ग्रीन युरीन

By admin | Published: May 16, 2015 02:25 PM2015-05-16T14:25:13+5:302015-05-16T14:25:13+5:30

‘‘मानवी मूत्रचा वापर करूनच मी माङया दिल्लीच्या बंगल्यातली बाग फुलवली आहे’’ -असे सांगणारे नितीन गडकरी टीकेचे धनी झाले. सोशल मीडियावर तर यावरून टिंगलटवाळीला उधाण आले. त्यातच महाराष्ट्राच्या कृषिमत्र्यांनी मुंबईच्या मॉलमधले मानवी मूत्र शेतीसाठी वाहून नेण्याचा मुद्दा काढला. - या पार्श्वभूमीवर विशेष मुलाखती आणि जगभरात चाललेल्या अभ्यासांची / प्रयत्नांची नोंद

Green Urine | ग्रीन युरीन

ग्रीन युरीन

Next
यात चेष्टा करावी, असे काय आहे?
 
नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री)
 
एका शहरातल्या नागरिकांनी आपल्या घरांच्या छपरांवर भाजीपाल्याचे वाफे लावले आहेत आणि त्यावर खत म्हणून  मानवी मूत्रचे शिंपण केले जाते आहे.
त्या शहराच्या मुख्य चौकात भर वर्दळीच्यामध्ये कल्पक आकारातली आणि रंगा-रुपाने देखणी ‘युरिनल्स’ ओळीने मांडली आहेत आणि नागरिकांनी ‘तेथे जावे’ यासाठी यंत्रणा प्रोत्साहन देते आहे. असे सार्वजनिक ठिकाणी एकत्रित झालेले मानवी मूत्र उचलून त्यापासून कसदार खत तयार करण्याचा आणि अख्ख्या शहराला लागणारा भाजीपाला त्या खतावरच पिकवण्याचा प्रयोग यशस्वी होतो आहे. शहरातल्या छोटय़ा वसाहतींनी आपापल्या भागात अशी मोहीम राबवावी यासाठी सरकार प्रोत्साहन देते आहे. शहराचा पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी जबाबदार असलेली कंपनी याकरता पुढाकार घेते आहे.
- हे काही कपोलकल्पित नव्हे. चेष्टा करावी असेही नव्हे. नेदरलॅण्ड्स या चिमुकल्या देशातल्या अॅमस्टरडॅम या शहरातले हे वास्तव चित्र आहे.
शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न हलका करणो, पिकांच्या वाढीसाठी भूगर्भातल्या खनिजांचा उपसा थांबवून शाश्वत पर्याय शोधणो आणि अन्नातील रसायनांचा अंश कमी करणो असा तिहेरी फायदा साधणारा हा प्रकल्प सध्या जगभरात चर्चेचा विषय आहे. त्याचे नाव ‘ग्रीन युरिन’ - यातले काहीही आपल्याला नवीन नाही. मानवी मूत्रच्या उपयोगाचे हे ज्ञान भारताकडे प्राचीन काळापासून होते. त्यावर बसलेली धूळ झटका आणि जगभरात चाललेल्या प्रयोगांपासून धडे घ्या, त्या प्रयोगांमध्ये आपल्या पारंपरिक ज्ञानाची भर घाला, एवढेच तर माङो म्हणणो आहे.
जुने सोडून नवे प्रयोग करून पाहण्याला प्रोत्साहन आणि असे प्रयोग करणा:याला उमेद देणारा हा काळ आहे. आपण त्यात मागे असण्याचे काय कारण?
मानवी मूत्रचा वापर शेतीसाठी करण्यामध्ये येऊ शकणारा प्रत्येक अडथळा ओलांडण्याची धडपड जगभरात चालली आहे. विष्ठेपासून मूत्र मुळातच वेगळे करता येईल, अशा स्वच्छतागृहांचे डिझाइन तयार करणो, ती कमी खर्चात बांधता येतील यासाठी हिकमती लढवणो, या विषयाभोवती असलेला ‘नकारात्मकतेचा’ घाण पडदा दूर करणो अशा कितीतरी पातळ्यांवर काम सुरू आहे.  
आपल्या शहरात समजा असतील यातले प्रश्न, खेडय़ात तरी सोपे आहे की नाही शिवारात असे प्रयोग करणो? कोणी अडवले आहे? - अडसर आहे तो आपल्या वृत्तीचा! 
नव्या संशोधनाकडे पाहून नाक मुरडणो आपण आता बंद केले पाहिजे. शेतीचे अर्थकारण हलके करण्याची क्षमता असलेले सोपे व साधे उपाय आपण उपयोगात आणले पाहिजेत हाच माझा विचार आहे. जमिनीत जे पाणी मुरते, त्यावरच तर शेती होते. गटाराचेही असेच पाणी मुरते. मानवी मूत्र हा खताचा उत्तम पर्याय आहे. त्याचा वापर केला तर नक्की उपयोग होतो, असे माङो मत आहे, आणि ते जगभरातील संशोधन व त्याचा प्रत्यक्ष होत असलेला उपयोग बघून तयार झाले आहे. 
- जे जगात होते आहे, ते भारतातही झाले पाहिजे. आपल्या शेतीतज्ज्ञांनी यामध्ये लक्ष घालून शेतक:यांना स्वस्तातील शेतीच्या चार युक्त्या सांगितल्या पाहिजेत. 
प्रथम टीका होते. त्याची खिल्ली उडविली जाते. कारण प्रारंभी विषय समजायला कठीण असतो. पण जेव्हा फायदे दिसून येतात तेव्हा तोच विषय कौतुकास पात्र ठरतो. संगणक आले तेव्हाही टीका झाली. त्याचे सार्वत्रिकरण होत होते तेव्हा टीकेची झोड उठवली गेली. हजारोंचा रोजगार जाईल अशी टूम उठवली गेली. आताचे चित्र काय आहे? संगणकाशिवाय आज कोणाचे पान हलत नाही. रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. सेंद्रीय शेतीचेही तसेच झाले. गांडूळ शेतीचेही असेच होते आहे. हळूहळू लोक प्रयोग स्वीकारतात. मानवी मूत्रमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम मोठय़ा प्रमाणात असते. मूत्र उपयोगात आणले जात नसल्याने ते वाया जाते. भारतातील शेतीची स्थिती व खतांची कमतरता लक्षात घेता स्वस्तातील व हमखास यश देणारा हा उपाय करावा, असे माङो सोपे सांगणो आहे. शेतक:यांनी मानवी मूत्र गोळा करून ते पिकांना द्यावे, त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढेल, असे मी बोललो, ते स्वत: केलेल्या प्रयोगानंतर बोललो. दिल्लीतील सरकारी बंगल्यात याच पध्दतीने मी बाग फुलवली आहे. त्याचे उत्तम परिणाम मिळाले आहेत. अशाच प्रयोगातून शेती स्वस्त झाली तर शेतक:यांच्या हाती पैसा असेल. खतांच्या किमतीत बचत होईल. 
जो आपल्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे, ज्याला आधुनिक काळातही वैज्ञानिक आधार आहे आणि जो जगभरात संशोधनाचा-प्रत्यक्ष वापरातला विषय आहे, तो केवळ ‘मानवी मूत्र’सारख्या गोष्टीशी संबंधित आहे म्हणून त्याला अकारण नाके मुरडणो, ते काहीतरी घाण, नकोसे आहे अशी त्याची संभावना करणो योग्य नव्हे.
(शब्दांकन : रघुनाथ पांडे)
 

Web Title: Green Urine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.