Investment: प्रथमच गुंतवणूक करताय? मग या टिप्स वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:33 AM2022-08-28T11:33:23+5:302022-08-28T11:34:41+5:30

Investment: पैसे नेमके कोणत्या कोणत्या योजनांमध्ये गुंतवावेत, जास्तीत जास्त रिटर्न देणाऱ्या योजना कोणत्या आहेत तसेच कमी कालावधीत अधिक नफा कसा मिळवावा याची त्यांना माहिती नसते. त्यामुळे तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर या काही टिप्स...

Investing for the first time? Then read these tips... | Investment: प्रथमच गुंतवणूक करताय? मग या टिप्स वाचाच...

Investment: प्रथमच गुंतवणूक करताय? मग या टिप्स वाचाच...

Next

- चंद्रकांत दडस, उपसंपादक

अनेक जण गुंतवणुकीच्या पहिल्या टप्य्यात गोंधळून जातात. पैसे नेमके कोणत्या कोणत्या योजनांमध्ये गुंतवावेत, जास्तीत जास्त रिटर्न देणाऱ्या योजना कोणत्या आहेत तसेच कमी कालावधीत अधिक नफा कसा मिळवावा याची त्यांना माहिती नसते. त्यामुळे तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर या काही टिप्स...
गुंतवणूक योजना बनवा
पैसे गुंतवायचे आहेत असे तुमच्या मनात आल्यानंतर तुम्हाला त्यासाठी एक योजना तयार करावी लागेल. मी किती गुंतवणूक करू शकतो? मी काय गमावू शकतो? माझे गुंतवणुकीचे ध्येय काय आहे? ते ध्येय गाठण्यासाठी मी किती काळ गुंतवणूक करत राहणार आहे? हे प्रश्न स्वत:ला विचारून गुंतवणुकीला सुरुवात करा.
किती रिस्क घेऊ शकता? 
तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे समजून घ्या आणि गुंतवलेले काही किंवा सर्व पैसे गमावल्यास तुम्हाला कसे वाटेल याचाही विचार करा. प्रथमच गुंतवणूक करणारे सामान्यपणे एक चूक करतात ती म्हणजे नुकसानीची भीती ते घेतात. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत रिस्क असते. रिस्क घेतली तर फायदेही मिळतात.
विविध ठिकाणी गुंतवणूक? 
केवळ विशिष्ट बाजारपेठांमध्ये, क्षेत्रांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने नुकसान होऊ शकते. त्याऐवजी अनेक मालमत्ता निर्माण करणाऱ्या क्षेत्रात गुंतवणूक केल्याने संभाव्य तोटा कमी करण्यात आणि दीर्घकालीन परतावा वाढवण्यास मदत होते.
सतत गुंतवणूक वाढवा
एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा थोडी थोडी गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरते.  त्यातून रक्कम हळूहळू वाढत जाते आणि धोकाही कमी राहतो. बाजारातील चढउतार लक्षात घेत कमी वयात आणि नियमितपणे गुंतवणूक सुरू करून तुम्ही श्रीमंत होण्याकडे वाटचाल करू शकता. यात तुम्हाला लाखांचे कोटी कधी झाले हे कळणारदेखील नाही. मात्र त्यासाठी ध्येय आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय ठेवा. तुम्ही गुंतवणूक सुरू केल्यानंतर त्यातून फायदा नक्की मिळतो. तो फायदा पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी वापरा. त्यामुळे खात्यातील रक्कम गतीने वाढलेली पहायला मिळेल.
तुमच्या योजनेवर ठाम राहा
जेव्हा पहिल्यांदा गुंतवणूक करायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात येईल की बाजारातील चढउतार, महागाई, व्याजदर, लाभांश, सोन्याची किंमत, तेलाच्या किमती या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे फार कठीण आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर सतत लक्ष द्यायला हवे. तुमची गुंतवणूक शक्यतो दीर्घकालीन असावी, त्यातून चांगले रिटर्न मिळतील या शक्यतेने संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करा.

Web Title: Investing for the first time? Then read these tips...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.