हँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:02 AM2019-06-30T00:02:12+5:302019-06-30T00:06:10+5:30

अमेरिकेत सटरफटर कामे करणाऱ्यांना हँडीमेन म्हणतात. ते गौरवर्णीय अमेरिकन असतात. घरातली दुरुस्ती, सुतार काम, रंगरंगोटी, प्लम्बिंग, बागकाम आदी किरकोळ कामे ते करतात. त्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते; मात्र, ते वेळेत उपलब्ध होतील याची शाश्वती नसते.

 Handime retail work boom --- American trip | हँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर

हँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर

Next
ठळक मुद्देएकजण बंगल्यामागील कट्ट्याचे काम महिन्यापूर्वी करून गेला; पण उर्वरित पैसे घ्यायलाही आला नाही.

- किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सी

अमेरिकेत सटरफटर कामे करणाऱ्यांना हँडीमेन म्हणतात. ते गौरवर्णीय अमेरिकन असतात.
घरातली दुरुस्ती, सुतार काम, रंगरंगोटी, प्लम्बिंग, बागकाम आदी किरकोळ कामे ते करतात. त्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते; मात्र, ते वेळेत उपलब्ध होतील याची शाश्वती नसते.


अमेरिकेत बहुतेक सर्व गोष्टी ताबडतोब आणि चुटकीसरशी किंवा एखादी शीळ घातल्यावर लगेच मिळतील; पण दुर्दैवाने दैनंदिन अत्यावश्यक गोष्टींना हँडीमेन मिळत नाहीत. अनेक वेळा छोट्या-छोट्या कामांसाठी भरपूर पैसे मात्र मोजावे लागतात. इथे कारागीर, फिटर, लोहार, सुतार, इलेक्ट्रेशियन, बागकामवाला, एअरकंडिशनवाला, प्लंबर, स्वयंपाकघरातील किरकोळ काम करणारा हरकाम्या आणि मुख्य म्हणजे घरकाम करणारी मोलकरीण यांच्या सेवा अतिशय महाग असतात.

या अत्यावश्यक कारागिरांना इथे अमेरिकेत हँडीमन वा हँडीवूमन म्हणतात. हँडीमॅन म्हणजे स्वत:मधील कौशल्य दाखवून दैनंदिन काम करणारा पुरुष वा स्त्री कामगार.! थोडक्यात काय... सटरफटर स्वयंरोजगार काम करणारा माणूस.! इथे सटरफटर कामासाठी माणूस मिळणे अत्यंत दुरापास्त, पण अवघड असते. एखाद्याचे नशीब असल्यासच असे अनेक हँडीमेन आॅनलाईन मिळूनही जातात; पण तत्काळ कामावर येतील असे नाही, इतके ते व्यावसायिक असतात. स्वत:बरोबर छोटी-मोठी यंत्रणा, ड्रिलिंग मशिन्स, अत्याधुनिक शस्रे आणि आयुधे घेऊन येतात अन् झटपट काम संपवितात. हँडीमेनना अमेरिकेत भरपूर मागणी असते. त्यांना कोणत्या इंजिनिअरिग्ांच्या पदवीची गरज नसते. अनुभव पुरेसा आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र मात्र हवे.

हे सर्व हँडीमेन सतत कामात असतात. ते सोबत स्वत:ची भली मोठी कार घेऊन येतात. अनेकवेळा मोठे काम असल्यास ते एकापेक्षा अधिक वाहने घेऊन येतात. त्यात अत्याधुनिक व अद्ययावत यंत्रसामग्री असते. थर्माकोलचा मोठा आईसबॉक्सही असतो. यात शीतपेयाच्या बाटल्याही असतात. काम करताना या पेयांचे सेवन तो करीत असतो. गाडीत अद्ययावत यंत्रसामग्री असल्याने मनुष्यबळही जास्त लागत नाही.

दोन किंवा तीन हँडीमेन पुरेसे असतात. सध्या समरमुळे प्रत्येकाच्या बंगल्यासमोरील अंगणात फरशी बसविण्याचे काम जोरात चालू असल्याने इथे आम्ही राहात असलेल्या ‘यारो सर्कल'मध्ये अनेक ठिकाणी हँडीमनच्या गाड्या दिसतात. खरे सांगायचे म्हणजे अमेरिकेत भिकारी सोडल्यास इतर सर्व स्वत:च्या कारनेच प्रवास करतात.

कामाला आलेल्या हँडीमेनने घातलेल्या पँट वा शर्टला अनेक मोठ्या आकाराचे खिसे असतात. खिशाला वा कमरेला बाहेर पक्कड, चिमटे, करवती लटकवलेल्या असतात. पुरुषांपेक्षा महिला हँडीवुमेन तशा अधिक. शारीरिक काम नसल्याने अधिक टापटीप व आकर्षक असतात. हे हँडीमेन वा वुमेन गौरवर्णीय असल्याने आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि पेहरावाबरोबरच गॉगल लावून आल्याने ‘कोणी साहेब आहे की हँडीमेन’ हे कळत नाही.

हँडीमेनच्या स्वभावाबद्दल लिहायचे झाल्यास ते अत्यंत सौम्य स्वभाव, विनयशील व मुख्य म्हणजे कामाला प्रामाणिक असतात. एखाद्याला फसविणे त्यांच्या तत्त्वातच बसत नाही. परवा आमच्याकडे आलेला हँडीमेन साथीदारासह खाली तळघरात गेला. यावेळी तो एकटाच काम करीत होता. आम्ही दोघेच (समीर, अनुजा आॅफिसला आणि केवा शाळेत गेल्याने) घरात होतो. माझे या हँडीमेनकडे बारीक लक्ष होते; पण इतरत्र व आजूबाजूला पसरलेल्या मौल्यवान वस्तूंना त्याने दृष्टीक्षेप राहूदे, हातही लावला नाही. यातील एकजण बंगल्यामागील कट्ट्याचे काम महिन्यापूर्वी करून गेला; पण उर्वरित पैसे घ्यायलाही आला नाही.

अनेक हँडीमेननी एकत्र येऊन स्वत:ची कंपनीही काढली आहे. सध्या त्यांचा कामाचा तासाचा दर कमीत कमी साठ ते पासष्ट डॉलर्स इतका आहे. दोन ते तीन घरांमध्ये काम केल्याने त्याला भारतीय चलनात सरासरी केवळ दिवसाकाठी १३ ते १४ हजार रुपये मिळतात.

Web Title:  Handime retail work boom --- American trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.