हत्ती.
By admin | Published: April 29, 2016 10:05 PM2016-04-29T22:05:29+5:302016-04-29T22:05:29+5:30
भारतीय संस्कृतीच्या महाकाय पटलावर हत्तीचं महत्त्व हजारो वर्षे टिकून आहे. गणोशाचं महन्मंगल देखणं रूप, बौद्ध धर्मातलं मानसिक सामथ्र्याचं प्रतीक ते समुद्रमंथनातलं इंद्रदेवाचं
Next
- सुधारक ओलव
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)
हत्ती.
प्रगती आणि चिरंतन समृद्धीचं प्रतीक!
भारतीय संस्कृतीच्या महाकाय पटलावर हत्तीचं महत्त्व हजारो वर्षे टिकून आहे. गणोशाचं महन्मंगल देखणं रूप, बौद्ध धर्मातलं मानसिक सामथ्र्याचं प्रतीक ते समुद्रमंथनातलं इंद्रदेवाचं वाहन अशी हत्तींची कितीतरी रूपं भारतीय उपखंडात दिसतात. शक्ती आणि सामंजस्य, सहनशीलता हे हत्तींचे स्वभावविशेष. त्यामुळेच हत्ती शारीरिक आणि मानसिक शक्ती आणि सामथ्र्याचं प्रतीक मानले जातात. तुम्ही उपखंडात कुठंही प्रवास करा हत्ती सर्वत्र वेगवेगळ्या रूपात, प्रतीकांत तुम्हाला भेटतच राहतात.
या भूतलावरचा अत्यंत दयाळू आणि अति बुद्धिमान जीव म्हणून या महाकाय प्राण्याची गणना होते. त्यांच्या त्या देखण्या, दयाळू, बुद्धिमान रूपाचं मला अत्यंत जवळून दर्शन झालं ते कर्नाटकात, कावेरी नदीच्या तीरावर! कर्नाटकात कोडगू जिल्ह्यात डुबरे एलिफण्ट कॅम्प ही विलक्षण सुंदर जागा आहे. कर्नाटक वनविभागाच्या अधिपत्याखाली असलेली ही जागा. या जंगलात हत्तींचं चलनवलन पूर्ण थांबल्यानं हत्तींच्या कळपांची काळजी ही वनविभागाचीच जबाबदारी आहे आणि आता या जंगलात हे हत्ती पर्यटकांच्या आकर्षणाचाच विषय ठरत आहेत.
जगात हत्तींच्या फक्त दोन जाती आहेत. एक आशियाई हत्ती, दुसरे आफ्रिकन. पृथ्वीच्या पाठीवर सर्वाधिक काळ अस्तित्वात असलेली ही पशुजमात. मात्र हे हत्ती असतात कठोर शिस्तीचे. त्यांच्या कळपाची शिस्त तर अत्यंत काटेकोर असते. कळपातल्या प्रत्येक सदस्याची ते अत्यंत मायेनं काळजी घेतात. आपण माणसं जसे कुटुंबाला धरून राहतो तसे हे हत्तीही अनेक र्वष आपल्या कुटुंबासह एकत्र राहतात.
डुबरेच्या कॅम्पमध्ये गेलात तर हत्तींचे असे मायाळू कळप भेटतात. पर्यटकांना त्यांच्या जवळ जाता येतं, त्यांना खाऊ घालता येतं. या हत्तींचा सांभाळ करणारी स्थानिक माणसंही किती मायेनं त्यांची देखभाल करतात हे दिसतं.
हत्तींचं शांत, मायाळू पण महाकाय रूप पाहून तिथं आलेल्या प्रत्येकाला या विशाल जिवांविषयी आदर वाटतोच. बलाढय़ प्राण्यांचं हे शांत, सच्छिल रूप पाहून खरंतर निसर्गाच्या किमयेपुढेही नतमस्तक व्हावंसं वाटतं. मात्र त्याचवेळी माणसाच्या क्रौर्याचीही जाणीव होतेच. हस्तिदंताच्या मोहापायी हत्तींच्या रहिवासावरच आक्रमण करून त्यांचं जगणं माणसानंच दुश्वर केलं आहे. खरंतर इतक्या प्रेमळ, इतक्या बुद्धिमान आणि विशाल प्राण्याविषयी माणसानं ममत्व बाळगायला हवं, त्यांना जपायला हवं. प्रयत्नपूर्वक!!