आवळ्याच्या बदल्यात औषध!

By admin | Published: March 12, 2016 03:16 PM2016-03-12T15:16:24+5:302016-03-12T15:16:24+5:30

औषधोपचारासाठी पैसे देणं ज्यांना परवडत नाही, अशा रुग्णांकडून पैशाच्या बदल्यात वस्तू स्वीकारणारे एक वैद्यराज कोकणात कार्यरत आहेत. पैशाशिवाय या जगात पान हलत नाही, अशी खात्रीच असलेल्या आधुनिक विचाराच्या विरोधात जाणारा हा अभिनव प्रयोग गेली वीस वर्ष चालू आहे.

Drug in exchange for amla! | आवळ्याच्या बदल्यात औषध!

आवळ्याच्या बदल्यात औषध!

Next

 

 
प्रत्येकाकडे रोख पैसे कुठून असणार? सुरुवात झाली केरसुणीपासून.  नंतर भोपळे, कोहाळे, गोमूत्र, काकवी, लोणचं, तेल, नारळ. असं काहीही.आलेल्या रुग्णांवर मी उपचार करायचे आणि त्या बदल्यात त्यांनी अशा वस्तू द्यायच्या! दोघांचाही फायदा! नुकसान होईलच कसं? आजवर कधीच, कसलंच 
नुकसान झालं नाही, एकही वस्तू फुकट गेली नाही. ज्या वस्तू माझ्या उपयोगाच्या नव्हत्या,
त्या इतरांनी विकत घेतल्या! 
 
- त्याची ही हृद्य कहाणी!
 
डॉ. सुविनय दामले
 
गोष्ट आहे जुनीच ! कोकणातली!
तशी प्रत्येक दवाखान्यातच घडणारी!
एका वृद्ध रुग्णोला तिचे औषध घेण्यापुरते पैसेसुद्धा तिच्या कनवटीला नव्हते.
तिला औषध घेण्यासाठी मी काही पैसे देऊ केले तेव्हा तिने स्पष्ट शब्दात नकार दिला.
‘आता देणा शिल्लक रवतां नये. मी मेलंय तर तुमचा देणा फेडतलो कोण?’ असं प्रांजळपणो विचारलं आणि मला पटलंदेखील.
प्रश्न शंभर रुपयांचा नव्हता. परिस्थितीमुळे का असेना, पण कोणाची उधारी करणं, कोणाच्या उपकाराच्या ओङयाखाली राहणं हे मनापासून नको वाटतं ना ! तसंच ती वृद्धा म्हणाली.
बसल्या जागी हिराच्या केरसुण्या वळून देण्याचं काम ती करायची! त्यावरच तिचा चरितार्थ चालतो, असं तिनं सांगितलं. 
सन्मानाने आपली औषधे खरेदी करता यावी यासाठी धडपडणा:या त्या आजीकडून मिळालेली प्रेरणा आणि राजीवभाई दीक्षितांनी दिलेली स्वावलंबनाची प्राचीन भारतीयांची दृष्टी मिळून एका योजनेचा जन्म झाला.
पूर्वी ज्या वस्तुविनिमय पद्धतीने देवाणघेवाण होत होती, प्रत्येकाची गरज भागवली जात होती, तिचा योग्य वापर केला तर आताच्या काळात ती का उपयोगी होणार नाही असा विचार आला. केल्याने होत आहे रे.. या सूत्रचा आधार घेत आयुर्वेदातील ‘दूष्यं देशं बलं कालं’ या तंत्रयुक्तीचा वापर करीत ही योजना राबवण्याचे ठरविले.
ग्रामीण भागात दरवेळी प्रत्येकाकडे पैसे असतातच असं नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे त्यांच्या शेतातला भाजीपाला, ते तयार करीत असलेल्या काही वस्तू, मध, गूळ, काकवी, लोणचं, झाडू. असं काहीही असू शकतं. 
डॉक्टरची फी म्हणून पैशाच्या ऐवजी त्यांनी या वस्तू, पदार्थच दिले, तर आपण त्या स्वीकारायच्या असं ठरवलं. 
पण माङया मनात सुरुवातीला काही प्रश्न निर्माण झाले होतेच.
सगळ्यांनीच वस्तू आणल्या तर?
नाशवंत पदार्थ असले तर?
गरजेपेक्षा जास्त वस्तू जमल्या तर?
आलेल्या वस्तूंचे करायचे काय?
इन्कममधे त्या वस्तू कशा दाखवायच्या?
- हे सगळे प्रश्न भेडसावत होते.
पण त्याच्याही पुढे जाऊन काय होऊ शकते याचा अभ्यास करायचा होता. मनाशी नक्की ठरवून बोर्ड लावला आणि सुंदर परिणाम दिसू लागला. सुरुवातीला रुग्णांनाच थोडी लाज वाटत होती. पण माङया स्टाफने समजावून सांगितल्यावर वस्तुरूपात देणं सुरू झालं. 
या वस्तू देवाणघेवाणीला आता वीस- बावीस वर्षे होत आली.
पण कधीही माङो आर्थिक नुकसान झाले नाही.
एकही वस्तू फुकट गेलेली नाही.
मला माङया घरात ज्या वस्तूंचा वापर करता येणार नव्हता, त्या वस्तू मी पुन: दवाखान्यातच ठेवायला लागलो. ज्यांना गरज होती त्यांनी त्या वस्तू विकत नेणो सुरू केले.
अशा वस्तुविनिमयात गरिबांचा आत्मसन्मान जपला जातो, त्याला लाचारी वाटत नाही उलट विश्वास वाटतो. विश्वास वाढतो.
सुरुवात केरसुणीपासून झाली. नंतर भोपळे, कोहाळे, सेंद्रिय तांदूळ, हळद, कोकम, काजू, काश्मीरमधील फौजेतील मुलाने आणून दिलेले असली केशर इथपासून अगदी गोमूत्र, गोमय, गुळवेल, घरची फळे, गूळ, काकवी, घरगुती लोणची, खोबरेल तेल, नारळ इ. इ. वस्तुविनिमय सुरू झाले. काहींनी तर कागदी पिशव्यासुद्धा बनवून दिल्या.
एका रुग्णोने 1क्क् रुपयाला मला पाच कोहाळे दिले. (तेव्हा बाजारभाव शंभर रुपयांना एक कोहाळा होता.)
एका कोहोळ्याचा मी चार किलो कुष्मांडपाक बनविला. 25क् रु. प्रतिकिलो विकला. असे आणखी चार कोहाळे माङयाकडे होते.
याच कोहाळ्यामधे प्रक्षेप म्हणून काश्मीरचे केशर घातले. त्याचा दर 35क् केला.
मला सांगा, मी कशाला नुकसानीत जाईन?
बरं, पेशंटच्या दृष्टीने मला पाच कोहाळे देणो अगदी सोयीचे होते.
दोघांचाही फायदा.
करा विचार !!!
अशी देवाण कोकणातील प्रत्येक डॉक्टरला अनुभवायला येते. कारण कोकणी माणसाचा स्वभाव देण्याचा असतो.
आणि आपल्या डॉक्टरना द्यायचे तर ते उत्तमात उत्तम असावे हा भाव पण असतो. या आपलेपणाचे मोल करताच येणार नाही.
या वस्तूंच्या देवाणघेवाणीला मी फक्त अधिकृत केले. बाकी काही विशेष नाही.
रुग्ण आणि वैद्यांमधील ही आपुलकी, जिव्हाळा जिवंत ठेवण्याचे काम मात्र झाले. त्यामुळे एकाही रुग्णाकडून मला तेवीस वर्षात कधी ‘रिटन कन्सेण्ट’ घेण्याची गरजच वाटली नाही. हा मिळविलेला विश्वास हा या देवाणघेवाणीचा ‘साइड बेनिफिट’ असं मला वाटतं.
आजही माङया चिकित्सालयात असाच व्यवहार चालतो.
सर्वसाधारणपणो 1क् टक्के रुग्ण वस्तुविनिमयात व्यवहार करतात, असा माझा अनुभव आहे.
काही वेळा फायदा जास्त असतो. प्रदेशानुसार आपण ही योजना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी युक्तीने वापरू शकतो!
आणि प्रत्येक वेळी आर्थिक फायदाच बघितला पाहिजे असं कुठाय ना! (आता साथीच्या रोगांना  ‘सिझन सुरू झाला’ असे म्हणणा:यांना काय म्हणावे?)
प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
मला प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळवायची हौस आहे.
या वस्तुविनिमयातून मला भरपूर आनंद मिळतो हे मात्र नक्कीच !
आणि हो, आता लिम्का बुकमधे यासाठीच नावाची नोंद झाली आहे, पण ते 2क्13 मधे. त्यासाठी मी काहीच केलेलं नाही. आणि मला लिम्काकडूनही काहीच सांगितलेलं नव्हतं. ‘लिम्का रेकॉर्ड्स’चं पुस्तक सहजच वाचनात आलं आणि आनंदात बुडालो.
 
(लेखक कोकणातील प्रथितयश डॉक्टर असून, परिसरातील सर्वसामान्य रुग्णांकडे असणा:या वस्तूच ‘फी’ म्हणून स्वीकारतात. वस्तुविनिमयाचा हा पुरातन तरीही अत्यंत ‘आधुनिक’ आणि दोन्ही बाजूंनी फायदेशीर असा प्रयोग त्यांच्या चिकित्सालयात 
गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.)
drsuvinay@gmail.com

 

Web Title: Drug in exchange for amla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.