नाव आडनाव

By admin | Published: March 5, 2016 02:47 PM2016-03-05T14:47:16+5:302016-03-05T14:47:16+5:30

मी साध्या घरातून आलो. माङो आईवडील कुणी प्रज्ञावंत, विचारवंत आणि महत्त्वाचे नव्हते. यामुळे माझे फार भले झाले. तुमची आडनावे तुमच्या नावापेक्षा मोठी होऊन बसली की तुमचा सतत पराजयच होत असतो. माझा एक मित्र मला म्हणाला, माङो वडील स्मगलर असते तरी परवडले असते, पण ते साले मोठे समाजसुधारक आहेत. सतत आदर्शवादी बडबड आणि त्यातच त्यांचे करिअर!

First name last name | नाव आडनाव

नाव आडनाव

Next

 

 
 
सचिन कुंडलकर
 
घरातून कामाच्या आवडीने बाहेर पडल्यावर आणि जगात एकटे फेकले गेल्यावर आपल्याला घराची, सुरक्षिततेची आणि आपल्या माणसांची खरी किंमत कळते, याचा मला फारच गडद असा अनुभव येत राहिला आहे. याची एक दुसरी बाजूसुद्धा आहे. ती सांगतो. 
काम करताना मला अनेक तरूण मुले-मुली भेटत राहिली; ज्यांचे आईवडील आमच्या चित्रपटक्षेत्रत होते किंवा आमच्या क्षेत्रात नसले तरी अतिशय नावाजलेले, प्रसिद्ध किंवा ज्याला समाजात स्वयंप्रज्ञ म्हणता येतील असे होते. मी अगदीच माङया मर्जीने आणि स्वभावानुसार घाईने जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडलो होतो. आमच्याकडे न भरमसाठ पैसे होते न समाजात मोठी पत किंवा ओळखीपाळखी होत्या. फक्त आई-वडिलांचे प्रॉमिस होते की तुला केव्हाही काहीही लागले तरी आपले घर उघडे आहे आणि तुङया सगळ्या निर्णयांना आमचा पाठिंबा आहे.
 मी सरळ त्या ताकदीवर सीएचा कंटाळवाणा अभ्यास सोडून चित्रपटक्षेत्रत उमेदवारी करायला सुरु वात केली होती. ज्यांचे आई-वडील मोठे लेखक, चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, गायक किंवा समाजात नाव कमावलेले विचारवंत होते त्या मुलांचा मला फार हेवा वाटे. असे वाटत राही की यांना किती सोपे आहे सगळे करणो. साध्या साध्या कामाच्या पहिल्या संधी यांना किती सहज मिळतात. यांना काही सल्ला लागला, मार्गदर्शन लागले तर किती सहज  मिळत असेल. याचे कारण यांचे प्रसिद्ध आईवडील.
 मी मुंबईला राहायला आलो तेव्हा मला मुंबईत जन्मलेल्या माङया आजूबाजूच्या मुलामुलींचासुद्धा हेवा वाटत असे. याचे साधे कारण त्यांची मुंबईत राहती घरे होती आणि काही जणांच्या आपसूकच चित्रपटक्षेत्रत ओळखी होत्या. या जन्मत: मिळणा:या सुखसोयी मला त्या काळात फार आकर्षित करत. कारण तुमच्या उमेदवारीच्या काळातला खूप मोठा आर्थिक आणि मानसिक ताण या सगळ्याने कमी होत असतो. 
पण आज मला, मी साध्या घरातून आलो आणि माङो आईवडील फार कुणी प्रज्ञावंत, विचारवंत आणि महत्त्वाचे नव्हते याचे फार म्हणजे फारच बरे वाटते. कारण त्यामुळे माङो फार भले झाले. आणि अतिविचारी, अतिप्रसिद्ध आणि ताकदवान आई-वडिलांची माङया आजूबाजूची मुले फारच दुबळी, सामान्य आणि फुकाची निघाली असे मोठय़ा प्रमाणात जाणवू लागले. तुमची आडनावे तुमच्या नावापेक्षा मोठी होऊन बसली की तुमचा पराजय होत राहतो आणि सतत तुमच्या आई-वडिलांचाच विजय होत असतो.
असे होण्यामागचे कारण आमच्या वेळी भारतात मुले कशी आणि का जन्माला घातली जात यामागे आहे. 
मुले होण्याचे कोडकौतुक आणि जन्म दिल्याचे भारावलेले फिलिंग आई-वडिलांना होत असले, तरी आईवडील होणो हे निसर्गाने दिलेले फुकटचे आणि कर्तृत्वशून्य काम आहे याची जाणीव आजच्या तरु ण जोडप्यांना असते तशी माङया आई-वडिलांच्या पिढीला नव्हती. असुरक्षित संभोग करत बसले की काही दिवसांनी मुले होतात यापलीकडे कोणत्याही जोडप्याचे पालक होण्यात कोणतेही कर्तृत्व नसते. आव मात्र असा आणला जाई की आपण समाजाचे काहीतरी देणो लागत होतो ते फेडले, कुटुंबाला वारस दिला, कुलदैवताचा प्रसाद मिळाला, वंश चालवला वगैरे वगैरे फालतूपणा. मग मुलांना हे आईवडील आयुष्यभर हे ऐकवत बसत, ‘‘आम्ही तुमच्यासाठी इतके केले, आता तुम्ही आमचे ऐका.’’ 
सुदैवाने आता माङया पिढीतली तरु ण मुले जर पालक झालीच तर दोन महिन्याच्या आत गुपचूप पोटापाण्याच्या कामाला लागतात. काही मूर्ख मुले फेसबुकवर अजूनही ‘प्राऊड पॅरेंट झालो’ असे फोटो टाकतात. मुले दुसरीपासून शाळेत नापास व्हायला लागली की लगेच यांचे प्राऊडपण कमी होते आणि ते मुलांना बदडायला लागतात. 
त्यात ही भारतीय पालक मंडळी सधन, सुशिक्षित आणि सामाजिक विचारवंत घराण्यांतील असतील तर मुले झाली रे झाली की ती त्यांच्यावर आपली स्वप्ने लादायला लागतात. जणू आपली स्वप्ने आणि आपले उद्योगधंदे पुढे चालवायला हा जीव पृथ्वीतलावर देवाने पाठवला असावा असे आई-वडिलांना वाटत असे. 
त्याकाळी स्थलांतराचे प्रमाण कमी असल्याने सगळे आईवडील आपापल्या आईवडिलांकडेच राहत. त्यामुळे त्या बिचा:या मुलामुलींवर आईवडील, आजीआजोबा,  पणजीपणजोबा यांनी दिवसरात पाहिलेली लाखो स्वप्ने पूर्ण करण्याची किंवा त्यांचा आदर्शवाद पुढे चालवण्याची जबाबदारी येई. आणि त्यात अशा घरात जन्मलेल्या मुलांची पुरती वाट लागत असे. 
माझा एक मित्र मला म्हणाला की माङो वडील स्मगलर असते तरी परवडले असते, पण ते साले मोठे समाजसुधारक आहेत. सतत आदर्शवादी बडबड करतात आणि स्वत:चे करिअर त्यात करतात, पण त्यामुळे आम्हाला साधे कॉलेजच्या कोप:यावर बिडय़ा फुकतसुद्धा उभे राहता येत नाही. येता जाता सगळी पुणोरी माणसे मला ‘त्यांचा मुलगा’ म्हणून ओळखतात. 
मी स्वत: पालक आणि मुलांची अतिशय गंभीरपणो हिंसात्मक नाती पाहिलेली आणि अनुभवलेली आहेत. या सर्व बाबतीत मला हे दिसले आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यात नको तेवढी ढवळाढवळ करणारे हे सर्व पालक पांढरपेशा आणि बुद्धिवादी घरातील यशस्वी आणि जाणती माणसे होती आणि त्यांच्या मुलांचा आयुष्यातला सर्व वेळ आणि ताकद त्यांच्या आईवडिलांपेक्षा वेगळे होण्यात गेली. त्यात ती मुले दमून थकून जवळजवळ नष्ट झाली. काही मुलांनी आई-वडिलांच्या डोक्यावर यथेच्छ मि:या वाटल्या आणि रागाने त्यांची घराण्याची पूर्ण बेअब्रू केली. उरलेली मुले घाबरून आईवडिलांचे अतिरिक्त गुणगान गात असतात, त्यांनी चालवलेल्या संस्था चालवत बसतात, त्यांचेच व्यवसाय पुढे चालवायचा प्रयत्न करत बसतात; पण आतून त्यांना स्वत:चा आवाज सापडत नाही किंवा आईवडिलांच्या धाकात त्या मुलांना तो सापडण्याची शक्यता नष्ट होते. अशी मुले गंभीरपणो अंतर्गत नैराश्यात जगत राहतात. 
सोपी उदाहरणो द्यायची तर अनेक मोठय़ा फिल्मस्टार्सची किंवा खेळाडूंची मुले पाहता येतील. त्यांच्या आईवडिलांच्या जवानीचा बहर कधीच ओसरत नाही आणि त्यात ही मुलेमुली चाळीस चाळीस वर्षाची झाली तरी आईचा किंवा वडिलांचा हात धरून बसलेली असतात. आपल्याला अभिनय करता येत नाही, ते आपल्या आई-वडिलांचे काम आहे, आपले नाही हे त्यांना कुणी सांगायला जात नाही. आणि यापुढच्या पिढीचे बोन्सायवृक्ष होऊन बसतात. तसेच गायकांच्या मुलांचे झालेले दिसते. त्यांच्या आई-वडिलांचेच कौतुक आणि लाड समाजात इतके चालू असतात की या मुलांनी वेळच्यावेळी आपला वेगळा मार्ग शोधला नाही तर ती पन्नाशीची होईपर्यंत आई-वडिलांचेच तंबोरे लावत बसलेली असतात. किंवा मग आईवडील मेले की मग त्यांची चरित्रे लिहिणो हे एक बिनडोक काम अशी मुले करतात. हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा फार मोठा तोटा आहे. आपल्याकडे पुढील पिढीला आपण आपली कामे आणि स्वप्ने पूर्ण करण्याची फॅक्टरी म्हणून पाहतो. 
अशा अनेक प्रसिद्ध अप्पलपोटी क्रूर आणि ताकदवान आई-वडिलांच्या घरात जन्मून आपली स्वप्ने धुळीला मिळालेली किंवा आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची मुभाच नसलेली अनेक ओळखीची मुलेमुली मी पाहिली तेव्हा मला मी साध्या आणि अजिबातच प्रसिद्ध नसलेल्या आई-वडिलांचा मुलगा आहे याचे फार बरे वाटले. पण त्याला थोडा काळ जावा लागला. इतरांचा नाश होताना पाहिले, की आपल्याला आपले सुदैव कळते तसे झाले.
आम्ही मोठे होताना आमच्या आईवडिलांनी फार विचार केला नाही आणि आम्हाला आमचे आमचे टक्केटोणपे खायला जगात सोडून दिले हे त्यांनी आमच्यावर केलेले सगळ्यात मोठे उपकार आहेत. साध्या मराठी शहरी मध्यमवर्गात जन्मल्याचे जे फायदे असतात त्यापैकी हा एक.
माङया आईवडिलांना माङया आणि माङया भावाच्या कार्यक्षेत्रतले काही म्हणजे काहीही कळत नाही. त्यामुळे ते आम्हाला सल्ले देत नाहीत आणि बहुमूल्य मार्गदर्शनपण करत नाहीत. ते आम्हाला एकटे सोडतात आणि आम्हाला आमच्या चुका करू देतात. अनेक वेळा आम्ही संपूर्ण हरलो आहोत तेव्हा त्यांनी घराची दारे आमच्यासाठी उघडी ठेवली आहेत हे मोठे आणि महत्त्वाचे काम त्यांनी केल्याचे बळ आम्हाला वेळोवेळी मिळाले आहे. 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com

Web Title: First name last name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.