घरपोच चंगळ

By admin | Published: January 31, 2016 12:02 PM2016-01-31T12:02:00+5:302016-01-31T12:03:12+5:30

रोज संध्याकाळी तुम्ही घरी येता. दिवसभराची कटकट विसरून जरा निवांत पाय पसरून आराम करावा आणि संगतीला घटकाभराची मौज असावी म्हणजे टीव्ही आलाच. टीव्ही म्हणजे सिरियल्स आल्याच.

Homeopathic | घरपोच चंगळ

घरपोच चंगळ

Next
>ऑनलाइन स्ट्रिमिंग सर्व्हिसेस :  मनोरंजनाच्या दुनियेचे फासे पलटवणा:या नव्या खिडक्या
 
रोज संध्याकाळी तुम्ही घरी येता. दिवसभराची कटकट विसरून जरा निवांत पाय पसरून आराम करावा आणि संगतीला घटकाभराची मौज असावी म्हणजे टीव्ही आलाच. टीव्ही म्हणजे सिरियल्स आल्याच.
रविवार वगळता रोज एक एपिसोड, रोज नवा वैताग. तरी आज काहीतरी घडेल अशी आशा लावतातच त्यातली माणसं. मग ती घरचीच होतात. रोज भेटाविशी वाटतात. त्यांनी डोकं उठवलं तरी. शिवाय एखाद-दोन संवाद होतात न होतात तोच जाहिरातींचा ब्रेक! अपवाद वगळता, सरसकट डोकेदुखीच वाटय़ाला. तरी व्यसनी माणसासारखी गत होते. अमुक वाजले की तमुक चॅनेल लागतंच डोळ्यासमोर.
..आता समजा, ही रोजरोजची ब्रेकवाली कटकट गेली आणि तुमची आवडती एक अख्खी सिरियल तुम्हाला एकदम - आणि तीही जाहिरातींशिवाय - बघायला मिळाली तर?
तुम्हाला एखादा जुना फ्रेंच सिनेमा बघायचा आहे
किंवा हॉलिवूडची एक ‘मस्ट वॉच’ लिस्टच आहे तुमच्याकडे. एखाद्या लघुपटासाठी तुम्ही जीव पाखडला, तरी त्याची डीव्हीडी तुम्हाला मिळालेली नाही. किंवा आहे ती इतकी महाग आणि दुर्मीळ, की परवडणं अशक्यच! - आधी व्हिडीओ कॅसेट्स आणि मग काही वर्षापूर्वी केबलवाला आला, मग त्याला लोणी लावणं आलं. इंटरनेट अवतरलं आणि मग तर सिनेमावेडय़ांना चटकच लागली, डाउनलोडिंगची! टोरण्टवरून सिनेमे रात्ररात्र डाउनलोडला लावायचे. मग ते हार्डडिस्क नाहीतर पेन ड्राइव्हवरून द्याय-घ्यायचे. हे सगळं गुपचूप आणि मुख्य म्हणजे चकटफू! आज रिलीज झालेल्या बॉलिवूडपटांच्या सस्त्यातल्या सीडी-डीव्हीडीज उद्या रस्त्यावर आल्या तरी उचलल्या जाऊ लागल्या. त्यालाच पायरसी म्हणतात, हे पुढे कळलं; तरी कायद्याचा धाक ज्ञान आणि मनोरंजनाच्या (फुकट) लालसेला लगाम घालू शकला नाही. भारतात जुगाड करण्याचं डोकं भारी. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळांवरची कडेकोट कुलपं हिकमतीने उघडून सिनेमे आणि लघुपट चोरून आणण्याला सगळे सरावले.
..आता समजा, तुम्हाला हवा असलेला एखादा दुर्मीळ सिनेमा थोडेसे पैसे भरून तुलनेने स्वस्तात अधिकृतरीत्याच डाउनलोड करता आला तर?
- आणि तोही मुंग्यामुंग्यांचा चोरीचा माल नव्हे, तर उत्तम दर्जाचा कण्टेण्ट!
आणि तोही थेट तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा अगदी प्रवासात असताना हातातल्या मोबाइलवरदेखील!
अमेरिकेला वेड लावलेल्या नेटफ्लिक्सचं भारतात आगमन होणं ही या मोठय़ा बदलाची पहिली चव आहे. त्याने आपल्या मनोरंजनाच्या सवयी बदलतील आणि पर्यायही! या नव्या प्रवाहाचं नाव आहे ऑनलाइन स्ट्रिमिंग सव्र्हिसेस! म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर जगभरातले सिनेमे, गाजलेल्या टीव्ही मालिका आणि लघुपटांची ऑनलाइन लायब्ररीच! या आधीही बिग प्लिक्स, स्पूल, मुव्हीज, हूक, हॉटस्टार यांसारख्या ऑनलाइन स्ट्रिमिंग सव्र्हिसेस उपलब्ध होत्याच. शिवाय ओळखीची, वापरातली यू टय़ूब. आणि इरॉस नाऊ, सोनीसारख्या बडय़ा निर्मात्या कंपन्यांचीही संकेतस्थळं! पण हे सारं अजूनही गिन्याचुन्यांच्याच वापरात होतं. ..आता नेटफ्लिक्सच्या निमित्ताने या खजिन्याचा शोध भारतीयांर्पयत व्यापक अर्थाने पोचेल.
आणि मग पुढे काय होईल?
त्यामुळे आपला सिनेमा आणि मुख्य म्हणजे टीव्ही बदलेल का?
अगदीच इंग्रजाळलेल्या भाषेत बोलायचं तर एण्टरटेन्मेण्ट कन्ङयूम करण्याच्या आपल्या सवयी या नव्या पर्यायांमुळे बदलतील का?
- याची चर्चा या अंकात.

Web Title: Homeopathic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.