IFC

By admin | Published: February 6, 2016 03:30 PM2016-02-06T15:30:29+5:302016-02-06T15:30:29+5:30

13 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणा-या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात मुंबईचे ब्रँडिंग ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र’ म्हणून करण्यात येणार आहे. न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूरसारख्या जागतिक महानगरांच्या थेट स्पर्धेत मुंबईला उभे करणा:या या महत्त्वपूर्ण स्थित्यंतराचा वेध..

IFC | IFC

IFC

Next

 श्रमिकांच्या मुंबईला जागतिक वित्त-व्यवहारांचे नवे पंख

 
- मनोज गडनीस
 
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर उतरले आणि पश्चिमेला बाहेर पडून वांद्रय़ाच्या दिशेला जायला निघाले, की गचाळ, अरुंद गल्लीबोळातून पाचव्या मिनिटाला हमखास लागणा:या सिग्नलवर रिक्षा थांबते. सिग्नल सुटला, रस्ता ओलांडला की मग नजरेत काय आणि किती साठवावे असे होऊन जाते.
त्याचे कारण वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचा परिसर! या जगात शिरताच कुणाही भारतीयाची नजर विस्फारतेच. 
मुंबईचा दक्षिणोपासून उत्तरेकडे जाणारा नकाशा काढला तर हृदयाच्या ठिकाणी येणारा हा बीकेसी. काचेच्या बंद कोशातल्या या इमारती बाहेरून थोडय़ा दडपणात टाकतात ख:या, पण भारताच्या या जागतिक चेह:याची ओळख आपल्याला सुखावून जाते. 
 उत्पादन क्षेत्रचा धडधडाट आणि कामगारांच्या घामाने भिजलेल्या मुंबईचा पहिला मेकओव्हर झाला तो बीकेसीच्या निर्मितीपासून. या नव्याने विकसित झालेल्या व्यापारी परिसराने 199क् च्या दशकात मुंबईच्या धनाढय़तेला एक श्रीमंती आणि आधुनिकतेचा साज चढवला. कुर्ला ते वांद्रा अशा पूर्व- पश्चिम विस्तीर्ण परिसराने मुंबईच्या उद्यमशीलतेला जागतिकतेचे परिमाण दिले. 
पाहता पाहता कफ परेड, नरिमन पॉइंट येथील कॉर्पोरेट मुंबईलाही बीकेसीच्या मोहिनीने आपल्या कवेत घेतले. 
शहराच्या मध्यभागी उभे राहिले, ते केवळ वर्षाला हजारो कोटी रुपयांचा कररूपी महसूल देणारे एक व्यापारी संकुल नव्हे, ही मुंबईच्या एका नव्या अवताराची नांदीच होती! या परिसराने व्यापारी मुंबईची ओळख ख:या अर्थाने कॉर्पोरेट केली..
आणि आता मुंबई पुन्हा एका मेकओव्हरच्या उंबरठय़ावर उभी आहे. हा मेकओव्हर आहे आधीच धावत्या मुंबईला अधिक गतिमान करणारा. या मेकओव्हरनंतरची मुंबई केवळ श्रमिकांच्या घामाची नसेल, तर सेण्ट्रलाइज्ड वातानुकूलित यंत्रंच्या गगनचुंबी थंडाव्यात जगभरातल्या कंपन्या आणि व्यापारी समूहांचे हजारो कोटींचे व्यवहार लीलया करणारी असेल..
आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून आकाराला येऊ घातलेली मुंबई आता लंडन, न्यूयॉर्क, सिंगापूर आणि दुबई यांना कट्टर टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहे. 
या बदलत्या चाहुलीचा वेध.
 
 

Web Title: IFC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.