मे चाहता है..

By admin | Published: January 2, 2016 02:21 PM2016-01-02T14:21:02+5:302016-01-02T14:21:02+5:30

मेळघाटच्या आश्रमशाळांमध्ये शिकणा:या या पोरी. त्यांनी काही तासावरची अमरावतीही अजून बघितलेली नाही. पण त्यांना काही विचारायला जा, त्यांचं उत्तर सुरू होतं एका ठरावीक वाक्यापासून : मे चाहता है.. म्हणजे आपल्याला काहीतरी हवं असू शकतं आणि प्रयत्न केले तर ते मिळवताही येतं, हा विश्वास इतक्या दूरच्या मातीत रुजला आहे.या पोरींचे आईबाप शिकलेले नाहीत, पहिली पाटी-पेन्सिल त्यांच्या हाती आली आहे, आणि पहिली स्वप्नंदेखील!

I want .. | मे चाहता है..

मे चाहता है..

Next
>माणसं आणि मुद्यांच्या शोधातल्या भटकंतीचा प्रारंभ :   चौफेर प्रवासाचा हा सफरनामा दर रविवारी प्रसिद्ध होईल
 
मेळघाटातली मुलं कुपोषणाची शिकार होतात हे दुर्दैवी वास्तव. पण त्याच रस्त्यावरून शाळेकडे जाणारी पावलंही उमटतात आणि त्यात मुलीही असतात हे शुभवर्तमान!
तेच शोधायला, या पोरींना भेटायला, त्यांच्याशी गप्पा करायला गेलो होतो. म्हटलं मेळघाटातल्या आश्रमशाळांच्या सावलीत सावित्रीबाईंच्या नाती भेटतील.
मेळघाटातल्या दुर्गम वाडीवस्त्यांत फिरत असताना, तिथल्या शाळा धुंडाळत असताना, तिथल्या शाळकरी मुलींशी बोलत असताना बदलाचा पहिला अनुभव आला तो मेळघाटातल्या बोरी गावात.
मेळघाटच्या धारणी तालुक्यातील हे व्याघ्र संरक्षित इवलुसं गाव. जंगलात वसलेलं आणि बफर झोनमधलं. 1क्8 घरांचा उंबरा. गावाच्या वेशीवरच वसुंधरा प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आहे. तिथेच रविना भेटली. या पिढीतल्या मुलींची नावंही मोठी गमतीची. ती नवी आहेत. पारंपरिक वळणाची नाहीत. आदिवासी बोलीभाषेत कधी नसलेल्या या नावांनीच पहिली आधुनिकता त्यांच्यार्पयत पोचवली असावी बहुतेक. रविना आठवीत शिकते. तिच्याशी बोलत असताना कळलं, अमरावती हे जिल्ह्याचं ठिकाणदेखील तिनं अजून पाहिलेलं नाही! जिल्ह्याचं मुख्य शहर तिनं अजून बघितलेलं नाही, पण गरिबांवर, आदिवासींवर होणारे अत्याचार तिला नवीन नाहीत. ती ते पाहतच मोठी झाली आहे. त्यामुळे ती कमालीची अस्वस्थ होते. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल तिला चांगलीच माहिती आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपणही पोलीस खात्यात जावं आणि सारा शिरस्ताच मुळापासून बदलून टाकावा असं तिने मनोमन ठरवलेलं दिसलं.
मोलमजुरी करणारे तिचे वडील सुंदरलाल जांबेकर यांनी तिच्या मनात या स्वप्नांची बिजं रोवली आहेत.
‘हे सगळं वाईट आहेच, पण तू एकटीनं ते कसं  काय बदलू शकशील?’ - असा तिच्या वयापेक्षा आणि अनुभवापेक्षाही मोठा प्रश्न तिच्याशी बोलता बोलता सहजच विचारला, तशी रविना म्हणाली, मे पुलिस अधिकारी बनना चाहता है. लडकियों को सताने वालो गुंडा लोगो को जेल में डालना चाहता है. सजा दिलाना चाहता है. देश के लिए कुछ करना है. पप्पा का इच्छा पुरा करना है. 
तिच्या उत्तरानं मी चमकलोच. 
 कोरकू आदिवासींची स्थानिक बोली वेगळी असलीं तरी मेळघाटातही आजकाल ‘हिंदी’ ही संपर्काची भाषा झाली आहे. त्यामुळे बहुतांश जण, विशेषत: नवी पिढी पाहुण्यांशी आणि परस्परांशीही हिंदीतूनच संवाद साधते. अर्थात त्यांच्या विशिष्ट ‘लहेजा’सह! ऐकताना आपल्याला ही भाषा ‘अशिष्ट’ वाटली, तरी ती त्यांच्यासाठी ‘शिष्टसंमत’ आहे.
रविनाला किरण बेदींसारखं वरिष्ठ पोलीस अधिकारी व्हायचंय हे ऐकल्यावर मी तिला पुढचा प्रश्न विचारला, ‘समजा झालीस तू पोलीस अधिकारी. मुलींवर अत्याचार करणारे गुंड तुला दिसले तर तू काय करशील? त्यांना भर चौकात मारशील, तुरुंगात धाडशील, की सव्र्हिस रिव्हॉल्व्हरनं उडवून देशील?’
- अचानक आलेल्या या प्रश्नानं रविना क्षणभर अंतमरुख झाली नि गंभीरपणो म्हणाली, मे उनको जेल भेजेगा! 
रविनाच्या मनात रुजलेली ही बिजं वैचारिक शिस्त आणि कायद्याच्या जाणिवेसह आकारास येऊ लागली आहेत. कुपोषण, दारिद्रय़ आणि अनारोग्यासाठीच कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटात उमटताना दिसणा:या या नव्या खुणा आश्वस्त करणा:या आहेत, हे नक्की! 
मेळघाटात चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांचा समावेश होतो. घाटांचा मेळ असलेल्या या भूप्रदेशात सागाचं घनदाट अरण्य आणि व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहे. दुर्मीळ प्रजातींसह अनेकानेक श्रेणींतील प्राणी-पक्षी या जंगलात आहेत. अनादि काळापासून या जंगलांच्या संरक्षकांची नि:स्वार्थी भूमिका निभावणारे आदिवासी ही या भागातील मुख्य लोकजमात. कोरकू आणि गोंड या जाती सर्वाधिक. सर्वाची घरं सारखीच. मातीची. रोजची गरजही तेवढीच. जगण्यापुरतं आणि आज जिवंत राहता येईल इतकं अन्न ! जंगलाच्या साहाय्यानं जगताना आपलं अस्तित्व टिकवणं आणि अशा ठिकाणी जगण्यासाठी आवश्यक असलेलं ‘जगण्याचं शिक्षण’ घेणं ही त्यांची मूळ प्राथमिकता. त्यामुळेच ‘व्यावहारिक’ शिक्षणाशी त्यांचं नातं कधी जुळलंच नव्हतं. तशी गरजही त्यांना कधी वाटली नव्हती. पण आधुनिक संदर्भामुळे त्यांचं जगणंही बदललं, जंगलातून त्यांना बाहेर यावं लागलं आणि ब:याचदा काढलंही गेलं. जगण्याचा आधारच गेल्यावर जाणतेपणी - कदाचित अजाणतेपणीही - शिक्षणाचं बोट त्यांना धरावं लागलं आहे. केकर्दा. बोरीसारखंच छोटंसं गाव. 8क् घरांमध्ये गाव संपतं. अख्खं गाव आदिवासी. गावात जिल्हा परिषदेची पूर्व माध्यमिक शाळा आहे. जाता जाता या शाळेतही डोकावलो. त्याच शाळेत छोटी ज्योतीही शिकते. ‘ज्यादा बोलती है’, तिच्या आई आणि आजीनं आधीच सांगितलं. ‘मे मॅडम बनना चाहता है.. तिच्याशी काहीही न बोलतासुद्धा तिनं स्वत:हूनच मला हे ऐकवल्यावर त्याचं प्रत्यंतर आलंच. लगेच म्हणाली, ‘मेरे भाई का नाम मैच रखेगा!’ तिला ‘मॅडम’च का बनायचं? - तर ‘हम पढेगा तो औरो को भी पढाएगा! हे तिचं उत्तर. आपल्या नवजात भावाचं नाव तिनं आधीच ठरवून ठेवलंय. दीपक! 
दीपकलाही ती आपल्याबरोबर शाळेत नेणार आहे. तो येईलच, असा तिला विश्वास आहे. नाहीच आला, कुरकुर केली तर धाकदपटशा दाखवणार; पण नेणारच! कारण तिला ‘मॅडम’ तर आपल्या भावाला गुरुजी (शिक्षक) बनवायचंय! 
घर आणि शेतीकामात मदत करणं, जंगलातून लाकडाच्या मोळ्या आणणं, मासे पकडणं किंवा लहान भावंडांना सांभाळणं. ‘मोठय़ा’ होईर्पयत मेळघाटातल्या मुलींची आत्ताआत्तार्पयत ही आणि एवढीच मुख्य जबाबदारी होती. पण मेळघाटातल्या नव्या पिढीतील मुलींना आता शिक्षणाचं महत्त्वही पटू लागलं आहे. घरातल्या दाणापाण्याचं सूत्र बिघडलेलं असलं तरी पोट मारून का होईना आईवडीलही मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्याचा फायदा मुलींनीही घेतला नसता तरच नवल. शिक्षणाची आस तर त्यांच्यात दिसतेच आहे, पण शिक्षणाची गोडीही निर्माण होतेय. त्यामुळेच त्या आता म्हणू लागल्यात. ‘हमें स्कूल जाना है. मॅडम (शिक्षिका) बनना है!.
मोगर्दा. धारणी तालुक्यातलं आणखी एक गाव. डोळ्यांत स्वपA घेऊन फिरणा:या आणि स्वपAांसाठी जगणा:या अनिताची तिथे ओळख झाली. ती आता दहावीत आहे. हिंदी सिनेमे तिला आवडतात. तिनं सिनेमे आणि त्यातली मुंबईदेखील ब:याचदा पाहिली आहे. त्यामुळे मुंबईविषयी तिला अपार आकर्षण आहे. एक बार मुंबई देखना चाहता है. समुद्र देखना है. रास्ते देखना है. बडे घर देखना है. आपलं हे स्वपA सत्यात उतरावं अशी आस अनिता बाळगून आहे, पण ‘मुंबई’, ‘बम्बई’ आणि ‘बॉम्बे’ ही वेगवेगळी शहरं असावीत, असाच अजूनही तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा समज आहे. झगमगत्या मुंबईचं चित्रपटांत दर्शन घेतलेल्या अनिताला जागेपणीही स्वपAं पडतात ती मुंबईचीच. ‘थोडय़ा वेळासाठी का होईना, उघडय़ा डोळ्यांनी मला एकदा मुंबई पाहायचीय. मुंबईचं ते रूप माङया डोळ्यांत साठवायचंय. बास! त्यानंतर आयुष्याकडून माझं वेगळं काही मागणं नाही!’, असं अनिता स्वप्नाळू डोळ्यांनी सांगते, तेव्हा शहरी आणि ग्रामीण भागातले सारे भेद गळून पडलेले असतात.
 
 
बदलाची चाहूल
 
गेल्या पाच-सात वर्षात मेळघाटातलं चित्र झपाटय़ानं बदलताना दिसतं आहे. 
आजी-आजोबा किंवा आई-वडील यांच्यापैकी कोणीही, कधीही शाळेत न गेलेल्या घरातील तिसरी पिढी पहिल्यांदाच शाळेत जाऊ लागली आहे. मेळघाटातल्या अनेक शाळांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. गावातला जो कोणी शिकलेला आहे, मग तो अगदी बाहेरून आलेला का असेना, डॉक्टर, शिक्षक, वनशिपाई किंवा पोलीस. या प्रत्येकाचंच गावात वजन. गावक:यांवर त्यांचा पगडाही मोठा. आपल्यालाही त्यांच्यासारखंच व्हायचं असेल, ‘मान-सन्मान’ मिळवायचा असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, याची खात्री आता आदिवासींना पटली आहे. मेळघाटातल्या मुलींनीही ते प्रत्यक्ष पाहिल्यामुळे शिक्षणाशी त्यांनी आपला मेळ घातला आहे. 
 
‘भूमका नही, डाक्टर बनेगा!
कमालीची अंधश्रद्धा हे मेळघाटाचं आणखी एक वैशिष्टय़! हाड मोडलेलं असो वा कुठलाही गंभीर आजार, डॉक्टरांऐवजी रुग्णाला एका धार्मिक इसमाकडे नेलं जातं. त्याला ‘भूमका म्हणतात. या भूमकावर आजही आदिवासींची प्रगाढ श्रद्धा आहे. त्याला जणू देवाचाच दर्जा दिला जातो. अधिका:यांनी डॉक्टरांकडे दाखल केलेले गंभीर रुग्णदेखील दवाखान्यातून भूमकाकडे नेले जातात, एवढं या भूमकांचं प्रस्थ.
पण प्रस्थापित धारणांनाही तडे जाऊ लागले आहेत. 
धारणी तालुक्यातील बेरदाबलडा गावी बलिता शिवलाल कास्देकर ही दहावीतील मुलगी भेटली. तिला अंधश्रद्धा मान्य नाहीत. त्याऐवजी शिकून तिला डॉक्टर व्हायचं आहे. तिचा भाऊ पोटाच्या दुखण्यानं बेजार होता. अमरावतीच्या डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केल्यामुळेच तो वाचला हे तिनं स्वत: डोळ्यांनी पाहिलेलं आणि अनुभवलेलं आहे. 
बलिता म्हणत होती, ‘मे डाक्टर बनेगा. जान बचाने के लिए! 
 
 
- गणोश देशमुख
(लेखक ‘लोकमत’च्या अमरावती 
कार्यालयात संपादकीय प्रमुख आहेत.)
ganesh.deshmukh@lokmat.com

Web Title: I want ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.