इसिसच्या महिला दहशतवादी

By admin | Published: October 3, 2015 10:48 PM2015-10-03T22:48:37+5:302015-10-03T22:48:37+5:30

इसिसच्या दहशतवाद्यांनी सगळ्या जगात धुमाकूळ घातलेला असतानाच आता त्यांची महिला विंगही झाली आहे. भारतातही त्यांचं जाळं विस्तारतं आहे.

ISIS women terrorists | इसिसच्या महिला दहशतवादी

इसिसच्या महिला दहशतवादी

Next
>- पवन देशपांडे
 
इसिसच्या दहशतवाद्यांनी 
सगळ्या जगात धुमाकूळ 
घातलेला असतानाच आता त्यांची महिला विंगही झाली आहे. 
भारतातही त्यांचं जाळं विस्तारतं आहे. 
मात्र ज्या इराकमध्ये इसिसनं धुमाकूळ घातलाय तिथल्याच महिलांनी आता त्यांच्याविरुद्ध शस्त्र हाती घेतलंय.
 
सलमान मोइनोद्दीन. नावात तसं काहीच नाही. उण्यापु:या बत्तीस वर्षाचा एका चांगल्या घरात वाढून इंजिनिअर झालेला तरुण. शिवाय यूएस-रिटर्न. हैदराबादेत हजीबनगरमध्ये राहणारा हा सलमान मायबापाच्या आशा-आकांक्षा पु:या करण्यासाठी पुन्हा यूएसला निघाला होता. त्याला ‘ग्रँड निरोप’ देण्यासाठी घरचे सारेच हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर आले होते. निरोप दिला आणि ते घरी परतले. पण तेवढय़ात सलमानचा फोन आला. माझी फ्लाइट मिस झाली.. घरचे पुन्हा विमानतळावर. पण त्याची फ्लाइट मिस झाली नव्हती, तर त्याला पोलिसांनी अटक केलेली होती. कारण तो होता एक धागा..
इसिस या महाभयंकर दहशतवादी संघटनेर्पयत पोहोचणारा धागा.. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिसमध्ये सामील होण्यासाठी त्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते आणि त्यामुळेच यूएसला न जाता तो दुबईची फ्लाइट पकडणार होता. त्याची ‘माशुका’ तिकडे दुबईत त्याची वाट बघणार होती. दुबईमार्गे मग तुर्की आणि नंतर सीमा ओलांडून तो थेट सिरियात पोहोचणार होता. पण त्याचे मनसुबे उधळले गेले. जानेवारीत अटक झाल्यापासून आतार्पयत त्यानं पोलिसांसमोर अनेक पत्ते उघड केले आहेत. जी माहिती त्यानं दिली ती भारतीय सुरक्षा व्यवस्थांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. 
अफशा जबीन. याही नावात तसं काहीच नाही. ऑनलाइन जगतात ‘निकी जोसेफ’ नावानं ओळखली जाणारी ही महिला आहे 37 वर्षाची. हीसुद्धा मूळ हैदराबादचीच. सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) वास्तव्यास होती. इतरांसारखीच हीसुद्धा तिकडे कामासाठी गेलेली. नावात असं विशेष काही नसलं तरी ‘कर्तृत्व’ मात्र ‘अतिरेकी’ होतं. ही दुबईत बसून इसिसचं काम करायची. जन्मानं भारतीय असलेली ही अफशा ब्रिटिश नागरिक असल्याचं भासवायची अन् ऑनलाइन जगतात तरुणांना भुरळ घालून इसिसकडे आकर्षित करायची. अबुधाबीत अटक करून सहकुटुंब प्रत्यार्पण करीत तिला भारताकडे सोपवण्यात आलंय. निष्पाप मुस्लीम तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसकडे आकर्षित करण्याची व त्यांना इसिसमध्ये भरती केल्याची कबुलीही तिने दिली आहे. 
सलमान आणि अफशा हे दोघंही हैदराबादचे. या दोघांचा थेट संबंध आला नव्हता पण अफशानं ऑनलाइन मार्गानं सलमानवर भुरळ पाडली होती. इसिसमध्ये सामील होण्यासाठी तिनं त्याला यूएसऐवजी दुबईच्या मार्गावर येण्याची गळ घातल्याचं सलमाननं चौकशीत सांगितलं आणि हैदराबाद पोलिसांनी यूएईच्या मदतीनं अफशाला गाठलं. इसिसमध्ये तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी महिलांचाही वापर करून घेतला जात असल्याचा नवीन पुरावा अफशाच्या रूपानं भारताच्या हाती लागला आहे. 
इसिससाठी काम करणा:या अशा असंख्य महिला जगभरात कार्यरत आहेत. थेट इसिसच्या म्होरक्यांच्या बायका बनून सिरिया आणि इराकमधून हे नेटवर्क हँडल करणा:याही महिलाही आहेत. यापूर्वी कोणत्याच दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारे महिलांची मदत घेतली नव्हती. अगदी अल् कायदानेही महिलांना आपल्या संघटनेत असे सहभागी करून घेतले नव्हते. पण इसिसने सगळ्यांना चकित करणारी स्ट्रॅटेजी आखल्याचं दिसून येतं. एका बाजूला त्यांना सर्व जगावर राज्य करायचं आह़े संपूर्ण जग ‘इस्लामिक स्टेट’ बनवायचं आहे, तर दुसरीकडे आपल्या कायद्यानुसार जगणारा समाजही निर्माण करायचा आहे. त्यासाठी त्यांना महिलांचा समावेश हवा आहे आणि म्हणूनच त्यांना शरण आलेल्या किंवा त्यांच्यात स्वत:हून सामील होण्यासाठी पुढे आलेल्या मुली/महिलांसाठी त्यांच्या संघटनेत ‘रेड कार्पेट’ टाकलेले असते. त्यांना कोणताही कर आकारला जात नाही, कोणतीही कमाई करावी लागत नाही, उलटपक्षी सगळ्या सोयीसुविधा फुकट दिल्या जातात. इसिसचा पगडा असलेल्या मुली/महिला मग इतर तरुणांना भुरळ घालण्यासाठी तर कामी येतातच; शिवाय दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालून नवीन समाजही वसवण्यासाठी वापरल्या जात आहेत. 
दुसरीकडे सोशल मीडियावर तरुणींना अधिकाधिक स्थान देऊन जगभरातील तरुणांना इसिसमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांचा वापर करून घेण्याचा इसिसचा मनसुबा वेळोवेळी दिसून आला आहे. ब्रोकिंग्ज इन्स्टिटय़ूटचा ‘इसिस टि¦टर सेन्सस’ हा अहवाल पाहिला तर लक्षात येतं की टॉप 2क् हजार टि¦टर अकाउंटपैकी 239 टि¦टर अकाउंट हँडल करणा:या महिलांनी त्यांच्या टि¦टरवरील नावाआधी ‘उम्म’ (अरबी भाषेतीला आई हा शब्द) किंवा ‘बिंट’ (मुलगी किंवा तरुणी) असं नाव लावलेलं आहे. म्हणजेच त्यांना त्यांची ओळख ‘महिला’ अशी करून द्यायची होती. सोशल मीडियावरील इसिसच्या पुरुष आणि महिलांचं प्रमाण हे सात पुरुषांमागे एक महिला असं असल्याचं दिसून येतं. जे. एम. बजर्र यांनी केलेल्या संशोधनात त्यांना 5क्क् महिलांचे ट्विटर अकाउंट इसिससाठी काम करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही ‘उम्म’ आणि ‘बिंट’ अशी त्यांची नावं दिसून आली आहेत. यावरूनच इसिसमध्ये स्वत:हून सहभागी असलेल्या किंवा इसिससाठी छुप्या पद्धतीनं काम करणा:या तरुणींची संख्या अधिक असल्याचं अधोरेखित होतं. 
ब्रिटनचे रहिवासी असल्याचं ऑनलाइन भासवायचं आणि दुबई, सिरिया किंवा इराकमधून ‘पोस्ट’ वा ‘टि¦ट’ करायचं, अशी या महिलांची खेळी असते. केवळ तरुणांनाच नव्हे तर जगभरातील तरुणींवर भुरळ घालून त्यांना ‘अल्लाह’साठी काम करायला या, जन्नतमध्ये जायचे असेल तर इसिसमध्ये या, अशा भूलथापा मारतात. या थापांना बळी पडून अनेक तरुणी या संघटनेत सहभागी झाल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, स्कॉटलंड, नायजेरियातील काही तरुणी अशाच प्रकारे इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी निघाल्याचं दिसून आलं आहे. काही मुलींनी तर तुर्कीमार्गे सिरियात प्रवेशही मिळवला आहे. 
अफशा वगळता भारतातील मुली इसिसमध्ये सहभागी झाल्याचं सध्यातरी उघड झालं नसलं तरी अनेक तरुण इसिसच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती अफशाने चौकशीदरम्यान दिली आहे. तब्बल 3क् तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या संपर्कात होते, असं तिनं पोलिसांना सांगितलं आहे. तिनं ज्या दिवशी ही कबुली दिली त्याच दिवशी आणखी चार तरुणांना दुबईतून परत पाठवण्यात आलं होतं. अफशाच्या रूपानं इसिसमधील एका भारतीय महिलेचा चेहरा समोर आला आणि अशा अनेक भारतीय मुली/महिला या मार्गावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यूएईशी चांगले संबंध प्रस्थापित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे प्रवेशद्वार काही प्रमाणात बंद केले आहे. त्यामुळे या मार्गानं इसिसकडे जाणा:या भारतीय तरुणांचा संशय येताच त्यांना परत पाठवलं जात आहे, पण अंतर्गत सुरक्षा आणि सोशल मीडियावर वॉच ठेवण्याचं महत्त्वाचं कामही सुरक्षा यंत्रणांना करावं लागणार आहे. तसेच इसिसच्या मार्गावर नेणारे असे किती जण भारतात कार्यरत आहेत, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. 
 
अफ्शाची धक्कादायक कबुली
 
- निकी जोसेफ नावाने दुबईतून काम करत होते.
- भारतातील 3क् पेक्षा अधिक तरुण आपल्या संपर्कात होते. 
- सलमान मोईनुद्दीनच्या साथीने इसिससाठी सोशल नेटवर्किगचा केला वापर.
- इस्लाम विरुद्ध ािश्चॅनिटी- फ्रेंडली डिस्कशन या नावाने फेसबुकवर ग्रुप केला होता. त्या ग्रुपला फॉलो करणा:यांची संख्या 5क् हजारांच्या घरात पोहोचली होती.
- गेल्या वर्षी इसिसच्या संदर्भातील मजकुराच्या कारणास्तव हे अकाउंट ब्लॉक करण्यात आले. पण वेगळ्या नावाने ग्रुप करून हाच उद्योग सुरू ठेवला. 
 
महिला अत्याचाराविरुद्ध महिलांची फौज!
तुम्ही आमच्या आयाबहिणींना नेलं. नको तेवढे अत्याचार केले. बलात्कार केले.. काहींना विकलं. काहींना नको असताना गरोदर केलं आणि त्यानंतरही बलात्कार केले.. पण आता बास्स. आता हे सहन केलं जाणार नाही. आता आम्ही तुमचा खात्मा करू.. असा निर्धार करणा:या महिला आहेत इराकमध्ये.. आश्चर्य वाटेल पण ज्या देशात इसिसनं धुमाकूळ घातलाय त्याच देशात महिलांची एक फौज निर्माण झाली आहे. दहशतवादाशी दोन हात करताना भल्या-भल्यांना मोठ-मोठय़ा शस्त्रंची गरज लागते. इथं मात्र याङिादी महिलांनी मिळून अशी एक फौज निर्माण केली आहे. जगातील सध्याची सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या इसिसशी दोन हात करण्यासाठी आणि प्रसंगी त्यांना गोळ्या घालण्यासाठी या महिलांच्या फळीने हाती एके-47 घेतली आहे. ‘सन गल्र्स’ असं या संघटनेचं नाव. इराकी गायिका ङोट शिंगली हिने जुलै महिन्यात कुर्दीश सरकारची परवानगी घेऊन ही संघटना उभी केली आणि त्याला इराकमध्ये आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कधी काळी ङोट शिंगलीच्या हाती गिटार असायची. याङिादी लोकगीतं गात आपल्या सुमधुर आवाजानं ती मंत्रमुग्ध करायची. आता हाती असते एके-47. तिच्या या संघटनेत 17 ते 3क् वयोगटातल्या 123 महिला हाती बंदूक घेऊन सज्ज आहेत. यात स्वखुशीनं महिला सहभागी होत आहेत. काही महिला तर कधीकाळी इसिसच्या ताब्यात होत्या. त्यांच्यावर अनन्य अत्याचारही झाले होते आणि त्याचाच बदला म्हणून त्यांनी ही ‘सन गल्र्स’ आर्मी निवडली. ङोट शिंगलीच्या मते आम्ही अजून फार ट्रेन नसलो तरी इसिससोबत दोन हात करण्यासाठी सज्ज आहोत. 
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: ISIS women terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.