Education: उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:07 AM2022-06-19T10:07:53+5:302022-06-19T10:08:13+5:30
Education: १०वी तसेच १२वीला चांगले गुण मिळूनदेखील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना फी कशी भरायची ही विवंचना मध्यमवर्गीय पालकांसमोर असते. महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
- आनंद मापुस्कर,
करिअर मार्गदर्शक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
१०वी तसेच १२वीला चांगले गुण मिळूनदेखील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना फी कशी भरायची ही विवंचना मध्यमवर्गीय पालकांसमोर असते. महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी जातीची अट नाही. या अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू आहे.
१) उच्च शिक्षण विभाग
n पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के टयूशन फी (शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्था) सरकार देते.
n व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वार्षिक उत्पन्न रू २.५० लाख किंवा त्याहून कमी असलेल्या पालकांच्या पाल्यांची शासकीय व अनुदानित महाविद्यालयामधील १००% ट्यूशन फी, तर विना अनुदानितमधील ५० % टयूशन फी सरकारकडून दिली जाते.
n वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ८ लाख असलेल्यांच्या पाल्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांची ५०% टयूशन फी (सर्व महाविद्यालयांसाठी)
सरकारकडून दिली जाते.
n परीक्षा फी - व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के परीक्षा फी तर पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के परीक्षा फी सरकार देते.
२) तंत्र शिक्षण विभाग
खालील अभ्यासक्रमांची ५० टक्के टयूशन फी व ५० टक्के परीक्षा फी दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅप (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) मधून आवश्यक आहे.
पदविका - इंजिनीयरिंग डिप्लोमा, १२ वीनंतरील फार्मसी डिप्लोमा, १२ वीनंतरील हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा
पदवी - इंजिनीयरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, आर्किटेक्चर
पदव्युत्तर पदवी - एम.बी.ए. / एम.एम.एस., एम.सी.ए.
३) वैद्यकीय शिक्षण विभाग
पदवी - एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.यू.एम.एस., बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी व स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स व ऑर्थ्रोटिक्स, बी.एस्सी. (नर्सिंग) शासकीय अनुदानित, महापालिका संचालित तसेच खासगी महाविद्यालयांमधील वरील अभ्यासक्रमांची ५० टक्के फी (शिक्षण शुल्क व विकास शुल्क) दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी हवे.
ही वेबसाईट बघावी-
https://mahadbtmahait.gov.in/