डुडूचं बदक

By admin | Published: February 6, 2016 03:19 PM2016-02-06T15:19:34+5:302016-02-06T15:19:34+5:30

एखाद्या संध्याकाळी सहज फिरायला म्हणून महानगरपालिकेच्या इमारतीत जावं, असा विचार कधी तुमच्या कल्पनेत तरी येईल का?- तेल अवीवचे नागरिक मात्र गाणी-गप्पांसाठी, मुलांचे वाढदिवस साजरे करायला महानगरपालिकेत जातात आणि कुणी कुणाच्या प्रेमात पडलं तरी ते महानगरपालिकेला आवजरून कळवतात. ‘लोकसहभाग’ मिळवण्यासाठी या शहराला स्पर्धा आणि बक्षिसांची लालूच दाखवण्याचं नाटक करावं लागत नाही.

Dudu's Duck | डुडूचं बदक

डुडूचं बदक

Next
>-अपर्णा वेलणकर
 
आपल्या शहराचं नियमन करणा:या महानगरपालिकेशी नागरिक म्हणून आपलं नातं काय असतं?
दुराव्याचं, त्रसाचं, संशयाचं. त्रयस्थ तर नक्कीच. आपण आपल्या महानगरपालिकेच्या इमारतीत सहज संध्याकाळची चक्कर मारायला जाण्याची, तिथे जाऊन आपल्या शहराविषयी अधिक माहिती करून घेण्याची साधी कल्पना तरी करू शकतो का? 
- या नुसत्या विचारानेही अनेकांच्या अंगावर शहारे येतील, कारण सौहार्दाचा मानवी स्पर्शच नसलेले शहर-पालिकांचे बेपर्वा, उद्दाम, रखरखीत, बेंगरूळ आणि अजागळ चेहरे! काम करून घेण्यासाठी अपरिहार्य असेल तेव्हाच आणि तेवढय़ापुरताच या कचे:यांचा संबंध. तोही अत्यंत नकोसे, गुदमरलेले अनुभव देणारा.
आज स्मार्टेस्ट सिटी म्हणून जगभराच्या कुतूहलाचा विषय ठरलेल्या इस्त्रयलच्या तेल अवीवमध्ये दहा-बारा वर्षापूर्वीर्पयत याहून वाईट स्थिती होती. आर्थिक-औद्योगिक विकासाच्या वाटेवर हलकेहलके तेल अवीवचा चेहरा हरवत गेला. शहराच्या चलनवलनात कोरडा त्रयस्थपणा, मरगळ आली. या त्रसाचा पहिला उच्चार डुडू गेवा या तेल अवीवमधल्या ख्यातनाम व्यंगचित्रकार-लेखकाने 2क्क्3 सालात केला. त्याने लिहिलं, हे शहर मरतंय. त्याच्या कोरडय़ा कंटाळवाण्या रस्त्यांवर बदकांचे थवे ठेवा, मोठमोठय़ा इमारतींच्या छतांवरून प्लॅस्टिकचे पिवळेजर्द साप खाली सोडा. चौकातल्या झाडांच्या खरबरीत खोडांना रंगीत कागदांच्या घट्ट मिठय़ा मारा. या अजागळ श्रीमंत शहरातले सगळे उद्दाम रस्ते पुसून टाका आणि छान नव्या रेघा ओढा. महानगरपालिकेची इमारत किती रडकी दिसते, तिच्या उंच छतावर मला एक मोठ्ठं हसरं बदक बसवू द्या.’
- त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षानी तेल अवीवचा शंभरावा वाढदिवस आला तेव्हा युवल कास्पी या तरुण चित्रकाराने महानगरपालिकेकडे रीतसर अजर्च केला- या शंभर र्वष जुन्या, म्हाता:या, कंटाळवाण्या, कोरडय़ा शहरात थोडी जान ओतली पाहिजे. आम्हाला सिटी हॉलच्या डोक्यावर डुडूचं बदक बसवू द्या.
रॉन हुल्देई महापौर होते. ते म्हणाले, मी सगळ्यात वरच्या मजल्यावर बसतो. माङया केबिनच्या डोक्यावरच बसवा हे बदक!
या कल्पनेनेच शहरात सर्वत्र उत्साह संचारला. वर्गणी गोळा झाली. आठवडाभरातच तब्बल दहा फूट उंचीचं, हवा भरून टम्म फुगवलेलं लालचुटूक चोच असलेलं एक भलंमोठ्ठं हसरं बदक दोन्ही पाय खाली सोडून सिटी हॉलच्या उंच इमारतीवर ऐटीत बसलं. 
- एक साधी गोष्ट.
पण तिने जादू केली. मुलाबाळांना घेऊन नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी ते बदक बघायला रॉबिन स्क्वेअरमधल्या सिटी हॉलपाशी जमू लागल्या.
जणू गमतीची, उत्साहाची जत्रच भरली.
कोणतंही काम नसताना सहज म्हणून संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रांगणात यावं. त्यानिमित्ताने दुराव्याची दरी कमी होईल आणि महानगरपालिका आपल्या चेह:यामोह:यात जे बदल करू पाहते आहे, त्याकडे नागरिक सकारात्मक नजरेने पाहतील. त्यातून नुसत्या टीकेऐवजी सहभाग वाढेल असा रॉन हुल्देईंच्या टीमचा होरा होता. डुडू गेवाच्या ‘त्या’ बदकाने ही दुराव्याची भिंत फोडायला मोठीच मदत केली.
स्मार्ट होण्याच्या वाटेवरल्या डिजि-टेल या महत्त्वपूर्ण प्रकल्पात (पाहा : या आधीचे लेख) गेम चेंजर ठरली ती रेसिडेण्ट कार्डची योजना.
लोकसहभागासाठी प्रभातफे:या काढून, स्पर्धाची-बक्षिसांची आमिषं दाखवून नागरिकांची याचना करण्याऐवजी लोक स्वत:हूनच महानगरपालिकेशी नातं जोडायला पुढे येतील असा मोठा रोचक मार्ग तेल अवीवने शोधला. नागरिकांनी भरलेले-भरायचे कर, बिलं, त्यांच्या मालमत्तेचा-विविध परवान्यांचा तपशील असले सगळे कोरडे कामाचे मुद्दे ऑनलाइन संदर्भ-संपर्कासाठी होतेच; पण त्याहीपुढे जाऊन लोकांच्या खासगी जीवनात, प्रेमप्रकरणात, खरेदी आणि नाटक-सिनेमे पाहण्यासारख्या आनंदाच्या क्षणांमध्ये महानगरपालिकेने भागीदारी मिळवली, ती या रेसिडेण्ट कार्डच्या माध्यमातून!
अठरा र्वष वयापुढल्या प्रत्येकाला हे कार्ड मिळतं. त्यातली आपली प्रोफाईल ‘अपडेट’ करावी लागते. सिनेमा, नाटक, संगीत, प्रवास, खाद्यपदार्थ, रेस्टॉरण्ट्स, आवडती दुकानं अशा अनेकानेक मुद्दय़ांखाली आपापल्या आवडीनिवडी नागरिकांनी नोंदवायच्या. कुणी प्रेमात पडल्यास ‘रिलेशनशिप स्टेटस’ अपडेट करायची सोयही आहे. या माहितीचा ‘उपयोग’ करून महानगरपालिका नागरिकांना खरेदीसाठी डिस्काउंट कूपन्सपासून ते नाटक-सिनेमा-रॉक कॉन्सर्ट्सच्या सवलतीतल्या तिकिटांर्पयत अनेक गोष्टी ऑफर करते. ‘हॉट’ रेस्टॉरण्टमध्ये हॅपी-अवर डिस्काउण्ट मिळवून देण्यापासून अमुक एका दुकानात आवडलेला महागडा ड्रेस समजा सेलमध्ये स्वस्तात मिळणार असेल, तर त्याचा अॅलर्ट पाठवण्यार्पयतची उस्तवार हे रेसिडेण्ट कार्ड करतं.
इस्नयलमध्ये खुल्या आकाशाखालच्या म्युङिाक कॉन्सर्ट्स ही (महागडी) हौस आहे. तिकिटं फार महाग असतात. अशा कॉन्सर्ट सुरू होण्याआधी काही तास आधी विकली न गेलेली तिकिटं महानगरपालिका एकगठ्ठा सवलतीत खरेदी करते आणि त्याबद्दलचे अॅलर्ट्स पाठवून ‘डिजी-टेल कार्डधारकांना लास्ट मिनिट ऑनलाइन बुकिंग ऑफर करते. कार्यक्रम सुरू व्हायच्या अगदी पंधरा-वीस मिनिटं आधी तो कार्यक्रम होणार असलेल्या परिसरात आजूबाजूला जे कुणी असतील, त्यांच्याच फोनवर शेवटचे टार्गेटेड अॅलर्ट्स येतात. 
..आता तर महानगरपालिकेने आपल्या अत्याधुनिक इमारतीची दारंच नागरिकांसाठी उघडली आहेत. कामाच्या वेळा सोडून आणि सुटय़ांच्या दिवशी या इमारतीतल्या बैठकीच्या खोल्या, सभागृहं नागरिकांच्या खासगी समारंभांसाठी (पूर्वनोंदणीने) उपलब्ध असतात. म्हणजे जिथे महानगरपालिकेच्या वित्त विभागाच्या बैठका होतात, तिथेच सुटीच्या दिवशी चिमुरडय़ांच्या वाढदिवसांची गंमत रंगते.
- वरवर पाहता ही सारी गोष्ट गमतीची  (आणि काहीशी हौशी) वाटत असली, तरी त्यामुळे नागरिकांच्या मनातला दुरावा, त्रयस्थ मरगळ पुसण्यात तेल अवीव महानगरपालिकेला मोठंच यश आलं आहे. या व्यवस्थेशी आपला काही  ‘संबंध’ आहे आणि या व्यवस्थेत आपल्या अस्तित्वाला/मताला ‘किंमत’ आहे असा भरवसा नागरिकांना देणं हे जगभरच्या शहर प्रशासकांपुढचं मोठंच आव्हान आहे. त्याचे काही मार्ग तेल अवीवला सापडले आहेत, हे नक्की!
पण मग या रेसिडेण्ट कार्डच्या निमित्ताने महानगरपालिकेकडे जमा होणा:या ‘खासगी’ माहितीचा दुरुपयोग होत नसेल कशावरून? इतक्या मोठय़ा माहितीच्या साठय़ाचं ‘स्मार्ट व्यवस्थापन’ करण्याची जबाबदारी असलेली लिओरा सेचर म्हणते, ‘येस, इन्फर्मेशन इज ऑलवेज स्केअरी!’
त्याबद्दल पुढच्या रविवारी.
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com
 

Web Title: Dudu's Duck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.