..कसे घडते हे?

By admin | Published: February 27, 2016 02:33 PM2016-02-27T14:33:26+5:302016-02-27T14:33:26+5:30

कलाकार म्हणून महाभारताच्या कचाटय़ातून कोणी सुटणो मुश्कील! हा विषय मलाही खुणावत होता. पण आतून कौल येण्याची तब्बल तीस वर्षे मी वाट पाहिली. काही वर्षापूर्वी वाटलं, बहुधा हीच ती वेळ.! पुन्हा नव्यानं रियाज सुरू झाला. त्या महाकाव्यात तीन वर्षे मी पूर्ण बुडाले, नंतर दीड वर्ष सादरीकरणासाठी! शारीरिक मर्यादांची परीक्षा पाहणारा, पण नव्या संवेदनांना स्पर्श करणारा हा रियाज खूपच वेगळा, आनंददायी होता.

How does this happen? | ..कसे घडते हे?

..कसे घडते हे?

Next
रियाज 
- शमा भाटे
 
सतारवादक उस्ताद विलायत खां यांचे वडील विलायत खां साहेब अगदी लहान वयाचे असतानाच अल्लाला प्यारे झाले. ‘आता ह्यांच्या तालमीचे काय?’ ह्याची काळजी असलेला एक कलाकार काहीशा आढय़तेने त्यांना म्हणाला, ‘कुछ जरुरत पडी तो हमारे पास आना’. त्यावर, तेव्हा अगदी कम उमर असलेले विलायत खां साहेब त्यांना नम्रतेने म्हणाले, ‘वालीदने हमारे लिये कुछ 5040 ताने लिख छोडी है. दो भिन्न रागोमें उसपर रियाज करते है, कहते है, इसमेसे सब कुछ निकलेगा..’
नृत्याच्या पारंपरिक बंदिशीपलीकडे जाऊन समकालीन विषयांवर मी जेव्हा नृत्यरचना करते तेव्हा मला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘हे विषय तुम्हाला सुचतात कुठून आणि कसे?’ - तेव्हा मला हा किस्सा नेहमी आठवतो. 
माझी परंपरा आणि माझ्या भोवतालचे सतत बदलत असलेले जगणो हे मला सतत इतके काही देत असते की विषय शोधण्यासाठी त्यापलीकडे जावेच लागत नाही. फक्त, कोणता विषय कधी, कसा हाताळायचा यासाठी मात्र खूप मानसिक रियाज करावा लागतो. आता हेच पाहा ना, महाभारताच्या कचाटय़ातून सुटलाय असा भारतीय सापडणो मुश्कील. मीही तरु ण वयात महाभारत अनेक कलाकारांच्या नजरेतून वाचले-बघितले होते. दुर्गा भागवत, इरावती कर्वे, आनंद साधले, भैरप्पा. प्रत्येकाची एक वेगळी नजर, वेगळा दृष्टिकोन. ते वाचताना हे महाकाव्य एक कलाकार म्हणून मला सतत खुणावत होते. त्यातील असंख्य प्रकृतीची माणसे, त्यांच्या नात्याची गुंतागुंत, त्यातील सत्ताकारण, अहंकार, अमानवी वाटावे असे मैत्र, पराक्र म आणि प्रेम. ह्या सगळ्या गोष्टी मला त्या विषयात पुन्हा-पुन्हा खेचत होत्या. पण आतून वाटायचे, नाही, कलाकार म्हणून हा विषय हाताळण्याची प्रगल्भता अजून यायला हवी. 
तब्बल तीस र्वष मी वाट बघत होते. आतून कौल येण्याची. अगदी आत्ता, दोन-तीन वर्षापूर्वी मात्र हा विषय मनात ठाण मांडूनच बसला तेव्हा वाटले, बहुधा हीच ती वेळ..! मग माझा नव्याने रियाज सुरू झाला.
त्याच पुस्तकांचे पुन्हा वाचन, प्रत्येक प्रदेशात सादर केले जाणारे महाभारत बघणो. मला माझी सही असलेली कलाकृती उभी करताना महाभारतातील फक्त सात व्यक्ती दिसत होत्या. भीष्म, दुर्योधन, कर्ण, युधिष्ठिर, द्रौपदी, कुंती आणि गांधारी. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर उभे राहून मागे वळून आयुष्याकडे पुन्हा बघणा:या. आणि त्यांचा विचार करताना मला जाणवू लागले, या प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगळा, ऊर्जा वेगळी, आयुष्याच्या अंतिम चरणावर वाटणारी खंत-आनंद वेगळा. असा वेग-वेगळा पोत असणारी माणसे.  एकाच नृत्यशैलीत त्यांना बांधण्याचा अट्टहास मी का करायचा? 
आपल्याकडील प्रत्येक शैलीत असलेले वैशिष्टय़ बघत-बघत मग मी प्रत्येक पात्रसाठी वेगळी नृत्यशैली निवडली. अशा सात भिन्न-भिन्न नृत्यशैलीत असलेले माङो महाभारत उभे करण्यासाठी मला दीड वर्ष लागले. सगळ्या मानवी आयुष्याला आणि त्यातील राग-लोभ-मोहाला कवेत घेणा:या त्या महाकाव्यात मी तीन र्वष पूर्ण बुडाले होते..! 
वेगवेगळ्या नृत्यशैली आणि कथक यांची गुंफण करणो हा माङयासाठी एक अगदी वेगळा रियाज होता, जो मला माङया चौकटीबाहेर घेऊन जात होता. आणि तरीही कृष्ण नावाचा महानायक माङया त्या नृत्यात नव्हताच.! 
हा सगळा प्रवास एकीकडे शारीरिक मर्यादांची परीक्षा बघणारा, पण रोज कलाकार म्हणून नवे काही दाखवणारा, नव्या संवेदनांना स्पर्श करणारा होता.
‘वर्ल्ड ऑफ सायलेन्स’ नावाचा एक सुंदर, ऑस्कर पुरस्कारविजेता माहितीपट बघितला होता. शांतता आणि असीमता नृत्यातून दाखवता येईल? मला शांतता दाखवायची होती. त्यामुळे घुंगरू आणि नाद निर्माण करणारी वाद्ये वापरता येणार नव्हती. समुद्रकिनारी असलेली असीम शांतता आणि माणूस असे ते नाते होते. त्यामुळे कलाकारांना चेहरा नव्हता, होती फक्त देहाकृती आणि सोबत सतारीचा न संपणारा स्वर.
नृत्यातून फक्त राधा-कृष्णच दाखवायला हवेत असे शास्त्र सांगत नाही. इथे मी नृत्यातील रंगमंचाच्या एका मोठय़ा अवकाशात नृत्यातील हालचाली आणि स्वर यांच्यातील परस्पर संवाद आणि त्यातून निर्माण होणारी, मनाला स्वस्थ करणारी शांतता दाखवू बघत होते. 
एस. एच. रझा या अमूर्त शैलीत चित्र काढणा:या चित्रकाराची चित्रे जेव्हा नृत्यातून दाखवावी असे वाटले तेव्हा त्यांनी रेखाटलेल्या भौमितिक आकृत्या आणि त्यातील जर्द लाल रंग बघता बघता मला जंगलात पेटलेला वणवा दिसू लागला. आकाशात ङोपावणा:या त्याच्या लसलसत्या ज्वाला आणि चहू दिशांनी असणारा वेग. मी आधी रंगमंचावर नृत्यातून एक भव्य कॅनव्हास जणू रेखाटून घेतला आणि त्यावर हस्तरेषांच्या माध्यमातून जणू एक रसरशीत वणवा पेटवला..! 
एखादा विषय मांडताना त्याची समाजमान्य जी एक चौकट असते त्यापलीकडे बघणो हाही माङया रियाजाचा एक भाग आहे. ‘नृत्याच्या पारंपरिक बंदिशींनी जो कृष्ण सांगितला त्या पलीकडे तो आहे का?’ - असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला, तेव्हा मला दिसलेला कृष्ण वेगळाच होता. तो होता समाजाच्या प्रश्नांशी जोडला गेलेला कृष्ण. कालिया मर्दन करून यमुनेला जहरमुक्त करणारा आणि त्यातील जलचर-वनस्पतींना संजीवनी देणारा. गोकुळातून बाहेरगावी जाणारे दूध-लोणी चोरून ते गोकुळातील आपल्या दूध-तुपापासून वंचित मित्रंना खाऊ घालणारा. 
आणि कस्तुरबांचे आयुष्य मांडण्याचे आव्हान समोर आले तेव्हा मला त्यात केवळ कस्तुरबा नाही दिसल्या, तर दिसली एक स्त्री; जी दुस:याच्या वेदनेसाठी स्वत:ला, स्वत:च्या आयुष्याला पणाला लावायला तयार आहे. 
अशी स्त्री बघत असताना मला हेही जाणवले, पोरबंदरच्या वेशीबाहेर पायही न ठेवलेली स्त्री बॅरिस्टर गांधी यांच्या आयुष्यात येते आणि पायात बूट घालून टेबलवर बसून काटय़ा-चमच्याने जेवायला शिकते तेव्हा ती स्वत:ला ओलांडून आयुष्याच्या किती दूरवरच्या त्रिज्येला स्पर्श करीत असते ते. म्हणून मी कस्तुरबांच्या नृत्यासाठी भारतीय वाद्यांबरोबर जाझ वापरले आहे..! 
मानसिक, बौद्धिक रियाझाच्या ह्या गोष्टी न संपणा:या, पण आठवतात तेव्हा असीम आनंद देणा:या.. कसे घडते हे सारे? 
असे म्हणतात की, राजस्थानी सारंगीवादक आपली सारंगी वाजवणो सुरू करण्यापूर्वी ती जमिनीवर आडवी ठेवून जुळवतात, मग म्हणतात, ‘अब इसको बदनसे मिला लेता हूँ.’ 
कला अशी बदनसे आणि दिलसे मिलाना म्हणजे रियाज..
 
 
स्वर जर दिसू शकतात,
तर शांतता का दिसू नये?
 
पंडित कुमार गंधर्व म्हणायचे, ‘मला रागाचा चेहरा वेगवेगळ्या कोनातून दिसतो. कधी मला तो समोरून दिसतो, तर कधी मला त्याची प्रोफाइल दिसते!’
स्वरांची साधना करणा:या कलाकाराला अमूर्त असे स्वर जर दिसू शकतात, मग नृत्य तर दृश्यकलाच. त्यात रंग आहेत, संगीत-लय आहे आणि आहेत हस्तरेषा, पदन्यास. मग माङया जगण्यातील कोणताही विषय मला त्यातून सांगता यायला हवा. अगदी शांततासुद्धा!
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे

 

Web Title: How does this happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.