुविधांचा वेळ न घालवता विकास करणो गरजेचे आहे. 
भ्रष्टाचाराने आपले आयुष्य पोखरले आहे. येणा:या सरकारने त्याच्या निमरूलनासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर येणा:या काळात त्याचे आणखीन गंभीर परिणाम प्रत्येकाला भोगावे लागतील. 
अभिजित कुंटे 
युवा क्रीडापटू
 
 
प्रगतीची कास धरायलाच हवी..
लोकांना आता हुकूमशाही सरकार नको आहे. नव्या सत्ताधा:यांनी लोकांचा आणि देशाचा विचार करून, काही ठोस उपाययोजना केल्या, तर पुढील काळासाठीही त्या पक्षासाठी ती एक उत्तम संधी असेल.  
कॉर्पोरेट क्षेत्रमध्ये पायाभूत सोयीसुविधा चांगल्या व्हाव्यात. कॉर्पोरेट क्षेत्रबरोबरच सामान्य माणसाचाही विकास झाला पाहिजे. येणा:या सरकारने काही जुने विचार मागे ठेवून नवीन पिढीला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देणो गरजेचे आहे. समाजातही राजकारणाबाबत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शालेय स्तरापासून अभ्यासक्रमात असणारे नागरिकशास्त्र 2क् गुणांचे असल्याने विद्याथ्र्याकडून ते बाजूला ठेवले जाते. शालेय स्तरावर त्याचे गुण वाढवून शिक्षक व विद्यार्थी दोघांकडूनही त्याला महत्त्व दिले गेले पाहिजे आणि त्याचा तितकाच महत्त्वाचा विषय म्हणून अभ्यास केला गेला पाहिजे. कला-सांस्कृतिक क्षेत्रच्या प्रसारासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. सांस्कृतिक क्षेत्रमध्ये नाटकाची आवड असणा:यांसाठी प्रत्येक गावात सभागृह असणो गरजेचे आहे. ते केवळ असून चालणार नाही, तर त्यातील सोयीसुविधा आणि तिथे जास्तीत जास्त नाटकांचे प्रयोग व्हावेत, यासाठी प्रयत्न होणो गरजेचे आहे. सुसंस्कृत समाजासाठी प्रत्येक गावात सांस्कृतिक केंद्र असणो गरजेचे आहे.      
किशोर कदम
कवी, अभिनेता
 
विषयातील तज्ज्ञ माणूस मंत्री करा
ज्या खात्याचं मंत्रिपद बहाल केलं जातं त्या माणसाला त्या क्षेत्रची काडीचीही माहिती नसते, हा आजवरचा अनुभव. या पुढे नव्या शासनात तरी ही अपेक्षा नाही. ज्या खासदाराला जे खाते दिले जाणार आहे, त्याला त्याच्या विषयाची पूर्ण जाण असावी, तो त्या विषयातील तज्ज्ञ असावा. त्यामुळे संबंधित खात्याकडून विकासाच्या योजना ठरविताना दर्जा राहील. शिक्षण आणि राजकारण हे वेगळे ठेवले पाहिजे.  कारकुनी, चाकोरीबद्ध शिक्षणपद्धती बदलायला हवी. शिक्षणासोबत संस्कार मिळतील, अशी शिक्षणपद्धत राबवावी. आयटीक्षेत्रत सवलती दिल्या जातात, तशा सवलती ‘एमआयडीसीं’ना द्याव्यात. आर्थिक विकास घडविताना पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे. नियमांची पायमल्ली करत कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्यावर र्निबध आणणो गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रचा नियोजनबद्ध विकास हवा. त्यातून भविष्यातील समस्या टाळता येतील. 
पूजा मेस्त्री 
व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज, द्वितीय वर्ष 
 
देश गरीब नाही; 
कुशल तरुणांचा!
आपण म्हणतो हा देश तरुणांचा.. पण तो केव्हा होईल?.. जेव्हा याच तरुणांमधून कुशल मनुष्यबळ घडेल तेव्हा. असं जेव्हा होईल तेव्हाच आपण 2क्25 मध्ये देशाला महासत्ता करण्याची स्वप्नं पाहावीत. येणा:या सरकारकडून म्हणून तीच अपेक्षा आहे. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतून खरोखर कुशल मनुष्यबळ बाहेर पडते का? त्याची गुणवत्ता आणि दर्जा जागतिक आहे का, हे पाहायला लागेल. नसेल तर त्यादृष्टीने नव्या अभ्यासक्रमांची रचना करावी लागेल. निव्वळ पुस्तकी ज्ञान आता उपयुक्त ठरणार नाही. त्याऐवजी शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर द्यावा. देशाचा तरुण स्वत:च्या पायावर जेव्हा उभा राहील, तेव्हा तो देशालाही दिशा देईल. दुसरी मोठी समस्या आहे भ्रष्टाचाराची. ही कीड संपविण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत. गरिबांचा देश ही आपली प्रतिमा आता तरी पुसायला हवी. देशाचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान भक्कम व्हायला हवे. शिक्षणाच्या माध्यमातून ही संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी नवे शासन पुढाकार घेईल?
श्रेयश मोहिते 
राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 
सरकार हवे भ्रष्टाचारमुक्त 
देशाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. त्यामुळे येणारे सरकार भ्रष्टाचारमुक्त असावे, ही माझी पहिली अपेक्षा आहे. व्यापार, उद्योगांच्या दृष्टिकोनातून बोलायचे म्हटले, तर या संदर्भातील अनेक धोरणांवर पुनर्विचार होण्याची गरज आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे इतके वेगवेगळे सरकारी कर आहेत, की एखाद्या ‘सीए’लासुद्धा त्याची यादी एका दमात सांगता येणार नाही. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांना सोयीस्कर अशी करप्रणाली असणो गरजेचे आहे. सुरक्षिततेचा प्रश्न तर गंभीर आहे. महिला, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी सर्वाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. चो:या, दरोडे राजरोसपणो सुरू आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नव्या सरकारने गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी कडक कायदे करण्याची अपेक्षा आहे.  
हृषीकेश पाटील 
युवा उद्योजक, क:हाड
 
‘लाल फिती’चा 
कारभार नको
‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ असं गमतीने म्हटलं जातं; पण हे आपल्या कडील कारभाराचे दारूण वास्तव आहे. हे चित्र बदलण्याचे धाडस, धमक आपल्या नव्या शासनाने दाखवावी.. शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि त्यांची मानसिकता ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. सरकार कुठलेही असो, जोर्पयत प्रशासकीय कामांची गती वाढणार नाही, तोर्पयत कुठलेही परिवर्तन शक्य नाही. आजवर हेच होत आले आहे. सरकार कितीही चांगले असले, तरी अधिका:यांची मानसिकता बदलणो गरजेचे आहे. 
 मनीष पराते
 विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी, नागपूर 
 
विश्वासाला तडा नको
जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणो हे येणा:या सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या सरकारला चांगल्या प्रशासनावर लोकांची श्रद्धा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भ्रष्टाचारासारख्या हाताबाहेर गेलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणो आणि गरज भासल्यास ठोस पावले उचलण्याचेही महत्त्वाचे आव्हान या सरकारपुढे आहे. 
शेती हा सर्व व्यवस्थांचा महत्त्वाचा घटक आहे. सामान्य शेतक:याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये. त्याचे जगणो हे सुलभ आणि अभिमानाचे व्हावे, यासाठीही उपाययोजना करणो गरजेचे आहे. महिलांच्या शिक्षण, रोजगार, सुरक्षितता यासाठी प्रयत्न होणोही आवश्यक आहे. 
शहरातील आणि पर्यायाने संपूर्ण देशातील मूलभूत सोयीसुविधा ठरलेल्या वेळेत पूर्ण होणो गरजेचे आहे. जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना त्यासाठी जास्त वेळ लागता कामा नये. आपल्या कामाचा पुढील पिढीला फायदा होईल, यासाठी येणा:या सरकारने काम करावे. निवडून आलेल्या सरकारने आपल्या कार्यकाळातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारणो तितकेच महत्त्वाचे आहे. युवकांना रोजगार मिळणो ही पण नव्याने येणा:या सरकार समोरील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल.
 
क्षितिज पटवर्धन
युवा पटकथालेखक, 
पुणो
 
प्रत्येक हाताला काम द्या
केंद्रात सत्तेवर येणा:या सरकारने सर्वप्रथम रोजगारनिर्मितीसाठी पाऊल उचलावे. देशभरात उच्चशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी सध्या परदेशात नोकरीसाठी जात आहेत. त्यांना आपल्या देशातच संधी उपलब्ध झाली पाहिजे. देशातील ग्रामीण भाग आजही रोजगारापासून वंचित आहे. त्यामुळे प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे. लघुउद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागार्पयत रोजगार निर्मिती झाली, तर देशाच्या औद्योगिक प्रगतीला मोठा आधार मिळेल. शिक्षणाबाबतीत शासनाने असे धोरण राबविले पाहिजे, की ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये. शालेय स्तरापासून उच्च शिक्षणार्पयत अशी सुलभ पद्धती असायला हवी. भ्रष्टाचाराबद्दल सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. काळ्या पैशाला चाप बसविण्याबरोबरच महागाई कमी करण्यासाठी प्राधान्याने उपाय शोधले पाहिजेत. रस्ते व अन्य पायाभूत सुविधांबाबतही चीन, अमेरिका आणि जपान अशा प्रगतिशील देशांच्या तोडीस तोड प्रगती अपेक्षित आहे. 
 
शुभम जाधव
बी. कॉम., जी. ए. कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली 
 

Web Title: Dream dreamless world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.