मेरे पास ट्विटर है.
By admin | Published: March 19, 2016 03:03 PM2016-03-19T15:03:14+5:302016-03-19T15:03:14+5:30
विजय मल्ल्या प्रकरणातून अनेकांना अनेक धडे मिळाले, पुढेही मिळतील. पण प्रस्थापित प्रसारमाध्यमांनाही त्यांनी पुरेपूर गंडवलं. त्यांच्यावर इतके आरोप, टीका झाली. पण त्यांनी ना एखादी पत्रपरिषद घेतली, ना कोणाला मुलाखत दिली, ना लेख लिहिला. त्याऐवजी त्यांनी आपला बचाव करताना केला तो ट्विटवर हल्ला! वृत्तपत्रे, टीव्ही या सार्वजनिक चर्चाविश्वावरील वर्चस्वाचा लंबक आता वेगाने फेसबुक, ट्विटरसारख्या समूहमाध्यमांकडे झुकत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
Next
- विश्राम ढोले
प्रस्थापित प्रसारमाध्यमांच्या क्षमतेला आणि आश्वासकतेला सोशल मीडियाचं आव्हान!
प्रसारमाध्यमांनी इंग्लंडमध्येही माङयामागे ससेमिरा लावलाय. खरंतर त्यांनी जिथे शोधायला हवं होतं तिथे ते शोधत नाहीयेत. मी काही प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही. तुम्ही उगाच तुमचे कष्ट वाया घालवू नका.’ - दीविजयमल्ल्या या ट्विटर अकाउंटवरून विजय मल्ल्यांनी 12 मार्चला असे ट्विट केले आणि एकच टिवटिवाट उडाला. मल्ल्यांना भगोडा, खोटारडा, आर्थिक दहशतवादी वगैरे 14क् कॅरेक्टरमध्ये बसतील तेवढय़ा शिव्या देणारे आणि ‘या संकटातूनही तुम्ही पुन्हा भरारी घ्याल’ असा दिलासाही देणारे शेकडो ट्विट येत गेले. अर्थात शिव्या घालणा:या ट्विटची संख्या खूपच जास्त. मद्य, मदनिका, मौज आणि माज अशा ‘म’कारांमध्ये रु तलेल्या त्यांच्या प्रतिमेचा यथेच्छ वापर करीत मार्मिक टिप्पणी करणारी अनेक चित्रे, अर्कचित्रे आणि छायाचित्रे व्हायरल झाली. ‘गिव्ह मी अ लोन अँड देन लीव्ह मी अलोन’ यासारख्या डोकेबाज कॉमेण्ट्स ट्विट आणि रीट्विट व्हायला लागल्या. एकाने तर चक्क मल्ल्यांनाच ‘डू यू रिअलाइज यू आर दी मोस्ट ट्रोल्ड पर्सन इन इंडिया नाऊ’ असे ट्विट केले.
टाइम्स नाऊ वाहिनीवरील वरील बेलगाम आणि बेसुमार चर्चेच्या पाश्र्वभूमीवर ‘मोस्ट ट्रोल्ड पर्सन इन इंडिया नाऊ’ ही स्थिती मल्ल्यांना निश्चित जरा बरी वाटली असणार. किंबहुना तशी ती व्हावी म्हणूनच मल्ल्यांनी ट्विटचा सपाटा लावला होता. एरवी फार काही बरं बोलावं असा मल्ल्यांचा सार्वजनिक वावर तसाही कधी नव्हता. किंगफिशर एअरलाइन्सचे वाटोळे होणो, सार्वजनिक बँकांचे कर्जे बुडविणो प्रकरणांनंतर तर यशस्वी उद्योजक या त्यांच्या प्रतिमेवरही मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणी अटक वॉरण्ट निघणो आणि त्यांचे भारतातून गायब होणो यामुळे तर त्यांच्याविषयीच्या नकारात्मकतेचे रूपांतर संतापात झाले. वृत्तपत्रीय लिखाण, टीव्हीवरील चर्चा आणि सोशल मीडियावरील क्रिया-प्रतिक्रि यांचे बोलधागे (ट्रोल्स) या संतापाने दुथडी भरून वाहू लागले. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा निदान अशा परिस्थितीत तोंड उघडण्यासाठी मल्ल्यांनी निवडला तो सोशल मीडियाचा- ट्विटरचा- माध्यममार्ग.
त्यांच्याविरु द्ध जणू काही आघाडी उघडली असावी अशा पद्धतीने चर्चा करणा:या किंवा घडवून आणणा:या माध्यमांना - त्यातही टीव्ही वाहिन्यांना - त्यांनी तिकडे दूर इंग्लडमध्ये सुरक्षित बसून ट्विटरवर उत्तरे देण्याचा सपाटा लावला. 11 मार्चला त्यांनी पहिला ट्विट हल्ला केला तो सरळ टाइम्स नाऊ आणि संपादक अर्णब गोस्वामींवर. ‘बेधडक खोटे, खोडसाळ, दिशाभूल करणारे आरोप केल्याबद्दल टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी खरेतर आता कैद्याच्या कपडय़ात आणि कैद्यांचे अन्न खाताना दिसले पाहिजे’ असे ट्विट झळकले आणि मल्ल्यांची मल्लगिरी सुरू झाल्याचा संकेत मिळाला. ‘‘मी आंतरराष्ट्रीय उद्योजक आहे. मी सतत जगभर फिरत असतो, मला फरार किंवा भगोडा म्हणणं बावळटपणा आहे.’’ ‘‘आपली न्यायव्यवस्था उत्तम आणि आदरणीय आहे. पण माध्यमाकडून होणारी सुनावणी (मीडिया ट्रायल) मला मान्य नाही.’’ ‘‘माध्यमे म्हणतात मी माझी संपत्ती जाहीर करावी. याचा अर्थ बँकांना काय माझी संपत्ती माहीत नाही?. की संसद सदस्य या नात्याने मी माझी संपत्ती घोषित केलेली नाही?’’ असे एकामागोमाग एक ट्विट करत मल्ल्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बाजूने माध्यमांमध्ये आलेल्या मोजक्या बातम्या किंवा प्रतिक्रि यांची कात्रणो आणि लिंक्स रीट्विट केल्या. ‘‘माध्यमांमधील बडय़ांनी मी त्यांना गेली अनेक वर्षे जी मदत केली, ज्या सुखसुविधा पुरविल्या, जी उदार वागणूक दिली ती विसरू नये. या सगळ्यांची मी चांगली नोंद करून ठेवली आहे. आता टीआरपी मिळविण्यासाठी इतकं खोटं बोलता?’’ - अशी गर्भित धमकी द्यायलाही मल्ल्या विसरले नाहीत. शेवटी मल्ल्याच ते. ‘‘एकदा का माध्यमांनी विचहंट किंवा शिकार करणं सुरू केले की लवकरच त्याचे रूपांतर वणव्यात होते आणि त्या वणव्यात मग वास्तव आणि सत्य जळून खाक होतात,’’ असे प्रबोधनपर सत्यवचन कथन करण्यासही ते विसरले नाहीत.
आता ही सारी टीका मल्ल्या नावाच्या आरोपीकडून होत असली, हे बोधामृत एका मदमस्त मद्याधिपतींकडून मिळत असले, तरी त्यात सत्याचा थोडाफार अर्कउतरला आहे हे मात्र नाकारता येत नाही. अर्थात त्याचा संबंध मल्लांच्या कर्ज प्रकरणाशी नाही, त्यांच्या कथित निरपराध असण्याशीही नाही किंवा त्यामागच्या राजकारणाशीही नाही. मल्ल्यांच्या ट्विटर हल्ल्यातून सार्वजनिक चर्चाविश्वासंबंधीचे, प्रसारमाध्यमांच्या त्यातील स्थानाविषयीचे एक नवे वास्तव स्पष्ट होत आहे. ते प्रथमच दृग्गोच्चर होत आहे असे नव्हे. पण मल्ल्या प्रकरणाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा आणि अधिक ठळकपणो जाणवू लागले आहे. काय आहे हे वास्तव? प्रसारमाध्यमांशी त्याचा काय संबंध आहे?
देशातील एका खूप मोठय़ा सार्वजनिक चर्चाविश्वावर वृत्तपत्रे, टीव्ही वगैरे प्रसारमाध्यमांचे असलेले वर्चस्व आता ओसरू लागले आहे, हे ते वास्तव आहे. सार्वजनिक चर्चाविश्वावरील वर्चस्वाचा लंबक आता वेगाने फेसबुक, ट्विटर यांसारख्या समूहमाध्यमांकडे झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे. नुसते मल्ल्या प्रकरणापुरते जरी बघितले तरी ते लक्षात येते. म्हणजे असे की प्रसारमाध्यमांमध्ये मल्ल्यांवर इतकी टीका झाली, इतके आरोप झाले तरी मल्ल्यांनी प्रसारमाध्यमांची खास सोय असलेली ना एखादी पत्रकार परिषद घेतली, नाही कोणा पत्रकाराला मुलाखत दिली. ना लेख लिहिला, ना आरोपाचे खंडन करणारे प्रसिद्धीपत्रक काढले. कदाचित त्यांच्या जनसंपर्क यंत्रणोद्वारा किंवा समर्थकांद्वारा प्रसारमाध्यमांमध्ये थोडीफार बाजू येत राहील याची काळजी त्यांनी घेतली असेलही; पण स्वत: मात्र प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांच्या फैरीपासून ते लांबच राहिले.
वलयांकित लोकांना, अधिकारपदावरील लोकांना समाजमाध्यमांचे फायदे जास्त आहेत. कारण समाजमाध्यमांमध्ये असणारे त्यांचे फॉलोअर्स जास्त, त्यांचे फ्रेंड नेटवर्कमोठे. म्हणून त्यांचे म्हणणोही जास्त लोकांपर्यंत आणि अधिक वेगाने पसरणार. पण गंमत अशी की, त्यांना असे सेलिब्रिटी बनविण्यात महत्त्वाचा वाटा मात्र प्रसारमाध्यमांचा. पण एकदा असे वलय प्राप्त झाले की, प्रसारमाध्यमांना पूर्णत: टाळूनही आपले म्हणणो रेटण्याची किंवा चर्चेचा जोरदार धुरळा उडवून प्रसारमाध्यमांना त्याची दखल घेण्यास भाग पाडण्याची क्षमता समाजमाध्यमे मिळवून देतात.
दुसरे आव्हान अधिक थेट आहे. प्रसारमाध्यमे जे काही सांगतात, जी काही चर्चा करतात त्याच्यावर पुन्हा चर्चा करण्याचे, त्याची उकल करण्याचे किंवा त्याची चिरफाड करण्याचे एक नवे व्यासपीठ समाजमाध्यमांमधून उभे राहिले आहे. एरवी सगळ्यांची यथेच्छ हजेरी घेणा:या माध्यमांची तितकीच किंवा त्यापेक्षाही यथेच्छ हजेरी समाजमाध्यमांमधून घेतली जाते. त्यात चुका दाखविलेल्या असतात, आरोप केलेले असतात, हेतूंवर शंका घेतलेल्या असतात, विखारी टीका असते आणि शिवीगाळही असते. जवळजवळ लाइव्ह. प्रसारमाध्यमांमध्ये जे येते त्यावर साधकबाधक चर्चा होणो, त्याचा अन्वयार्थ लावला जाणो हे खरंतर चांगलेच आहे. माध्यमसाक्षरतेच्या दृष्टीने ते योग्यही आहे. पण समाजमाध्यमांवरील चर्चा, ट्रोल्स बघितले तर त्यात अनेकदा इतका उथळपणा, इतका अभिनिवेश, टोकाचा विरोध, दुराग्रह आणि शिवराळपणा आढळतो की या माध्यमांच्या चर्चाक्षमतेवर शंका निर्माण व्हावी. एरवी सामान्य, सुसंस्कृत वगैरे वाटणारी व्यक्ती समाजमाध्यमांवर सार्वजनिक विषयावरील चर्चेत सहभागी होताना इतकी अविवेकी, बेलगाम आणि हलकी कशी होते याचे आश्चर्य वाटावे. समाजमाध्यमांचा अगदी वैयक्तिक संदर्भात होणारा वापर, त्यावर अनामिक, भ्रमनामिक होण्याचे मिळणारे स्वातंत्र्य, छोटय़ा आणि वेगवान संवादकौशल्याचा तिथे असणारा आग्रह यामुळे कदाचित असे होत असावे. कारणो काहीही असोत, समाजमाध्यमांवरील चर्चाविश्वाच्या आश्वासकतेपुढे आणि क्षमतेपुढे खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे हे नाकारता येत नाही.
असे असूनही सार्वजनिक चर्चाविश्वाचा लंबक असा समाजमाध्यांकडे झुकणो हे एका अर्थाने प्रसारमाध्यमांचेही अपयश आहे. खरंतर प्रसारमाध्यमांची रचना, त्यांची कार्यपद्धती ही अधिक सुसंघटित असते. निर्णयांच्या, तपासणी-फेरतपासणीच्या अनेक पाय:या त्यात अभिप्रेत असतात. वैयक्तिक मतांपेक्षा विश्लेषणाला, वस्तुनिष्ठतेला प्राधान्य देणो तिथे अपेक्षित असते आणि त्यादृष्टीने तिथली कार्यपद्धतीही असावी लागते. चर्चेचे, टीकाटिपणीचे काही प्रस्थापित संकेत, सभ्यता पाळणो हेही तिथल्या कार्यशैलीचा भाग असणो अपेक्षित असते. पण गेल्या काही वर्षात प्रसारमाध्यमांमधील विशेषत: टीव्हीवरील चर्चामधून या सा:या गोष्टी वेगाने बाहेर फेकल्या जात आहेत. वरकरणी रचना जरी बदललेली नसली तरी त्यातील मूल्ये प्रचंड बदलली आहेत. त्यामुळे घसरणा:या चर्चेचा फटका अनेकांना बसलाय. प्रत्यही बसतोय. प्रसारमाध्यमांवरील घसरत्या चर्चाविश्वाचा फटका बसलेल्यांचा मनात त्याबद्दल संताप आहे, तर त्याचे दररोज साक्षीदार होणा:या प्रेक्षक-वाचकांच्या मनात नाराजी. एरवी हा संताप वा नाराजी दबून राहत होती. पण समाजमाध्यमांचा पर्याय मिळताच ती उफाळून बाहेर येतेय. ब्लॉग ही आता काही नवलाईची बाब राहिली नाही. पण ब्लॉगच्या रूपाने जेव्हा सेलिब्रिटीजना लाखोंपर्यंत पोहचणारे माध्यम मिळाले तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी पहिला राग काढला तो प्रसारमाध्यमांवर. 2क्क्7 च्या आसपास अमिताभ बच्चनने ब्लॉग लिहायला सुरु वात केली तेव्हा सुरुवातीच्या काही निवेदनांमध्ये प्रसारमाध्यमांवरील सात्त्विक संतापाला त्यांनीही अशीच वाट करून दिली होती. अगदी थेट ‘दीवार’मधल्या विजयरूपी अँग्री यंग मॅनच्या संतापासारखी. तिथे ‘मेरे पास माँ है’ या वाक्याने विजय गप्प झाला होता. पण इथे ‘मेरे पास ब्लॉग है’ अशा थाटात अमिताभने प्रसारमाध्यमांना आव्हान दिले होते.
मल्ल्या कुलोत्पन्न विजय आता ट्विटर वापरून तसे काही करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. अगदी ‘दीवार’चाच डायलॉग वापरायचा तर ‘तुम मुङो इधर उधर ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ (ट्विटरपर) इंतजार कर रहाँ हूँ’ असे जणू ते मीडियाला डिवचताहेत. त्यांना तुमची कुलंगडी बाहेर काढीन असे धमकावताहेत. अर्थात दीवारमधल्या विजयप्रती वाटणारी कोणतीही सहानुभूती वा प्रेम मल्ल्यांच्या विजयच्या पारडय़ात टाकता येणार नाही. पण ‘मेरे पास ट्विटर है’ अशा थाटाचा त्यांचा पवित्र प्रसारमाध्यमांपुढे तर आव्हान आहेच; पण या नव्या सार्वजनिक चर्चाविश्वाकडून आशा-अपेक्षा बाळगणा:यांनाही तो विचार करायला लावणारा आहे.
फेसबुक आणि ट्विटर.
अदृश्य न्यूजबीट!
समाजमाध्यमांवर कोणीही, कधीही आणि (जवळ जवळ) काहीही म्हणू शकत असल्याने, त्याच्यावर बांध फुटल्यासारख्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता नेहमीच जास्त असल्याने समाजमाध्यमांवरील विधानांमधून कधी वादळ निर्माण होईल आणि मतांमधून कधी मोहोळ उठेल हे सांगणो अवघड. म्हणूनच आताशा प्रसारमाध्यमेच समाजमाध्यमांना फॉलो करू लागली आहेत. वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमध्ये फेसबुक आणि ट्विटर हे एक अदृश्य न्यूजबीटच होऊन गेले आहे. सार्वजनिक चर्चेयोग्य माहिती वा बातमी कोणती, त्याचे आयाम काय, ती कधी आणि कशी द्यावी यावरच्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या आजवरच्या एकाधिकारशाहीला खोलवरचे आव्हान मिळाले आहे. प्रसारमाध्यमांना पूर्णपणो टाळून हजारो, लाखो लोकांपर्यंत ‘मन की बात’ नेण्याचे विनामध्यस्थ, विनाहस्तक्षेप, विनानियंत्रण साधन सगळ्यांना उपलब्ध झाले आहे.
पत्रकारांना टाळून ‘चाय पे चर्चा’!
आजच्या सेलिब्रिटीजना, लोकाग्रणींसाठी प्रसारमाध्यमांना एक मर्यादित पण सशक्त पर्याय समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) रूपानं उपलब्ध झाला आहे. मल्ल्याच कशाला अनेक जण त्यांचा युक्तीने किंवा खुबीने वापर करू लागले आहेत. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही लोकांपर्यंत पोहचण्याचे महत्त्वाचे साधन ही समाजमाध्यमेच झाली आहेत. निवडणुकीपूर्वी आणि पंतप्रधान झाल्यानंतरही मोदींनी प्रसारमाध्यमांना, पत्रकारांना थेट सामोरे जाण्याचे सातत्याने टाळले आहे. ते ना पत्रकार परिषदा घेतात, ना बाईट देतात, ना फार मुलाखती देतात. ते मन की बात किंवा चाय पे चर्चा करतात ते पत्रकारितेला टाळून. बहुतेकवेळा थेट संवादातून किंवा ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून.
पत्रकारिता बायपास!
मल्ल्या यांनी खरंतर पत्रकार आणि पत्रकारितेलाच सरळसरळ बायपास केले. अर्थात ज्यांनी घटनादत्त चौकशी यंत्रणांनाच बायपास करण्याचे प्रयत्न सातत्याने केले त्यांनी प्रसारमाध्यमांना बायपास करण्यात विशेष नवल नाही. पण प्रश्न फक्त मल्ल्यांचा नाही. त्यांच्या बायपास करण्याचाही नाही. इतका स्पर्धात्मक, इतका सर्वव्यापी आणि इतका आक्र मक (प्रसंगी आक्र स्ताळा) माध्यमव्यवहार दिसत असूनही ठरवले तर त्यालाही सहज बायपास करता येतं आणि कोणत्याही चिकित्सेला सामोरे न जाता प्रसारमाध्यमांवरच शरसंधान करता येऊ शकते हे जे नवे वास्तव यानिमित्ताने पुन्हा समोर येऊ लागले आहे ते महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमांसाठी आणि एकूणच सार्वजनिक चर्चाविश्वासाठीही.
प्रसारमाध्यमांची फरफट
‘मोस्ट डिस्कस्ड पर्सन नाऊ’ (किंवा ऑन टाइम्स नाऊ!) पासून ‘मोस्ट ट्रोल्ड पर्सन नाऊ’ किंवा ‘मोस्ट ट्रेंडिंग ऑन ट्विटर नाऊ’ किंवा ‘मोस्ट सर्चड् हॅशटॅग नाऊ’ किंवा ‘मोस्ट गूगल प्रॉम्प्टेड की फ्रेज नाऊ’ होणो हे साधे माध्यमांतर नाही. आपले सार्वजनिक चर्चाविश्व कसे खोलवर बदलू लागले आहे याचे आणि त्यात प्रसारमाध्यमांची कशी गोची किंवा फरफट होत आहे याचे ते द्योतक आहे.
ही गोची दोन पातळ्यांवर आहे. एक म्हणजे नवी माहिती, नवा मुद्दा, नवे काही विधान जगापुढे आणण्याचा आणि ती पसरविण्याचा समाजमाध्यमांचा वेग प्रचंड आहे. सबसे तेज असण्याचा दावा करणारे टीव्हीचे माध्यमही त्या वेगाची बरोबरी नाही करू शकत.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com