तो रोज ‘पनवेल’ला जातो..

By admin | Published: October 24, 2015 07:16 PM2015-10-24T19:16:37+5:302015-10-24T19:16:37+5:30

एकेकाळी ‘अमक्या मंदिरापासून डावीकडे किंवा तमक्या दुकानाच्या शेजारी मी राहतो’ अशा भाषेत पनवेलकर आपल्या घराचा पत्ता सांगत असत. बघताबघता काळ बदलला आणि या गावाचा भूगोलही! आता मी अमक्या बारजवळ राहतो असे सांगण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे. हे का घडले? पनवेल हा डान्सबारचा अड्डा होण्याची कारणो काय होती? ..आणि आता पुढे काय होईल?

Every day he goes to Panvel. | तो रोज ‘पनवेल’ला जातो..

तो रोज ‘पनवेल’ला जातो..

Next
 
एका शहराच्या बदनामीची गोष्ट..
 
एकेकाळी ‘अमक्या मंदिरापासून डावीकडे किंवा तमक्या दुकानाच्या शेजारी मी राहतो’ अशा भाषेत पनवेलकर आपल्या घराचा पत्ता सांगत असत. बघताबघता काळ बदलला आणि या गावाचा भूगोलही! आता मी अमक्या बारजवळ राहतो असे सांगण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे. 
हे का घडले? पनवेल हा डान्सबारचा अड्डा होण्याची कारणो काय होती? 
..आणि आता पुढे काय होईल?
 
ओंकार करंबेळकर
 
मुंबई ज्या काळामध्ये आकारास येत होती त्याच काळामध्ये मुंबईच्या आसपासच्या गावांमध्ये विकासाची थोडी चाहूल लागत होती. साधारणत: 250 ते 300 वर्षापूर्वी पनवेल बाजारपेठेचे ठिकाण म्हणून उदयास आले. मुघल, मराठे, इंग्रज, पोतरुगीज या सर्वाच्या नकाशात मुंबई बेट आणि कोकणाच्या सीमेवरील या गावाचे नाव महत्त्वाच्या यादीत होते. मुंबई-पुणो आणि मुंबई-गोवा या राज्यातील महत्त्वाच्या महामार्गानी केलेल्या त्रिकोणात असणा:या शहराचे महत्त्व अधिकाधिक वाढत गेले. त्यातून वाढत्या मुंबईमध्ये वाढणा:या शहरीकरणाचा ताण कमी करण्यासाठी आणि उद्योगाचे विभाजन करण्यासाठी नवी मुंबई रंगारूपास येऊ लागली. पेण, पनवेल, तळोजा, रसायनी, पाताळगंगा, तुर्भे अशी उद्योगाची नवी केंद्रे पुढे आली, तर जेएनपीटीसारख्या सतत व्यस्त असणा:या व तितक्याच महत्त्वाच्या बंदराची व्याप्तीही वाढत चालली होती. साहजिकच लोकसंख्याही आसपासच्या प्रदेशात एकवटू लागली. सिडकोने बांधण्यास घेतलेल्या शहरांमुळे जुनी गावठाणो उठून नव्या शहरांनी जन्म घेतला. 
या सर्व प्रक्रियेमध्ये तेथील मूळच्या लोकांकडे जमिनीच्या बदल्यात पैसेही येऊ लागले. 199क् ते 2क्क्क् या दहा वर्षाच्या काळात जमिनींचे भाव दहापटीने वाढले. त्यामुळे रोख रक्कम एकदम हातामध्ये आली. जमिनी विकून आलेले पैसे किंवा चाळी, घरे भाडय़ाने देऊन येणा:या पैशावर जगणारा एक वर्गच निर्माण झाला. अचानक आणि वेगाने आलेला पैसा, महामार्गावरचे मोक्याचे स्थान यामुळे डान्सबारना पनवेलसारखी सुपीक भूमी आयती हातात सापडली.
त्याचवेळेस कामानिमित्त मुंबईत येणारे लोक, मजा करायला शहराकडे जाणारे, विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी धडपडणा:या असंख्य लोकांना पनवेल खुणावत होते. वाढते ग्राहक आणि त्यांच्याबरोबर येणारा पैसा पाहताच या बारची संख्याही वाढू लागली. 
पनवेल आणि परिसरातील डान्सबारची संख्य़ा 5क् पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. अशी मुंबई-पुणो आणि मुंबई-गोवा या मार्गावर संपूर्ण तालुक्यामध्ये बारची अशी साखळीच तयार होऊ लागली. मुंबईत जायचे, दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी पनवेलला जाऊन दारू पिऊन मजा करायची. एमआयडीसी किंवा तत्सम जागी कामासाठी नेहमी जाव्या लागणा:या लोकांनी आपापली ठिकाणो तयार केली होती. काम झाले की आवडत्या ठिकाणी जाऊन बसणो असे पॅटर्नच तयार झाले होते. त्यामुळे पनवेलच्या आजूबाजूस असणा:या सर्व भागाची ओळख डान्सबारचे पनवेल अशीच झाली. 
या सर्व काळात पनवेल शहरही कात टाकत होते. वाडासंस्कृतीमधून मिळालेली मूल्ये जपत जगण्याची धडपड आणि एकामागोमाग एक मान टाकत वाडय़ांचे रूपांतर इमारतींमध्ये होताना होणा:या बदलांच्या कात्रीमध्ये पनवेल सापडले होते. त्यामुळे शहरीकरणाबरोबर येणा:या इतर चंगळवादी गोष्टीही आपोआप पनवेलमध्ये आल्या. 
   इतर कोणत्याही शहरापेक्षा पनवेल शहरामध्ये दारूची दुकाने आणि बार यांची संख्या जास्त असल्याचे लगेचच जाणवते. प्रत्येक कोप:यावर किंवा महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी या दारूच्या बारनी ठाण मांडलेले आहे. यापैकी अनेक बार शाळा, महाविद्यालयांपासून हाकेच्या अंतरावरसुद्धा आहेत. उभ्या-उभ्याने दारू पिणारे मजूर लोक, ङिांगणारे, ङिांगून पडलेले लोक हे रेल्वेस्थानकाच्या जवळील भागात सहज दिसणारे चित्र आहे. एकेकाळी अमक्या मंदिरापासून डावीकडे किंवा तमक्या दुकानाच्या शेजारी मी राहतो अशा भाषेत पत्ता सांगणा:या लोकांना मी अमक्या बारजवळ राहतो असे सांगण्याची वेळ यावी इतपत ही संख्या वाढली आहे. 
या बार आणि डान्सबारकडे नाशिक, पुणो, मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील श्रीमंतांची व परिसरातील नव्याने श्रीमंत झालेल्या लोकांची पावले वळली. डान्सबारसारखी चैन करणो न ङोपणा:यांनी इतर मार्गाचा वापर सुरू केला. स्वत:च्याच घरामध्ये चोरी करणो, सोनसाखळ्यांची चोरी असे प्रकार केवळ डान्सबारमध्ये जाता यावे यासाठी केले जाऊ लागले. आपला मुलगा डान्सबारमध्ये पैसे उडवेल म्हणून पैसे देण्यास नकार देणा:या आईचा खून करेर्पयत कोन नावाच्या गावातील एका मुलाची मजल गेली.
डान्सबारचा व्यवसाय शिखरावर असताना पनवेलच्या संपूर्ण परिसराची झालेली वाताहत आजही लोकांच्या चर्चेमध्ये असते. तरुणांचे तसेच मध्यमवयीन गृहस्थांचे संसार धुळीस मिळण्याच्या घटना डोळ्यांदेखत घडत होत्या. बंदी झाली तरी बार सुरूच होते याबद्दल पनवेलकर त्रगाही व्यक्त करतात. 
अनेक डान्सबारजवळ असणा:या स्पीडब्रेकरचे काय प्रयोजन आहे असा प्रश्नही त्यांच्या मनामध्ये येतो.  गाडीचा वेग कमी होऊन तिच्या आतील लोकांना बारमध्ये जाण्याची इच्छा व्हावी असा तर त्यामागे हेतू नसावा ना, अशी शंकाही त्यांच्या मनामध्ये आहे. शहर आणि शहराच्या आसपास असणा:या गावांमधील बारचे बांधकाम आणि ते करत असलेल्या अनधिकृत बाधकामांवर कोणाचे लक्ष आहे का, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतात. पनवेल आणि परिसरामध्ये विवाहात लग्नापेक्षा त्यातील हळद या समारंभाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ही हळद दारू आणि मटनाशिवाय साजरी केलीच जाऊ शकत नाही असे सोयीस्कर गृहीतक मनात असल्यामुळे यावेळेस भरपूर दारू प्यायली जाते. इकडे हळद ही यजमानाची औदार्य दाखविण्याचीही वेळ असते त्यामुळे तोही हात मोकळा सोडतो. साहजिकच एकमेकांमध्ये या औदार्याची स्पर्धाही लागते. दारू देण्यावरून यजमान किती दिलदार आहे हे ठरत असते, तर पिणारा किती जास्त पितो यावरून पिणा:याची ताकद ठरत असते. आमच्या मुलाच्या लग्नात इतकी दारू प्यायली गेली हे स्टेटस सिम्बलदेखील होऊ शकते. लग्नाच्या पंगतीत 15 लाडू खाल्ले आणि किंवा ताटभर जिलब्या फस्त केल्या अशा जुनाट स्पर्धा न होता, तेव्हा किती दारू प्यायलो होतो याचीच चर्चा केली जाते. अशा वातावरणामुळे दारूच्या अतिरेकाला वाव मिळालाच होता. त्यामध्ये डान्सबारने भर घातली. 
डान्सबार बंद झाल्यावर बेकार झालेल्या बारबालांनी कोठे जायचे? असा प्रश्न विचारला की पनवेलकर तितक्याच जोरात उसळून   ‘आमच्या भागात उद्ध्वस्त झालेल्या संसारांचे पुनर्वसन कोण करणार?’ हा प्रश्न विचारतात. संपूर्ण पिढी बरबाद होऊन पुढची पिढी उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, बाप आणि मुलगा एकाच बारमध्ये जाऊन बसावेत इतकी घसरण झाल्यावर तरी आम्ही आमचा विचार करायला नको का? असे दु:ख ते उद्वेगाने मांडतात. 
शहरातील लोकमान्यनगरमध्ये एकेकाळी असणा:या बारमध्ये संध्याकाळी वातावरण बदलूनच जायचे. घरातील महिलांना बाहेर पडणोदेखील मुश्कील व्हायचे, तेव्हा कोणीच विचारायला आले नाही. अशा स्थितीत बारबालांचे पुनर्वसन हा आमचा विषय नाही असे ते स्पष्टपणो मांडतात. 
आपल्या गावाला बाहेर डान्सबारचे गाव म्हटले जाते याचा त्रसदायक अनुभव अनेक नागरिकांनी घेतला आहे. तुमच्या आर.आर. आबांनी डान्सबार बंदी आणली आणि आमचे पनवेलला येणो बंद झाले असे लोक सरळ तोंडावर म्हणत. 
एकेकाळी पनवेलचे नाव तलावांचे शहर किंवा व्यापाराचे शहर म्हणून ओळखले जाई किंवा महामार्गावर असल्यामुळे रुग्णालयांची संख्याही येथे जास्त आहे. त्यामुळे आपली जुनी ओळख मिळावी यासाठी पनवेलकर धडपडत असतात, तर काहींना डान्सबारमुळे ती वेळ कधीच गेली असे वाटते. 
पनवेलमध्ये तुकाराम महाराज स्वत: देहूवरून घाट उतरून व्यापारास येत असत असे इतिहासात अनेक दाखले आहेत. ज्या व्यापारासाठी वैश्य हिंदूच नव्हे तर बोहरी, ज्यूदेखील पनवेलमध्ये एकवटले तो मागे पडून इथले डान्सबार पुढे गेल्याबद्दल पनवेलकरांना आजही दु:ख वाटते.
- आता नव्या वातावरणात पनवेलकरांचे हे जुने दु:ख पुन्हा उफाळून येणार की काय, अशा चिंतेत सध्या सामान्य पनवेलकर आहे, हे खरे!
 
कपलबारचे प्रकरण
2005 साली बारवर बंदी घातली गेली तरी त्याची कितपत अंमलबजावणी झाली हा खरेच संशोधनाचा विषय ठरावा. अधूनमधून घातल्या जाणा:या छाप्यांमुळे बारबंदीच्या स्थितीवर प्रकाश पडतो. या डान्सबारमध्ये केवळ नृत्य व दारू प्यायली जाते या भाबडय़ा संकल्पनांना सहज छेद दिला जाईल अशा घटना समोर येत होत्या. 2013 च्या मे महिन्यामध्ये पनवेलमधील कपल नावाच्या बारवर पडलेल्या छाप्यामध्ये 90 मुलींना पकडण्यात आले. यामध्ये 32 अल्पवयीन मुलींचा समावेश होता. इतकेच नव्हे तर एक कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम आणि सोनेही या छाप्यामध्ये जप्त करण्यात आले. कपल बार आणि डिम्पल नावाच्या लॉजमध्ये शरीरविक्रीचा व्यवसाय होत असल्याचा पोलिसांना संशय होता. मुली पुरवणा:या अनेक एजंट्सचा या बार व लॉजशी संबंध असल्याचे नंतर उघड झाले. पकडलेल्या मुलींमध्ये राजस्थान, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, नेपाळ अशा विविध प्रांतांमधून आलेल्या मुलींचा भरणा असल्याचे दिसून आले. शहरामध्ये राजरोस चालू असणा:या डान्सबारवरील छाप्यानंतर स्थानिक पोलिसांवर कारवाईदेखील करण्यात आली होती.
 
डान्सबार की टांकसाळ
पनवेल आणि परिसरामध्ये असणा:या डान्सबारमध्ये अक्षरश: पैशाचा पूर वाहत असे. कित्येक ग्राहक एका रात्रीत लाखो रुपये उडवून रिकामे होऊन परतत असत. अशा उदार ग्राहकांच्या एकेक सुरस कथा प्रसिद्ध आहेत. स्टॅम्प घोटाळ्यात अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला फसविणा:या अब्दुल करिम तेलगीचाही या उदार ग्राहकांमध्ये समावेश होता. लक्षावधी रुपये बारबालांवर उधळण्याची त्याला सवय होती. 2क्क्2 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रॅँटरोडच्या बारमध्ये त्याने एका रात्रीत 9क् लाखांहून अधिक पैसे उधळल्याची माहिती मिळते, तर मटकाकिंग सुरेश भगतचा मुलगा हितेशने दररोज काही लाख रुपये उधळण्याचा छंद सलग दोन दिवस जपला होता. त्यामुळे डान्सबार हे पैसा मिळविण्याची मोठी केंद्रेच बनली होती. डान्सबारमधील छाप्यांमध्ये रोख रक्कम, सोने, सोन्याचे दागिने सापडल्याने किती मोठय़ा रकमेचे व्यवहार एका रात्रीत अशा बारमध्ये होत असतील याचा अंदाज बांधता येऊ शकेल.
 
व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री
 
डान्सबार बंदीचे आदेश मागे घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर लगेचच व्हॉट्सअॅपवर संदेश फिरू लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोट करून बंदी उठवली पण सारखं पनवेलला जायचं नाही बरं का असे सांगत असल्याचा तो संदेश होता. विनोदाचा भाग सोडला तरी यावरूनच पनवेल आणि डान्सबार या दोन नावांचे समीकरण लोकांच्या मनामध्ये घट्ट बसल्याचे दिसून येते.
 
 
गुन्ह्यांचे आगार
डान्सबार ही केवळ मनोरंजन आणि दिवसभराच्या श्रमातून आराम मिळावा यासाठीची जागा असते. तेथे नृत्याशिवाय काहीच होत नाही असा समज करून देण्यात आलेला असतो. मात्र डान्सबार हे विविध गुन्ह्यांची मुख्य केंद्रे व्हावीत इतका त्यांचा गुन्ह्यांशी संबंध आला होता. अनेक गुन्हेगार हे गुन्हा करण्यापूर्वी किंवा गुन्हा झाल्यावर मिळालेल्या पैशाची उधळण करायला डान्सबारमध्ये येत. डान्सबारमधील मुलींशी त्यांची मैत्रीही असे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यासाठीही डान्सबारचा वापर होत असे. खब:यांचे जाळेच डान्सबारच्या माध्यमातून पसरवले गेले होते. ठाणो पोलिसांनी ‘उत्सव’ बारवर घातलेल्या छाप्यात एक डायरी सापडली. त्यात हप्त्यांची कुंडलीच होती. पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास या बारमधून प्रतिमहिना 3क् हजार रुपये, निरीक्षकास 1क् हजार, पोलीस नाईकास प्रतिमाह 5 हजार, हवालदारांना 3 हजार व इतर पोलिसांना 1 हजार प्रत्येक महिन्याला हप्ता स्वरूपात दिले जात असल्याचे बिंग फुटले. ठाणो पोलिसांवर या सर्व प्रकरणामुळे चांगलाच डाग लागला. ठाण्याचे पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी एकाच दिवसात 49 पोलिसांची बदली करण्याचा निर्णय या प्रकरणामुळे घेतला होता. 
जर पोलिसांना इतक्या मोठय़ा रकमेचा हप्ता बारमालक देऊ शकत असतील तर ते किती पैसे मिळवत असतील याचा विचारसुद्धा करता येत नाही!
 
 
पुन्हा आंदोलन उभारण्याची तयारी
- विवेक पाटील (माजी आमदार)
 
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात दहा वर्षापूर्वी डान्सबारनी धुमाकूळ घातला होता. महिलांना फिरणो अशक्य झाले होते. अपघाती मृत्यूंचे प्रमाणही वाढले होते. बेटिंग, जुगार, वेश्या व्यवसाय आणि पैशांचा गैरवापर पाहणो अशक्य झाले होते. त्यामुळे हा मुद्दा मी विधानसभेत मांडला. सुदैवाने अनेक बाजूंनी छुपा किंवा उघड विरोध असूनही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बंदीसाठी मनापासून प्रयत्न केले. त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे. मधल्या काळात बंदीही योग्य प्रकारे अंमलात आली नाही. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने योग्य प्रकारे बाजू मांडली नाही. आता बंदी उठविल्यानंतर पुन्हा तेच जुने चित्र पाहायला मिळेल अशी चिन्हे आहेत. डान्सबारवर पुन्हा बंदी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कितीही मोठे जनआंदोलन उभे करण्याची आमची तयारी आहे. 
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
उपसंपादक आहेत.)
onkark2@gmail.com

 

Web Title: Every day he goes to Panvel.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.