मानाचि

By admin | Published: June 13, 2015 02:14 PM2015-06-13T14:14:06+5:302015-06-13T14:17:18+5:30

कुठल्याही दृष्य कलाकृतीचा निर्मितीबिंदू असतो लेखक. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करतात ते लेखकाचे शब्द. पण त्याचं योग्य श्रेय त्याला कुठे मिळतं? लेखकाला किती आणि कधी मेहनताना दिला जातो?. श्रेयनामावलीत लेखकाचं स्थान कुठे असतं?. आत्मसन्मानासाठी म्हणूनच मराठी लेखकमंडळी एकत्र आली आहेत आणि जन्माला आला आहे, एक नवा फोरम.

Honesty | मानाचि

मानाचि

Next
मालिका. नाटक. चित्रपट.तिन्ही क्षेत्रतल्या लेखकांची स्वसन्मानाची धडपड
 
 
पराग पोतदार
 
मराठी वा हिंदी कुठलंही चॅनल लावा.. 
मालिका सुरू नाही असं नाहीच! ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘जय मल्हार’पासून ते ‘सम्राट अशोका’ आणि अगदी ‘थपकी’र्पयत.. 
हा सारा  दृकश्रव्य व्यवहार हिंदी मराठी वाहिन्यांवर अहोरात्र सुरू असताना तो सारा भव्य डोलारा सांभाळणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोण असतो? - अर्थात लेखक !.. 
या निर्मिती व्यवहारातला सर्वात महत्त्वाचा परंतु तितकाच दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक! 
समजा, सगळ्याच लेखकांनी एक दिवस ठरवलं की टीव्हीवर सुरू असलेल्या मालिकेचा पुढचा भाग लिहूनच द्यायचा नाही.. तर? 
- अर्थात असं कुणी करणार नाही; परंतु या सजर्नशील घटकाकडे कुणाचंच म्हणावं तितकं लक्ष नाही.  हिंदी-गुजराती निर्माते असतील तर लेखक त्यांच्या लेखी खिसगणतीतही नसतो. 
मराठीत परिस्थिती बरी म्हणावी, तर तिथे एकवेळ फक्त मान मिळेल परंतु धन मिळेलच याची शाश्वती नाही. मराठीत वर्षाला तब्बल 25क् चित्रपट बनतात. मालिका वेगळ्याच. पण ब:याचदा चित्रपटांचे निर्माते हे आरंभशूर निघतात. लेखक बिचारा सुरुवातीला मूळ कथाकल्पना सुचवण्यापासून इतरांच्या सूचना, तांत्रिक शक्यता लक्षात घेऊन कथाविस्तार आणि पटकथा-संवादांर्पयत सारं तयार करण्यासाठी वेळ, बुद्धी, कौशल्य खर्ची घालतो आणि अन्य कुठल्याही कारणाने ( बजेटची जुळवाजुळव न होणो, निर्माता-दिग्दर्शकातले वाद इ.) अख्खा प्रोजेक्टच रद्द झाला, तर मग एक पै चा मोबदला न मिळता निव्वळ तरफडत बसण्याची वेळ त्याच्यावर येते. साधं उदाहरण सांगायचं, तर प्रत्येक मालिकेसाठी एक क्रेडिट पिरियड असतो. कलाकारांसह सर्वाना तो तीन महिन्यांचा असतो. याचा अर्थ पहिला चेक मिळणार तो एपिसोड एअरवर गेल्यानंतर तीन महिन्यांनी. पण मालिकेसाठी लेखन करण्याचं लेखकाचं काम मात्र त्यापूर्वी तीन महिने सुरू झालेलं असतं, मग त्याला एकटय़ाला 6 महिन्यांचा क्रेडिट पिरियड. म्हणजे, त्याला एकटय़ाला पहिला चेक 6 महिन्यांनी! 
बरं मानधन किती मिळेल, याचीही शाश्वती नाही. इंडस्ट्रीमध्ये मालिकेच्या प्रत्येक भागासाठी अवघ्या दीड-दोन हजारांवर काम करणारे लेखक आजही आहेत. या सगळ्यामध्ये समजा त्या लेखकाची मूळ कथा-कल्पना म्हणजे नव्या भाषेत कन्सेप्टच चोरीला गेली तर आवाज कुणी उठवायचा? 
अशी तर असंख्य उदाहरणं..
निर्मात्याने हो. हो. करत टोलवलेले आणि नंतर संपूर्ण पैसे बुडवलेले अनेक अनुभवी लेखक आहेत. 
चित्रपट असो, मालिका असो वा नाटक, तिथल्या व्यवहारात महत्त्व असतं दिग्दर्शकाला आणि ती मालिका प्रभावीपणो सादर करणा:या कलाकारांना. परंतु, मालिकेचा सूर पकडून ठेवत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करतात ते लेखकाचे शब्द. त्याला त्याचं श्रेय मिळायला नको? श्रेयनामावलीत त्याला मानाचं स्थान नको? त्याने एकटय़ानेच त्याच्या क्षमतेनुसार लढायचं नाहीतर मुग गिळून गप्प बसायचं! 
असे कितीतरी प्रश्न  घेऊन लेखक मंडळी एकत्र आली. धडपड होती ती मनोरंजनाच्या या व्यवसायातल्या लेखकाला त्याचं अस्तित्व मिळवून देण्याची. आपल्याच भोवतालचं गुंतागुंतीचं, गोंधळाचं अवकाश जरा नीट करण्याची. स्वत:च्याच हक्कांसाठी जागरुक करण्याची आणि आत्मसन्मान मिळवून देण्याची.
फक्त हे सारे करताना उगीचच विरोधाचे ङोंडे घेऊन उभं नाही राहायचं. पण मुग गिळून गप्पही नाही बसायचं, असं ठरलं. जे काही करायचं ते समजून उमजून, सर्वाना विश्वासात घेऊन. जुन्या जाणकार लेखकांमधले मिथिला सुभाष, अरुणा जोगळेकर, शिरीष लाटकर, रोहिणी निनावे अशांना सोबत घ्यायचं.. 
नव्याने येऊ पाहणा:यांना घडवायचं, हाही एक उद्देश होताच! या सा:या प्रश्नांतूनच एक उत्तर उभं राहिलं, ते म्हणजे, मानाचि 
अर्थात मालिका.., नाटक.., चित्रपट.. लिहिणा:या लेखकांचा एक फोरम. फक्त फोरमच. ‘हमारी मांगे पुरी करो’ वाली युनियन वगैरे नाही. कारण त्यांना अडवणूक, आडकाठी अपेक्षितच नाही. त्यांना हवाय त्यांचा हक्क आणि आत्मसन्मान. एकत्र आल्याशिवाय ते मिळणार नाही हे लक्षात आलं, म्हणून सा:यांनी एकजूट करायची ठरवली. जुनेजाणते, रुजलेले-मुरलेले आणि नवोदितसुद्धा. पायाभरणी झाली व्हॉट्सअॅपने. 
अंबर हडप, गणोश पंडित, जयेश पाटील, कौस्तुभ दिवाण, सचिन दरेकर असे पहिल्यांदा एकत्र आले. गरज लक्षात घेऊन एक फेसबुक पेज तयार केलं गेलं.
प्रत्येक लेखक त्याच्या त्याच्या अवकाशात सोबत शोधत होताच. त्यालाही गरज होती त्याचा आवाज उंच आहे हे सांगण्याची. लेखक एकत्र येऊ लागले. म्हणता म्हणता 1क्क् लेखक एकत्र आले आणि एक फोरम, मंच तयार झाला. अर्थात सुरुवात सोपी नव्हतीच. लेखक एकत्र येताहेत म्हटल्यावर निर्मात्यांमध्ये खळबळ झाली. अशक्य मागण्या घेऊन ते येतील असं त्यांना वाटलं. पण मग जयेश पाटील यांनी सा:यांना विश्वासात घेतलं. आडकाठी करणार नाही हे समजावून सांगितलं. मग त्यांनाही पटत गेलं हळूहळू. आता कुठेही काही झालं तरी लेखकाला विश्वास असतो की मी एकटा नाही. माङयासोबत माझा फोरम आहे. सारे मिळून आवाज उठवतील. लेखनव्यवहाराला मोल मिळेल. माझा हक्क डावलला जाणार नाही. 
लेखकाला दुर्लक्षून चालणार नाही ही जाणीव संपूर्ण इंडस्ट्रीतच रुजायला हवी. त्याचीच ही नेटकी सुरुवात म्हणायला हवी. कारण कुठल्याही दृष्य कलाकृतीचा निर्मितीबिंदू असतो लेखक. नाटक.. चित्रपट वा कुठल्याही मालिकेचा पहिला जन्म होतो तो लेखकाच्या डोक्यात. पण तरीही तो ब:याचदा उपेक्षित.. 
का? - तर फसवले गेले तरी फार काही बोंबाबोंब करणारी ही मंडळी नव्हेत याची जाणीव इंडस्ट्रीला केव्हाच झालेली आहे. अर्थात चांगले अनुभवही इथे येतातच. पण सुरुवातीपासूनचा प्रवास नीट समंजस रितीने झाला, त्यातला गोंधळ दूर झाला आणि निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांच्यामध्ये एक सौहार्दाचं खेळीमेळीचं नातं निर्माण झालं तर कुणाला नकोय? त्यामुळे वादासाठी नव्हे तर संवादासाठी लेखकांनी एकत्र येऊन एक पाऊल पुढं टाकलंय.. स्वत:च्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवून..!
 
 
नवोदित लेखकांसाठी शिबिर 
 
मालिका, नाटक व चित्रपटांसाठी लेखन करणो ही एक स्वतंत्र कला आहे. त्यामुळे यामध्ये चांगले लोक यावेत, त्यांच्यातून उद्याचे लेखक घडावेत, असा प्रयत्न ‘मानाचि’ करणार आहे.  येत्या जुलै महिन्यामध्ये फोरमच्या माध्यमातून एक नवोदित लेखकांसाठी शिबिर घेण्यात येत आहे. जाणकार लेखकांची व्याख्याने, कार्यशाळा असे त्याचे स्वरूप असणार आहे. 
‘मानाचि’ नक्की काय करणार?
 
 श्रेयनामावलीमध्ये लेखकाचं नाव ब:याचदा दिलंच जात नाही. पण जर सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट करतानाच त्यासंबंधीचा तपशील ठरवला आणि नक्की केला जावा, यासाठी प्रयत्न. 
 लेखकाला कायदेशीर बाबी ब:याचदा ठाऊक नसतात. लेखकांना त्याविषयीची माहिती करून देणो.
  चालू असलेल्या मालिकेचे लेखन दुस:या लेखकाकडे हस्तांतरित करताना नेमके काय करायचे, कॉपीराइटचा कायदा व लेखकाने त्याविषयी कसे सतर्क राहायला हवे याविषयीची माहिती देणो.
  मराठी लेखकांमधील बराचसा व्यवहार शब्दांवर आणि विश्वासावर असतो. त्यासाठी ते सारे लिखित ठरलेले असावे, असा आग्रह धरण्यासाठी जागरुकता निर्माण करणो.
 
आयडिया शेअरिंग..
 
महिन्यातून एकदा आम्ही सगळे एकत्र भेटायचं ठरवतो आहोत. या भेटीत आपल्या अनुभवांचे, कल्पनांचे सादरीकरण होते. अनेक चांगल्या गोष्टींचे आदानप्रदान होते. मला हे नवं समजलं हे एकमेकांना सांगत असताना आपल्याही संकल्पनांचं अवकाश मोठं होत असतं. नवं वाचलेलं, नवी नाटकं, आपलीच एखादी येत असलेली कलाकृती हे सारं तिथं येतं. 
प्रत्येक चांगला लेखक हा चांगला समीक्षकही असतो. त्यामुळे तिथे कामाची खरी पावती मिळून जाते. त्यामुळे हक्कांविषयीच्या जागरूकतेबरोबरच हादेखील एक अँगल महत्त्वपूर्ण आहे. 
 
- अंबर हडप, मालिका आणि चित्रपटांचे लेखक
 
(लेखक लोकमतच्या पुणो आवृत्तीमध्ये 
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
 

Web Title: Honesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.