द्या जगण्याला अर्थ नवा

By Admin | Published: December 26, 2015 05:37 PM2015-12-26T17:37:09+5:302015-12-26T17:37:09+5:30

कुत्र्या-मांजरांवरसुद्धा माणसं जीव ओवाळून टाकतील, पण भुकेनं तडफडणा:या माणसाकडे दुर्लक्ष करतील. अमेरिकेत लोकांची गरज ओळखून त्यांना फुकट जेवण देणं, औषधपाणी करणं. असे अनेक उपक्रम स्वयंस्फूर्तीनं राबवले जातात. त्यातून आपणही काही शिकतोच.

Give meaning to living | द्या जगण्याला अर्थ नवा

द्या जगण्याला अर्थ नवा

googlenewsNext
- दिलीप वि. चित्रे
 
समोरच्याच घरात राहणा:या बार्बराची आज सकाळपासूनच चाललेली धावपळ दिसत होती. तिचा नवरा डेव्हिडसुद्धा गडबडीत दिसला. लवकरच उठून त्यानं पुढचं-मागचं गवत कापलं. थंडीचे दिवस असूनही झाडांना पाणी घातलं. घरापुढच्या दिव्याच्या खांबावर टाइमर लावलेल्या दिव्यांच्या माळा लावल्या. समोरच्या अंगणात ख्रिसमस डेकोरेशन्सची सजावट केली. उंच शिडीवर चढून घरापुढच्या छपरावर लांबलचक लपकझपक करणा:या दिव्यांच्या माळा सोडल्या.
ज्येष्ठ नागरिकांच्या वसाहतीत राहणारे आम्ही सगळे. आता डेव्हिडचं वयच किमान 75 ते 80 च्या आसपास असावं. तो शिडीवर चढताना पाहून मी अवाक् झालो होतो. त्यानं माझ्याकडे पाहून नुसते डोळे मिचकावले आणि हसला. सगळीकडेच उत्साहाचं वातावरण. नोव्हेंबरच्या अखेरीस ‘थॅँक्सगिव्हिंग’चा सण संपता संपता किंवा त्याआधीच ख्रिसमसचे वेध लागलेले असतात.
सगळ्या वातावरणातच जणूकाही चैतन्य फुललेलं. शॉपिंग मॉल्स नुसते गजबजलेले. मॉल्सच्या चहूबाजूंना पसरलेले पार्किग लॉट्स खच्चून भरलेले. मुलं-नातवंडं-नातेवाईक यांच्यासाठी ख्रिसमस गिफ्ट्स खरेदी करायला झुंबड उडालेली.
दिव्याच्या माळा लावण्याचं काम संपवून डेव्हिड खाली उतरला, तेव्हा मी त्याला यंदाच्या ख्रिसमसला त्याचा व बार्बराचा काय प्लॅन आहे म्हणून विचारलं. तो म्हणाला, ‘नेहमीचाच’.
म्हणजे असा की, त्याचा मुलगा वॉल्टर विमानानं न्यूयॉर्कहून इकडे येतो आणि डेव्हिडच्याच मोटारीनं त्याला आणि बार्बराला घेऊन जातो. दोन आठवडय़ांनी ख्रि ािसमस संपल्यावर त्यांना पुन्हा घेऊन येतो आणि स्वत: विमानानं पुन्हा न्यूयॉर्कला परततो.
पण डेव्हिड आणि बार्बरा न्यूयॉर्कहून परतले की आनंदात असतात. कारण तिकडे नातवंडांबरोबर त्यांचा वेळ खूप चांगला जातो. इकडे आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वसाहतीला ते कंटाळलेले असतात. दरवर्षी तेवढाच काय तो त्यांना विरंगुळा. म्हणून ते या दिवसांची वाट पाहत असतात.
फक्त एकच अडचण असते.
इकडे फ्लोरिडाला बाराही महिने स्वच्छ सूर्यप्रकाश. उत्तम हवामान. शिवाय डिसेंबर महिना असूनही थंडीचा मुळीच त्रस नाही. याउलट न्यूयॉर्क. डिसेंबरमध्ये हटकून होणारा ‘स्नोफॉल’. बर्फ वादळं. मोठाले कोट, वुलनचे कपडे, कानटोप्या, हातमोजे घातल्याशिवाय बाहेर पडायची सोय नाही. पण नातवंडं भेटण्याच्या आनंदासाठी हे सारं सहन करायला ते तयार असतात. पण मोटारीच्या प्रवासाचा त्रास असतोच. कारण एकंदर अंतर जवळजवळ 200 किलोमीटर्स. ते कापायला दोन दिवस लागतात. एक रात्र बाहेर मोटेलमध्ये काढावी लागते.
पण न्यूयॉर्कमधल्या ख्रिसमसची मजा औरच. आम्ही कितीतरी वर्ष न्यूयॉर्कला काढली. बाजारातली- रस्त्यावरची गर्दी, सर्वत्र दिव्यांची आरास. रॉकफेलर सेंटरसमोरच्या प्रशस्त चौकात बर्फावर स्केटिंग करण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी. आणि त्या प्रचंड थंडीत शेगडीवर भाजलेले गरम गरम ‘चेस्टनट्स’ (शिंगाडे) विकत घेऊन खात फिरणारे आम्ही. सगळं वातावरणच मंतरलेलं!
या मंतरलेल्या दिवसांचा स्वत: आनंद लुटता लुटता ज्यांना ते शक्य होत नाही त्यांच्यासाठी आधाराचा हात पुढे करणा:या कित्येक दानशूर व्यक्ती आणि संस्था असतातच.
डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना. आणि त्यातही, ख्रिसमस अगदी वर्षअखेरीस आलेला सण. त्यामुळे वर्षभरात केलेल्या खर्चाचा अंदाज घेऊन ‘टॅक्स ब्रेक’ मिळवण्यासाठी देणग्या देणारेही खूप लोक असतात. या मिळालेल्या देणग्यांचा समयोचित व यथोचित वापर करून गरिबांसाठी आनंद वाटणारेही अनेक असतात. सणासुदीच्या दिवसात काम करण्यासाठी प्रत्येक गावामधून खूप सपोर्ट ग्रुप्स स्थापन केलेले असतात. त्यात कामं करणा:या व्यक्ती गरिबांना नुसते शारीरिक काम करून व अर्थसाहाय्य करून मदत करतात असं नाही, तर त्यांना मानसिक बळ देण्याचंही अत्यंत महत्त्वाचं काम करतात. शेवटी माणसाला माणसाचंच प्रेम हवं असतं, त्यात राव व रंक हा भेदच नसतो. ज्यांना हे प्रेम, हा आधार मिळत नाही त्यांना एकाकी जीवन कंठणं हे किती कठीण असतं याची सहजासहजी कोणी कल्पना करूशकत नाही.
सगळ्यात महत्त्वाचं, मी एक पाहिलं. इकडे नियमितपणो प्रत्येक चर्चमध्ये स्वयंसेवी वृत्तीनं काम करून गरजूंना साहाय्य करण्यासाठी कित्येक कार्यक्रम राबविले जातात. ते पाहून मी आश्चर्यानं थक्क होतो. ‘सॅण्डविच’ तयार करून त्यांचं वाटप करा, ‘कॅण्ड फूड’चे डबे व तयार पाकिटं वाटा, औषधांची गरज असणा:यांना त्यांच्या गरजा ओळखून यथोचित मदत करा, दर शुक्रवारी गरिबांना फुकट जेवण द्या, जेवणासाठी रांगेत उभे असलेल्या गरिबांशी हिडीसफिडीस न करता सहानुभूतीने वागा व सन्मानाने बोला. यातून कितीतरी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, असं मला वाटतं.
शेवटी काय? माणसं लाडानं स्वत:च्या कुत्र्या-मांजरांना कुरवाळतील, त्यांना धष्टपुष्ट करतील; पण रस्त्याच्या कडेला बसलेल्या उपाशी भिका:याकडे दुर्लक्ष करतील. अर्थात याला अपवाद असतातच. माणसानं माणसाला सन्मानानं वागवलं तर आपला समाज किती बदलेल याची मी नेहमी दिवास्वप्नं पाहतो.
खूप वर्षापूर्वी मी कुठेतरी एक छान सुभाषित वाचलं. त्याचा मी अनेकदा माझ्या भाषणात उल्लेख केला. ते असं, ‘‘आपली भूक भागल्यानंतरही दुस:याच्या पानांतली भाकरी ओढून खाईल- ती विकृती. आपल्या पानातली अर्धी भाकरी दुस:या भुकेल्या माणसाला देईल ती प्रकृती आणि आपल्या पोटात भुकेचा डोंब उसळलेला असताना आपली पूर्ण भाकरी दुस:या भुकेल्या माणसाला देईल- ती संस्कृती.
‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या आमच्या अमेरिकेतील सेवाभावी संस्थेसाठी काही वर्षापूर्वी मी एक ‘प्रेरणा गीत’ लिहिलं, त्याची सुरुवात अशी :
‘‘चैतन्याची फुलवा झाडे, द्या जगण्याला अर्थ नवा अडले पडले उचला, ज्यांना आधाराचा 
हात हवा..!’’
 
 
  जाता जाता.
आज 27 डिसेंबर 2015. 
अजून चार दिवसात हे वर्ष संपून नवीन साल उजाडणार. दिवस कसे असे भराभर सरतात. बालपणीच्या आठवणी आठवताना आयुष्याची ‘गोरजवेळ’ केव्हा सुरू झाली हे कळलंही नाही. आणि मागे वळून पाहताना लक्षात आलं, की अरे, ती सुरू होऊनसुद्धा खूप र्वष उलटली की!
पण र्वष किती उलटली यापेक्षा ती कशी उलटली हे महत्त्वाचं नाही का? आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सकारात्मक असायला हवा. तो तसा असला तर प्रत्येक क्षण आनंदाचाच असतो हे नि:संशय.
‘लोकमत’साठी ‘गोरजवेळ’ हे सदर लिहिताना पाहता पाहता एक संपूर्ण वर्ष उलटलं की! 
‘लोकमत’ने माझ्यावर टाकलेला विश्वास आणि वाचकांचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून मिळालेलं प्रेम यामुळे क्षणोक्षणी उमेद वाढतच गेली. आणि एकदम लक्षात आलं की आता हा निरोपाचा क्षण येऊन ठेपलाय!
वाचकहो, 
तुमच्या प्रेमाची साथ आणि ‘लोकमत’चा विश्वास याशिवाय माझ्या आयुष्याची ‘गोरजवेळ’ धन्य होऊ शकली नसती. सा:यांना मन:पूर्वक धन्यवाद! आभार!!
(समाप्त)
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगितिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)
dilip_chitre@hotmail.com

 

Web Title: Give meaning to living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.