पाऊस हा आणि तो.

By admin | Published: June 13, 2015 01:28 PM2015-06-13T13:28:22+5:302015-06-13T13:28:22+5:30

गावाकडचा पाऊस वेगाने येऊन घट्ट मिठी मारणार. श्वासात श्वास मिसळवणार. प्रकृतीची, शेतीवाडीची चौकशी करणार. शहरातला पाऊस ब्रेकिंग न्यूजमधून फ्लॅश होणारा. रस्त्यावरच्या खड्डय़ांत साचणारा. ‘सेल्फी’ मिरवणारा.

It's rain and it's so. | पाऊस हा आणि तो.

पाऊस हा आणि तो.

Next
>- कमलाकर पाटील
 
तसा खिडकीतून गजांची मर्यादा न मानता हाक मारणा:या पावसाचा आणि वा:यावर झुलणा:या भिंतीवरच्या कालनिर्णयाचा ‘रहो कनेक्टेड’ असा काही संबंध उरला नाहीये, पण तरीही पावसाने दारावर थाप मारली की, खिडकीत  येऊन बसणं होतं नि आभाळाकडे नजर फिरवताना गावाकडचा पाऊस आठवतो.
तसं पाहिलं तर हा काय नि तो काय? शहरातला काय नि गावाकडचा काय? पाऊस तोच. एकच, पण तरीही दोघांचं येणं, अनुभवणं वेगवेगळं. फरक दर्शविणारं. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या, सख्खे म्हटले जाणा:या, पण वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या दोन भावासारखं. दोघांची त:हा, मिजास, ओलेपण, परिणाम वेगवेगळाच.
शहरातला हा पाऊस स्वत:ची जाहिरात करणारा. बातम्यांमधून, ब्रेकिंग न्यूजमधून फ्लॅश होणारा. रस्त्यावरच्या खड्डय़ांत साचणारा. ‘सेल्फी’ मिरवणारा, तसा तो तारांबळ उडवतो. गटारी तुंबवतो. बेफिकीर रस्त्याचं, अलिप्त घरांचं ‘फेशियल’ करवणारा. शहरातल्या पावसाला स्वत:ची मिरवणूक काढायची भारी हौस. त्याला विचारलं तर तो म्हणतो, ही हौस नाही ‘फॅशन’ आहे आणि तीच आजची गरज आहे.
गावाकडचा तो पाऊस काहीसा वेगळा. त्याचं तसं नाही. त्याच्या डोक्यावर घराचं, गावाचं, प्रदेशाचं, देशाचं, माणसाचं, प्राण्याचं, पक्ष्यांचं पोटापाण्याचं ओझं पेलणार जबाबदारीच्या काठाचं मुंडासं. कपाळावर नांगरणी, वखरणी तथा तिफनच्या काळ्या हिरव्या चिंतेच्या रेषा. गावाकडचा पाऊस शहरातल्या पावसापेक्षा अधिक चिंताग्रस्त. समाधान एकच आणि ते असं की भलेही शहरातल्या पावसाने मानलेली नसेल, पण गावाकडच्या पावसाची शहरातल्याशी बांधिलकी. तो येणार. मातीच्या हातावर मेंदी काढणार. शहरातला पाऊस ‘टॅटूप्रेमी.’
गावाकडच्या त्या पावसाच्या कुशीत माती विसावते तेव्हा डोंगराला बापाचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान लाभतं. नदीला उधाण येतं. वात्रट असले तरी ओढय़ा-नाल्यालाही भरून येतं. माती कस्तूरी होऊन जाते.
त्या पावसाची भेट म्हणजे ‘शेकहॅण्ड इन् काँक्रीट जंगल’, ‘हाऊ डू यूडू?’ म्हणत तो पगारपाण्याची, शेअरबाजाराची, नफातोटय़ाची विचारपूस करणार तेही सुरक्षित अंतर राखून. 
गावाकडचा तो पाऊस भेटताना वेगाने येऊन घट्ट मिठी मारणार. श्वासात श्वास मिसळवणार. तो प्रकृतीची चौकशी करतो. शेतीवाडीचा बी-बियाणाचा, खता-मुताचा विचार मांडतो. सगेसोय:यांबाबत  चौकशी करतो. शहरातला पाऊस त्याचं तसं नाही. त्याचं एकमेव एकच, ‘मेरा घर मेरे बच्चे’.
शहरात छत्र्या रस्त्यावर येऊन पावसाचं ताळेबंदासह वेलकम करतात. गावाकडच्या पावसाचं असं बेगडी स्वागत कुणालाच जमत नाही. मुळात अंदाज घेणो, प्रयोजन करणं अशी त्याची प्लॅण्ड वृत्ती नसतेच मुळी. मट्रेलाची पोतडी, घोंगडी, प्लॅस्टिकचा कागद, हाताशी येईल तो कपडा, असं काहीही त्या पावसाला मान्य.
हा पाऊस संप, मोर्चा, उपोषणात हक्काच्या निमित्ताने सहभाग नोंदवतो. त्याचं काळ-काम-वेगाच्या सूत्रशी नातं. तो हिशेब करणार कॅल्सीवर. ङिारो प्लस ङिारो इक्वल टू ङिारो. तो एवढचं जाणतो, ‘श्रमाच्या मोबदल्यात पैसा’. तो बिल्डर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनला सामील.
गावाकडचा पाऊस तसा बेहिशेबी. त्याच्या श्रमाचं काही गणितच नाही आणि श्रम, मोबदल्याचं सूत्रीकरणही नाही. त्याचा हिशेबच अघळपघळ. हाताच्या बोटांवरचा, त्या हिशोबाला थुंकीचा ओलावा.
तो काय न् हा काय? दोघा पावसाला नाचण्याची, गाण्याची आवड. हा गाणार एखादं रिमिक्स तर तो गाणार ‘काया मातीत मातीत’.
शहरातल्या पावसाचा ओलेपणा टेम्पररी, मतलबी गॅरंटीचा, तसं त्या गावाकडच्या पावसाचं नाही. मतलबापोटी चिरीमिरी नाही.
दोन्ही पावसांना जिव्हाळा नक्की. त्याचा जिव्हाळा नाडीच्या कापडी पिशवीतला तर ह्याचा प्रिंटेड कॅरिबॅगमधला. तो धाब्यावर उडी मारणार. हा गच्चीवर. तो गळाला तरी त्याला साचवण्यासाठी घरात भांडीकुंडी. हा गळूच नये म्हणून वॉटर प्रुफिंग. हा येणार म्हणून चिमुकले गॅलरीत येऊन गाणार ‘रेन रेन गो अवे..’ त्याच्यासाठी ‘येरे येरे पावसा..’ वा ‘सांग सांग भोलानाथ..’
शहरातला नि गावाकडचा पाऊस दोन्ही धार्मिक, भावनिक. हा हजेरी लावणार ती एखाद्या सत्संगाला, एखाद्या कलामंदिरात वा नाटय़गृहात, तो भागवत कथा, ज्ञानेश्वरी सप्ताहात हजेरी लावणार. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ गाणार. ह्याच्यासाठी वृक्षारोपण नि फोटोसेशन. त्याच्यासाठी सर्व काही नॅचरल.
एवढं नक्की, तो असो वा हा. पावसाचे माणसावर उपकार ऋणमुक्त न करणारे.
‘असा पडावा पाऊस, 
रान सारे हिरवे व्हावे.. 
माणसासाठी माणसाने 
माणसाचे गाणो गावे..’

Web Title: It's rain and it's so.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.