हामिगाकी आणि ओहागुरो.

By admin | Published: January 16, 2016 01:00 PM2016-01-16T13:00:17+5:302016-01-16T13:00:17+5:30

आपण दात कसे, किती वेळा घासतो, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीच! जपानमध्ये तर तो एक संस्कार आहे. जपानी बायका दिवसातून एक-दोनदा नव्हे, तर वेळ मिळेल तेव्हा आणि तितक्या वेळा दात घासतात. मुलांनाही घासायला लावतात. सुंदर दिसण्यासाठी दात काळे करण्याची प्रथाही तिथे प्रचलित होती.

Hamigaki and Oahaguro | हामिगाकी आणि ओहागुरो.

हामिगाकी आणि ओहागुरो.

Next
- सुलक्षणा व-हाडकर
 
जपानमध्ये आजही मुलं आणि पालक एकत्र दात घासतात. मुलं नीट दात घासतात की नाहीयावर काळजीपूर्वक देखरेख ठेवली जाते, तपासणी केली जाते.  मुलं आधी स्वत: दात घासतात, नंतर आईच्या मांडीवर जाऊन बसतात. तिथे आई मुलांचं तोंड उघडून पाहते, की त्यानं दातांची नीट सफाई 
केलेली आहे किंवा नाही. त्यानंतर ती स्वत: त्याचे दात स्वच्छ करून देते. मुलांना दातांच्या स्वच्छतेची सवय लागावी म्हणून तिथले काटरून्सही दातच घासत असतात!
 
हामिगाकी अर्थात जपानी पालकांचा दात घासण्याचा संस्कार.
आजही चुलीतील राख बोटावर घेऊन दात घासणारे भारतात कमी नाहीत. लिंबाच्या काडय़ा, जाडे मीठ घेऊन दात घासणारे भारतीय आणि सर्वांसह दात घासणो म्हणजे रोजच एक साग्रसंगीत कार्यक्रम करणारे जपानी म्हणजे दोन वेगळ्या टोकावरच्या संस्कृती!
माझ्या लेकाच्या वर्गात त्याचा एक मित्र होता. बाबा श्रीलंकन आणि आई जपानी असणारा मुलगा, लेकाचा सहा वर्षापासून मित्र होता. या मुलाचे बाबा खूपदा त्यांच्या बायकोच्या दात घासण्याच्या सवयीवर चर्चा करीत असत. म्हणजे वैताग येण्यापर्यंत ते आम्हाला काही कथा, किस्से सांगत असत.
माङया काही जपानी मैत्रिणी वेळ मिळेल तेव्हा एकदा नाही तर अनेकदा दात घासत असत. कोणत्याही गृहोपयोगी दुकानात दात  घासण्यासाठीची साधने, पेस्ट पाहता मला तर डेण्टल कोपरा म्हणजे डिझायनर झोन वाटत असे. तुम्ही कसे दात घासता किंवा किती वेळा दात घासता हा प्रश्न वाटतो तितका सोप्पा नक्कीच नाही. स्वच्छतेचे भोक्ते असणारे जपानी लोक दात घासण्याकडे कसे पाहतात हे पाहिले तर आपल्याला आपण कित्ती वेगळे आहोत हे समजेल.
दात घासणो अर्थात ‘हमिगाकी’ संस्कृतीबद्दल लिहू तेवढे कमीच आहे. मध्यंतरी तोफुगी या जपानी मासिकात सारा या लेखिकेने लिहिलेला एक लेख वाचला आणि माहितीत भर पडली. मग 8434ुी वर याच विषयावर काही क्लिप्स पाहिल्यात आणि गंमत वाटली. दात घासणो या  4-5 मिनिटांच्या कार्याला जपानी लोकांनी एक संस्कारांचे स्वरूप दिलेय. त्याचबद्दल थोडंसं.
प्राचीन काळी जपानमध्ये गुणौषधी झाडांच्या लहान लहान फांद्यांपासून केलेल्या काडय़ांचा वापर केला जात असे. दात कोरण्याच्या काडय़ासुद्धा वापरल्या जात असत.
नक्की सांगता येणार नाही, जपानी माणसाने टुथ ब्रश वापरायला कधी सुरु वात केली ते. परंतु जपानी बौद्ध स्क्रिप्टमध्ये एके ठिकाणी उल्लेख आहे की बुद्धाने वापरलेला टुथ ब्रश जमिनीवर फेकला आणि तिथे एका फार मोठय़ा वृक्षाची बीजं आपोआप उगवून आली. याचा अर्थ बुद्धाच्या काळापासून तिथे दात घासण्यासाठी ब्रश वापरला जात असावा. साधारण 1223 च्या सुमारास एका ङोन गुरूने टुथ ब्रशचा उल्लेख केला आहे. बैलाच्या हाडाच्या तुकडय़ाला घोडय़ाचे केस लावून बनविलेला ब्रश चिनी लोक वापरत असत असे तो म्हणतो. याचा अर्थ त्याच सुमारास जपानमध्येसुद्धा ब्रश संस्कृती उदयास आली असावी, असा दस्तऐवज लिखित स्वरूपात आहे . 188क् च्या एका वैद्यकीय अहवालात माहितीपत्रकात जपानी टुथ ब्रशचे फोटोसुद्धा पाहावयास मिळतात. 
‘ओहागुरो’.
- अर्थात दात काळे करण्याची एक प्रथासुद्धा जपानमध्ये प्रचलित होती.
जपानी शाळांमध्ये वर्गात सर्व मुले जेवण झाले की दात घासतात. त्यांना तसे धडे दिले जातात. प्रत्येक वेळेस जेवण झाले की त्यांना दात घासावे लागतातच. आठ- दहा वर्षाच्या लहान मुलांना दात घासण्याची सवय लागावी म्हणून अनेक गाणी मुलांना दाखविण्यात येतात.
म्हणजे दात घासण्यासाठी प्रेरणा देणारे संगीत, त्याला अनुसरून शब्दरचना. हे व्हिडीओज ऐकून, पाहून लहान लहान मुले दात घासतात. त्यामुळे ही सवय पक्की होते.
लहान मुलांचे आवडते कार्टूनसुद्धा दात घासण्याच्या रूपात बाहुली बनून येते. अनेक खेळाच्या कंपन्या दात घासणारी सॉफ्ट खेळणी मार्केटमध्ये घेऊन आल्यात. कॅण्डी बनविणा:या  कंपन्यासुद्धा अशा प्रकारे काही खेळणी घेऊन आल्यात.
जपानी भाषेत ब्रशला हाबुराशी म्हणतात. इथे मिळणारी हाबुराशी इतर देशापेक्षा अत्यंत नाजूक, लहान आणि सॉफ्ट असतात. कॉस्मेटिक  बाजारपेठेप्रमाणो ही बाजारपेठसुद्धा विविधतापूर्ण आहे .
विशेष म्हणजे, इथे टूथ पेस्टमध्ये फ्लोराइड नसतेच किंवा नगण्य असते.
हे सर्व पाहिल्यावर वाटतं की सुंदरतेची आत्यंतिक आवड असणारे जपानी लोक दात घासण्यासारख्या एका लहानशा कृतीकडेसुद्धा किती गंभीरतेनं पाहतात.
ब्राझीलमध्येही दात घासणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तिथे प्रत्येक खाण्यानंतर दात घासले जातात. ऑफिसमध्ये सर्वजण आपापले ब्रश घेऊन जातात. 
मॉलमध्येसुद्धा लोक दात घासताना दिसतात. इथे दातांची विशेष काळजी घेतात. डेण्टल विमा काढतात. दात स्वच्छ असावेत, सुंदर असावेत म्हणून नियमित उपचार घेतात. 
व्यवसाय कोणताही असो, स्वत:ची, शरीराची काळजी घेतली जातेच. सौंदर्याचे निकष ठरविणारा व्यवसाय नसला तरी याकडे विशेष लक्ष दिलं जातं. 
रस्तोरस्ती आकंठ बुडून चुंबन घेणारं प्रेमीयुगुल पाहिलं की हे जाणवतंच. 
 
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
 
sulakshana.varhadkar@gmail.com

 

Web Title: Hamigaki and Oahaguro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.