बोलीनाटय़ाचे आयपीएल!

By Admin | Published: February 27, 2016 02:27 PM2016-02-27T14:27:34+5:302016-02-27T14:27:34+5:30

ठाण्यात नुकतेच 96 वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन झाले. मालवणी बोलीभाषेला प्रतिष्ठा मिळवून देणारे ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर अध्यक्षस्थानी होते. माझ्या बोलीभाषेनं जो बहुमान मला मिळवून दिला, तोच इतर मराठी बोलींनाही मिळावा यासाठी ‘बोलीनाटय़ा’ची ‘आयपीएल’ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या कल्पनेचा हा विस्तार..

IPL bidding! | बोलीनाटय़ाचे आयपीएल!

बोलीनाटय़ाचे आयपीएल!

googlenewsNext
>- गंगाराम गवाणकर
 
दर चार कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. पण या बदलत्या भाषेमध्ये त्या- त्या मातीतली महती आणि संस्कृतीही सामावलेली असते. 
त्या-त्या ठिकाणची बोलीभाषा, संस्कृती, परंपरा, पर्यावरण, खानपान. हे सारं म्हणजे त्या परिसराची जीवनशैलीच. ते त्यांचं सांस्कृतिक वैभव आणि त्यांचं वैशिष्टय़पूर्ण जगणंही. त्यांच्या बोलण्यातूनही ते डोकावतंच. 
प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळाच गोडवा असतो. तो अनुभवायचा तर तिथली वारी करण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय ती लज्जत समजणंच अवघड. पण सर्वानाच ते शक्य नाही, त्यामुळे या जीवनशैलीची ओळख सर्वाना करून देण्याची जबाबदारी येते ती कलावंतांवर. 
मी एक कलावंत आहे. माङया बोलीचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळेच मी ‘वस्त्रहरण’द्वारे मालवणी भाषेतील जगण्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मालवणीचा गोडवा नाटकाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला. नाटय़रसिकांसोबत अभ्यासकांनीही त्याचा आस्वाद घेतला. या नाटकानं, पर्यायानं माङया बोलीभाषेनंच नाटककार म्हणून मला प्रतिष्ठा मिळवून दिली. नाटय़संमेलनाचं अध्यक्षपद हीदेखील माङया बोलीभाषेचीच देण आहे. 
केवळ एका बोलीभाषेतलं सौंदर्य नाटकाच्या माध्यमातून मी जगासमोर मांडलं आणि नाटय़संमेलनाच्या सिंहासनावर जाऊन बसलो. 
हे झालं फक्त एका बोलीभाषेचं, पण महाराष्ट्रात तर अनेक अस्सल बोलींचा खजिना दडलेला आहे. या बोलीच त्या-त्या प्रांतांचं ख:या अर्थानं प्रतिनिधित्व करतात. विदर्भातली व:हाडी, झाडीबोली, खानदेशातील अहिराणी. अशा कितीतरी बोली. या बोली हेच आपलं खूप मोठं वैशिष्टय़ आणि वैभव, पण आपल्याला ते माहीत कुठे आहे? त्या-त्या भागातील लेखक आपापल्या बोलीत लिहितातही, पण त्या कलाकृती सर्वासमोर येतच नाहीत. 
वर्षभरात प्रत्येक बोलीभाषेतील किमान एक तरी कलाकृती सबंध महाराष्ट्राला बघता यावी. क्रिकेटमध्ये जशी ‘आयपीएल’ची संकल्पना आहे, तशीच एका वेगळ्या अर्थानं बोलीनाटय़ाच्या संदर्भातही ‘आयपीएल’ असावी अशी संकल्पना म्हणूनच मी मांडली आहे. ही केवळ एक स्पर्धा नसेल, तर त्या-त्या भाषेतल्या आणि प्रांतातल्या लोकसंस्कृतीचं ते आदानप्रदान असेल. संपूर्ण महाराष्ट्राचं ते सांस्कृतिक संचित असेल.
लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील बोलीभाषेतील नाटक दत्तक घ्यावं आणि ते सर्वदूर पोहोचवावं, असा प्रयत्न या उपक्रमामागे आहे. उद्देश फक्त नाटकापुरता मर्यादित नाही. बोलीभाषा जगल्या पाहिजेत आणि कलावंत म्हणून आपण त्या जगवल्या पाहिजेत, हादेखील हेतू आहेच. त्याविषयीचं चिंतन आता सुरू झालं आहे. लवकरच त्याला मूर्त रूप येईल अशी आशा आहे. 
महाराष्ट्राचा भौगोलिक व्याप खूप मोठा आहे. दर दहा मैलांवर भाषा बदलते. आगरी, कोळी, व:हाडी, झाडीबोली यांसह मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातल्या बोलींना स्वत:ची एक लय, ताल, गोडवा आणि त्यांचा स्वत:चा म्हणून एक अस्सल ठसकाही आहे. तीच तिथली संस्कृती आणि त्यांचं जगणंही बोलीभाषेत व्यक्त होताना मकरंद अनासपुरे, विदर्भातील भारत गणोशपुरे यांसारख्या काही कलावंतांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे आणखीही लेखक, कलावंत आहेत, पण त्यांना वाव मिळायला हवा, बोलीभाषेचा सुगंध सर्वदूर पसरायला हवा. 
‘बोलीभाषेच्या आयपीएल’मधून गावखेडय़ांतील कलावंतांनाही स्पर्धेच्या निमित्तानं एक हक्काचा रंगमंच आणि भाषेचे अभ्यासक, विद्याथ्र्याना एक वेगळं खाद्य मिळेल अशी अपेक्षा आहे. बोलीभाषांतलं सामथ्र्य खूप मोठं आहे. त्यासाठीच ‘बोलीनाटय़ा’चा आग्रह मी धरला आहे. या उपक्रमासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. त्यांना शासनाकडून नाटय़संमेलनासाठी जो 5क् लाखांचा निधी मिळतो, त्यापैकी सातआठ लाख रुपये या स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी त्यांनी जर बाजूला काढून ठेवले तर त्यातूनही बरंच काही साध्य होऊ शकेल. मराठी भाषा समृद्ध आहेच, या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक शब्दांचा, जगण्यातील संस्कृतीचा खजिनाही आपल्यापुढे खुला होईल. मराठी रंगभूमीसाठी ते मोठं संचित ठरू शकेल. 
बोलीभाषेच्या आयपीएलचं हे झाड आपण सर्वानी मिळून लावायचं आहे. भविष्यात त्याचं रूपांतर नक्कीच महावृक्षात होईल. त्यातून सबंध महाराष्ट्राला सांस्कृतिक मेजवानी मिळेल. 
प्रस्ताव तयार करणं, शासनाच्या प्रतिनिधींना भेटणं, सर्व बाबींची पूर्तता करणं, स्पर्धेचं प्रारूप ठरवणं, निधी गोळा करणं. यासाठी सर्वाचं सहकार्य अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींना मिळणारा आमदार-खासदार फंड सांस्कृतिक विकासासाठी खर्च होण्याचं प्रमाण तसं अल्पच आहे. लोकप्रतिनिधींना मिळणा:या निधीपैकी काही टक्के रक्कम या उपक्रमावर खर्च करण्याचं बंधन जर शासनानं घातलं तर त्यातूनही ‘बोलीनाटय़ा’ची ही चळवळ गावागावांत पोहोचू शकेल. एकसंध सांस्कृतिक महाराष्ट्रासाठी अशा चळवळी एक मोठं बलस्थान ठरेल.
 
 
काय आहे संकल्पना?
 
लेखकांनी आपापल्या बोलीभाषेत नाटकं, एकांकिका लिहाव्यात. त्या-त्या भागातील आमदारांनी त्याचं आयोजन करावं. सवरेत्कृष्ट एकांकिकांची दुसरी फेरी ‘खासदारांच्या’ मतदारसंघनिहाय, तर त्यानंतरची फेरी शासनाच्या वतीनं विभागीय स्तरावर व्हावी. विभागनिहाय सवरेत्कृष्ट एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडल्या जाव्यात. अंतिम फेरीतून प्रत्येक बोलीभाषेतून एक याप्रमाणो सवरेत्कृष्ट किमान पाचसात एकांकिका गवसतील. त्या वेगवेगळ्या महोत्सवांत, संमेलनांत सादर करण्यासाठी शासनानं शिफारस करावी. त्यातून बोलीभाषा तर महाराष्ट्राच्या कानाकोप:यांत पोहोचतीलच, पण मातीशी नाळ जोडलेले अस्सल लेखक, कलावंतही मिळतील.
 
शब्दांकन : महेंद्र सुके
mahendra.suke@lokmat.com
 

Web Title: IPL bidding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.