हि:याची अंगठी!
By admin | Published: March 26, 2016 08:32 PM2016-03-26T20:32:35+5:302016-03-26T20:32:35+5:30
अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पण नशीब आज जोरावर असावं. ढग हळूहळू निघून गेले. सूर्याच्या आड येणा:या चंद्राने सूर्यकोर एकादशीच्या चंद्रासारखी दिसू लागली. काही वेळाने अर्धे सूर्यबिंब चंद्राने ग्रासले. ..शेवटी तो क्षण आलाच. त्या अनुभवासाठी तर आम्ही भारतातून इंडोनेशियाच्या या बेटावर पोचलो होतो.
Next
आम्ही याला वेडेपणा म्हणा किंवा उधळपट्टी म्हणा, पण केवळ खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी आम्ही इंडोनेशियातील बेलिटंग बेटावर जाण्याचा बेत आखला होता. वेडेपणा अशासाठी की साधारणत: कुठल्याही बेटावर विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी समुद्रसान्निध्यामुळे ढगांची दाटी असते. शिवाय मार्च महिन्यात इंडोनेशियामध्ये पावसाळ्याचा शेवट असतो. ग्रहणाचा काळ सकाळी 6.21 ते 8.35 असा होता आणि त्यात खग्रास ग्रहण फक्त 7.22 पासून अवघे दोन मिनिटे 1क् सेकंद दिसण्याची शक्यता होती! परंतु ही संधी चुकवू नये असं तीव्रतेने वाटत होते आणि त्याला कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी भूज (ऑगस्ट 1999) आणि नंदुरबार (जुलै 2009) इथे ढगांची दाटी झाल्यामुळेच सूर्यग्रहण दिसू शकले नव्हते. त्यानंतर भारतातून अशी संधी 2034 साली म्हणजे तब्बल 18 वर्षानंतर येणार आहे. शेवटी भवती ना भवती करत जायचं निश्चित झालं.
इंडोनेशियाच्या जकार्ता या राजधानीपासून सुमारे एक तासाचा विमानप्रवास करून बेलिटंगला पोचलो. ‘बीडब्ल्यू सूट’ या हॉटेलच्या आवारातूनच ग्रहण दिसू शकेल अशी माहिती मिळाल्यामुळे त्याच हॉटेलमध्ये मुक्काम करायचे ठरवले. आदल्या दिवशी, सकाळी 7 वाजेर्पयत सूर्य क्षितिजाच्या वर कितपत येतो त्याचा अंदाज घेतला, तेव्हा असं खात्रीपूर्वक वाटलं की त्याच सुमारास दुस:या दिवशी ग्रहण हॉटेलच्या आवारातूनच दिसू शकेल. हॉटेलमध्ये तिस:या मजल्यावर गच्चीही होती. म्हटलं हॉटेल व्यवस्थापनाला विचारून पाहावं की गच्ची उघडून देतील का? विचारल्यावर ते टंगळमंगळ करायला लागले. संध्याकाळपर्यंत ग्रहण दर्शनासाठी आलेल्या जगभरच्या हौशी खगोलप्रेमींनी हॉटेलच्या 22क् खोल्या भरून गेल्या. एकदाचा 9 मार्च दिवस उजाडला. 6 वाजायच्या आधीच हॉटेलच्या आवारात पोचलो. उत्कृष्ट कॅमेरे असलेले इतर सगळे खगोलप्रेमी मात्र पूर्वेच्या 27 कि. मी. दूरवरच्या समुद्रकिना:यावर जाऊन ग्रहण पाहणार होते. आम्ही थोडेच आणि एक जर्मन प्रवासी हॉटेलच्या आवारात उरलो. त्याने त्याचा कॅमेरा उभारून सज्ज केला होता. काही वेळाने कसं कोण जाणो पण हॉटेलच्या कर्मचा:यांपैकी एकजण आमच्या जवळ आला आणि त्याने आम्हाला गच्चीवर नेले.
लगबगीने गच्चीवर गेलो. आता नजर सतत पूर्वाकाशावर लागलेली होती. येताना सूर्य पाहता येईल असे चष्मे घेऊन आलो होतो. हळूहळू सहस्ररश्मी उगवला! आशा बळावत होती. आकाशात म्हणावे तसे ढग नव्हते. परंतु सव्वासहाच्या सुमारास सूर्याच्या चकतीवर उजव्या बाजूला वर कपाळावर काळ्या केसांच्या बटा याव्यात तसे ढग दिसू लागले.
ग्रहणकाळ सुरू झाला तरी नेमकं कुठल्या बाजूने चंद्र सूर्याच्या आड येतो आहे ते समजेना. परंतु नशीब बलवत्तर असावं. ढग हळूहळू निघून गेले. सूर्याचा गोल म्हणजे एक घडय़ाळ आहे अशी कल्पना केली तर त्या घडय़ाळात 1 वाजण्याच्या दिशेने चंद्र हळूहळू पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये सरकू लागला. चष्मे लावून आता चंद्राची प्रगती एकटक पाहू लागलो. हळूहळू सूर्याच्या आड येणा:या चंद्राने सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्याची कोर एकादशीच्या चंद्रासारखी दिसू लागली.
चंद्र पुढे सरकतच होता. काहीवेळाने अर्धे सूर्यबिंब चंद्राने ग्रासले. नंतर जेव्हा 8क्-85 टक्के सूर्य ग्रासला गेला तेव्हा सूर्य चतुर्थीच्या चंद्रासारखा दिसायला लागला. आता उत्सुकता शिगेला पोचली. सूर्याची कोर लहान लहान होत गेली तरीही पूर्ण सूर्यबिंब चंद्राने झाकले जायला बराच वेळ लागला. अखेर ती वेळ आली. परंतु त्याआधी काहीच क्षण सूर्यबिंब जवळजवळ संपूर्ण झाकले जायच्या किंचित आधी सूर्याच्या भोवती प्रकाशाचे कडे आणि सूर्य घडय़ाळाच्या 7 वाजण्याच्या दिशेला त्या कडय़ावर एखादा लखलखता हिरा दिसावा तसे अनुपम, अद्भुत दृश्य दिसायला लागले! (यावेळी मात्र डोळ्याला लावलेला चष्मा दूर करावा लागतो नाहीतर डोळ्यापुढे केवळ अंधार दाटल्यामुळे ही हि:याची अंगठी पाहण्याचे भाग्य लाभणार नाही!)
आता सूर्यबिंब चंद्राने पूर्ण झाकले गेले. हाच तो खग्रास सूर्यग्रहणाचा क्षण! ही अवस्था जेमतेम दोन मिनिटे आणि 10 सेकंद टिकणार होती.
यावेळी सूर्यबिंब चंद्राने पूर्ण झाकलेले असताना सुंदर सूर्यप्रभा दिसली. त्याचबरोबर अंधार झाल्यामुळे बुध आणि शुक्र ाचे पूर्वाकाशात दर्शन झाले. त्यानंतर चंद्र पुन: सूर्यबिंबावरून पुढे सरकायला लागला आणि पुन: तीच हि:याची अंगठी स्वयंप्रकाशाने उजळली. फरक एवढाच की यावेळी अंगठीचा हिरा एक वाजण्याच्या दिशेला होता आणि आधीच्या पेक्षा जास्त तेजस्वी, आकाराने मोठा आणि दिमाखदार भासला. हे दृश्य शब्दांपलीकडचे होते आणि याचि देही याचि डोळा पाहिल्याशिवाय त्याची प्रचिती येणं शक्य नाही!
यथावकाश चंद्र जसजसा पुढे सरकला तसतसा सूर्य पुन: प्रगट व्हायला लागला
आणि सुरु वात झाल्यापासून जवळजवळ सव्वादोन तास चाललेल्या या अवकाशातील नाटय़ाची सांगता झाली !
(लेखक हौशी खगोल अभ्यासक आहेत.)
ramuly48@gmail.com