नम्र हुकूमत
By admin | Published: January 31, 2016 10:17 AM2016-01-31T10:17:07+5:302016-01-31T10:17:07+5:30
अवकाशाला आपल्या स्वरांनी स्पर्श करायचा, त्यात रंग भरायचा, आणि मग स्वत:चा स्पर्श असलेले गाणो घडवण्यासाठीचा रियाज. उंच डोंगरावर उगमापाशी झ:याचे असते तितके आणि तसे स्वरांचे शुद्ध स्वरूप. फक्त तानपु:याच्या साथीने या स्वरांच्या आकृती रेखित राहणो, आजवर कधीच व्यक्त न झालेल्या राग स्वरूपार्पयत पोचण्याचा प्रय} करीत राहणो ही आमची साधना.
Next
>- पंडित उदय भवाळकर
भोपाळच्या कडाक्याच्या थंडीत पहाटे साडेतीन वाजता सायकल काढून घराबाहेर पडायचो तेव्हा सगळे भोपाळ मऊ दुलईच्या कुशीत गाढ झोपलेले असायचे. पहाटेचे गार वारे अंगावर घेत निर्मनुष्य रस्त्यांवरून सुसाट सायकल हाणीत मी गुरूंकडे निघायचो. सकाळच्या रियाजासाठी. बरोब्बर चार वाजता आमचा खर्जाचा रियाज सुरू व्हायचा तो सहा वाजेपर्यंत. ही वेळ फक्त खर्जाच्याच स्वरांसाठी आणि त्याच्या मेहनतीसाठी. पहाटे-पहाटे जड असलेल्या आवाजाला स्थिर आणि पिळदार करण्यासाठी ही मेहनत जेव्हा मी घेत होतो तेव्हा माङो वय होते जेमतेम पंधरा वर्षे. कमालीचे निसरडे, उनाडपणा आणि बंडखोरी करण्याचे वय. शरीरात आणि त्यामुळे मनात होणा:या बदलांना, त्यामुळे अंगावर येणा:या वादळाला तोंड देण्याचे. पण मी मात्र अशी कोणतीही आगळीक न करता रोज शहाण्या मुलासारखा भल्या पहाटे निघायचो. न कुरकुरता दोन-दोन तास बैठक मारून बसत होतो आणि त्यानंतर गुरुजींच्या घरात करावी लागणारी छोटी-मोठी कामेही करीत होतो. एकटाच राहायचो मी तेव्हा भोपाळमध्ये. त्यामुळे बरेचदा खोलीवर गेलो की चूल पेटवून आपल्यापुरते काही शिजवावे लागे आणि ते होईतो पुन्हा रियाजाला जायची वेळ यायची..! ही गोष्ट ऐकताना कदाचित एखाद्या बुजुर्ग कलाकाराच्या चरित्रतील वाटू शकते, 19 व्या शतकातील वगैरे. पण मी बोलतोय ते माङया रियाजाबद्दल. आत्ता-आत्ता 8क् च्या दशकात केलेल्या आणि गुरुगृही राहून गुरूंनी करून घेतलेल्या रियाजाबद्दल. तेही अशा गायकीबद्दल, जी मुळी मनोरंजनासाठी नाहीच असे म्हटले जाते.
श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी गाण्यापेक्षा त्यांना शांतता आणि ध्यानाचा असीम आनंद देणारी गायकी अशी धृपद गायकीची ओळख आहे. स्वरांचीसुद्धा धड ओळख झालेली नसताना असे काहीतरी उदात्त वगैरे, न ङोपणारे ध्येय मी वयाच्या पंधराव्या वर्षी कसे ठरवले, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. जेव्हा मी माङो भोपाळमधील दिवस आठवतो तेव्हा जाणवते ते एवढेच की धृपद गायकी कशासाठी असा प्रश्न मी कधी माङया गुरुजींना विचारलाच नव्हता. कारण मुळात गायचे कशासाठी हा प्रश्नच कधी मनात आला नव्हता. काहीही झाले तरी आपल्याला गायचे नक्कीच आहे हेच मनात पक्के होते. तेव्हा आम्ही सगळे उज्जैनला राहत होतो. घरात गाण्याचे प्रेम होते पण परंपरा मात्र नव्हती. बहिणीला हार्मोनियम शिकवायला घरात एक गुरुजी येत. ते ज्या बंदिशी शिकवत त्या मी धडाधड पाठ म्हणायचो. त्यामुळे अर्थातच माझी रवानगी संगीत विद्यालयात झाली. माधव संगीत विद्यालयात माङो संगीत शिक्षण सुरू झाले. कोणत्याही क्लासमध्ये असते तसे. कमालीची शिस्त आणि पुस्तकी शिक्षण. वहीत क्रमाने लिहून दिलेल्या ताना पाठ करणो हे विद्याथ्र्याचे परमोच्च कर्तव्य आणि हुशारी दाखवण्याचा एक हमखास मार्ग. मीही त्याच वर्गातला म्हणजे हुशार सदरात मोडणारा विद्यार्थी होतो. पण त्याचे कारण निव्वळ माङया बुद्धिमत्तेत नव्हते, तर गाण्यावर असलेल्या माङया मन:पूर्वक प्रेमात होते. प्रमोद शास्त्रींची तालीम मला आवडत होती कारण मी जे काही गात होतो, शिकत होतो त्या गाण्यात रोज नवे काही असे दिसायचे जे माङया मनात रेंगाळत राहायचे. धृपद, धमार, टप्पा, ठुमरी, जुनी सिनेमागीते असे सगळे काही तेव्हा मी मोठय़ा तयारीने म्हणत असे. सिनेमाची गाणी वगळता बाकी सगळे गायन प्रकार हा आमच्या अभ्यासक्रमाचा भागच होता. पण माङयासाठी तेव्हाही तो फक्त अभ्यास नव्हता.
अशा वेळी वाचनात आली ती भोपाळमध्ये सुरू होत असलेल्या धृपद केंद्राची जाहिरात. वीणा, सारंगी, टप्पा, धृपद असे विविध गायन-वादन या केंद्रात शिकवले जाणार होते आणि निवडक विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती मिळणार होती. हे विद्यार्थी निवडणारी कमिटी कोण असावी? ठाकूर जयदेव सिंह आणि डॉ. प्रेमलता शर्मा नावाचे संगीतशास्त्र जाणणारे प्रकांड विद्वान, बाळासाहेब पूंछवाले, कुमार गंधर्व असे तयारीचे गायक. अशा 1क्-12 बुजुर्गांसमोर माङयासारख्या मिसरूड पण न फुटलेल्या मुलाला गायला बसवले गेले. मुलगा मोठय़ा आत्मविश्वासाने गात होता म्हणून त्याला शिष्यवृत्ती देऊन निवडले गेले आणि मी भोपाळला आलो.
धृपद गायकीचा चेहरा अशी ज्यांची ओळख ते ङिाया फरीदुद्दिन आणि मोहिनुद्दिन डागर यांच्या डागर बानी नावाच्या एका समृद्ध परंपरेत मी दाखल झालो होतो. हे दोन गुरू मला शिकवणार होते. वहीत लिहिलेल्या आणि पाठ केलेल्या ताना-पलटय़ाच्या चौकटीतून मुक्त असलेले संगीत प्रथमच समोर येत होते. इथे कानावर पडत असलेला राग ओळखीचा असायचा पण या रूपात तो पूर्वी कधीही भेटलेला नव्हता. रागाचे आरोह-अवरोह आणि बंदिशींच्या पलीकडे दिसायचा तो. कितीतरी मोठा, अफाट. गुरुजी शिकवत असायचे तो रागवाचक स्वर भेटायचा आणि त्या स्वरांच्या छोटय़ा-छोटय़ा आकृती. गुरुजी सांगायचे, अरे बाबा, पंचम एकच असतो पण तो जेव्हा शंकरा रागात लागतो तेव्हा वेगळा दिसतो आणि मुलतानीमध्ये वेगळा. दोन्ही पंचमांचे संदर्भ वेगळे, त्यांच्या आगे-मागे असणारे स्वर वेगळे आणि म्हणून प्रत्येक पंचमाचे सौंदर्य वेगळे. हे एकाच स्वराचे वेगवेगळे चेहरे तुम्हाला दिसतायत? दाखवता येतायत? मैफलीत बसल्यावर लागणा:या पहिल्या स्वरातून तो सगळा राग रसिकांच्या डोळ्यासमोर उभा करता येणो ही इथली पहिली परीक्षा होती. निव्वळ एका स्वरातून असा एखाद्या रागाचा माहोल उभा करायला शिकणो आणि त्यासाठी त्या स्वरांवर कसून हुकूमत मिळवणो हे इथे मी शिकत होतो. माङो गुरू मोहिनुउद्दिन यांच्या 8क् व्या वाढदिवशी आम्ही सगळे शिष्य एकत्र जमून गात होतो. एका सकाळी गुरुजी गायला बसले. तोडी गात होते आणि मी स्वरसाथ करीत होतो. एका क्षणी त्यांनी असा काही तीव्र मध्यम लावला जो मला प्रयत्न करूनही पकडता येईना. त्याक्षणी जाणवले, कलाकाराचा रियाज प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो. शारीरिक रियाजाची गरज त्या टप्प्यावर संपते आणि सुरू होते मानसिक रियाजाची गरज. सहज अनुमान बांधण्याच्या पलीकडे असे जे काही संगीत असते ते या रियाजातून एखाद्या अवचित क्षणी झपकन डोळ्यासमोर येते. तो क्षण पुन्हा-पुन्हा यावा यासाठीच मग साधना सुरू होते. नव्याने.
कोणत्याही रागाला नियम असतात, व्याकरण असते; पण त्यात एक अव्यक्त असा विराट कलात्मक अवकाश असतो. गायकाने त्या अवकाशाला आपल्या स्वरांनी स्पर्श करायचा असतो. त्यात रंग भरायचा असतो. ह्या रंगांची आणि स्पर्शाची ओळख करून देण्यासाठी आणि मग स्वत:चा स्पर्श असलेले गाणो घडवता यावे यासाठी चालायचा हा रियाज. सकाळी खर्ज, त्यानंतर पलटे, मग उपज आणि मग बंदिशींचे शिक्षण. बंदिशींच्या मुक्कामी येण्यापूर्वी होणारी नोमतोम आणि संथ आलापी ही आमच्या गायकीची खासियत. त्यात आम्ही दाखवत असतो कोणत्याही स्वराचे अतिशय शुद्ध, निखळ स्वरूप. उंच डोंगरावर उगमापाशी झ:याचे असते तितके आणि तसे शुद्ध स्वरूप. फक्त तानपु:याच्या साथीने ह्या स्वरांच्या आकृती रेखित राहणो, आजवर कधीच व्यक्त न झालेल्या राग स्वरूपापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत राहणो ही असते आमची साधना, रियाज. कोणताही राग हा कलाकारापेक्षा फार मोठा असतो ह्याची जाणीव ठेवून नम्रपणो केलेला.
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे