ओळख इतिहासकारांची

By admin | Published: June 22, 2014 01:02 PM2014-06-22T13:02:00+5:302014-06-22T13:02:00+5:30

पौर्वात्य जगाला भारतीय आणि चिनी समृद्ध अशी संस्कृती लाभली. इतिहासलेखनाचा प्रारंभ चीनमध्ये ग्रीकांच्या पूर्वी झालेला होता. चिनी लोकांना ऐतिहासिक दृष्टी होती. विल ड्युरंट चीनला इतिहासकारांचा स्वर्गलोक मानतात.

Identity historians | ओळख इतिहासकारांची

ओळख इतिहासकारांची

Next

 कन्फूशिअस

(इ. स. पूर्व ६ वे शतक)
 
पौर्वात्य जगाला भारतीय आणि चिनी समृद्ध अशी संस्कृती लाभली. इतिहासलेखनाचा प्रारंभ चीनमध्ये ग्रीकांच्या पूर्वी झालेला होता. चिनी लोकांना ऐतिहासिक दृष्टी होती. विल ड्युरंट चीनला इतिहासकारांचा स्वर्गलोक मानतात. चिनी इतिहासलेखन हे स्वयंप्रेरित आणि स्वयंप्रज्ञ आहे. प्राचीन काळातील चीनी लेखकाने दोन वैचारिक प्रवाह आढळतात पहिला तात्त्विक आणि दुसरा ऐतिहासिक. गतकालीन जीवनातून, घटनांतून अनुभवजन्य ज्ञान मिळते ते टिकविणे इतिहासलेखनाचे उद्दिष्ट ते मानतात. शासकीय सेवेसाठी इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे मानले गेले. त्यामुळे इ. स. ७व्या शतकात शासकीय स्तरावर इतिहासाचा स्वतंत्र कार्य विभाग स्थापन करण्यात आला. त्यामुळे चिनी इतिहासलेखनाला गती मिळाली. चीनमध्ये गतकालीन घटनांच्या स्मृती लोककथा, दंतकथा, मिथिके या स्वरूपात टिकविल्या गेल्या.
 
हा प्रख्यात चिनी तत्त्ववेत्ता. आपल्या पूर्वजांनी परंपरेचे जे धडे घालून दिले, त्यांचे योग्य आकलन आणि आचरण होण्यासाठी गतकाळाचा अभ्यास आवश्यक आहे, असे तो मानतो. आपले जीवन सुनियोजित व सुखकर होण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. त्याचे धडे त्याने शिष्यांना दिले. त्याने एकूण पाच पुस्तके लिहिली. त्यांतील दोन ग्रंथांचे स्वरूप इतिहास ग्रंथासारखे आहे. त्यांपैकी एकाचे नाव   'Ch' un- Ching  म्हणजे Spring and Autumn Annals  असून, इ. स. पूर्व ७२२ ते ४८४ या कालावधीतील १२ राज्यकर्त्यांच्या शासनाची माहिती त्यात दिली आहे. दुसरा ग्रंथ Shu-Chingl म्हणजे  Book of History हा असून, राज्यकर्त्यांच्या संभाषणांचा, आज्ञांचा, सरदारांशी केलेल्या करारांचा व इतर महत्त्वाच्या नोंदींचा तो संग्रह आहे. त्यात आदर्श राजाची प्रतिमा निर्माण करून ती विद्यार्थ्यांना समजावी म्हणून कथाही घातल्या आहेत. यामुळे तो खर्‍या अर्थाने इतिहास ग्रंथ ठरत नाही. त्यानंतर कन्फ्यूशिअसच्या  Book of History या ग्रंथावरील भाष्य करणारा एक ग्रंथ म्हणजे  TSO Chuan हा होता आणि दुसरा ग्रंथ Annals of the Bamboo Book हा होता. हे दोन्ही ग्रंथ कन्फूशिअसच्या नंतरच्या दुसर्‍या शतकात निर्माण झाले.
- प्रा. श्रुती भातखंडे
(लेखिका इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)

 

Web Title: Identity historians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.