अंतराळातलं घर!
By admin | Published: March 12, 2016 03:23 PM2016-03-12T15:23:25+5:302016-03-12T15:23:25+5:30
अंतराळात जवळपास वर्षभर वास्तव्य करून स्कॉट केली नुकतेच पृथ्वीवर परत आले. खरं तर पृथ्वीपासून ते फक्त काही मिनिटे दूर; 400 किलोमीटर अंतरावर होते! या काळात त्यांनी पृथ्वीला 500 प्रदक्षिणा मारल्या, 10,000 वेळा सूर्योदय पाहिला! अंतराळात पाणी नसल्यानं मूत्र आणि घामच रिसायकल करून 200 गॅलन पाणी तयार केलं आणि पृथ्वीचे शेकडो फोटो काढले! कशासाठी चाललंय हे सगळं?
Next
आपली नातवंडं, पतवंडं ‘बेघर’ राहू नयेत यासाठी शास्त्रज्ञांचा अनोखा प्रयोग!
शैलेश माळोदे
अंतराळवीराचं स्वागत अगदी साध्या पण त्याला आवडणा:या पद्धतीनं होणं म्हणजे ‘सोने पे सुहागा’! तेही देशाच्या द्वितीय महिला नागरिकाद्वारे थेट! मग तर ‘क्या बात है’! होय बिअर आणि अॅपल पाय या एखाद्या टिपिकल अमेरिकन व्यक्तीस आवडणा:या साध्या पण अत्यंत प्रेमानं ‘ऑफर’ केलेल्या गोष्टींद्वारे गेल्या आठवडय़ात 1 मार्चला परतलेल्या स्कॉट केली या अमेरिकेच्या नासा अंतराळवीराचं स्वागत उपराष्ट्राध्यक्ष जो बिडन यांच्या पत्नी जिल बिडन यांनी केलं. अंतराळात जाणं, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आय.एस.एस.) मुक्काम करणं आणि परतणं हे काही तसं नावीन्याचं काम राहिलेलं नाही. अनेक भारतीयांचा आदर्श असलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा अशा अनेक अवकाशवीरांनी ही मदरुमकी दाखवलेली आहे. काहींनी तर अनेक वेळा. युरी गागारीन या अंतराळवीरापासून 1961 मध्ये सुरू झालेली ही ‘परंपरा’ अव्याहत सुरूआहे. अगदी ‘मंगळ’ मोहिमेद्वारे त्यामध्ये आणखी भर घालण्याची भारताच्या इस्रो संस्थेसह अनेक राष्ट्रांची (नासाचीही) इच्छा आहे. आणि त्याकरिताच स्कॉट केली यांच्या यशस्वी परतीचं विशेष कौतुक आहे. यंदा याला वेगळीच झालर आहे. कारण ते केली यांचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व आणि त्यांना असलेला कम्युनिकेशनचा म्हणजे संवाद साधण्याचा ‘सेन्स’!
52 वर्षाचे स्कॉट केली यांच्याकरिता 2क्15 च्या मार्चमध्ये सुरू झालेली ही 342 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातल्या वास्तव्याची मोहीम ही फक्त पूर्वीसारखी ‘एकाकी’ तुरुंगवासाप्रमाणो नव्हती. संचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील क्रांतीचा त्यांनी पुरेपूर वापर केला आणि टि¦टरद्वारे लोकांशी संपर्क ठेवत फोटोज् आणि टि¦ट्सच्या माध्यमातून आपल्या भावना वारंवार शेअर केल्या. यापूर्वीदेखील रशियाच्या मिर अवकाश स्थानकात दीर्घकाळ मुक्काम करण्यात आला होता. पण या मोहिमेद्वारे ‘मायक्रो ग्रॅव्हिटी (सूक्ष्म गुरुत्व) आणि वजनविरहित (!) अवस्थेचा मानवी शरीरावरील परिणामदेखील विशेषत्वानं अभ्यासण्याचं उद्दिष्ट नासानं ठेवलं होतं. मंगळावर माणूस पाठविण्यापूर्वीच्या तयारीच्या दृष्टीनं हे फार आवश्यक आहे.
पृथ्वीपासून तसे फार लांब नव्हते स्कॉट केली. अवघ्या 4क्क् कि.मी. अंतरावर हे आंतरराष्ट्रीय अवकाश यान असून, वेलींच्या वास्तव्यात त्याने पृथ्वीभोवती 5क्क्क् प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यामुळे त्यांना सूर्य पृथ्वीच्या दोन्ही बाजूंनी ‘उगवताना’ बघता आला एकूण दहा हजार वेळा. अर्थात कमी अंतर असलं म्हणून काय झालं अंतराळातील वास्तव्य म्हणजे सोपी गोष्ट नाही. हा एक आगळा वेगळा अनुभव आहे. तिथे पिण्यासाठी पाणी नाही, मग काय घाम आणि मूत्र रिसायकल (पुनर्चक्रीकरण) करून वापरायचं. त्यामुळे या वास्तव्यात केली आणि त्यांचे रशियन सहकारी अंतराळवीर मिखाईल कोर्नियेन्को यांनी 2क्क् गॅलन पाणी याप्रकारे पुनर्चक्रीकरणाद्वारे वापरलं. परंतु हे सर्वच अंतराळवीरांसाठी आवश्यक बाब आहे. हे मिशन प्रामुख्यानं लक्षात राहणार आहे ते केलींच्या वैशिष्टय़पूर्ण फोटोग्राफीसाठी. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांकरिता अवकाश अन्वेषण म्हणजे स्पेस एक्सलोरेशन अधिक ‘रिलेटेड’ अधिक ‘अॅक्सेसिबल’ ठरलंय. केलींनी पृथ्वीच्या भूरूपांची (लॅण्डफॉर्म्स) आणि जलरूपांची आणि प्रवाहांची शेकडो छायाचित्रे/प्रकाशचित्रे टिपली. त्यांनी सफायर निळ्याशार रंगाच्या महासागरांवर घोंगावणारी वादळं (हरिकेन्स) टिपली. ‘ऑरोरा’ या नैसर्गिक दृश्याचा ध्रुव प्रदेशानजीकचा अनुभव चमकत्या धूसर धुक्याच्या रंगातून बाहेर पडताना टिपला. विशेष म्हणजे, त्यांनी सागरकिनारे, वाळवंटं, जंगलं आणि इतर बरंच काही टिपताना पृथ्वीच्या भूभाग आणि जलक्षेत्रला अॅब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट (अमूर्त कलाकार) च्या स्वप्नात परिवर्तीत केलं, तेही पृथ्वीवर वास्तव्य करणा:या साध्या माणसाला उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे म्हणजे निकॉन डी-4 डिजिटल कॅमेरा आणि फुटबॉल गेम्सच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणा:या लेन्सेसद्वारे. या चित्रंमुळे केलींना लोकांचा भरपूर पाठिंबा लाभला. टि¦टर ते टम्ब्लर अनेक
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटरेटी (उपयोगकर्ते) यांनी या फोटोज्वर खुलेपणाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर केलींनी हे फोटो कोठून ‘क्लिक’ केले असतील ती ‘ठिकाणं’ही टॅग केली. या जिओ टॅगिंगचा खरोखर एक वेगळा आनंद मिळाला. इतर अनेक अंतराळवीर शहरं वा प्रादेशिक दृष्टीनं फोटो घेताना दिसतात. पण केलींचा भर अमूर्ततेकडे दिसतो. त्यामुळे त्याला एक कलात्मकता लाभली आहे एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरसारखी. कदाचित पृथ्वीवरील एखाद्या फोटोग्राफरला त्यांनी निवडलेल्या अँगल्सविषयी असूया वाटली असती.
अंतराळातील वास्तव्यात एक लेटय़ूस खातानाचा स्कॉट केलींचा फोटो आणि त्यावरील डल्ली 2ें’’ ्रु3ी ा1 ेंल्ल, ल्ली ॅ्रंल्ल3 ’ींस्र ा1 ठअरअश्ए¬¬कए हे टि¦ट मंगळ मोहिमेसाठी खूपच अर्थपूर्ण आहे. शून्य गुरुत्वात सनफ्लॉवरसारखे ङिानिया उगविण्यासाठीचा त्यांचा प्रय} हे खूपच कठीण असल्याची जाणीव करून देणारा ठरला. कक्षीय शेती (ऑर्बिटल फार्मिग) खूपच कठीण असल्याचं जाणवतं म्हणून त्यांनी ‘द मार्शियन’ या चित्रपटातील मॅट डॅमन या अभिनेत्यानं साकारलेल्या अंतराळवीर- वनस्पती शास्त्रज्ञाच्या भूमिकेचा संदर्भ देऊन टि¦ट केलं होतं, ‘‘आपल्या वनस्पती इथे फारशा चांगल्या वाढताना दिसत नाहीत. मंगळावर समस्या उद्भवतील. त्यासाठी मी स्वत:च्या आतील मार्क वॉटनी (मॅट डॅमनची भूमिका) बाहेर काढणार आहे.’’
संपूर्ण वर्षभरात केलींनी आपल्या रक्ताचे नमुने शास्त्रज्ञांच्या अभ्यासासाठी घेतले आणि त्यावेळी मार्क केलींनी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले. त्यावेळी स्वत:च्या अवकाशातील भाराप्रमाणोच सर्व मानसिक आणि बौद्धिक चाचण्या पार पाडल्या. या आकडेवारीचा शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. यासाठी एकूण दहा अधिकृत प्रयोग करण्यात येणार असून, त्यात अमेरिकेतल्या विविध संस्थांच्या प्रस्तावांची नीट छाननी करण्यात आली होती. कमी गुरुत्वात पेशींवर होणारा परिणाम, प्रारणांचा मोठा संपर्क आणि इतर अनेक अवकाशके पर्यावरणीय घटकांचा समावेश असणार आहे. त्याचवेळी एजिंग (वार्धक्य), जीन एक्स्प्रेशन आणि प्रतिबंधक प्रणालींवरील परिणामही अभ्यासला जाणार आहे. दोन अभ्यास शारीरिक प्रक्रियांबाबत असणार आहेत. एकामध्ये धमन्यांमधील प्लाकची निर्मिती अवकाश प्रवासात वेगाने होते का हे तपासलं जाणार आहे, तर दुस:याद्वारे शरीरातील स्त्रवांचा दृष्टीवरील परिणाम तपासला जाणार आहे. अंतराळवीरांत दृष्टिदोष निर्माण होणं नेहमीचं आहे. स्कॉट केलीदेखील त्याला अपवाद नाही.
मानसिक चाचण्यांपैकी महत्त्वाचं अध्ययन स्कॉट केलींच्या एकूण धारणोबाबत (परसेप्शन), रिझनिंग, निर्णय क्षमता आणि अलर्टनेस (टवटवीतपणा) जागरूकता याविषयी काही बदल झाला का? ते तपासून पाहण्याबाबत आहे. शेवटचा अभ्यास दोहोंच्या पोटातील जीवाणू वर्षभर कशा प्रकारे कार्यरत होते याबाबत आहे. आहार आणि पर्यावरण यांचा परिणाम शरीराच्या आतील आणि आजूबाजूच्या जीवाणूंवर मोठय़ा प्रमाणात होतो आणि मग त्याचा परिणाम अर्थातच आपल्या आरोग्यावर आणि फिटनेसवर होतो. अवकाशात जीवाणूंमध्ये होणारे बदल जाणणं मंगळ मोहिमेतील अंतराळवीर चमूला आनंदी आणि आरोग्यानं परिपूर्ण ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरेल.
पुढच्या शंभर वर्षात मानव मंगळावर राहू लागेलही (कदाचित!). पण हा बहुपिढीय प्रयत्न म्हणजे मल्टीजनरेशनल प्रयत्न आहे. त्याकरिताच नवीन पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम स्कॉट केली आणि त्यांच्या पिक्चर्स, टि¦ट्स आणि मोहिमेनं केलंय. अवकाश अन्वेषणातील आव्हान या नवीन पिढीला निश्चितच प्रोत्साहित करेल. त्यातून नवे अंतराळवीर घडतील. स्कॉट केली आणि त्यांच्या आधीच्या अंतराळवीरांचे प्रयत्न सध्याच्या पिढीला, त्यांच्या नंतरच्या पिढीला आणि त्यांच्या नातवंडे आणि पतवंडांना प्रोत्साहित करत राहतील. मंगळाचा आणि एकूण अथांग अवकाशाचा वेध घेण्यासाठी! हे नक्की.
वजन ‘शून्य’, पण
उंची वाढली दोन इंचानं!
स्कॉट आणि मार्क केली या दोन्ही जुळ्यांमधील शारीरिक आणि मानसिक वैशिष्टय़ांचा अभ्यास केला जात आहे. स्कॉट यांची उंची पाच सेंटीमीटरनं वाढल्याचं अवकाशवास्तव्याअंती दिसून आलं. मार्क यांचा वापर एकप्रकारे कक्षेतील त्यांच्या भावासाठी ‘कंट्रोल’ म्हणून करण्यात आला. अर्थात ही उंचीवाढ लघुकालिक असणार आहे. अवकाश भ्रमणाचा हा एक विचित्र, पण तात्पुरता साइड इफेक्ट आहे. कारण गुरुत्वाच्या पूर्ण प्रभावात आल्यावर दोन मणक्यांमधील जेल भरलेल्या डिस्कस खाली सरकतात परिणामी मेरु रज्जू (स्पायनल कॉर्ड) प्रसरण पावतो. या दोहोंच्या संदर्भातील प्रयोग नीट सुरू आहे.
जुळ्या भावांवर प्रयोग!
कमांडर स्कॉट केली यांनी अमेरिकन नेव्हीतल्या कारकिर्दीत नासाच्या विविध अंतराळ मोहिमांमध्ये सक्रिय भाग घेतला. हजारो तासांचा अंतराळ अनुभव त्यांच्याकडे जमा आहे. त्यांचे जुळे बंधू कॅप्टन मार्क केली हेदेखील अंतराळवीर म्हणून निवृत्त झाले असून, त्यांच्यापेक्षा केली यांचा अनुभवअवधी जास्त आहे. त्यामुळे मायक्रो ग्रॅव्हिटीचा मनुष्य शरीरावरील परिणाम तपासून पाहण्यासाठी मार्क केली यांच्या शारीरिक स्थितीचा स्कॉट केलींच्या अवकाशवास्तव्याअंती स्थितीशी तुलनेसाठी ‘बेंचमार्क’ म्हणून उपयोग होईल.
वजनरहित अवस्थेत वर्षभर!
नासानं अधिकृतरीत्या ‘वन इअर मिशन’ म्हणून नामनिर्देशित केलेल्या स्कॉट यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेचं खास उद्दिष्ट होतं. ते म्हणजे मंगळावर मानव पाठविण्यासाठीची मोहीम सुखरूपपणो पार पाडण्यासाठी नेमकी तयारी कशी करायची!
‘रॉकेट सायन्स’ ही वेगळी बाब आहे. परंतु वजनविरहित अवस्थेत माणसांना फिट ठेवणं त्याचवेळी अनेकानेक महिने विविध प्रारणांचा (रेडिएशन्सचा) संपर्क सहन करावा हे तर आहेच, पण त्याचवेळी एकटेपणा म्हणून स्कॉट केली कझाकस्तानातील बैकानूर अंतराळ केंद्रामध्ये परतल्यापासून त्यांच्या विविध शारीरिक चाचण्या सुरू आहेत. अमेरिकन अंतराळवीराद्वारे दीर्घ वास्तव्याचं हे रेकॉर्ड आहे. 1995 साली व्ॉलरी पॉल्याकोव्ह यानं 437 दिवसांच्या वास्तव्याचं केलेलं रशियाचं रेकॉर्ड अबाधीत आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासातील
सर्वात मोठा विज्ञान प्रकल्प
मानवाला अंतराळात वर्ष-वर्ष ठेवण्याचे हे प्रयोग का केले जाताहेत?
- वाढत्या लोकसंख्येमुळे काही वर्षानंतर मानवाला राहण्यासाठी पृथ्वीवरची जागा संपेल हे तर खरंच, त्यामुळे मानवी वस्तीसाठी नवी जागा शोधण्यासाठी तसेच इतरही काही वैज्ञानिक कारणांसाठी हे प्रयोग सुरू आहेत. या सर्व अभ्यासातून मंगळावर पोहचणं अभिप्रेत असलेल्या स्त्री-पुरुषांच्या सुरक्षिततेसाठीची योजना तयार होईल. कारण मंगळावर पोहचणं आणि परतणं यासाठीच प्रत्येकी नऊ महिन्यांचा सलग अंतराळ प्रवास असेल. तिथे पोहोचल्यावर नासाद्वारे काही महिने वा दिवस त्यांचा तिथल्या खडकाळ प्रदेशात मुक्काम असेल.
कारण अठरा महिने एखाद्या ‘टिन कॅन’मधून प्रवास करून नव्या ग्रहावर पोहोचणं ही साधी बाब नाही. म्हणजे मंगळ मोहीम काही वर्षाची कमिटमेंट असेल. मानवी संस्कृतीच्या इतिहासातील हा एक सर्वात मोठा विज्ञान प्रकल्प असेल. पृथ्वीवर वास्तव्यास असलेल्या मानवजातीचं अवकाश संशोधन करणा:या प्रजातीतलं ते रूपांतर असेल. हे नवीन प्रकारचं विज्ञान असेल कदाचित.
(लेखक विज्ञान पत्रकार आणि लेखक आहेत.)
shailesh.malode@gmail.com