ब्रह्यांड दाखवणारी दुर्बिण... एकदा पाहाच आणि जाणून घ्या कशी असते?,,,

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:43 AM2022-08-21T07:43:55+5:302022-08-21T07:44:19+5:30

जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण असा नावलौकिक मिळवलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपने आता अवकाशात चांगलाच जम बसविला आहे.

How is a telescope showing the universe just see and know | ब्रह्यांड दाखवणारी दुर्बिण... एकदा पाहाच आणि जाणून घ्या कशी असते?,,,

ब्रह्यांड दाखवणारी दुर्बिण... एकदा पाहाच आणि जाणून घ्या कशी असते?,,,

googlenewsNext

जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण असा नावलौकिक मिळवलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपने आता अवकाशात चांगलाच जम बसविला आहे. अवकाशातील अनेक प्राचीन आणि दुर्मीळ छायाचित्रे टेलिस्कोपने भूतलावर पाठवली. जाणून घेऊया जेम्स वेबविषयी अधिक माहिती... 

निर्मितीची प्रक्रिया
जेम्स वेबच्या निर्मितीची प्रक्रिया दोन दशकांपासून सुरू होती. ०७ देशांतील १००० लोकांचा या निर्मिती प्रक्रियेत सहभाग. हबल दुर्बिणीला निवृत्त करून तिची जागा घेण्यासाठी जेम्स वेबची निर्मिती केली. अंतराळातील अगदी दुर्मिळातील दुर्मीळ प्रकाश-किरणांचा वेध घेण्याची जेम्स वेबची क्षमता आहे.

टेलिस्कोप उद्दिष्टे 
- विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाल्याचे मानले जाते. या महास्फोटानंतर अंतराळात निर्माण झालेल्या आकाशगंगा, तारकापुंज यातून निघालेल्या प्रकाशाचा मूळ स्रोत शोधणे हे जेम्स वेब टेलिस्कोपचे मूळ उद्दिष्ट आहे.
- आकाशगंगेची निर्मिती आणि रचना यांचा सखोल अभ्यास करणे.
- अवकाशातील विविध ग्रहांची निर्मिती कशी झाली, त्यांची रचना आणि त्या ठिकाणी सजीवांचे अस्तित्व आहे किंवा कसे, याचा चिरंतन शोध घेणे.
- अवकाशातील सर्व ग्रह-तारका मंडलांची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवणे.

दुर्बिणीच्या बाह्य भागावर अंतराळातील वातावरणात टिकू शकतील असे धातू आणि रसायने आहेत.

वेब इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे. इन्फ्रारेड रेडिएशनमुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे सूर्यकिरणांपासून टेलिस्कोपचा बचाव व्हावा यासाठी त्यावर टेनिस कोर्टाच्या आकाराएवढे एक आवरण चढविण्यात आले आहे.

एक अँटेना दुर्बिणीवर बसवलेला असून,  त्याची रेंज १५ लाख किमी अंतरापर्यंतची आहे.

आतील भागात दोन आरसे असून, त्यातील एक अंतर्वक्र आणि अन्य बहिर्वक्र आहे. हे आरसे भलेमोठे असून, मूळ प्रतिमेच्या १५ पट आकार त्यात दिसू शकतो.

या आवरणाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या केसाच्या आकाराएवढ्या प्लास्टिक कणांचे पाच थर त्यावर लावण्यात आले आहेत.

दुर्बिणीच्या सर्व यंत्रणेला नियंत्रित करण्यासाठी खालच्या भागाला स्पेसक्राफ्ट बस जोडली आहे.

Web Title: How is a telescope showing the universe just see and know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.