फूड फॉर ऑल !

By Admin | Published: April 29, 2016 11:00 PM2016-04-29T23:00:56+5:302016-04-29T23:00:56+5:30

‘खाऊन माजा, पण टाकून माजू नका’, ‘पान चाटूनपुसून स्वच्छ कर’, ‘आमटीमधलं आमसूलसुद्धा खाऊन टाक’, ‘ते ताक पी रे, ताक इंद्राच्याही नशिबात नसतं’..

Food for All! | फूड फॉर ऑल !

फूड फॉर ऑल !

googlenewsNext
>- ओंकार करंबेळकर
 
दररोज किती लाख लोक 
उपाशीपोटी झोपतात? 
आणि दररोज किती कोटी रुपयांचे,
किती कोटी टन तयार अन्न वाया जाते?
- संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार 
जगभरात एक तृतीयांश अन्न वाया जाते. 
भारतात त्याचे प्रमाण 4क् टक्के आहे!
वाया जाणारे हेच चांगले अन्न 
गरजूंच्या पोटात जावे यासाठी 
एक अभिनव उपक्रम मुंबईत सुरू झालाय.
उरलेले अन्न भुकेल्यांर्पयत पोचवणो
इतकी साधी संकल्पना!
मुंबईच्या डबेवाल्यांनीही त्यासाठी 
आपला हात पुढे केला आणि 
बघता बघता हजारो भुकेल्यांची
क्षुधा शांत होऊ लागली!
 
‘खाऊन माजा, पण टाकून माजू नका’, ‘पान चाटूनपुसून स्वच्छ कर’, ‘आमटीमधलं आमसूलसुद्धा खाऊन टाक’, ‘ते ताक पी रे, ताक इंद्राच्याही नशिबात नसतं’.. आपल्यापैकी जवळजवळ सर्वानीच बालपणी ही वाक्ये ऐकली आहेत. किंबहुना अशी वाक्ये हा आपल्या जेवणाचा अविभाज्य अंगच झाली होती. पण हव्या त्या वस्तू, पदार्थ मनसोक्त खाऊनही खिशांमध्ये पैसे उरायला लागल्यापासून आपल्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. उरणा:या अन्नाबद्दल फारसे काही वाटणो कमी झाले आणि आपण सहज पदार्थ फेकू लागलो, म्हणजे टाकूनही माजायला शिकलो.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणो, लखनौ अशा मोठय़ा महानगरांमध्ये दररोज पाटर्य़ाचे आणि लग्नाचे बार उडतात. या प्रत्येक लग्नात किंवा पार्टीत माणसे वाढली तर काय करायचे या भीतीने सढळ हाताने स्वयंपाक केला जातो आणि मग पन्नासपासून कितीही लोकांना खाता येईल इतके अन्न उरते. 
एका बाजूस हे उरणारे अन्न फेकून द्यावे लागते त्याचवेळेस शहरामध्ये लाखो लोकांना अर्धपोटी किंवा उपाशीपोटी झोपावे लागते. हे दुर्दैवी चित्र जवळपास प्रत्येक शहरामध्ये कमीअधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते.  
ही वस्तुस्थिती आणि विरोधाभास पाहून मुंबईतले ऋषिकेश कदम अस्वस्थ झाले. उरणारे अन्न आणि भुकेले, उपाशीपोटी झोपणारे लोक यांच्यामधील दुवा होण्यासाठी ‘फूड फॉर ऑल’ या योजनेची सुरुवात त्यांनी केली. ज्या पार्टीमध्ये किंवा लग्न समारंभात अन्न उरेल तेथे जाऊन अन्न गोळा करायचे आणि ते गरिबांमध्ये वाटायचे अशी सरळ संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. जेवणाची नियमित कंत्रटे घेणा:या केटर्सशीही त्यांनी संपर्क केला. त्यामुळे अन्न उरण्याची चिन्हे दिसू लागताच केटर्स ऋषिकेशला फोनवरून कळवू लागले. त्यामुळे अन्न खराब होण्यापूर्वी आणि खाण्यायोग्य स्थितीतच ते लोकांना देता येऊ लागले. 
बहुतांशवेळा हजारभर लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली जाते आणि फारच कमी लोक कार्यक्रमास उपस्थित राहतात. ब:याचदा कार्यक्रमास नुसती हजेरी लावून न जेवताच परत जाणा:यांचीही संख्या मोठी असते. अशावेळी अन्न उरते आणि त्याचे काय करायचे हा प्रश्न केटर्सना पडतो. कार्यक्रमाचे यजमान ते सारे अन्न घरी घेऊन जाऊ शकत नाहीत आणि संपवूही शकत नाहीत. 
हेच उरलेले अन्न रस्त्यावर झोपणारे, रेल्वे स्टेशन्सच्या आसपास राहणारे गरीब, भिकारी यांच्या ताटात पडू लागले. आज दिवसभरात अडीचशे लोकांना पुरेल इतके अन्न गोळा होते. इतक्या मोठय़ा मुंबई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन अन्न गोळा करणो केवळ अशक्य होते. त्यांची ही समस्या सोडविली मुंबईचे अन्नदाते म्हणून ओळखल्या जाणा:या डबेवाल्यांनी. सुमारे पाच हजारांच्या संख्येने शहरात झपाटय़ाने कार्यरत असणारे डबेवाले शहरातील प्रत्येक भागात आणि उपनगरांत विखुरलेले आहेत. त्यांची सुसूत्र अशी साखळी यंत्रसारखी काम करत असते. नोकरदारांच्या डब्यांप्रमाणो समारंभात उरलेल्या अन्नाचा घास गरिबाच्या मुखी पडावा यासाठीही ते पुढे आले.
शहरामध्ये केवळ भिकारीच नेहमी अर्धपोटी झोपतात असे नाही. कर्करोगासारख्या मोठय़ा आजारांवर शस्त्रक्रिया आणि इतर उपचार घेण्यासाठी बंगाल, ओरिसा आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमधून लोक येतात. राहण्याचा व खाण्याचा खर्च परवडणो त्यांना शक्यच नसते. 
काही सामाजिक संस्था त्यांना मदत करतात. 
‘फूड फॉर ऑल’ने अशा लोकांना अन्न देण्याचीही सोय केली. रुग्णांचे हे नातेवाईक अत्यंत गरीब असले तरी स्वाभिमानी असतात. कोणापुढे हात पसरणो त्यांना आवडत नाही आणि भुकेल्यापोटीही जास्त काळ राहू शकत नाहीत. त्यांची ही गरज ओळखून अन्नाच्या उपलब्धतेनुसार त्यांच्यार्पयत अन्न पोहोचवण्याची आता सोय करण्यात आली आहे. 
लग्नसमारंभाप्रमाणोच शहरांमध्ये हल्ली महाप्रसाद आणि भंडारा म्हणून जेवणावळी घातल्या जातात, त्यांच्यामध्येही हमखास अन्न उरते. एकदा एका भंडा:यामध्ये हजारभर लोकांचे जेवण उरल्याचा अनुभवही ‘फूड फॉर ऑल’च्या चमूला आलेला आहे. त्याचप्रमाणो गुरुद्वाराच्या लंगरमधून चारशे लोकांचे जेवणही मिळाल्याचा अनुभव आहे. 
शिजवलेले अन्न ताटामध्ये रोज आणि विनासायास पडायला लागले की लोक आणखी आळशी होतील, कामधंदा बंद करतील हादेखील धोका आहेच. त्यावरही ऋषिकेशने विचार केलेला आहे. जे लोक धडधाकट परंतु गरीब आहेत, त्यांनी अन्नाच्या मोबदल्यात त्या-त्या विभागात विविध कामांमध्ये मदत करावी असे त्यांचे मत आहे. त्यांच्यावरती प्रभाग अधिकारी किंवा सामाजिक संस्थांद्वारे लक्ष ठेवता येईल आणि गरीब व्यक्तींनाही सन्मानाने अन्न ग्रहण करता येईल. 
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार जगभरात उत्पादित झालेल्या अन्नापैकी एक तृतीयांश अन्न वाया जाते, तर भारतात 4क् टक्के अन्नाची नासाडी होते. कोटय़वधी जनता एकवेळ उपाशीपोटी असताना अन्नाची ही नासाडी अक्षम्यच आहे. 
‘फूड फॉर ऑल’सारखे उपक्रम आणि अन्नाबाबतची संवेदनशीलता हा भार कमी करू शकतात.
 
आता अॅपचीही मदत
फुडफॉरऑलने आता अॅपच्या मदतीने लोकांर्पयत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या अॅपमध्ये आपण आपल्या ताज्या अन्नाचे फोटो प्रदर्शीत करुन, किती लोकांचे अन्न शिल्लक आहे ते इतरांना सांगू शकतो. तसेच ज्या लोकांना अन्नाची गरज आहे त्यांना ही माहिती घेऊन त्यार्पयत पोहोचता येईल. आपल्या घराजवळ किंवा कार्यक्षेत्रजवळ अन्नदाता किंवा गरजू व्यक्ती कोठे आहेत हे समजल्यामुळे शिल्लक राहिलेले अन्न कमीत कमी वेळेत लोकांर्पयत पोहोचण्यास मदत होईल. भारतातील सर्व स्थळे जीपीएसद्वारे जोडल्यामुळे अन्न्नदाता किती अंतरावर आहे, त्यार्पयत पोहोचण्यास किती वेळ लागेल याचाही अंदाज आपल्याला घेता येईल. एखाद्या ठिकाणी गरजू व्यक्ती, संस्था असतील तर त्यांचे स्थळ यामध्यो नोंदविण्यासाठी आपण सूचनाही करू शकतो.
 
‘योगर्ट’ आणि कॉर्पोरेट कंपन्या
मोठे उद्योग तसेच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचा:यांसाठी दररोज तेथेच मोफत किंवा माफक दरात जेवण तयार केले जाते. यापैकी दहा टक्क्यांर्पयत अन्न वाया जाते. नवी मुंबईमधील कोपरखैरणोमधील अशाच एका कंपनीने हे अन्न देऊ केले आहे. लवकरच हे शिजवलेले अन्न आसपासच्या अनाथालय व आदिवासी पाडय़ांमध्ये देण्याची सोय केली जाणार आहे. त्याबरोबरच आयआयटी पवईच्या मुलांच्या मेसमधील शिल्लक उरणा:या अन्नाचेही लवकरच वाटप केले जाणार आहे. कित्येक कंपन्यांच्या कॅण्टीनमध्ये शिजवलेल्या अन्नाचे करायचे काय असा प्रश्न असतो. कंपन्यांना सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत विविध प्रकारची मदत करायची असते त्याअंतर्गतही अशा मदतीसाठी विचार केला पाहिजे. 
काही कंपन्या आपल्या ब्रँडचे मूल्य टिकविण्यासाठी उत्पादित पदार्थ उरले तरी फुकट किंवा एकावर एक मोफत देऊ शकत नाहीत. विशेषत: ज्या पदार्थाचे आयुष्य (शेल्फ लाइफ) काही ठरावीक दिवस असते त्यांना ते पदार्थ फेकून द्यावे लागतात. अशाच एका योगर्ट कंपनीने मुदत उलटण्यापूर्वी दररोज चारशे ते पाचशे कप दही ‘फूड फॉर ऑल’ला देऊ केले आहे. आता प्रत्येक दिवशी निरनिराळ्या फळांच्या चवीचे आणि चांगल्या पोषणमूल्याचे दही अनाथ, गरीब व शाळेत जाणा:या मुलांना वाटण्यात येते.
 
लगAांतली नासाडी सात हजार कोटींची, 
तर पाटर्य़ातली नासाडी 15 हजार कोटींची!
मोठय़ा संख्येने युवावर्ग असणा:या भारतामध्ये वर्षभरामध्ये अंदाजे एक कोटी विवाह होतात. प्रत्येक विवाहात सरासरी पन्नास ते साठ जणांचे अन्न वाया जाते. एका व्यक्तीचा जेवणाचा खर्च 1क्क् रुपये गृहीत धरला तर या वाया जाणा:या आणि शिजवलेल्या अन्नाची किंमत पाच ते सात हजार कोटींवर जाते. तसेच इतर पार्टी आणि हॉटेल्समध्येही साधारणत: पंधरा हजार कोटी रुपयांच्या अन्नार्पयत नासाडी होत असते. भिक्षेकरी आणि अर्धपोटी झोपणा:या या देशासाठी ही मोठी विरोधाभासाची बाब आहे. ऋषिकेश कदम सामाजिक कार्याबरोबर वधू-वर सूचक मंडळही चालवतात. त्यामुळे विवाह समारंभात होणा:या अन्नाची नासाडी त्यांच्या लक्षात आली. या व्यवसायामुळे केटर्सही त्यांच्या ओळखीचे होते. वाया जाणा:या अन्नाचा उपयोग केला जाऊ शकतो हे त्यांनी ओळखीच्या केटर्सना पटवून दिले आणि केटर्स, ‘फूड फॉर ऑल’, डबेवाले आणि गरीब लोक यांच्यामध्ये अन्नाची एक साखळीच तयार झाली. केटर्स, समारंभ आयोजित करणारे यजमान यांना समजावण्यासाठी तसेच अन्नाचे वाटप करण्यासाठी तज्ज्ञांची, स्वयंसेवकांची फळी तसेच सर्व शहरांमध्ये अशा प्रकारचे काम सुरू होण्याची गरज आहे. यापुढील काळामध्ये फूड फॉर ऑलच्या संकेतस्थळावरच अन्नाची छायाचित्रे टाकण्याची सोय केली जाणार आहे. ‘आमच्याकडे हे अन्नपदार्थ उरले असून, ते ताजे व खाण्यायोग्य आहेत’ असे यजमानांना जाहीर करता येईल. जवळच्या परिसरातील लोकांना त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. अन्न देण्यासाठी सध्या दररोज 25 ते 3क् फोन येतात. शनिवार-रविवारी ही संख्या 5क् वर जाते. हॉटेल्समध्ये उरणारे पदार्थही गोळा करण्यासाठी झोमॅटोसारख्या कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. त्यानंतर हॉटेलांमध्ये उरणारे अन्नही उपलब्ध होईल.
 
पाप्पडावडा!
- भूक लागलीय, या आमच्याकडे!
अन्नाची नासाडी करणारा आणि अर्धपोटी लोकांचा भारत हा एकमेव देश नाही. जगातील प्रत्येक देशात गरीब-श्रीमंत दरी, बेकारी, अन्नाची नासाडी हे प्रश्न आहेत. वाया जाणा:या अन्नाबद्दल अमेरिका आणि युरोपातील देशांनी कम्युनिटी फ्रीज किंवा स्ट्रीट फ्रीजची संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये वसाहतींमध्ये एक मोठा फ्रीज बसवलेला असतो. त्यामध्ये लोक अन्न वाया जाण्यापूर्वी आणि मुदत उलटण्यापूर्वी आणून ठेवतात. गरीब, उपाशी राहणारे लोक त्यात ठेवलेले दूध, ब्रेड, अंडी, बटर किंवा मांस आपापल्या गरजेनुसार घेतात. यामध्ये कोठेही कमीपणा वाटून घेतला जात नाही. आमच्याकडे जे अन्न उरणार होते ते आम्ही दिले आणि आम्हाला गरज होती म्हणून ते आम्ही घेतले असा सरळ स्वच्छ हेतू त्यामध्ये असतो. भुकेच्या वेळेस अन्न मिळत असल्याने हे फ्रीज लुटणो किंवा ते फोडून अन्न पळविणो असे प्रकारही तेथे होत नाहीत. हळूहळू ही संकल्पना युरोप आणि मध्यपूर्वेतही आली आहे. 
आपल्याकडे कोचीमध्ये पाप्पडावडा नावाच्या उपाहारगृहाने उरलेले चांगले पदार्थ ठेवण्यासाठी रस्त्यावर एक फ्रीजच ठेवला आहे. कोचीमधील गरजू लोक त्याचा उपयोग करत आहेत.
 
मुंबईतल्या डबेवाल्यांची 
‘रोटी बँक’!
सायकलवरून प्रवास करत जेवणाचे डबे पुरविणारे डबेवाले गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमीच धावून आले आहेत. 
पार्टी तसेच समारंभांमध्ये वाया जाणारे अन्न गरिबांच्या पोटात जावे म्हणून डबेवाल्यांनी ‘रोटी बँक’ सुरू केली आहे. 
समारंभात उरलेले जेवण आणायला डबेवाला सायकलवरून जातो व ते जेवण भुकेल्यांना वाटतो. ब:याचदा कार्यक्रम रात्री उशिरा संपतात तेव्हा जेवण उरल्याचा  फोन येतो. पण अशावेळेस संस्थेला काहीच करता येत नाही. हे अन्न साठविण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने रात्री उशिरा मिळणारे अन्न लोकांना देता येत नाही. 
फ्रीज असलेले एखादे वाहन डबेवाल्यांना मिळाले तर रात्री मिळणारे अन्नही लोकांमध्ये वाटता येईल. या वाटपासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता डबेवाले आपली सेवा देतात. सायकलवरून प्रवास करून अन्न गोळा करतात आणि त्याचे वाटपही करतात. 
दक्षिण मुंबईमधील रुग्णालयाच्या दारामध्ये राहणा:या रुग्णांच्या नातेवाइकांना अन्न घेऊन येणारे हे डबेवाले अन्नदूतच वाटतात.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
 

Web Title: Food for All!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.