गुजगोष्टी.

By admin | Published: March 26, 2016 08:34 PM2016-03-26T20:34:57+5:302016-03-26T20:34:57+5:30

लैंगिकतेसंदर्भातील मौनाची कुंपणं मोडावीत, स्त्रियांनी लैंगिकतेची अभिव्यक्ती सकारात्मक पद्धतीनं करावी यासाठी तीन प्रयोगांचं लक्ष्य असताना या नाटकाचे दोनशे प्रयोग केले. माझ्या मांडणीकडे दुर्लक्ष होईल, नाटक बंद पाडण्यासारखे प्रकार होतील याची जवळच्या माणसांना काळजी होती. काही प्रमाणात ते झालंही. काही जण म्हणाले, नाटक महत्त्वाचंच, पण ‘योनी’ हा शब्द तेवढा काढा. - मुख्य मुद्दाच कसा काढून टाकणार? मौनाची कुंपणं तोडणं हेच तर उद्दिष्ट होतं.

Forgiveness | गुजगोष्टी.

गुजगोष्टी.

Next
>- वंदना खरे
 
 
नाटक पाहणं हा भाग महत्त्वाचाच, पण त्यानंतर आवर्जून होणारी चर्चा खूप इंटरेस्टिंग व्हायची?
- आपल्याकडे सार्वजनिक व्यासपीठावर कुणी लैंगिकतेची चर्चा करत नाही. खासगी बैठकीत ती कदाचित होऊ शकते, पण होतेच असं नाही. खरंतर लैंगिकतेच्या प्रश्नावर चर्चेसाठी निमित्त तयार करणं हेच या प्रयत्नाचं उद्दिष्ट होतं. नाटकानंतरची चर्चा ठोस पद्धतीनं व्हावी असं मला वाटायचं. वेगवेगळ्या ठिकाणचे हे अनुभव खासच!  एकदा एक बाई तावातावाने म्हणाल्या, ‘लोकांना इकडं जेवायला मिळत नाही आणि तुम्ही लैंगिकतेवर नाटकं कसली करताय?’ - माझं उत्तर होतं, ‘एक वेळ जेवायला मिळत नाही ते सेक्स करत नाहीत याची तुम्हाला खात्री आहे का?’ आपण मध्यमवर्गीय माणसांनी हा प्रश्न महत्त्वाचा नाही अशी मानसिकताच करून ठेवलीय. मी सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे नाटक निवडलेलं आहे असा आरोपही होत राहिला. पण जी बाई नाटय़क्षेत्रतली व्यावसायिक कलावंत नाही, ती एक दिवस उठून हेच नाटक का करेल? 
 जवळच्या माणसांना माझी काळजी वाटत होती ती एक तर माङया मांडणीकडे दुर्लक्ष होईल किंवा अनेक मार्गानी  संस्कृतिरक्षक नकोसा त्रस देतील. नाटकाचं पहिलं अभिवाचन केलं तेव्हा लोक म्हणाले, नाटक तसं महत्त्वाचंच आहे, पण ‘योनी’ हा शब्द काढून टाकला पाहिजे. मुख्य मुद्दाच कसा काढून टाकणार? 
या विषयाभोवती जे मौनाचं कुंपण पडलेलं आहे ते मोडावं, सार्वजनिकरीत्या बोलता यावं म्हणून तर नाटकासारखी कृती करायची. नाटक प्रदर्शित झाल्यावर जाहीर लेख लिहून चिखलफेक केली गेली,ज्याचा नाटकाशी संबंध नव्हता. माणसं पातळी सोडून बोलत होती, पण मी गृहीत धरलं होतं की कौतुक होणार नाही. आपण परंपरांशी, भाषेशी विद्रोह करतो आहोत.
नाटकाच्या शेवटी आजीनं नातीच्या प्रसूतीच्या वेळी केलेल्या मदतीचा एक प्रसंग आहे. त्यावेळी ती म्हणते, ‘मी योनीचं हृदयामध्ये रूपांतर होताना पाहिलं!’ ब:याच स्त्रियांप्रमाणो काही पुरुषांनाही हा प्रसंग विशेष भावतो असा अनुभव. काही पुरुष तर म्हणाले होते की, ‘आम्ही पुरुषांनी लेबर रूममध्ये थांबून हे अनुभवायला हवं, तर आई-बहिणीवरून शिव्या कधीच तोंडात येणार नाहीत.’ पण याच प्रसंगावर एक बाई खवळल्या आणि म्हणाल्या, ‘मी या नाटकाला स्त्रीवादी नाटक बिलकुल मानत नाही. तुम्ही मातृत्वाची भलावण करताहात. जी बाई मूल जन्माला घालत नाही तिला काय हृदय नसतं का?’ मी त्यांना शांतपणानं म्हणाले, ‘जन्म देणं हे मातृत्व नाही. मातृत्व कितीतरी पलीकडे जातं याच्या.’ 
तुम्ही वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शहराप्रमाणो खेडय़ापाडय़ातल्या मुलींबरोबरही काम करता. लैंगिकतेबद्दल नैतिक निषिद्धता कुठं जास्त आढळते?
- निषिध्दता दोन्हीकडे आहे. पण त्याचं स्वरूप, पातळ्या आणि तीव्रता वेगवेगळी आहे. इथं शहर आणि खेडं हा शाब्दिक खेळ करता येत नाही. शहरातल्या अशाही कष्टकरी वस्त्यांमध्ये मी काम केलंय, जिथं एकच खोली खाली, तिथून छोटा जिना आणि वर माळ्यासारखी छोटी खोली. खाली पाहुणो आले असतील तर पाळीचं पॅड बदलायला मुलीला परवानगीशिवाय खाली येता येत नाही. दुसरीकडे गावातल्या काही घरांमध्ये सर्व सुविधा आहेत, पण लैंगिकतेवरची बंधनं आणि दडपणं वेगळी व भरपूर आहेत. 
म्हणून कसलंही ढोबळ विधान मी करू धजणार नाही. 
चंद्रपूरमधल्या मुलींबरोबर मी युनिसेफसाठी ‘आता तुझी पाळी’ नावाचं नाटक त्यांचेच अनुभव एकत्र करून केलं होतं. ती सगळी प्रक्रिया वर्षभर चालू होती. वर्षाच्या सुरुवातीला ‘मासिक पाळी’ हा शब्दसुद्धा त्या मुली उच्चारत नव्हत्या. नंतर चर्चा आणि गप्पांमधून त्यांना बरीच मोकळीक आली. तिथे खेडोपाडी या नाटकाचे 5क् प्रयोग झाले. नाटकानंतर होणारी चर्चा अधिक सुकर करण्याइतपत मुली धीट झाल्या.
हे नाटक अनुभवल्यावर कुणी मोकळेपणानं आपल्यातल्या बदलांविषयी बोललं का?
एखादी कलाकृती असे पटकन बदल घडवू शकते, यावर माझा फारसा विश्वास नाही. बदलाच्या प्रक्रियेला थोडा वेग जरूर मिळतो.
आमच्या नाटकात काम करणारी एक मुलगी म्हणाली की, शरीराबद्दलची संकल्पना क्लीअर झाल्यामुळे तिच्या आत्मविश्वासात कमालीचा फरक पडला.  
 धारावीतल्या कष्टकरी वर्गातल्या बायकांना तिथल्या ‘स्नेहा’ नावाच्या संस्थेनं खास बस करून नाटकाला आणलं होतं. त्यांनी धमाल केली. एका शब्दाविषयीची नाटकातली चर्चा ऐकल्यावर त्या म्हणाल्या, आम्ही हा शब्द कितीकवेळा शिवीसारखा वापरतो.  
हा शब्द योनीसाठी आहे आणि तो चांगला आहे हे आम्हाला ठाऊकच नव्हतं. त्यांच्या या कबुलीजबाबाचं समाधान वाटलं. शरीराच्या भागांचं शिवीपण घालवणं हाच तर उद्देश होता त्या प्रवेशाचा.
आपल्याकडे लैंगिकतेबद्दल खूपच संकोची वातावरण आहे, त्यात निदान थोडे बदल घडले, तुमचा उपक्र म यशस्वी झाला असं वाटतं?
- नाटय़दिग्दर्शक सुनील शानबाग यांची प्रतिक्रि या फार बोलकी आहे. ते म्हणाले होते, ‘मी इंग्रजी नाटक बघितलंय, त्यामुळं मला त्यावेळी वाटलं की अच्छा अच्छा, अमेरिकेत असं आहे तर! मराठीत पाहिल्यावर माङया मुस्काटातच बसली, की अरेच्चा माङया शेजारच्या काकूसुद्धा असा विचार करतात!’ 
- आपल्याला वाटतं की लैंगिकतेबद्दलची घुसमट फक्त आपल्याकडे आहे, पण तसं नाही. हे नाटक वेगवेगळ्या देशांतल्या ज्या बायकांनी आपापल्या भाषेत केलंय त्यांचे अनुभव मी वाचले.  जर्मनीतली बाई म्हणते, युरोपातच फक्त सेक्स्च्युअॅलिटीचा टॅबू आहे असं वाटायचं. पण असं नाहीये. अमेरिकेतपण आहे! इराणमधल्या, पाकिस्तानातल्या, चायनातल्या पण तेच म्हणतात. 
अमेरिकेत इंग्रजी नाटकाची तिकीट विक्र ी होत होत होती तेव्हा लोक ‘व्हच्यरुअल मोनोलॉग’चं किंवा ‘डायलॉग’चं तिकीट द्या म्हणायचे. जिथं शब्द उच्चारायलाही संकोच तिथं स्वीकाराची सुरु वात कशी होणार म्हणून एका मुलीला मुद्दाम काम दिलं गेलं होतं की तिकीट देताना लोकांना नाटकाचं नाव नीट उच्चारायला लावायचं. नको त्या संकोचाचा भार हटवायला हवा म्हणून! 
आमच्या मराठी नाटकाची यशस्वीता मोजणार कशात? हां, स्त्रियांनी लैंगिकतेची अभिव्यक्ती सकारात्मक पद्धतीनं करावी यासाठी तीन प्रयोगांचं लक्ष्य असताना दोनशे केले ही गोष्ट महत्त्वाचीच.  तरीही सांगते, बदल झाल्याचं मी ऐकते तेव्हा आश्चर्य वाटतं. 
आपल्या आयुष्यात किती र्वष असतात आणि नाटक आपण एक-दोन तास बघतो. नाटक परिवर्तनाचं माध्यम आहे असं मी मानत नाही. स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेगळीच कुठलीतरी ऊर्जा लागते. नाटक ते नाही करू शकत. नाटक फक्त विचाराला सुरु वात करून देऊ शकतं. 
ही एक पायरी आहे पुढे जाण्याची. 
काही लोकांना तिच्यावरून तडक पळावं वाटेल, काहींना ती ओलांडावी वाटेल.. एवढंच!
 
‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक दोनशे प्रयोगांचा टप्पा पूर्ण करून आता विराम घेतं आहे. 
अमेरिकन लेखिका इव्ह एन्सलर यांच्या ‘व्हजायना मोनोलॉग’ या नाटकाचं मराठी रुपांतर आणि दिग्दर्शन वंदना खरे यांनी केलं.  
गेली सात र्वष ‘लैंगिकता’ या विषयावरील चर्चा त्यांनी जोखीम घेऊन आणि सातत्याने  चालू ठेवली आहे. 
या प्रवासाविषयी त्यांच्याशी केलेला हा संवाद.
मुलाखत 
- सोनाली नवांगुळ
sonali.navangul@gmail.com

Web Title: Forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.